पावसाच्या धुंद सरी,
सुगंध मातीचा दरवळलेला
साथ होती फक्त तुझीच,
सोबत निसर्ग हिरवळलेला.
तो पाऊसही गेला नि सहवासही,
हा पावसाळा एकांताचा होता.
निसर्ग तसाच नटलेला पण,
सोबतीला फक्त स्पर्श तुझ्या शब्दांचा.
ते शब्द तुझ्या वचनातले,
पावसात होते पुसून निघाले.
नशिबाबरोबर तुही पाठ फिरवलीस,
वचन फक्त मीच निभावले.
आता हा एकांत माझा,
साद तुला देत आहे.
उन्मत्तलेला हा वाराही,
स्पर्शून तुला येत आहे.
तो स्पर्श तुझ्या शब्दांचा,
डोळ्यांत आजही दाटून येतो.
चेहर्यावर ओघळणारा पाऊसच
फक्त, अश्रू माझे वाटून घेतो. ......
शुक्रवार, २९ मे, २००९
पावसाच्या धुंद सरी,
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
मुळातच साथ दिली नाही तर
मुळातच साथ दिली नाही तर,
प्रतिसादाची अपेक्षाच राहत नाही,
पण साथला प्रतिसाद मिळाला नाही तर,
अंतर तूटल्यावाचून राहत नाही.
मुळातच नात जमले नसेल तर,
तुटल्याच दुख होत नाही,
पण जमलेले नाते तुटले तर,
वेदनेस अंत राहत नाही.
पण अर्ध्यावर साथ तुटली तर,
आयुष्या पुढे रेटवत नाही
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
स्वत:हून जास्त प्रेम तुझ्यावर
स्वत:हून जास्त प्रेम तुझ्यावर
केले होते मी...माझे सर्वस्व अर्पण
तुझा भास..तुझा सहवास....
तुझ्याच प्रेमात पडले होते मी...
नाही कधी मिळाले मज काही
ना मिळाले काही मज आज..
स्वप्न रंगवत होते आपली...
पण स्वप्नांतील रंगच आज झाले नाहीसे...
खूप ठरवले होते मी स्वत:शीच
नाही पाहणार तुझ्याकडे कधीच
पण प्रेम होते तुझ्यावर आधीच
संपणार नव्हते ते आज व कधीच..
तू मला सोडून निघून गेलास
अश्रूंच्या ओंझळीत मला सोडून गेलास
मला विसरून जा म्हणतोस
मग का माझ्यासाठीच रडतोस ....
आज तो मला सोडून गेला होता
काळीज मज काढून निघून गेला होता
रंगहीन झाले मज आयुष्याचे चित्र आज
मरण सुद्धा मज नशीबात का नव्हते....
कारण जगले होते आयुष्य मी फक्त तुझ्यासाठीच..
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
काहीजण मैत्री कशी करतात?
काहीजण मैत्री कशी करतात?
उबेसाठी शेकोटी पेटवतात अन
जणू शेकोटीची कसोटी पहातात.
स्वार्थासाठी मैत्री करतात अन
कामाच्या वेळेस फ़क्त आपलं म्हणतात.
शेकोटीत अन मैत्रीत फ़रक काय?
दोन्हीपण एकच जाणवतात.
मैत्री करणारे खूप भेटतील
परंतू निभावणारे कमी असतील
मग सांगा, खरे मित्र कसे असतील?
कधी भांडणाची साथ, कधी मैत्रीचा हात
कधी प्रेमाची बात, अशी असते निस्वार्थ मैत्रीची जात
या मैत्रीचा खरा अर्थ केव्हा कळतो?
नेत्रकडा ओलावल्या अन शब्द ओठांवरच अडखळला
मित्र या शब्दाचा अर्थ तो दूर गेल्यावर कळला
आपल्यावर जीवापाड प्रेम करणारं
सुख-दु:खाच्या क्षणी आपल्या मनाला जपणारं
जीवनाला खरा अर्थ समजावणारं
अशी असते ती मैत्री ...........
लेबल: कविता , मराठी कविता , मराठी गोस्टी , मैत्री , Friendship , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
कधी पाहिलय मी तुला
कधी पाहिलय मी तुला
फुलपाखरु होऊन आकाशी उडताना
रडणा-या प्रत्येक चेह-यावर हसु वाटत फिरताना
कधी पाहिलय मी तुला
स्वप्न होऊन रंगताना
निराश झालेल्या दु:खी मनात
आशेचा नवा किरण भरताना
कधी पाहिलय मी तुला
आकाशी उडताना
इंद्रधनुष्यी त्या रंगात
अलगतपणे मिसळताना
कधी पाहिलय मी तुला
तिरस्काराने बेभान होताना
तप्त त्या अग्निरसात
सारं सारं वाहुन नेताना
कधी पाहिलय मी तुला
दु:खाच्या सागरात डुबताना
सारे अश्रु आतल्या आत
ह्रदयामध्ये लपविताना
कधी पाहिलय मी तुला
माझ्यामध्ये शिरताना
क्षणोक्षणी बरोबर माझ्या
माझ्यासाठीच जगताना .. .....
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , मराठी सण , मैत्री , Friendship , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
शब्द पुणेरी, अर्थ पुणेरी
शब्द पुणेरी, अर्थ पुणेरी
मराठीतले काही शब्द पुण्यात फारच वेगळ्या अर्थाने उच्चारले जातात. अशा काही शब्दांची ही डिक्शनरी
१.यंत्रणा : जाडजूड मुलगी
२.दांडीयात्रा : ऑफिसला सलग बुट्ट्या
३.पेटणे : संतापणे
४.हुकलेला : मुद्दाच न कळालेला
५.चैतन्यकांडी : सिगारेट
६.चैतन्यचूर्ण : तंबाखू
७.चेपणे : पोट भरून दाबून जेवणे
८.कल्ला : धम्माल
९.बुंगाट : (वाहनासंदर्भात) अतिशय वेगाने
१०.गाडी : टू व्हीलर
११.टांगा पल्टी, घोडे फरार : दारू पिऊन आउट होणे
१२.थुक्का लावणे : फसवणे
१३.एलएलटीटी : लुकिंग लंडन, टॉकिंग टोकियो (तिरळा)
१४.कर्नल थापा : थापाड्या माणूस
१५.सत्संग : ओली पार्टी .................
लेबल: कविता , मराठी कविता , वात्रटिका , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
बैचेन अशी होवू नकोस
बैचेन अशी होवू नकोस
मन भटकू देवू नकोस
मी येतोय तुझ्या जीवनात
माझी वाट तू पाहू नकोस
रस्त्याकडे डोळे लावू नकोस
भासांच्या मागे धावू नकोस
मी करेन तुझ्या ह्रदयात प्रवेश
मला इतरत्र तू शोधू नकोस
आरशात सारखं पाहू नकोस
ओठ आता रंगवू नकोस
मी जीवनचं तूझं रंगवून टाकेन
तू शरीर आपलं रंगवू नकोस
रात्र आता जागवू नकोस
जास्त विचार तू करु नकोस
मी येईन प्रत्यक्ष समोर तुझ्या
स्वप्नात मला तू शोधू नकोस
यापुढे...
तुझ्या ह्रदयाची धडधड मी असेन
तुझ्या स्वप्नातला राजकुमार मी असेन
तुझ्या आयुष्याचा सोबती मी असेन
तू आता तू नाहीस तर मीच असेन
दोनच पावलं एकटी चाल आता...
पुढच्या वळणावर उभा मी असेन...
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
ये जाणार्या क्षणा
ये जाणार्या क्षणा
थांब मी येतो
तिला अगदी शेवटचेच
डोळे भरुन पाहतो
बघ ती मला
परत भेटणार नाही
माझ्या आठवणीत ती
कधीच नटणार नाही
एकदा तिच्या नजरेत
मनभरुन पाहतो
ये जाणार्या क्षणा
थांब मी येतो
तिचे ते हासणे
परत दिसणार नाही
मी गेल्यावर ती
परत हसणार नाही
तिच्या त्या खळीला
एक नजर पाहतो
ये जाणार्या क्षणा
थांब मी येतो
माझ्या बाहुत ती
परत शिरणार नाही
माझा विरह ती
सहन करणार नाही
जाण्याआधी तिला मी
घट्ट मिठीत घेतो
ये जाणार्या क्षणा
थांब मी येतो
ये जाणार्या क्षणा
थांब मी येतो
तिला अगदी शेवटचेच
डोळे भरुन पाहतो
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
मी तिला विचारले किती गं करतेस माझ्यावर प्रेम,
मी तिला विचारले किती गं करतेस माझ्यावर प्रेम,
हसत म्हणाली माझ्या नजरेला जरा वाचत जा...
मी विचारले किती गं असे भेटायचे चोरून चोरून,
ती म्हणाली प्रेमात थोडासा धीर धरत जा...
मी म्हणालो आता मला तुझ्या साथीची गरज आहे,
ती म्हणाली त्यासाठी देवासमोर रोज हात जोडत जा...
मी म्हणालो खूप ओझं झालंय एकाकीचं आता,
ती म्हणाली अरे वेड्या मग आठवणी थोडंसं रडत जा...
मी म्हणालो अरे पापण्या ओल्या होतात विरहात तुझ्या,
ती म्हणाली मुखवटे घालून थोडंसं हसत जा...
मी म्हणालो ऋतू सुद्धा माझ्यावर हसतो आहे,
ती म्हणाली अरे मग एक छानसी गझल ऐकत जा...
मी विचारलं असतेस कुठे सध्या तू,
तेव्हा मात्र ती म्हणाली माझ्या श्वासांना तुझ्यातच कुठेतरी शोधत जा..
मी विचारलं हि कुठली रीत तुझी प्रेम करण्याची,
ती म्हणाली अरे प्रेमात कधी असाही एकमेव अनुभव घेत जा..
मी विचारलं आता किती वाट बघायची तुझी सखे,
ती म्हणाली नेहमीच तू तरसवतोस मला आता तू ही तरसून बघत जा..
मी विचारले मग पुन्हा नाही नां घडणार
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
एक प्रवास मैत्रीचा
एक प्रवास मैत्रीचा
एक प्रवास मैत्रीचा
जश्या हलुवार पावसाच्या सरीचा
टी पावसाची सर अलगद येउन जावी
अन एक सुंदरशी संद्याकल हळूच खुलुन यावी
एक प्रवास सहवासाचा
जणू अलगद पदानार्य गारांचा
न बोलताही बरच काही संगनारा
अन सप्र्षा न करताही अंगाला भीड़नारा
एक प्रवास शुन्याचा
जणू हिमालायाशी भीड़न्याचा
शुन्यातुन नवे जग साकारनारा एक प्रवास मैत्रीचा
जश्या हलुवार पावसाच्या सरीचा
टी पावसाची सर अलगद येउन जावी
अन एक सुंदरशी संद्याकल हळूच खुलुन यावी
एक प्रवास सहवासाचा
जणू अलगद पदानार्य गारांचा
न बोलताही बरच काही संगनारा
अन सप्र्षा न करताही अंगाला भीड़नारा
एक प्रवास शुन्याचा
जणू हिमालायाशी भीड़न्याचा
शुन्यातुन नवे जग साकारनारा
अन नव्या निर्मितीची चाहुल देणारा
एक प्रवास जगण्याचा
क्षणा क्षणाला मानुस घडवन्याचा
हसता हसता रडवनारा
अन रडउन हळूच हसवनारा
एक प्रवास प्रेमाचा
भुर भुर नर्या या दोन जिवांचा
जिंकलो तेर संसार मानडायाचा
अन हरलो तर नवीन वाटा शोध्याच्या
एक प्रवास प्रयत्नांचा
सुखा दुखातिल नाजुक क्षणांचा
अखंड घडवनार्या मानुस्किचा
अन नवी उमेद देणार्या घडींचा
एक प्रवास
तुमच्या आमच्या आवडीचा
साठवू म्हटले तर साठवनीचा
आठवू म्हटले तर आठवनीचा
लेबल: कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
आज खुप एकट-एकट वाटतय,
आज खुप एकट-एकट वाटतय,
जणु तुला शोधावस वाटतय,
नज़रेतुन तुला बघावस वाटतय,
मनातून थोडस रडावसही वाटतय…..
चिंब पावसात भिजावस वाटतय,
तुझ्या हाताला धरून नाचावस वाटतय,
ओल्या डोळ्यांनी तुला पहावस वाटतय,
पहाता-पहाता तुला सर्व काही सांगावस वाटतय…..
बेभान वारयाबरोबर धावावस वाटतय,
जगाला विसरून वेगळ काही कारावस वाटतय…..
पण....
सर्व काही नुसत वाटतच रहातय,
नसून सुद्धा ह्या इथे, तू असल्यासारखी वाटतेस ,
तुझ्याशिवाय मन जणु वेड होऊन रहातय,
हळव्या मनाला कुठेतरी समजवावस वाटत
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
भेटली आहेस तू अफवेप्रमाणे...
भेटली आहेस तू अफवेप्रमाणे...
कोण जाणे मी कुणाला बघत आहे ?
************ ********* ********* *****
चालताना ओळखीचे दार आले..
मी जरासा थांबलो! - चुकलेच माझे!
************ ********* ********* *****
बोलू कुणास देई आकांत हा सुखाचा?
मागेच दु:खितांचा टाहो मरून गेला!
************ ********* ********* *****
केव्हाच आसवांची गेली पुसून गावे..
स्वप्नामधेच माझा रस्ता सरून गेला
************ ********* ********* *****
मी क्षमा केल्यावरीही हाणली चपराक त्याने !
काय माझ्या मालकीचा एकसुद्धा गाल नाही ?
************ ********* ********* *****
मला ही जिंदगानीची नशा आता पुरे झाली,
जराशा झिंगण्यासाठी कधी मी पीतही नाही ......................
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
लाख क्षण अपूरे पडतात
""लाख क्षण अपूरे पडतात
आयुष्याला दिशा देण्यासाठी
पण, एक चुक पुश्कळ आहे
ते दिशाहीन नेण्यासाठी,,,,,,,,,,,,,,,,!
किती प्रयास घ्यावे लागतात
यशाचं शिखर चढण्यासाठी
पण, जरासा गर्व पुरा पडतो
वरुन खाली गडगडण्यासाठी,,,,,,,,,,,,!
देवालाही दोष देतो आपण
नवसाला न पावण्यासाठी
कितींदा जिगर दाखवतो आपण
इतरांच्या मदतीला धावण्यासाठी,,,,,,,,,!
किती सराव करावा लागतो
विजश्रीवर नाव कोरण्यासाठी
पण, जरासा आळस कारणीभूत ठरतो
जिंकता जिंकता हरण्यासाठी,,,,,,,!
कितीतरी उत्तरं अपुरी पडतात
आयुष्याचं गणित सुटण्यासाठी
कितीतरी अनुभवातनं जावं लागतं
आयुष्य कोडं आहे पटण्यासाठी,,,,,,,,,!
विश्वासाची ऊब द्यावी लागते
नात्याला जिवनभर तारण्यासाठी
एक अविश्वासाचा दगड सक्षम आहे
ते कायमचं उद्धवस्त करण्यासाठी.""
लेबल: कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
तुझं माझं मैत्र...
तुझं माझं मैत्र...
जीवनाच्या कागदावर रेखाटलेले एक चित्र...
भरलेले विविध भावनांचे रंग..
नारंगी बालपणातल्या मस्तीत दंग..
तो हळुवार रंगलेला हिरवा..
जणु सोबतीच्या आठवणीतला गारवा...
लाल लाल तारुण्यातला जोश...
तर प्रेमळ क्षणातला गुलाबी मदहोश....
ह्या छटा अनेक रेखाटलेल्या...
कधी रुसलेल्या कधी हसलेल्या...
गडद दु:खातल्या आधारासारखं...
तर सुखातल्या क्षणापरी हलकं...
सरळ आडव्या रेखांनी हे सांधलेलं...
अन वेग-वेगळ्या घटनांनी बांधलेलं...
तुझं माझं हे मैत्र...
एक नयन-रम्य चित्र....
विस्तारु याला अजून मोठं
राहून नेहमी एकत्र....
लेबल: कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
मराठी मुलगा
माझ्याबद्दल जितके सांगावे तितके कमीच!!!....त्यापेक्षा न सांगीतलेलेच बरे!!!!.....तरीही....
** मराठी मुलगा **
ओर्कुट वर अनेक मुले असतात,
पण जो मित्रांना स्क्रॅप मध्ये (प्रेमाने)शिवी घालुन,
मुलींशी मात्र सभ्य भाषेत बोलतो ,
तो मुलगा मराठी असतो...
ऑनलाईन अनेक मुले असतात,
पण जो ओफिस चे काम नीट करुन,
मित्र परिवाराशीही बोलतो,
तो मुलगा मराठी असतो...
मेल FWD अनेक मुले करतात,
पण जो मुलींना embarassing वाटेल असे काही FWD करत नाही,
तो मुलगा मराठी असतो...
चाट वर मोबाईल नंबर अनेक मुले मागतात,
पण जो 'I Respect your Privacy' म्हणून,
मुलींना फोर्स करत नाही,
तो मुलगा मराठी असतो...
Virtual चाट फ्रेन्डस अनेक मुले असतात,
पण जो 'Whts Real,Virtual ?..Friends Are Forever'असे म्हणतो,
तो मुलगा मराठी असतो...
माझ्याबद्दल इतकी माहिती पुरेसी आहे ना!!!!.......
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
मुली असतात फुलासारख्या ♥
मुली असतात फुलासारख्या ♥
♥ मुली लहान मुलासारख्या ♥
♥ त्यांच्या हसण्यान जगात बहार आहे ♥
♥ त्यांच्या रडण्यात मानवजतीची हार आहे ♥
♥ मुली म्हणजे relations ♥
♥ मुली म्हणजे emotions ♥
♥ छोट्या छोट्या गोष्टीनी हिरमुसनार्या ♥
♥ शंभर जन्म कुरबान अशा लाघवी रुसणार्या ♥
♥ मुली म्हणजे पाऊस ग्रीष्मातला ♥
♥ मुली म्हणजे मोर श्रावणातल्या ♥
♥ मुली म्हणजे ठसून सौंदर्य ♥
♥ मुली म्हणजे त्याग औंदर्य ♥
♥ मुली असतात softcorner ♥
♥ मुली असतात melting point ♥
♥ घसरत्या आमच्या career च्या मुळीच असतात turning point ♥
♥ त्यांच नुसात् smile देण म्हणजे आमच्यासाठी हर्षवायू ♥
♥ पण रुसण म्हणजे अर्धान्गवायू ♥
♥ मुली वाटतात हव्याहव्याश्या ♥
♥ मुली वाटतात आपल्याशा ♥
♥ आमच मन समजून घेणार्या ♥
♥ दुखात आम्हाला आधार देणार्या ♥
♥ कधी कधी त्यांच्या माझ्या नात्याला ♥
♥ काही नाव नसत पण तरही ते जपायच असत..... ♥मुली असतात फुलासारख्या ♥
♥ मुली लहान मुलासारख्या ♥
♥ त्यांच्या हसण्यान जगात बहार आहे ♥
♥ त्यांच्या रडण्यात मानवजतीची हार आहे ♥
♥ मुली म्हणजे relations ♥
♥ मुली म्हणजे emotions ♥
♥ छोट्या छोट्या गोष्टीनी हिरमुसनार्या ♥
♥ शंभर जन्म कुरबान अशा लाघवी रुसणार्या ♥
♥ मुली म्हणजे पाऊस ग्रीष्मातला ♥
♥ मुली म्हणजे मोर श्रावणातल्या ♥
♥ मुली म्हणजे ठसून सौंदर्य ♥
♥ मुली म्हणजे त्याग औंदर्य ♥
♥ मुली असतात softcorner ♥
♥ मुली असतात melting point ♥
♥ घसरत्या आमच्या career च्या मुळीच असतात turning point ♥
♥ त्यांच नुसात् smile देण म्हणजे आमच्यासाठी हर्षवायू ♥
♥ पण रुसण म्हणजे अर्धान्गवायू ♥
♥ मुली वाटतात हव्याहव्याश्या ♥
♥ मुली वाटतात आपल्याशा ♥
♥ आमच मन समजून घेणार्या ♥
♥ दुखात आम्हाला आधार देणार्या ♥
♥ कधी कधी त्यांच्या माझ्या नात्याला ♥
♥ काही नाव नसत पण तरही ते जपायच असत..... ♥
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
माझे मन मला सांगतय
माझे मन मला सांगतय
तुला यावेच लागेल
ठरव किती ही काही ही तू
तुला यावेच लागेल
प्रेम आहे तुझे माझ्यावर
तुला मानवेच लागेल
वेडा झालोय तुझ्या प्रेमात
तुला समजून घ्यावेच लागेल
लाख खोटे नकार दे तू
पण तुला हा म्हणावेच लागेल
प्रेम जर माझे खरे आसेल
तर तुला झुकावेच लागेल
माझे मन मला सांगतय
तुला यवेच लागेल
नाही जर आता आलिस
आयुष्य भर पाछ तावा लागेल
मी तर एकदाचा संपून जाईल
तुला रोज मरावे लागेल
सकाळ संध्याकाळी आठवणीत माझ्या
स्वताला जळावे लागेल
माझे मन मला सांगतय
तुला यवेच लागेल
प्रेम माझे खार आहे
तुला मानवेच लागेल
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते
आरक्त चेह~याने सांज ढळते
अन् पाखरांची किलबिल होते
घराकडे मी परतत असताना
आई तुझी खूप आठवण येते
तेच कुठेतरी सॅक फेकून देणे
तेच घाईघाईत कपडे बदलणे
अस्ताव्यस्त कपडे उचलताना
मात्र आई तुझी आठवण येते
एका हाताने बेसिनमध्ये भांडी धुनं
दुस~या हाताने कडवट चहा पिणं
तव्यातील चपाती जेव्हा करपून जाते
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते
पंख फुटल्यावर प्रत्येक पाखराला
आकाशी झेप तर घ्यावीच लागते
दमून जातो जेव्हा जीव पिल्लाचा
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते
आजही इथे साता समुद्रापार आई
कधीतरी डोळे भरून येतात अन्
पापण्यात तुझी मूर्ती उभी राहते
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते
लेबल: आई , कविता , मराठी कविता , Aai , Marathi Kavita , Marathi poem
1
Read more>>
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
रेवा वरदा, कृष्ण कोयना, भद्रा गोदावरी
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी
भीमथडीच्या तट्टांना या यमुनेचे पाणी पाजा
जय जय महाराष्ट्र माझा ...
भीती न आम्हा तुझी मुळी ही गडगडणार्या नभा
अस्मानाच्या सुलतानीला जवाब देती जीभा
सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा
दरीदरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा
काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी
पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेणी
दारिद्र्याच्या उन्हात शिजला, निढ़ळाच्या घामाने भिजला
देशगौरवासाठी झिजला
दिल्लीचेही तख्त राखितो, महाराष्ट्र माझा
जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा
"महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा " !!
लेबल: कविता , जय महाराष्ट्र , मराठी कविता , मी मराठी , Jay Maharashtra , Marathi Kavita , Marathi poem , Me Marathi
0
Read more>>
कपडे स्वच्छ ठेवून कधी, चिखलात पडता येत नाही
कपडे स्वच्छ ठेवून कधी, चिखलात पडता येत नाही
आरसा पुढे ठेवून स्वतः पासून दडता येत नाही
प्रेम आणि स्वात्यंत्र हे विरूध्दार्थी शब्द आहेत
पंखात पंख घालून कधी, गगनात उडता येत नाही
मनात जिद्द असेल तर "एव्हरेस्ट" सुद्धा पार होतो
मेलेल्या मनाला साधा, जिना चढता येत नाही
आयुष्य धरायला गेलात तर, चावतं एखाद्या कुत्र्यासारखं
पण पळून जाईल ह्या भितीने, त्याला सोडता येत नाही
पूल बांधा, धरण बांधा, कालवे काढा उपयोग नाही
जेव्हा तुम्हाला माणसाला, माणूस जोडता येत नाही
आले जर माझ्या डोळ्यात पाणी तर हारलो मी म्हणून दैव सुखावेल
म्हणूनच मला ईच्छा असून, मोकळं रडता येत नाही
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
अहो ऐकले का हा काय म्हणतो ते !!!!
अहो ऐकले का हा काय म्हणतो ते !!!!
अहो ऐकले का हा काय म्हणतो ते !!!!
याला म्हणे गर्लफ्रेंड च नाही
अहो का म्हनून काय विचारता ????
आज काल मूलीना आवडतात
smoke, drink करणारा
पण हा आहे निर्व्यसणी फक्त चहा घेणारा
आज काल मूलीना आवडतात
चार चौघात issue आन् भाण्डणे करणारा
पण हा आहे तिची तमा बाळगणारा,तिची लाज राखणारा
आज काल मूलीना आवडतात
स्वार्थी possesive,aggressive आन् Immotionally Blackmail करणारा
पण हा आहे सर्वाना मदत करणारा आन् तिची काळजी घेणारा
आज काल मूलीना आवडतात
खोटे बोलणारा आन् फसवणूक करणारा
पण हा आहे कायम खरे बोलणारा
या सर्व कारणा मुळे याला गर्लफ्रेंड च नाही
या सर्व कारणा मुळे याला गर्लफ्रेंड च नाही
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
सांत्वना
तु कळी, तुझे हे फ़ुलायचे गं दिवस
रडु नको मैत्रिणी सोडू नको गं आस
ते व्याकुळ डोळे थरथरणारे ओठ
ही कुणा कलीची तुला लागली दृष्ट
असतात जगी या काटे जागो जागी
प्रत्येकच जागी भेटतेच कुणि दुष्ट
पण फ़ुलेही असतील
पण फ़ुलेही असतील पुढचा कर तू प्रवास
रडु नको मैत्रिणी सोडू नको गं आस
आभाळ असे भरलेले दाटुन ओले
विज कडाडल्याविण बरसण्यास झालेले
वारा नाही, ना कसली चाहुल साथ
दिसतच नाही ना पुढली काही वाट
होईल मोकळे
होईल मोकळे, येईल ऊन भरास
रडु नको मैत्रिणी सोडू नको गं आस
पाठीवर माझा हात तुझ्या गं आहे
आपुली संगती जन्मभराची आहे
तू व्याकुळ होता पाझर माझा होई
तु तडफ़डताना मन हे गदगद होई
नसणार एकटी
नसणार एकटी कधी तू धर विश्वास
रडु नको मैत्रिणी सोडू नको गं आस
तु कळी, तुझे हे फ़ुलायचे गं दिवस
रडु नको मैत्रिणी सोडू नको गं आस
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
उशीर
जेव्हा तू ’त्या’ नावाने मारलीस गोंडस हाक
मी थरथर झाले होते कळलेच नाही तेव्हा...
जेव्हा तू नजरेने त्या अर्धा कटाक्ष फ़ेकला
मी थरथर झाले होते कळलेच नाही तेव्हा...
धडपडता मी, तु झटकन सावरले छातीपाशी
मी थरथर झाले होते कळलेच नाही तेव्हा...
जेव्हा तू सहजासहजी घेतला हात हातात
मी थरथर झाले होते कळलेच नाही तेव्हा...
मी सोडवला तो हात अन मागे नव्हते वळले
मी थरथर झाले होते कळलेच नाही तेव्हा...
मन मागे खेचत होते पावले जात वाटेने
मी थरथर झाले होते कळलेच नाही तेव्हा...
कळलेच नाही रे तेव्हा, ना तुला मला कॊणाला
मग उशीर हा होईल, कळलेच नाही तेव्हा...
लेबल: उशीर , कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
डोळ्यातील अश्रू पडतात
डोळ्यातील अश्रू पडतात
तेव्हा त्यांचा आवाज होत नाहि
याचा अर्थ असा नाहि की
तु दुरावल्यावर मला दुःख होत नाहि
शब्दांनाहि कोड पडावं
अशीही काही माणस असतात
किती आपलं भाग्य असत
जेव्हा ती आपली असतात
कुणीच आपल नसतं
मग आपण कुणासाठी असतो
आपलं हे क्षणिक समाधान
इथ प्रत्येक जण एकटा असतो
डहाळीवरूण ओथंबणारे पावसाचे थेंब
उगाचच का अडकून बसतात
काहि क्षण फ़ाद्यांशी नातं जोडून
किती निष्ठूरपणे सोडून जातात
नजरेत जे सामर्थ्य आहे
ते शब्दांना कसे मिळणार
पण प्रेमात पडल्याशिवाय
ते तुम्हाला कस कळणार
जिवनात काहितरी मागण्यापेक्षा
काहितरी देण्यात महत्व असत
कारण मागितलेला स्वार्थ
अन दिलेलं प्रेम असतं
शब्दांनी कधितरी
मझी चौकशी केली होती
मला शब्द नव्हे
त्यामागची भावना हवी होती
स्वप्नातील पावलांना
चालणे कधी कळलेच नाहि
पाऊलवाट चांगली असली तरी
पाऊल हे वळलेच नाही
अस्तित्वाची किंमत
दूर गेल्याशिवाय कळत नाही,
सगळ कळतय मला
पण तुला सोडून दुरही जाववत नाही..........
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
ऊठ बा मानवा
॥ हरि ૐ ॥
ऊठ बा मानवा
झुंजूमुंजू झाले
आता झुंजूमुंजू झाले
अवघे चैतन्य लेवूनी
सकळ ब्रम्हांड जागले
कोंबड्याने बांग दिली
पाखरांना जाग आली
गोठ्यातली कपिलाही
पाडसाला साद घाली
डोलु लागे शेत सारे
पांघरुनी गार वारे
लाजरीच्या पानांचेही
रोमांचित रोम सारे
उमलल्या जाईजुई
वात कसा गीत गाई
वनातल्या केकीलाही
नृत्याची जडली घाई
चेतावल्या दश दिशा
उजळल्या न्हाऊनीया
दवबिंदु प्राशुनिया
निशेला चढली नशा
उठीले कण नि कण
उठीलेही नारायण
तूच बा मानवा असा
करीसी कुठे परायण
वेळ असा कुणासाठी
नाही कधी रे थांबला
कालचक्राच्या फे-यात
थांबला तो संपला....
थांबला तो संपला....
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
काहीही बदललं तरी... हृदय अजून मराठी आहे...
काहीही बदललं तरी... हृदय अजून मराठी आहे...
विदेशी कपडे घातले... तरी हृदय अजून मराठी आहे...
तोडून तुटत नाहीत... या मजबूत रेशीम गाठी आहेत...
पिझा, बर्गर खाल्ल्यावरही... पोट पुरणपोळीच मागतं...
ईंग्रजी पुस्तकं वाचली तरी... मन मराठी चारोळीच मागतं...
मात्रुभूमि सोडली की... आईपासून दूर गेल्यासारखं वाटतं...
भाषा सोडली की... अस्तित्व हरवल्यासारखं वाटतं...
वडाची झाडं मोठी होऊनही... परत मात्रुभूमिकडे झुकतात...
कितीही दूर गेलं तरी... पाय परत मात्रुभूमिकडेच वळतात...
काहीही बदललं तरी... हृदय अजून मराठी आहे.............................
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
विडम्बन** आमचे ’ हे ’ रात्री अस्स्स्स्से घोरतात..**
विडम्बन** आमचे ’ हे ’ रात्री अस्स्स्स्से घोरतात..**
चोरी,दरोडे पडतात शेजारच्या घरी
आमच्या घरापासून चोर लांबच राहतात
अहो,पहारेकरी नाही काही दारी
आमचे हेच चोरांना पळवून लावतात
हत्यारांविना ते अशी करामत करतात
काहीच न करता , घरा उपयोगी पडतात..
सांगतांना बाईई लाज वाटते पण.......
आमचे हे रात्री अस्स्स्स्से घोरतात
अस्स्स्से घोरतात हो अस्स्स्से घोरतात..
जसे तोफांतून दारुगोळे सुसाट सुटतात
की चोर जीव घेऊन पळतच सुटतात
पळतच सुटतात हो धुम्म पळत सुटतात
आमचे हे रात्री अस्स्स्स्से घोरतात
रातराणी फुलते मागच्या अंगणी
चंद्र चांदण्यांचे झिम्मा फुगडी गुंजतात
अहो,छळायला नसतं कुणी एकांती
आमचे हेच युध्दाची तुतारी फुंकतात
चढत्या रातींची नशा उतरवतात
काहीच न करता , मला उपयोगी नसतात..
सांगतांना बाईई लाज वाटते पण.......
आमचे हे रात्री अस्स्स्स्से घोरतात
अस्स्स्से घोरतात हो अस्स्स्से घोरतात..
वैदूचे अंगारे,डॉक्टरचे फवारे सारेच फसतात
सारेच फसतात हो सारे उपायच फसतात
आमचे हे रात्री अस्स्स्से घोरतात
घोरतच राहतात हो घोरतच राहतात......
घर्र घ्व्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र घर्रर्र र घ्व्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
तुम्हाला एक प्रसंग सांगतो...........
तुम्हाला एक प्रसंग सांगतो...........
एकदा मला तो परमपिता परमेश्वर भेटला तेंव्हा मी त्याला सहजंच विचारलं....
तु सगळ्यात चांगली गोष्ट कुठली बनवलीस?"
"माणसाचे मन"...बाप्पा.
"आणि सगळ्यात वाईट गोष्ट?"...मी.
"माणसाचे मन"....बाप्पा खिन्न होत मला पुढे म्हणाला.....
"ऐक, मी एक कुबेर बनवला होता...त्याच्याकडे जगातली सगळ्यात जास्त संपत्ती होती, पैशाची.
मी तुला बनवला अन आता तुझ्याही वाट्याला संपत्ती येतीये, माणसांची..........
लक्षात ठेव, एक माणूस हा कुबेराच्या संपत्तीच्या दसपट मोलाचा असतो...........
मनं जप, मनं जोड, माणसं मिळव.......
विचार कर.........."
सिगारेटीचं थोटुक पायाखाली विझवत बाप्पा चालता झाला अन,
माझ्या मनात ठिणगी टाकून गेला.............
तेंव्हापासून हे वेड लागलंय...........
आज एक एक करुन मोती जुळवतोय, माणसं जोडतोय,
खरेच पुन्हा कधी बाप्पा भेटला तर त्याला सांगण्यासाठी,
की मी खरेच तू सांगितलेले काम करतोय.........
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
गोकुळाष्टमी...
फोड नैराश्येची मटकी कान्हा
मिळव सुख-आनंदाचा काला
"बजरंग बली की जय" म्हणोनी
आला यशोदेचा कान्हा आला
अवघे जागले गोकुळ
रात अष्टमीची होती
वाजली यमुनेस बासरी
ती कान्हाचीच होती
आला यशोदेचा कान्हा आला.
मोर मुकुट पितांबर ल्याला
मथुरेत मोठा गलबला झाला
सांभाळा मटकी गोविंदा आला
सावळे सुंदर रुप मनोहर
गोपींच्या जीवा लावे घोर
दहि दुधावर त्याची नजर
धन्य गोपिका धन्य चराचर
नाचे निल घन तन, नचें यदु नंदन.
नाचे सखे सवंगडी,नाचे सारे वृंदावन.
धन्य यशोदा, धन्य सारे वृंदावन.
गोजि~या, लडिवाळाच्या लिला पाहुन
लेबल: कविता , मराठी कविता , मराठी सण , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
नवरात्र
॥ हरि ૐ ॥
नवरात्र
घटी बैसे आदिमाया
नंदादीप नऊ दिस
नवान्नाने तृप्त झाला
झळाळतो अश्विन मास
दाट काजळी अंधार
कृष्णमेघ आले आले
भिजे हस्ताचे नक्षत्र
घट माळ ओले ओले
वृक्ष तरू लता वेली
तृप्त काळोख हिरवा
गारव्याने शहारतो
पानी कंटक बरवा
निवडंगांचे उंच फ़डे
एकाकी सुन्न रान
वेळूतून लहरते
शिळभारी मंद गान!
वेळूच्या बनी बाई
सखा कान्हुला राहतो
आकाशी तेज वीज
तेथे राधेला पाहतो
नवराती रातभर
राधा नाचली नाचली
तिच्या अंगोअंगी भिने
घननीळ्याची मुरली!
लेबल: कविता , नवरात्र , मराठी कविता , मराठी सण , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
हेही कळतं आहे
हेही कळतं आहे
आयुष्यं एक प्रवाहच आहे
आयुष्यं आहे थांबलेल
तरी,वाट ही बोलवतेचं आहे
विसरायचे कसे मी
घडले ते एक सत्यच आहे
स्वप्ने सुंदर सजली
पणं,ती अजून सुनीच आहे
जगतो ज्या श्वासांवर मी
कर्जाच ते ही एक ओझच आहे
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
फुले शिकवतात......,
गुलाब सांगतो,
येता जाता रडायचं नसतं,
काट्यात सुध्दा हसायचं असतं;
रात रानी म्हणते,
अंधाराला घाबरायचं नसतं,
काळोखात ही फुलायचं असतं;
सदाफुली सांगते,
रुसुन रुसुन रहायचं नसतं,
हसुन हसुन हसायचं असतं;
बकुळी म्हणते,
सवळ्या रंगाने हिरमुसायचं नसतं,
गुनाच्या गंधाने जिंकायचं असतं;
मोगरा म्हणतो,
स्वत:चा बडेजावपणा सांगायचा नसतो,
सदगुनांचा सुगंध मैलवरुन ही येतो;
कमळ म्हणतो,
संकटात चिखलात बुडायचं नसतं,
संकटांना बुडवुन फुलायचं असतं.
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
प्रवासात सगळेच अनोळखी असतात
प्रवासात सगळेच अनोळखी असतात
म्हणून प्रवास टाळायचा नसतो
कारण त्यातला एखादा प्रवासी
आपल्यासाठी थांबलेला असतो
जीवनात सगळंच मिळत नाही
म्हणून प्रयत्न सोडायचा नसतो
कुठल्यातरी वळणावर
आपला वाट पहाणाराही असतो
एखाद्याला आपलं करता आलं नाही
म्हणून जीव जाळायचा नसतो
जीवनच संपल्यावर आपण
त्या व्यक्तिच्या सहवासालाही मुकतो
जगण्याचे संदर्भ असे क्षणाक्षणाला बदलतात
म्हणूनच माणसे उमलतात आणि फुलं कोमेजतात....
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
युगा युगां ची नाती
ह्ळव्या प्रेमाची महती
सागर ही थांबे तेव्हा
त्या एका थेंबासाठी...
आधीर्या लहरी तलवारी नाचती
मेघांच्या मनी कसे सात रांग ह सती
वारी हळवा झुळू झुळु वाहतो
मोहरू न पाण्यामध्ये प्रतिबिंब पाहतो
हवा ही सागराला साद देते....
ही युगा युगां ची नाती
ह्ळ व्या प्रेमाची महती
सागर ही थांबे तेव्हा
त्या एका थेंबासाठी....
रूपेरी वाळूवरी सोनियचा बंगला
बांध ताना प्रीती मध्ये जीव माझा गुंतला
सागरी तळाशी एक वेडा शिंपला
घरकूल मोतियांनी सजवाया थांबला
देणा प्रेमधारा तूच मोहिनी....
ही युगा युगां ची नाती
ह्ळव्या प्रेमाची महती
सागर ही थांबे तेव्हा
त्या एका थेंबासाठी
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
गालावरी खळी डोळ्यात धुंदि
गालावरी खळी डोळ्यात धुंदि
ओठावर खुले लाली गुलाबाची
कधी कुठे कसा तुला सांग भेटू
वाट पाहतो एका ईशा-याची
जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू
माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे
कोणताहा मौसम मस्त रंगाचा
तुझ्यासवे माझ्या जिवनी आला
सुने सुने होते किती मन माझे
आज तेच वाटे धूंद मधुशाला
जगण्याची मज आता कळते मजा
नाहि मी कोणाचा आहे तुझा
सांगतो मी खरे खुरे तुझ्यासाठी जीव झुरे मन माझे थरारे
कधी तूझ्या पुढे-पुढे कधी तुझ्या मागे-मागे करतो मी ईशारे
ए जाऊ नको दूर तू
जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू
माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे
तुझ्या पापण्यांच्य़ा सावलीखाली
मला जिंदगीही घेऊनी आली
तुझ्या चाहुलीची धुन आनंदि
अंतरास माझ्या छेडूनी गेली
जगण्याची मज आता येई मजा
तू माझे जिवन तू माझी दिशा
आता तरी माझ्यावरी कर तुझी जादूगीरी हुर-हुर का जिवाला
बोल आता तरी काहि तरी भेट आता कुठे तरी कसला हा अबोला
ए जाऊ नको दूर तू
जाऊ नको दूर तू, अशी ये समोर तू
माझा रंग तू घे, तूझा रंग मला दे
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
सुंदर नाजूक उठून दिसेल ती,
सुंदर नाजूक उठून दिसेल ती,
गालावर सुरेख खळ पडून ह सेल ती,
कारण नसताना खोटी च रुसेल ती,
काय माहीत कशी असेल ती ????
एकुलती एक सर्वात थोरली असेल ती,
नाहीतर कदाचित धाकटि असेल ती,
संसार कसा संभाळेल ती,
काय माहीत कशी असेल ती ????
फॅशेन करील की संस्कृती पाळेल ती,
परंपरा जोडेल की परंपरा तोडेल ती,
संसाराचा पसारा कसा आवरेल ती,
काय माहीत कशी असेल ती ????
थोडी नखरेल असेल का ती,
हुशार समजूतदार सुगरण असेल का ती,
एक संमज्स अर्धांगिनी शोभेल का ती,
काय माहीत कशी असेल ती ????
एवढ छोट आयुष्य सहज जागेल का ती,
आभाळ एवढ दुख सहज सोसेल का ती,
दुखात ही न तुटता हसेल का ती,
काय माहीत काही असेल ती ??????????
कोणी संगेल का ???????????
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
तुझ्या हसण्याच गंध
माझ्या गाली यावा,
तुला फुलवेल तो कुन्द गारवा
मलाही छेडावा,
तुझे असावे झुलणे
सदा सौख्यासंगे
तुला दुखवेल असा शब्द
माझ्या ओठी न यावा.
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
त्याला पाऊस आवडत नाही,
ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो.
मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही,
असलं तुझ गणित खरच मला कळत नाही.
पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ,
पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ.
पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी
पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी.
पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच,
पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात.
दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं
दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं.
पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं
पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते
पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते.
पावसासकट आवडावी ती म्हणूण ती ही झगडते.
रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात.
त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात.
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
डोळ्यातील अश्रू पडतात
तेव्हा त्यांचा आवाज होत नाहि
याचा अर्थ असा नाहि की
तु दुरावल्यावर मला दुःख होत नाहि
शब्दांनाहि कोड पडावं
अशीही काही माणस असतात
किती आपलं भाग्य असत
जेव्हा ती आपली असतात
कुणीच आपल नसतं
मग आपण कुणासाठी असतो
आपलं हे क्षणिक समाधान
इथ प्रत्येक जण एकटा असतो
डहाळीवरूण ओथंबणारे पावसाचे थेंब
उगाचच का अडकून बसतात
काहि क्षण फ़ाद्यांशी नातं जोडून
किती निष्ठूरपणे सोडून जातात
नजरेत जे सामर्थ्य आहे
ते शब्दांना कसे मिळणार
पण प्रेमात पडल्याशिवाय
ते तुम्हाला कस कळणार
जिवनात काहितरी मागण्यापेक्षा
काहितरी देण्यात महत्व असत
कारण मागितलेला स्वार्थ
अन दिलेलं प्रेम असतं
शब्दांनी कधितरी
मझी चौकशी केली होती
मला शब्द नव्हे
त्यामागची भावना हवी होती
स्वप्नातील पावलांना
चालणे कधी कळलेच नाहि
पाऊलवाट चांगली असली तरी
पाऊल हे वळलेच नाही
अस्तित्वाची किंमत
दूर गेल्याशिवाय कळत नाही,
सगळ कळतय मला
पण तुला सोडून दुरही जाववत नाही..........
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
आज का मला एकटा वाटताय ??
आज का मला एकट वाटताय
तसे बरोबर होतच कोण कधी.
आज का मोडल्यासारख वाटताय तसे
बांधून ठेवला होतच कोणी कधी
हा असे चालताना अपेक्षाना मार्ग
पूर्णत्वाचा सापडला नाहीच कधी.
त्या माणसपेक्षा त्च्या यातना किती
प्रामाणिक होत्या.
प्रेत्येक वेळी माझ्या बरोबर तरी त्या होत्या.
आता मी ठरविले तुझ्या आठवणीमुळे
माझ्या अश्रूना नाही दुखवायचे.
किती तरी वर्षे माझ्या बरोबर आहेत ते तुझ्या नंतर
मग आता का देऊ मी त्यांना अंतर.
अगणित दिले यांनीच मला बळ
पडल्यानतर उठण्यासाठीच दिला सगळा वेळ.
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
मला उमगलेली मैत्री
एक बिंदु आणि अनेक मिळालेले सेतु
पार पाडावा अगदी जणु सराव रोजचा
मैत्री....
एक बगीचा मनात सदैव फ़ुलणारा
माळी होऊन घ्यावी जीवापाड काळजी
मैत्री....
एक धागा सरळ रेशमी मऊसुत जसा
जास्त ताणला तर तुटतो बघा ना कसा
मैत्री....
एक रोपटे अबोलीचे प्रत्येकाच्या दारातले
फ़ुले मुक हसती पाणी पिताना ओन्जळीतले
मैत्री....
एक सुगन्धी दरवळणारे लिहलेले पत्र
खुशालीसाठी उशीराही का होईना नाही पाठवावे मात्र
मैत्री....
एक नात कसल्याही मोहात न अड्कणारे
निरागसता जपताना खळखळुन हसवणारे
मैत्री....
एक आनंदाचे झाड हक्काच्या अंगणातले उभे
ऊन वारा सारे झेलुनही कधीही न वाकणारे
मैत्री....
एक अनमोल शिंपला अवचित हाती मिळालेला
घाई नको उघडाया अलग़द उघडा लख्ख प्रकाश देणारा 'मोती'आला का हाती
लेबल: कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
गार वारा हा भरारा
रानी वनी, पानोपानी, मन पाऊस पाऊस ॥धृ.॥
माती खाली खोल खोल, ओल मातीच्या मनास
मातीवर थरथरे, ओला सुवास सुवास ॥१॥
पावसाळी पायवाटा, जरा उदास उदास
दाही दिशांत पाखरे, जणू आभास आभास ॥२॥
रान मोकळे मोकळे, बघे भारुन नभास
त्याचा हिरवा हिरवा, आज प्रवास प्रवास ॥३॥
****************************************
रिमझिम धून, आभाळ भरुन
हरवले मन, येणार हे कोण ? ॥धृ.॥
मन फुलांचा थवा, गंध हा हवा हवा
वाहतो वारा नवा, जुन्यात हरवून ॥१॥
गूज मनीचे मनाला, आठवूनी त्या क्षणाला
सांगावे का माझे मला, उगाच मनात बावरुन ॥२॥
वार्यात गाणे कुणाचे, गाण्यात वारे मनाचे
मनाच्या वार्यात आता, सुरात तुला मी कवळून ॥३॥
****************************************
झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले
चिंब मनी आज पुन्हा, आठवूनी मेघ जुना कोणी भिजलेले ॥धृ.॥
वार्यातूनी, पाण्यातूनी, गाण्यातूनी भिजला
पाऊस हा माझा तुझा, आता ऋतू सजला
गंध असे, मंद जणू, होऊनिया थेंब जणू, आता टपटपले ॥१॥
पाऊस हा असा, झाला वेडापिसा, पानाफुलांत पुन्हा
खूप जुन्या आज पुन्हा, डोळयात थेंबखुणा
होऊनिया धुंद खरे, आज पुन्हा गार झरे येथे झरझरले ॥२॥
काही कळया, काही फूले, काही झूले हलले
काही मनी, काही तनी, काही नवे फुलले
वावरुनी आज कुणी, सावरुनी आज कुणी, येथे थरथरले ॥३॥
लेबल: कविता , गारवा , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
गारवा, वार्यावर भिरिभर पारवा, नवा नवा
प्रिये नभात ही चांदवा नवा नवा ॥धृ.॥
गवतात गाणे झूलते कधीचे
हिरवे किनारे हिरव्या नदीचे
पाण्यावर सरसर काजवा नवा नवा
प्रिये मनात ही ताजवा नवा नवा ॥१॥
आकाश सारे माळून तारे
आता रुपेरी झालेत वारे
अंगभर थर थर थर नाचवा नवा नवा
प्रिये तुझा जसा गोडवा नवा नवा ॥२॥
लेबल: कविता , गारवा , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
पुन्हा पाऊस
तिचे माझे सारेच पावसाळे, माझ्या मनात भिजून जातात
पुन्हा पाऊस ओला ओला, पुन्हा पाऊस बांधून झूला
तिच्याकडले उरले झोके, परत करतो माझे मला
पुन्हा पाऊस खूप ऐकतो, पुन्हा पाऊस खूप बोलतो
त्याच्या माझ्या गप्पांमधले तिचे थेंब अलगद झेलतो
पुन्हा पावसाला सांगतो मी, पुन्हा पावसाशी बोलतो मी
माझे तिचे आठवण थेंब, पुन्हा पावसालाच मागतो मी
लेबल: कविता , गारवा , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
पाणी झरत चालले
पावसाला पावसाने वर ढगात गाठले.
पाणी झरत चालले झाड झाडाच्या मीठीत,
आता झाडाच्या भवती रान आगीच्या ढगीत.
पाणी झरत चालले नदी सागर भरती,
वाळू ओलावली सारी दोन्ही किना-यावरती.
पाणी झरत चालले उभ्या रानाला तहान,
आता किलबिलताहे झाडाझाडातून पान.
पाणी झरत चालले आज आभाळ फाटले,
पावसाला पावसाने वर ढगात गाठले.
लेबल: कविता , गारवा , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
गारवाची गाणी
पहिली माती... पहिला गंध
पहिल्या मनात... पहिलाच बंध
पहिलं आभाळ... पहिलं रान
पहिल्या झोळीत... पहिलच पान
पहिले तळहाथ... पहिलं प्रेम
पहिल्या सरीचा... पहिलाच थेंब
पहिलाच पाऊस... पहिलीच आठवण
पहिल्या घराचं... पहिलच अंगण
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळं पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?
वार्याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड,
समुद्रावर ये
तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी रहा
वाळू सरकेल पायाखाली,
बघ माझी आठवण येते का?
मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे
चालत रहा पाऊस थांबेपर्यत, तो थांबणार नाहिच,
शेवटी घरी ये
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस,
पुन्हा त्याच खिडकीत ये
आता नवर्याची वाट बघ,
बघ माझी आठवण येते का?
दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला तुझ्या भिजण्याचं कारण,
तू म्हणं घर गळतयं
मग चहा कर, तूही घे
तो उठून पंकज उधास लावेल, तो तू बंद कर
किशोरीचं सहेलारे लाव,
बघ माझी आठवण येते का?
मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल,
म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं
विजांचा कडकडात होईल, ढ़गांचा गडगडाट होईल
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्या शरीराकडे बघ
बघ माझी आठवण येते का?
यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी,
बघ माझी आठवण येते का?
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
पाऊस वेगळा होता
जो काल इथे आला तो
पाऊस वेगळा होता
आभाळ निराळे होते
तो मेघ वेगळा होता
...
वेचली फुले थेंबांची
ओठही फुलांचे होते
डोळ्यात पावसामधला
निथळता जिव्हाळा होता
...
पाऊस असा आला की
अद्याप थांबला नाही
या अशा पावसासाठी
सोसला उन्हाळा होता
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
हळुवार पावलांचा
दारास भास आता हळुवार पावलांचा
गवतास थेंब सारे बिलगुनी बैसलेले
नितळुन साचलेले नितळुन साचलेले
तळवा भिजेल आता हळुवार पावलाचा
झाडावरुन पक्षी सारे उडुन गेले
जेंव्हा भिजुन गेले जेंव्हा भिजुन गेले
पंखात लाडक्यांचा हळुवार पावलांचा
पाउलवाट सारी रात्री भिजुन गेली
विसरुन तीच गेली विसरुन तीच गेली
ओला ठसा कुणाचा हळुवार पावालांचा
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
आला आषाढ-श्रावण
आल्या पावसाच्या सरी ;
किती चातक चोचीने
प्यावा वर्षाऋतूतरी
काळ्या ढेकळांच्या गेला
गंध भरून कळ्यांत ;
काळ्या डांबरी रस्त्याचा
झाला निर्मळ निवांत
चाळीचळीतून चिंब
ओली चिरगुटे झाली ;
ओल्या कौलारकौलारी
मेघ हुंगतात लाली
ओल्या पानांतल्या रेषा
वाचतात ओले पक्षी ;
आणि पोपटी रंगाची
रान दाखविते नक्षी
ओशाळला येथे यम ,
वीज ओशाळली थोडी ,
धावणाऱ्या क्षणालाही
आली ओलसर गोडी
मनी तापलेल्या तारा
जरा निवतात संथ ;
येतां आषाढ - श्रावण
निवतात दिशा - पंथ
आला आषाढ - श्रावण
आल्या पावसाच्या सरी ;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षाऋतूपरी
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
पाऊस
झांकळलें नभ, वाहे
सोंसाट्याचा वारा
रस्त्याने ओहोळ जाती खळखळ
जागजागीं खाचांमध्ये तुडुंबले
जळ
ढगावर वीज झळके सतेज
नर्तकीच आली गमे लेवुनिया
साज
झोंबे अंगा वारे काया थरथरे
घरट्यांत घुसूनिया बसली
पाखरें
हर्षलासे फार नाचे वनीं मोर
पानांतून हळूं पाहे डोकावून
खार
पावसाच्या धारा डोईवरी मारा
झाडांचिया तळी गुरे शोधिती
निवारा
नदीलाही पूर लोटला अपार
फोफावत धांवे जणू नागीणच
थोर
झाडांची पालवी चित्ताला मोहवी
पानोपानी खुलतसें
रंगदार छबी
थांबला पाऊस उजळे आकाश
सूर्य येई ढगांतून, उधळी
प्रकाश
किरण कोंवळे भूमीवरी आले
सोनेरी त्या तेजामध्यें
वस्तुजात खुले
सुस्नात जाहली धरणी हांसली,
वरुणाच्या कृपावर्षावाने
सन्तोषली
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
मॆत्रिण मॆत्रिण ||
मॆत्रिण माझी हूं का चूं ! मॆत्रिण माझी !
मॆत्रिण माझी हट्टी गं उन्हाळ्याची सुट्टी गं
मॆत्रिण माझ्या ओठांवरची कट्टी आणिक बट्टी गं !
मॆत्रिण रुमझुमती पोर मॆत्रिण पुनवेची कोर
मॆत्रिण मॆत्रिण कानी डूल मॆत्रिण मॆत्रिण वेणीत फूल !
मॆत्रिण मांजा काचेचा हिरवा हार पाचूचा
बदामाचे झाड मॆत्रिण बदामाचे गूढ मॆत्रिण
मॆत्रिण माझी अशी दिसते जणू झाडावर कळी फुलते
ओल्या ओठी हिरमुसते वेड्या डोळ्यांनी हसते
मॆत्रिण माझी फुलगंधी मॆत्रिण माझी स्वच्छंदी
करते जवळिक अपरंपार तरीही नेहमी स्पर्शापार
मॆत्रिण सारे बोलावे मॆत्रिण कुशीत स्फुंदावे
जितके धरले हात सहज, तितके अलगद सोडावे
मॆत्रिण माझी शब्दांआड लपते, हासुनिया म्हणते-
पाण्याला का चव असते अन् मॆत्रिणीस का वय असते !
मॆत्रिण थोडे बोलू थांब बघ प्रश्नांची लागे रांग
दु:ख असे का मज मिळते तुझ्याचपाशी जे खुलते !
मॆत्रिण माझी स्वच्छ दुपार मॆत्रिण माझी संध्याकाळ
माझ्या अबोल तहानेसाठी मॆत्रिण भरलेले आभाळ !
मॆत्रिण मॆत्रिण !
मॆत्रिण मॆत्रिण !!!
लेबल: कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
तो पाउस वेगळा होता ...
पाऊस वेगळा होता
आभाळ निराळे होते
तो मेघ वेगळा होता
...
वेचली फुले थेंबांची
ओठही फुलांचे होते
डोळ्यात पावसामधला
निथळता जिव्हाळा होता
...
पाऊस असा आला की
अद्याप थांबला नाही
या अशा पावसासाठी
सोसला उन्हाळा होता
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
दूर पाऊस कोसळून गेला !!
दूर पाऊस कोसळून गेला !!
दूर पाऊस कोसळून गेला !!
दूर पाऊस कोसळून गेला
दवांना ललाटी तुझ्या आसरा ...
काळ्या विवरात विरले मेघ
सुर्य ढळता कुणाचे वेध ..
ऊर आतुन पोखरुन गेला !
दूर पाऊस कोसळून गेला !!
निळ्या अंबराला कळेना कधी
धुंद पवना कळेना ही भाषा ..
सूर शोधून सुचवून गेला !!!
दूर पाऊस कोसळून गेला !
माझ्या पावसाला विचारा तरी
कधी तो बरसेल वेड्याच्या दारी ??
चिर कोरुन ह्रिदयात गेला ..!!
दूर पाऊस कोसळून गेला !
दवांना ललाटी तुझ्या आसरा ...
दूर पाऊस कोसळून गेला !!
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
कोसळणारा पाऊस पाहुन
कोसळणारा पाऊस पाहुन
मला नेहमीच एक प्रश्न पडतो
माझं तर ठीक आहे
पण हा कुणासाठी रडतो
दव पडलेल्या गवतावरून
जेव्हा मी हात फ़िरवतो
तुझे अश्रू पुसतोय
आसाच मला भास होतो
गोडीगुलाबी अन थोडासा रुसवा,
खुप सारे प्रेम अन थोडासा राग हवा,
नको अंतर नको दुरावा
पावसाला लाजवील, असा
असावा मैत्रीत ओलावा
मैत्री नको चंद्रा सारखी,
दिवसा साथ न देणारी,
नको सावली सारखी सदा पाठ्लाग करणारी
मैत्री असावी अश्रुन सारखी सदा सुख दु:खात साथदे
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
आता कुठे मी...........
आता कुठे मी...........
आता कुठे मी स्वप्न पहायला शिकतोय
रात्रीच्या कुशीत शांत झोपायला शिकतोय
विचारांना आता कुठे गति आलीय माझ्या
दिवसांना आता कुठे सार्थकी लावायला शिकतोय
सागळ जग बदलतय माझ आता अन्
मी ही माझ्यात बदल करायला शिकतोय
सोप्प नव्हत कधी हे आणि नसनारेयही
पण अवघड गोष्टिच करायला शिकतोय
क्षितिज बरच लांब आहे अजुन पण
दरमजल करत निदान चालायला शिकतोय
सुर्याला तोंड देऊ शकत नाही अजुन पण
काजव्याला तरी मुठीत पकडायला शिकतोय
यशापयश काय असत हे माहित नाही मला
पण उमेदीन लढायला मात्र शिकतोय
जिंकायाची अपेक्षा केलीच नव्हती कधी
पण जीवनात हरायच नाही कधी हे शिकतोय
अजुन तरी स्वतंत्र विचार केला नव्हता कधी
आता स्वतंत्र अस्तित्व निर्माण करायला शिकतोय
सर्व काही अंधारातच आहे अजुन पण
आत्मविश्वासाच्या ज्योतिने अंधार भेदायला शिकतोय.
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
मी. एक भूल
मी.....................
एक भूल
कोमेजलेले फूल
विझलेली चूल |
मी...................
एक नशा
हरवलेली दिशा
कातरवेळेची निराशा |
मी........................
एक भास
निसटलेला आभास
अंतहीन प्रवास |
मी........................
एक ध्यास
अपुरा सहवास
सुटलेला निश्वास |
मी.........................
एक गाज
दबलेला आवाज
भरकटलेले जहाज |
मी..................
एक आशा
पराभुतांची निराशा
अनाकलनीय भाषा |
मी....................
एक ध्येय
अंधारवाटी भय
न सुटणारे प्रमेय |
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
कधी काळी तुझ्यावर प्रेम करत होतो
कधी काळी तुझ्यावर प्रेम करत होतो
आता अश्रुंवर प्रेम करण्याचे दिवस आलेत
खूप इच्छा होती माझी घर बसवण्याची
बघ आज माझे घर सोडण्याचे दिवस आलेत.
कधी काळी मी तुझ्यावर मरत होतो
आता खरोखर मरण्याचे दिवस आलेत
खूप इच्छा होती मरणं आजमवण्याची
बघ आज इच्छा पुर्ण करण्याचे दिवस आलेत.
कधी काळी माझ्या कविता हसत होत्या
आता कवितांवर रडण्याचे दिवस आलेत
कागदावर माझ्या शब्दांशीवाय काहीच नव्हते
आज शब्दांसोबत अश्रुंचे डागही आलेत.
कधी मनापासुन मनापर्यंत पोहचत होतो
आज डोळ्यातुन ओघळण्याचे दिवस आलेत
तुझ्या सोडून सागळ्याच्यां डोळ्यात आसवे आहेत
बघ आज तुझ्या सुखाचे नाही माझ्या आसवांचे
दिवस आलेत.
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
काही नाती बांधलेली असतात
काही नाती बांधलेली असतात
ती सगळीच खरी नसतात
बांधलेली नाती जपावी लागतात
काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात
कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात.
जे जोडले जाते ते नाते
जी जडते ती सवय
जी थांबते ती ओढ
जे वाढते ते प्रेम
जो संपतो तो श्वास
पण निरंतर राहते ती मैत्री
फ़क्त मैत्री...........
मोहाच्या नीसटत्या क्षणी
परावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडूगोड क्षणांना
निशब्द करते ती मैत्री,
जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला
साथ देते ती मैत्री,
आणि जी फक्त आपली असते,
ती मैत्री
लेबल: कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
मैत्री नको फुलसारखी क्षणभर सुगध देणारी
...{`--..-.'_,}
.{;..\,__...-'/}
.{..'-`.._;..-';
....`'--.._..-'
........,--\\..,-"-.
........`-..\(..'-...\
...............\.;---,/
..........,-""-;\
......../....-'.)..\
........\,---'`...\\
.....................\| मैत्री नको फुलसारखी क्षणभर सुगध देणारी
नको सुर्यासारखी सतत तापलेली
नको चद्रासारखी दिवसा साथ न देणारी
नको सावलीसारखी कायम पाट्लाग करणारी
मैत्री हवी अश्रुसारखी सुख-दुखात साथ देणारी
लेबल: कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
कमळ पत्रा वरील पाण्याला कधी थांब म्हणायच नसत
◐•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◐
कमळ पत्रा वरील पाण्याला कधी थांब म्हणायच नसत
नीसटणार्या क्षणांना कधी जवळ करायच नसत
माणसाच आयुष्य हे असच असत
बाकी काही हरवल तरी
त्यापेक्षाही जास्त उरलेल असत.
◐•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◐
काही नाती बांधलेली असतात
ती सगळीच खरी नसतात
बांधलेली नाती जपावी लागतात
काही जपून ही पोकळ राहतात
काही मात्र आपोआप जपली जातात
कदाचित त्यालाच मैत्री म्हणतात.
◐•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◈•◐
मोहाच्या नीसटत्या क्षणी
परावृत्त करते ती मैत्री,
जीवनातल्या कडूगोड क्षणांना
निशब्द करते ती मैत्री,
जीवनाच्या आंतापर्यंत प्रत्येक पावलला
साथ देते ती मैत्री,
आणि जी फक्त आपली असते,
ती मैत्री.
◐•◐•◐•◐•◐•◐•◐•◐•◐•◐•◐•◐•◐•◐•◐•◐•◐
लेबल: कविता , चारोळी , मराठी कविता , मराठी चारोळी , मराठी चारोळ्या , charoli , marathi charolya , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
चांगल्या मैत्रीचा ठेवा भाग्यवंतांनाच मिळतो,
चांगल्या मैत्रीचा ठेवा भाग्यवंतांनाच मिळतो,
गर्दीतल्या थोड्यांशीच आपला सूर जुळतो.... १
सुरात गायलेलं मैत्रीचं गीत आयुष्याला सुरेल करतं,
अशा गीताचं माधुर्य आयुष्यभर पुरुन उरतं....२
सुदैवाने आपल्यातही असंच मधुर नातं आहे,
त्याच्या आधाराने आयुष्य सुखात व्यतीत होतं आहे....३
आपलं नातं कायम राहो हीच एक सदिच्छा,
जीवनातील प्रत्येक क्षणासाठी तुला खूप शुभेच्छा !!!
लेबल: कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
एक तरी मैत्रीण असावी
एक तरी मैत्रीण असावी
बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग
करिझ्माहून झकास दिसावी !
एक तरी मैत्रीण असावी
चारचौघीत उठून दिसावी
बोलली नाही तरी निदान
समोर बघून गोड हसावी !
एक तरी मैत्रीण असावी
कधीतरी सोबत फिरावी
दोघांना एकत्र पाहून
गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी !
एक तरी मैत्रीण असावी
जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा
एखादाच अपवाद असावा..
एक तरी मैत्रीण असावी
आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवर
तिने घालावी हळूच फुंकर..
एक तरी मैत्रीण असावी
जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचासुद्धा खांदा कधी
तिच्या दुःखाने भिजावा..
एक तरी मैत्रीण असावी
चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे
चालावं पुढे तिच्याच प्रकाशात
लेबल: कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
गरज म्हणून "नातं" कधी जोडू नकोस,
गरज म्हणून "नातं" कधी जोडू नकोस,
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.....
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण... मोठेपणात हरवू नकोस.....
आयूष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर मीळेल इतकं भरून प्रेम मिळत असतं.....
तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यव्हारातलं देणं घेणं फ़क्त मध्ये आणू नकोस.....
मीळेल तीतकं घेत रहा, जमेल तीतकं देत रहा
दीलं घेतलं सरेल तेव्हा..पुन्हा मागून घेत रहा...
समाधानात तडजोड असते..फ़क्त जरा समजून घे
"नातं" म्हणजे ओझं नाही..मनापासून उमजून घे...
वीश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपुर्वक "नातं" जप.....मध्येच माघार घेऊ नकोस
लेबल: कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
मैत्री म्हणजे काय असत?
मैत्री म्हणजे काय असत?
एकमेकांचा विश्वास असतो?
अतूट बंधन असत? की
हसता खेळता सहवास असतो?
मैत्री म्हणजे मैत्री असते,
व्याख्या नाही तिच्यासाठी;
अतूट बंधन नसत,
त्या असतात रेशीमगाठी
मैत्री असते पहाटेच्या दवासारखी,
थंडगार स्पर्श करणारी;
मैत्री असते केवड्यासारखी,
तना-मनात सुगंध पसरवणारी
मैत्री असते सुर्योदयासारखी,
मनाला नवचैतन्य देणारी;
मैत्री असते झाडासारखी,
उन्हात राहून सावली देणारी;
मैत्री करावी सोन्यासारखी,
तावुन-सुलाखून चमचमणारी;
मैत्री करावी हिर्या सारखी,
पैलू पडताच लख-लखणारी;
मैत्री असावी पहाडासारखी,
गगनाला भिडणारी;
मैत्री असावी समुद्रासारखी,
तलाचा थान्ग नसणारी;
मैत्री म्हणजे समिधा असते,
जीवन यद्न्यात अर्पण झालेली;
स्वताच्या असन्याने सुद्धा
मन पवित्र करणारी;
मैत्री हे नाव दिलय
मनाच्या नात्यासाठी;
अतूट बंधन नसत त्या असतात ....
रेशीमगाठी
लेबल: कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
उदात्त मैत्रीचे एकच मागणे....
उदात्त मैत्रीचे एकच मागणे....
चांदणे पांघरलेले आकाश नाही मागत तुझ्याकडे
क्षितिजावर लुकलुकणारा एक तारा मात्र आठवनीने दे
बेभान कोसळणारा मुक्त पाउस नाही मागत तुझ्याकडे
श्वासात दरवळणारा ओल्या मातीचा सुवास मात्र आठवनीने दे
बेधुंद करणार्या रातराणीचा बहर नाही मागत तुझ्याकडे
जाताना एक मोगर्याची कळी मात्र आठवनीने दे
उसळणारा बेछुट दर्या नाही मागत तुझ्याकडे
शांत जलाशयातील एक तरंग मात्र आठवनीने दे
मुठी एवढे ह्रुदय नाही मागत तुझ्याकडे
मझ्यासाठी चुकलेला एक ठोका मात्र आठवनीने दे
जिवनातल्या आनंदाचा एकही क्षण नाही मागत तुझ्याकडे
आयुष्यातल्या दु:खाचे पहिल्या पासून शेवटचे पळ मात्र आठवनीने दे
आठवनीने दे........
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
कॉलेजला जाताना समोरच तिला बघितली
कॉलेजला जाताना समोरच तिला बघितली
मी दिसताच चालता चालता जरा थांबली
माझ्याकडे बघुन गोड हसली
ओठांची मोहोळ खुलली..
म्हटलं पोरगी बहुतेक पटली
पण..हत तिच्या मारी
मागे वळुन बघितल तर तिची मैत्रीण दिसली..
त्यादिवशी ती वर्गात आली
येवुन नेमकी माझ्याच शेजारी बसली
माझ्या अंगावर कशी शहारी पसरली
बोलाण्यासाठी जीभ सरसावली..
पण.. हत तिच्या मारी
काही बोलणार इतक्यातच म्हणाली
"प्लीज, पुढे बसशील ती पहा माझी मैत्रिण आली."
एकदा कॉलेजमधे परीक्षा सुरु झाली.
गाडी घेवुन जाताना रस्त्यातच मला भेटली
पाठुनच तिनं एक हाक मारली
उशिर झालेला म्हणुन लिफ्ट मागितली.
"थांब गाडी लावुन येतो!" म्हणुन गेट पाशी सोडली..
पण.. हत तिच्या मारी
गाडी लावे पर्यंत हीच टाटा करुन सटकली
शेवटी मनाची तयारी केली
शेवटचा पेपर संपल्यावर जाताना तिला गाठली
हळुच खिशातली चिठ्ठी सरकवली
गालावरची खळी पाहीली..
वाटल बहुतेक देवी पावली
पण..हत तिच्या मारी
म्हणाली "सॉरी, थोडक्यासाठी गाडी चुकली
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे
इन्द्र्धनुष्याचे रंग आहेत आणि पारिजातकाचा वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
मी म्हणजे जीवन आणि तु म्हणजे श्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
संकटांची नाही भिती, तुझ्या मैत्रीचा विश्वास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
कधी वाटते फक्त तुझी मैत्री सच्ची, बाकी दुनिया नुसता आभास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
हवे काय अजुनि त्याला, मित्र तुझ्यासम ज्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
ओढ तुझ्या सावलीची माझिया रस्त्यास आहे
आपल्या मैत्रीमध्ये बरेच काही खास आहे
असो वा नसो कुणी आपल्या संगे, पर्वा त्याची कुणास आहे आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
माझ्या चुकांवरही मित्रा पांघरूण तुझे हमखास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
तुझ्याबरोबर ऐन उन्हाळा ही मजला मधुमास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
आयुष्याच्या पटलावरती तुझ्या मैत्रीची आरास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे
आपल्यात कधी निखळ चर्चा, आणि कधितरी उपहास आहे
आपल्या मैत्रीमध्ये मित्रा बरेच काही खास आहे.
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला आपल्या मनातले सर्व काही सांगावे,
सांगता सांगता आयुष्य पूर्ण सरुन जावे,
आणि सर्तानाही आयुष्य पुन्हा पुन्हा जगावे........
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याला घेऊन सोबतीने खूप खूप चालावे,
चालता चालता दूरवर खूप खूप थकावे,
पण थकल्यावरही आधारसाठी त्याच्याकडेच पहावे........
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
दुख त्याचे आणि अश्रू माझे असावेत,
सोबतीने त्याच्या खूप खूप रडावे,
आणि अश्रूंच्या हुंदक्यात सर्व दुख विरून जावे.........
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
आनंद त्याचा आणि हसू माझे असावे,
त्याच्यासाठी मी जगतच राहावे, जगतच राहावे,
आणि त्याच्यासाठी जगतानाच आयुष्य संपून जावे.......
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
ज्याच्या सोबतितल्या प्रत्येक क्षणाने सुखवावे,
उन्हात त्याने सावली तर पावसात थेंब व्हावे,
आणि मायेच्या थेंबानी मी चिंब भिजून जावे...........
एकदा तरी आयुष्यात कुणी असे भेटावे,
सूर त्याचा आणि शब्द माझे असावे
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
पान जरी कोरं असलं,
पान जरी कोरं असलं,
तरी पानालाही भावना असतात.
मन जरी वेडं असलं,
तरी मनालाही भावना असतात.
पानाच्या भावना कोणालाच कळत नाहीत,
मनाच्या भावना मनालाही कळत नाहीत.
मनं हे असचं असतं,
इकडून तिकडे बागडत असतं.
मनाला काही बंधनं असतात,
म्हणुन तर ह्र्दयात स्पंदनं असतात.
लेबल: कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
मैत्री म्हणजे विश्वास
मैत्री म्हणजे विश्वास
मैत्री म्हणजे अभिमान
मैत्री म्हणजे जीवनातील
जगण्याचा स्वाभीमान
मैत्री म्हणजे प्रेम
मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात
आधाराची उणीव
मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात
वाट दावणारा प्रकाश
मैत्री म्हणजे सुख दु:ख
मैत्री म्हणजे हर्श
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा
हळुवार स्पर्श.....
मैत्री म्हणजे अभिमान
मैत्री म्हणजे जीवनातील
जगण्याचा स्वाभीमान
मैत्री म्हणजे प्रेम
मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात
आधाराची उणीव
मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात
वाट दावणारा प्रकाश
मैत्री म्हणजे सुख दु:ख
मैत्री म्हणजे हर्श
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा
हळुवार स्पर्श.....
लेबल: कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
कवीता' म्हणजे ......
कवीता' म्हणजे ......
मनावरउमटलेले भावनांचे सुरेख प्रतिबिंब
अवचीत मिळणारा एखादा भावक्षण
स्वतःला हरवण्याचा नाजुक क्षण
भावनांच्या हिंदोळ्यांवर खेळणारे मन
जे 'कवीता' करतात
ते आपल्या भावना त्यातुन व्यक्त करतात
कधी दुःख, कधी सुखः व्यक्त करतात
मनातले भाव ते त्या द्वारे व्यक्त करतात
'कवीता' असतात,नाजुक फुलासारख्या ,
फुलल्या की आनंद देणारया
सुंदर दवबिंदुंसारख्या
मनाला सहजच भावणारया ,
'कवीता' विचार करायला लावतात
काही थोडेफार रडायलाही लावतात
काही मने जूळवतात
काही नाती बनवतात
काही भावना व्यक्त करतात
काही रोष व्यक्त करतात
समाजातील वाईट गोष्ठींवर काही वेळा प्रहारही करतात
'कवीता' शब्दांपासुन सुरु होतात
व शब्दांवरतीच संपतात
पण
संपता संपता ते
आयुष्याला एक ध्येय देऊन जातात
भावनांचे रंग मनावर असे चढतात की
ते संपुर्ण आयुष्यच बदलून जातात
म्हणुनच ते रंग मला कवीतेचे नव्हे तर भावनांचेच वाटतात............ ......... ..
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
गरज म्हणून "नातं" कधी जोडू नकोस,
गरज म्हणून "नातं" कधी जोडू नकोस,
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.....
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण... मोठेपणात हरवू नकोस.....
आयूष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर मीळेल इतकं भरून प्रेम मिळत असतं.....
तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यव्हारातलं देणं घेणं फ़क्त मध्ये आणू नकोस.....
मीळेल तीतकं घेत रहा, जमेल तीतकं देत रहा
दीलं घेतलं सरेल तेव्हा..पुन्हा मागून घेत रहा...
समाधानात तडजोड असते..फ़क्त जरा समजून घे
"नातं" म्हणजे ओझं नाही..मनापासून उमजून घे...
वीश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपुर्वक "नातं" जप.....मध्येच माघार घेऊ नकोस
लेबल: कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
आयुष्य खूप सुंदर आहे,
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसलं तरी,
एकट्यानेच ते फुलवत रहा,
वादळात सगळं वाहून गेल,
म्हणुन रडत बसू नका,
वेगळ अस काही, माझ्यात खास नाही असं म्हणून उदास होऊ नका
मृगाकडे कस्तुरी आहे,
फुलात गंध आहे,
सागराकडे अथांगता आहे,
माझ्याकडे काय आहे, असं म्हणून रडू नका,
अंधाराला जाळणरा एक सूर्य तुमच्यातही लपला आहे.
आव्हाहन करा त्या सूर्याला!!!!! मग उगवेल तो तुमच्या आयुष्यात नवीन क्षितिज घेऊन.
अंधारामय रात्र संपवून सोनेरी किरणांनी सजून
मग रोजच उगवेल एक नवी सकाळ,
उत्साह ध्येयाने भारुन म्हणून म्हणते.........
आयुष्य खूप सुंदर आहे,
सोबत कुणी नसल तरी
एकट्यानेच ते फुलवत रहा......
लेबल: कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मैत्री म्हणजे मायेची साठवण,
मनाने मनाला दिलेली प्रेमाची आठवण
हा धागा नीट जपायचा असतो,
तो कधी विसरायचा नसतो
कारण ही नाती तुटत नाहीत,
ती आपोआप मिटून जातात
जशी बोटांवर रंग ठेवून
फुलपाखरे हातून सुटून जातात.
लेबल: कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
मला परमेश्वर भेटला
मला परमेश्वर भेटला
मी त्याला सहजंच विचारलं
तु सगळ्यात चांगली गोष्ट कुठली बनवलीस ?
माणसाचे मन
आणि सगळ्यात वाईट गोष्ट ?
माणसाचे मन,
बाप्पा मला पुढे म्हणाला.....
ऐक, मी एक कुबेर बनवला होता...
त्याच्याकडे जगातली सगळ्यात जास्त संपत्ती होती, पैशाची.
मी तुला बनवला अन आता तुझ्याही वाट्याला संपत्ती येतीये, माणसांची..........
लक्षात ठेव, एक माणूस हा कुबेराच्या संपत्तीच्या दसपट मोलाचा असतो...........
मनं जप, मनं जोड, माणसं मिळव.......
विचार कर.........."
तेंव्हापासून हे वेड लागलंय...........
आज एक एक करुन मोती जुळवतोय, माणसं जोडतोय,
खरेच पुन्हा कधी बाप्पा भेटला तर त्याला सांगण्यासाठी,
की मी खरेच तू सांगितलेले काम करतोय.....
लेबल: कविता , मराठी कविता , मराठी गोस्टी , मैत्री , Friendship , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
ैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय
ैत्री केली आहेस म्हणुन तुला सांगावस वाटतय
गरज म्हणून 'नातं ' कधी जोडू नकोस
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस..
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण..मोठेपणात हरवू नकोस..
आयुष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर पुरेल इतकं भरून प्रेम मिळत असतं..
तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यवहारातलं देणं घेणं फक्तं मध्ये आणू नकोस..
मिळेल तितकं घेत रहा, जमेल तितकं देत रहा
दिलं घेतलं सरेल तेव्हा.. पुन्हा मागून घेत रहा..
समाधानात तडजोड असते...फक्त जरा समजून घे
'नातं ' म्हणजे ओझं नाही, मनापासून उमजून घे..
विश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपूर्वक 'नातं ' जप.. मध्येच माघार घेऊ नकोस........
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
सहवासाची संगत तु
सहवासाची संगत तु
चांदण्यांची गंमत तु,
रवि किरणांचा तुच तजेला
जलधारंची गंमत तु,
कधी अचानक रुसतस तु
मनापासुन हसतस तु,
साद घालते मनास
ऐसे जीवनगाणे तु,
खळखळणारा झरा तु
चंचलतेचा वार तु,
लाट धावते ज्याच्यासाठी
कधी तो शांत किनारा तु,
निखळ मनाचे तुझे वागणे
फ़क्त मैत्रीचे साद घालणे,
राग लोभ जरी आले गेले
उरले केवळ जीव लावणे,
गुण दोषांचा स्वीकार तु
माझ्यावरचा अधिकार तु,
शब्दांमद्ये साकार तु
मैत्री मद्ये साकार तु,
प्रत्येक दिवशी आठवतात
या मैत्रीची खुप कारणं,
सर्वात सुंदर हेच
आपलं एकमेकांच्या मनात राहणं
लेबल: कविता , मराठी कविता , मराठी गोस्टी , मैत्री , Friendship , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
मैत्रिणीचं माझ्या काय काय सांगु
मैत्रिणीचं माझ्या काय काय सांगु
तिख्खट आहे की दुधाची साय सांगु
वसंतासम सोनेरी रुप सजलेलं सांगु
अस्मानी डोळ्यांत स्वप्न भिजलेलं सांगु
तिचं रुसणं,हळुच गालात हसणं सांगु
वेडं वेडेपण सांगु की कोवळेपण सांगु
अल्लडपणाचा तिच्या काय कहर सांगु
की आईसारखी मायेची करडी नजर सांगु
इवल्याशा गोष्टीनी ओलावणारे डोळे सांगु
भरल्या डोळ्यानी हसणारे ध्यान खुळे सांगु
आमच्या यारीदोस्तीला नसलेली हद्द सांगु
सहज राखली जाणारी एक सरहद्द सांगु
अखंड गप्पांमधे क्षण किती हरवलेले सांगु
तिजमुळे अबोल माझे शब्द खुललेले सांगु
सगळ्याहून न्य्रारी पण गोड तिची रीत सांगु
असा नमुना लाखात एकच, हे गुपित सांगु
लेबल: कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
मैत्रीण माझी नाजुक फुलासारखी
मैत्रीण माझी नाजुक फुलासारखी
वाऱ्याबरोबर डोलणाऱ्या इवलाश्या रोपटयासारखी
हसण तिच खळखळणाऱ्या झऱ्यासारख
मनही तिच त्यातील निर्मळ पाण्यासारख
आहे ती अशीच अश्रुसोबत हसणारी
मनातील वादळांना मनातच थोपवणारी
भासते कधी आकाशातील चांदणीसारखी
तर कधी सागराबरोबर खेळणाऱ्या लाटेसारखी
तशी आहे ती माझ्यापासुन दुरवर
तरीही अंतःरात रुतलेली खोलवर
तुझ्या मैत्रीच्या छायेत मला क्षणभर विसावू दे
हरलेi जरी मी, आपली मैत्री मात्र सदैव जिंकू दे
लेबल: कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
कविता काय असते?
कविता काय असते?
एकटेपणाला मिळालेली साथ असते
सतत मिळतं असते
तुटतं नसते...
कविता काय असते?
हृदयातुन वाहणारी धारा असते
कितीही साचवली तरी
वाहतं असते...
कविता काय असते?
मनात लपलेली गुढ उदासी असते
दाखवली कोणाला तरी ती
दिसत नसते...कळतं नसते....
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
जीवनात ती माझ्या
जीवनात ती माझ्या
अशी अचानकच येऊन गेली
पण जाताना माझ्या मनात
स्वःताचे घर करुन गेली
जेव्हा ती जवळ होती माझ्या
मला ती इतकी जवळची नाही वाटली
पण जाताना माझ्या प्रेमावर
ती स्वत:चाच हक्क सांगून गेली
जाताना दूर माझ्यापासुन
ती उसने हास्य दाखवून गेली
िनळ्याभोर सुंदर डोळयांत
ती िवरहाचे अश्रु लपवून गेली
आली मनात जरी चोरपावलांनी
जडपावलांनी ती िनघून गेली
मी दुःख करु नये म्हणून
माझ्याजवल वचन मागून गेली
जाताना ती हसत गेली खरी
पण मनात दुःख घेऊन गेली
आपल्या िस्मतहास्याने ती
स्वपनात गुिपत सांगुन गेली..................
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
आठवण माझी कधीतरी येईलच तुला
आठवण माझी कधीतरी येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब मीच असेल..!
माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत हसशीलही
जो थांबेल तुझ्या ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल..!
कधी जर पाहशील पोर्णीमेच्या तु चंद्राला
त्याच्या तेजाला तु निखरत राहशील
मध्येच गर्द काळ्या ढगांनी जर त्याला घेरलं
नीट बघ त्याच्याकडे घेरलेला तो ढग मीच असेल..!
कधी जर सुटला बेधुंद गार वारा
मोहक डोळे तुझे मिटुन तु घेशील
मध्येच स्पर्शली तुला
जर उबदार प्रेमळ झुळुक
नीट बघ जाणवुन ती झुळुकही मीच असेल.
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्हाला ती आवडत
* तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्हाला ती आवडते,
तर हे प्रेम नाही हा तर मोह.................!
*तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिच्या स्पर्शाशिवाय राहू शकत नाही,
तर हे प्रेम नाही ही तर वासना...............!
*तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तिला सोडू शकत नाही असा विचार करून की तिच्या भावना दुखावतिल,
तर हे प्रेम नाही ही तर तडजोड..............!
*तुम्ही तिच्यावर प्रेम करतात कारण तुम्ही तुम्ही तिच्यापासून काही लपवत नाही तिला सर्व काही सांगतात, तुमचे सर्व अनुभव वाटतात,
तर हे प्रेम नाही ही तर मैत्री..................!
*जर तुम्हाला तिच्या यातना कळतात, तिने न सांगत...आणि त्याचा त्रास तुम्हाला होतो...,
तर ते आहे प्रेम..................................!
*जर तुमच्याकडे दुसरे आकर्षित होतात तरीही तुम्ही तिच्यासोबत राहता...,
तर ते आहे प्रेम...................!
*जरी तुम्हाला तिचा स्वभाव आवडत नाही आणि तुम्ही त्याला बदलण्याचा विचारही करत नाही, तिला जसेच्या तसे स्विकारता...,
तर ते आहे प्रेम...................!
*जर तुम्ही तुमच्या सर्व भावना तिला देता पण तिच्याकडून त्याची अपेक्षा करत नाही
आणि वाट पहाता की ती कधी ना कधी तिच्या सर्व भावना स्वत:हून सांगेल...,
तर ते आहे प्रेम...!
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
आज तुला शेवटची भेटायला आलेय.
आज तुला शेवटची भेटायला आलेय.
तुझ्या मैत्रीच्या सर्व आठवणींची
आज मी समग्र मूर्ती झालेय.
आज तुला शेवटची भेटायला आलेय.
हो रे! कुणाला न सांगता, लपुन छपुन.
तुझ्याशी भेटण्याचं मनात आलं
आणि तडक आलेय निघून.
हो रे! कुणाला न सांगता, लपुन छपुन.
या नंतर असे येता येणार नाही.
संसाराची गाडी ओढताना
हे समजून घ्यावे लागेल तुलाही.
या नंतर असे येता येणार नाही.
मैत्रिणीची आठवण ठेवशील ना?
दोघेही व्यवहारात रमल्यावर
माझी विचारपूस करशील ना?
मैत्रिणीची आठवण ठेवशील ना?
ही माझ्या लग्नाची पत्रिका.
चार दिवसांनी तुझी बायको झाल्यावर
आतल्या मैत्रिणीला विसरायचं नाही बरका!
ही माझ्या लग्नाची पत्रिका.
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
माझ्या या स्वगताला कविता
माझ्या या स्वगताला कविता
म्हणायचे धाडस करु नका
हे फ़क्त हुन्कार आहेत !
एका अत्रुप्त आत्म्याचे
नाकारलेल्या जीवाचे
ज्याला शरीरच मिळाले नही..........
हे आक्रन्दन आहे
तडफ़डणारया मनाचे,
ज्याचे सन्चित सम्पले आहे!
याला कवितेचा दोष देऊ नका!
हा शाप मी शब्दानी भोगतोय!
अश्वत्थाम्याचे प्राक्तन घेऊन
स्वत:ला शोधतोय?
वसन्तात फ़ुले फ़ुलतील
आषाढात मेघ बरसतील
हि नियती आहे!
माझे शब्द अवेळी येणारया
पक्ष्याप्रमाणे आहेत, जो थवा सोडुन भरकटलाय!
मी एवढेच सांगीन
जे दु:ख मी भोगतोय!
त्या वेदना इथे उमटतायेत!
ह्या आहेत, अपुर्णतेच्या, वान्झपणाच्या खुणा,
ह्याला लेणी म्हणु नका.................फ़क्त दगड!
उन,वारा, पाऊस झेलणारा!
एवढेच फ़क्त!
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
प्रेम करणं सोपं नसतं...
प्रेम करणं सोपं नसतं...
सर्व करतात, म्हणून करायच नसतं..
चित्रपटात बघीतलं, म्हणून करायच नसतं...
पुस्तकात वाचलं , म्हणून करायच नसतं....
तर कुणाकडून ऐकलं, म्हणून करायच नसतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं...
शाळा कॉलेजांत असच घडतं...
एकमेकांना बघीतलं की मन प्रेमात पडतं...
अभ्यासाच्या पुस्तकात मग तिचच रुप दिसतं...
जागेपणी ही मग प्रेमाचं स्वप्नं पडतं...
ज्या वयात शिकायचं असतं त्यावेळी भलतचं घडतं...
करीयरचं सत्यानाश तर आयुष्याचं वाटोळं होतं...
सहाजीकचं मग आईवडीलांच्या ईच्छांवर पाणी पडतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं...
हॉटेल सिनेमागृहात नेहमी जावं लागतं...
पैशाचं बजेंट नेहमी बनवावं लागतं...
फोन कडे नेहमी लक्श ठेवावं लागतं...
मग जागेपणीही स्वप्न दिसायला लागतं...
डोक्याला ताप होऊन डोक दुखायला लागतं...
आनंद कमी दुःख जास्त भोगावं लागतं...
एवढ सगळं करणं खुप कठीण असतं...
कारण प्रेम करणं सोपं नसतं...
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
तुझे प्रेम
दूर जरि तू नि मी जवळ असेल तुझे प्रेम,
तुझे अस्तित्व नि माझे मन,
आपण एकत्र पाहिलेली स्वप्ने नि त्या स्वप्नात भरलेले रंग,
तो पहिला पाऊस आजही साक्ष देतो................
लेबल: कविता , पाऊस , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
प्रेम हे होत नसत
"
प्रेम हे कराव लागत
आपल अस कुणिच नसत
आपलस कराव लागत
एकदा तरी स्वताहुन
वादळात झोकायच असत
नाहिच हाती आल तर
"त्याच वादळात"
मनसोक्त मरायला शिकायच असत
म्हणूनच
प्रेम हे होत नसत
प्रेम हे कराव लागत
आपल अस कुणिच नसत
आपलस कराव लागत"
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
गार वारा हा भरारा, नभं टिपूस टिपूस
गार वारा हा भरारा, नभं टिपूस टिपूस
रानी वनी, पानोपानी, मन पाऊस पाऊस
माती खाली खोल खोल, ओल मातीच्या मनास
मातीवर थरथरे, ओला सुवास सुवास
पावसाळी पायवाटा, जरा उदास उदास
दाही दिशांत पाखरे, जणू आभास आभास
रान मोकळे मोकळे, बघे भारुन नभास
त्याचा हिरवा हिरवा, आज प्रवास प्रवास
लेबल: कविता , गारवा , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा
पाऊस दाटलेला, माझ्या घरावरी हा
दारास भास आता, हळूवार पावलांचा
गवतास थेंब सारे बिलगून बैसलेले
निथळून साचलेले, तळवा भिजेल आता, हळूवार पावलांचा
झाडावरुन पक्षी, सारे उडून गेले
जेव्हा भिजून गेले, पंखात नाद त्यांच्या हळूवार पावलांचा
पाऊल वाट सारी, रात्री भिजून गेली
विसरुन तीच गेली, ओला ठसा कुणाच्या हळूवार पावलांचा
लेबल: कविता , गारवा , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
बघ माझी आठवण येते का?
बघ माझी आठवण येते का?
मुसळधार पाऊस खिडकीत उभं राहून पहा
बघ माझी आठवण येते का?
हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी
इवलसं तळं पिऊन टाक
बघ माझी आठवण येते का?
वार्याने उडणारे पावसाचे थेंब चेहर्यावर घे
डोळे मिटून घे, तल्लीन हो
नाहिच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये
तो उधाणलेला असेलच, पाण्यात पाय बुडवून उभी रहा
वाळू सरकेल पायाखाली, बघ माझी आठवण येते का?
मग चालू लाग, पावसाच्या अगणित सुया टोचून घे
चालत रहा पाऊस थांबेपर्यत, तो थांबणार नाहिच, शेवटी घरी ये
साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये
आता नवर्याची वाट बघ, बघ माझी आठवण येते का?
दारावर बेल वाजेल, दार उघड, नवरा असेल
त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढ़ेल
तो विचारेल तूला तुझ्या भिजण्याचं कारण, तू म्हणं घर गळतयं
मग चहा कर, तूही घे
तो उठून पंकज उधास लावेल, तो तू बंद कर
किशोरीचं सहेलारे लाव, बघ माझी आठवण येते का?
मग रात्र होईल तो तुला कुशीत घेईल, म्हणेल तू मला आवडतेस
पण तुही तसचं म्हणं
विजांचा कडकडात होईल, ढ़गांचा गडगडाट होईल
तो त्या कुशीवर वळेल, त्याच्या पाठमोर्या शरीराकडे बघ
बघ माझी आठवण येते का?
यानंतर सताड डोळ्यांनी छप्पर पहायला विसरू नकोस
यानंतर बाहेरचा पाऊस नुसता ऐकण्याचा प्रयत्न कर
यानंतर उशीखाली सुरी घे, झोपी जाण्याचा प्रयत्न कर
येत्या पावसाळ्यात एक दिवसतरी, बघ माझी आठवण येते का?
लेबल: कविता , गारवा , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
पुन्हा पावसालाच सांगायचे
पुन्हा पावसालाच सांगायचे
पुन्हा ढग दाटून येतात, पुन्हा आठवणी जाग्या होतात
तिचे माझे सारेच पावसाळे, माझ्या मनात भिजून जातात
पुन्हा पाऊस ओला ओला, पुन्हा पाऊस बांधून झूला
तिच्याकडले उरले झोके, परत करतो माझे मला
पुन्हा पाऊस खूप ऐकतो, पुन्हा पाऊस खूप बोलतो
त्याच्या माझ्या गप्पांमधले तिचे थेंब अलगद झेलतो
पुन्हा पावसाला सांगतो मी, पुन्हा पावसाशी बोलतो मी
माझे तिचे आठवण थेंब, पुन्हा पावसालाच मागतो मी
पुन्हा पावसालाच सांगायचे
कुणाला किती थेंब वाटायचे
मऊ कापसाने दरी गोठली
ढगांनी किती खोल उतरायचे
घराने मला आज समजावले
भिजूनी घरी रोज परतायचे
तुझी आसवे पाझरु लागता
खर्या पावसाने कुठे जायचे
लेबल: कविता , गारवा , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
गारवा, वार्यावर भिरिभर पारवा, नवा नवा
गारवा, वार्यावर भिरिभर पारवा, नवा नवा
प्रिये नभात ही चांदवा नवा नवा
गवतात गाणे झूलते कधीचे
हिरवे किनारे हिरव्या नदीचे
पाण्यावर सरसर काजवा नवा नवा
प्रिये मनात ही ताजवा नवा नवा
आकाश सारे माळून तारे
आता रुपेरी झालेत वारे
अंगभर थर थर थर नाचवा नवा नवा
प्रिये तुझा जसा गोडवा नवा नवा
लेबल: कविता , गारवा , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
पहिला पाऊस पहिली आठवण
पहिला पाऊस पहिली आठवण
पहिलं घरटं पहिलं अंगण
पहिली माती पहिला गंध
पहिलं आभाळ पहिलं रान
पहिल्या झोळीत पहिलच पान
पहिले तळहाथ पहिलं प्रेम
पहिल्या सरीचा पहिलाच थेंब
पहिला पाऊस पहिलीच आठवण
पहिल्या घराचं पहिलच अंगण
रिमझिम धून, आभाळ भरुन
हरवले मन, येणार हे कोण ?
मन फुलांचा थवा, गंध हा हवा हवा
वाहतो वारा नवा, जुन्यात हरवून
गूज मनीचे मनाला, आठवूनी त्या क्षणाला
सांगावे का माझे मला, उगाच मनात बावरुन
वार्यात गाणे कुणाचे, गाण्यात वारे मनाचे
मनाच्या वार्यात आता, सुरात तुला मी कवळून
लेबल: कविता , गारवा , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
माझ्या मनाचा आरसा
प्रेमात तुझ्या नाहलेला
लपवू किती जखमा अता
अजुनी न खपली धरलेल्या
माझ्या मनाचा आरसा
सांगू तुला कसा ???
मला वाटतं
यावे मी अश्रूनी भिजलेले गाल घेउनी
सारे अश्रू तू मधुर करावे तुझ्या ओठांनी.
माझ्या मनाचा आरसा
हे प्रीतबिंब तुझेच रे
नयानातले आसू तुझे
ओठांवर हासू तुझेच रे
माझ्या मनाचा आरसा
तू खोडकर प्रियकर माझा
श्वास ही दुणावलेला
तुझ्या घट्ट मिटीत माझा
माझ्या मनाचा आरसा
तुझीच छबी दाखवणारा
माझी मी न उरलेली
तुझा तू ना राहणारा
माझ्या मनाचा आरसा
एकरूप मी तुझ्या प्रतिबिंबात झालेली
माझे अस्तित्त्वही नाकारून
तुझ्या प्रेमात रंगलेली.
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
आपल्या नविन प्रेमामध्ये.....
आपल्या नविन प्रेमामध्ये.....
आपल्या नविन प्रेमामध्ये.....
एक नविन ॠतु आला
आपल्या नविन प्रेमामध्ये,
एक नविन उत्साह सळ्सळला
आपल्या नविन प्रेमामध्ये.....
आपण दोघेही नविन होतो
आपल्याच नविन प्रेमामध्ये,
एकांतातही तल्लीन होतो
आपल्याच नवीन प्रेमामध्ये.......
पावसालाही पडावसं वाटलं
आपल्या नविन प्रेमामध्ये,
कायमचा मुक्काम करावासा वाटला
आपल्या नविन प्रेमामध्ये.....
आपणही प्रेमळ...सामावून घेतलं...
आपल्या नविन प्रेमामध्ये
मन पावसाचं भरून आलं
आपल्या नवीन प्रेमामध्ये
लेबल: कविता , पाऊस , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
काल म्हटलं पावसाला,
काल म्हटलं पावसाला,
काल म्हटलं पावसाला,
माफ कर बाबा,
आज भिजायला जमणार नाही .
मैत्रीच्या पावसात भिजून
झालोय ओलाचिंब .
न्हाऊ घालतोय बघ मला
शुभेच्छांचा प्रत्येक थेंब..!
मित्रांची इतकी गर्दी झालीय
भिजून भिजून बघ मला सर्दी झालीय..!
पाऊस रिमझिम हसला .
ढगांना घेउन क्षितीजावर जाउन बसला .
जाता जाता म्हणाला," काळजी नको . भिजून घे खूप .
भिजणं थांबलं की घे पुन्हा मैत्रीचीच ऊब..!
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
पून्हा एकदा पावसात......
पून्हा एकदा पावसात...............
पून्हा एकदा पावसात
तिची माझी झाली भेट..
त्या ओल्याचिंब दिवसात.....
समोर मी दिसताच
मनापासुन हसली ती.....
उशीर का झाला? म्हणत,
थोडीफार रुसली ती...
देताच नजर नजरेला ..
थोडीशी... ती वरमली
जवळ ओढून घेताच..
थोडीशी... ती शरमली
बाहेर पावसाची रिपरिप
झोंबणार वारा..
चिंब मन...चिंब तन..
आसमंत सारा..
अगदी नेमक्या क्षणी,
वीज सूध्दा कडाडली.
मिठी अधिक घट्ट होऊन
ओठापाशी स्थिरावली
तिच्या ओठांशी ...
माझ्या ओठांचे...
बंध अचानक जुळुन आले
कुणितरी रसिकतेने..
त्यालाच चुंबन म्हणाले.
पून्हा एकदा पावसात
तिची माझी झाली भेट..
एका ओल्याचिंब दिवसात.....
लेबल: कविता , पाऊस , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
निःशब्द प्रेम
निःस्तब्धता
वर एक पान ही हलत नाही....
पाणीही शांत निजलेलं,उसळायचं ही विसरलेलं....
पाखरंही घरट्यां मध्ये निरागसपणे निजलेली...
नभात मात्र चांदण्यांची चावट कुजबुज् रंगलेली.
अश्याच रम्य क्षणी....
तुझी मिठी अजून अतृप्तता वाढवतेय,
आणि मी कणाकणाने जणु,तुझ्या मध्ये विरघळतेय.....
कंपित ओठांना माझ्या,तुझ्या ओठांचा आधार दे....
मोकळ्या माझ्या केसांमधून,
तुझा हात असाच् खेळू दे.....
तुझ्या राकट मिठी मधे आपण कायमचे एक होऊ...
निःशब्द या रात्रीत फक्त....
तुझ्या डोळ्यांतील बाहुल्यांना बोलू दे!!
फ़क्त बाहुल्यांनाच बोलू दे !!!
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!
आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या
कोसळणार्या धारा
श्वासांमध्ये भरून घ्यायचा
सळाळणारा वारा
कानांमधे साठवुन घ्यायचे
गडगडणारे मेघ
डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची
सौदामिनीची रेघ
पावसाबरोबर पाऊस बनून
नाच नाच नाचायचं
अंगणामधे, मोगर्यापाशी
तळं होऊन साचायचं!
आपलं असलं वागणं बघुन
लोक आपल्याला हसतील
आपला स्क्रू ढिला झाला
असं सुध्दा म्हणतील
ज्यांना हसायचं त्यांना हसू दे
काय म्हणायचं ते म्हणू दे
त्यांच्या दुःखाच्या पावसामधे
त्यांचं त्यांना कण्हू दे
असल्या चिल्लर गोष्टींकडे
आपण दुर्लक्ष करायचं!
पहिला पाऊस एकदाच येतो
हे आपण लक्षात ठेवायचं!
म्हणून...
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
नशीली निशा
नशीली निशा वादळी वादळाची
छातीस माझ्या तुझे बोट गोरे
ही नांदी म्हणावी नव्या वादळाची
संचारली वीज कल्लोळ झाला
हवा भोवताली खुळ्या वादळाची
कवटाळते घट्ट आकाश मेघा
मुसळधार खुल्ली ही झड पावसाची
सुखावून गेली धरित्री उपाशी
झाडांस "चढली" नशा वादळाची
कुठे 'नाम' नाही निशाणी कुणाची
तुला साथ माझी, मला वादळाची
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
पाऊसवेडी.............
पुर्वी पावसाळा मला फार आवडायचा
पण आता मात्र तो मला आवडत नाही
तूला पावसाळा फार आवडायचा
आणि म्हणून मलाही...........
आपल्या पहिल्या भेटिचा पाऊस
मला अजूनही आठवतोय
कोसळना~या पावसात, ओल्याचींभ रानात
तू लहान मुलीसारखी नाचायचीस
विजांचा कडकडाट, पाऊसाचा मार
पायखालचा चिखल, सार विसरून तू
पावसाला अलगत झेलायचीस.......
पाऊसही तुझ्याशी मित्रासारखा वागायचा
तू थकल्यावर आपल बरसन थांबवयचा
तूझा लटका राग पाहून मग
पून्हा रानभर कोसळायचा
पाऊसाचा निरोप घेवून तू
तूझ्या घराकडे निघायचीस
पाऊससुद्धा तूझ्या मागोमाग
तूझ्या अंगणापर्यंत यायचा
तू घरात गेल्यावर मात्र
रिमझीम उंबरठ्यावर करायचा
तू झोपी गेल्यावर मग
हळूच आभाळात साठायचा.....
अशाच पाऊसात तू मला भेटली होतीस
मग कितीतरी आपल्या पाऊसभेटी
मी काहीतरी सांगनार इतक्यात
पऊस अचानक बरसायचा
माझ बोलन न ऐकताच
तू पावसाशी खेलू लागायचीस
पावसाबरोबर नाचताना तू
मलाही पावसात ओढायचीस
अशाच पावसात भीजून तू
माझ्या मीठीत आली होतीस
मनातल सार माझ्या जाणून
तू गोड हसली होतीस
माझ्या मनातले सारे बोल
तूला पावसानेच सांगीतले असनार
म्हणूनच तूझ्याईतकीच
पावसाचीही मी वाट पाहनार
पाऊस निघून गेल्यावर
तूही अशीच निघून गेलीस
पावसाला आपल करून तू
मला मात्र अश्रू दिलेस
आता पाऊस कितीही कोसळलातरी
मी मात्र भिजत नाही
भिजतात त्या तूझ्या आठवणी
आणि पाऊसाईतकच डोळ्यातही पाणी
पाऊस आणि मी तूझ्यासाठीच वेडे
तू मात्र पाऊसवेडी
म्हणून पाऊस मला आता आवडत नाही
तू पावसाची...पाऊस तूझा....
मी मात्र वेडा त्या पाऊसवेडीचा..............
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
धरा भिजली भिजली...
आज ना माझ्याकडे हलकासा पाऊस पडला...
मजा आली पावसात भिजताना अन कवितेला स्मरताना...
धरा भिजली भिजली
ओल्या मातीला सुवास
थेंब इवलेसे झाले
पाना फ़ुलांची आरास
चिंब पाखरांना आता
गीत प्रेमाचे स्फ़ुरले
आपल्या गं मिलनाचे
थेंब हवेत तरले
असा विसावला सये
एक थेंब तुझ्या गाली
मीही वाटे थेंब व्हावे
तुझ्या ओठांची गं लाली
थेंब कोवळे कोवळे
असे मनी पाझरती
सूर तुझ्याच प्रेमाचे
असे शब्दात झरती
ओले चिंब पावसाला
तुझ्या रुपानेच केले
भिजवुन मला थेंब
तुझ्या केसुत विरले
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
पहिला पाऊस.........
पहिला पाऊस.........
पहिला पाऊस
मातीचा गंध
हर्ष होई मना
चराचरी आनंद
तप्त धरती
थंड पावसाची धार
तृप्त झाली माती
निसर्ग झाला गार
मयूर बेधुंद नाचे
धुंदी कणाकणात
पाखरे गाती गाणी
चैतन्य रानावनात
ढगांचा गडगडाट
विजांचा कडकडाट
भरलाय आसमंत सारा
पहा खट्याळ झालाय,तो वारा
सुखद बळीराजा
पावसाचा ऋणी
बरस रे वरुणराजा
मैत्री आपली जुनी
मन होई पाखरू
म्हणे पावसात फिरू
उकडलेल्या या देहाला
थोडे शितळ करू
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
पाउस आयला पाउस
पाउस आयला पाउस
हिरवे गाने गायाला पाउस
नभाला दुभंगुन
वार्यात या रंगून
भूमिवर या रंगायाला
पाउस आयला पाउस
भुइवर रंगायाला
पाउस आयला पाउस
थेम्बा थेम्बचा पाउस
दरी दरिच्या या खल्याला
रानोमल अन मल्याला
धब्धाब्याच्या संग झिन्गायाला
पाउस आयला पाउस
सर सर सरी
पाउस आयला पाउस
चातक मोराच्या तृश्नेला
घाम धरांच्या उश्नेला
अंगी अंगी झोम्बयाला पाउस
पाउस आयला पाउस
थेम्बंचा पाउस आयला
पाउस आयला पाउस
यवनाचा आयला पाउस
मिलानाचा आयला पाउस
चिम्ब चिम्ब भिजयाला पाउस
पाउस आयला पाउस
महापुराचा पाउस
उरा उराचा पाउस
घर घरात नान्दयाला पाउस
पाउस आयला पाउस
डोल्या डोल्यांचा आयला पाउस
पाउस आयला पाउस
पाउस आयला पाउस
पाउस आयला पाउस
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
तु पाउस अन मी रान होते
तु पाउस अन मी रान होते
जन्म आसवांसवे काढला मी
सोबतीस आठवणींचे रान होते
मनावरी जमले धुळिसम मृगजळ
खोट्या स्वप्नांचे ते दान होते
तु रात विझवलीस जरी माझी
डोळ्यातही माझ्या तुच होतास
तु लाख खोटे बोललास तरी
मी तुझ्याच गळ्याची आण होते
भेटल्या आजही अफवाच तुझ्या
तु समोरी आलाच नाहीस....
माझ्यासवे तु स्वप्नात होतास
तेव्हा भासांचेही मज भान होते
मेघ गहीरे गरजले जेव्हा
तुही बरसलास ओलेत्याने
सभोवती तनु उमलली तेव्हा
तु पाउस अन मी रान होते
लेबल: कविता , पाऊस , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
पाऊस - नादमय
पाऊस - नादमय
टिप टिप टिप टिप कोसळता थेंब
ओलं ओलं ओलं ओलंतन होई चिंब
लखलख लखलख चमकते वीज
गुपचूप गुपचूप पाखरांची निज
गडगड गडगड घुमतोया नाद
चुपचाप चुपचाप चातकाची साद
गार गार गार गार झोंबू लागे वारा
एक एक एक एक वेचू चला गारा
झपझप झपझप चालतात पाय
हुळूहुळू हुळूहुळू पावलात होय
चमचम चमचम मोती तो पानात
नवं नवं नवथर गीत ते रानात
वेडं वेडं वेडं वेडं मन होई वेडं
स्वरस्वर स्वर नवा सतार ती छेड
भरभर भरभर उमटती ओळी
गात गात गात गात उभी येथे खुळी !!
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
पाऊस
पाऊस
मला नसते तुला भिजवायाचे.
तुला असते प्रेम-रसात भिजायचे.
विखुरलेल्या थेंबाना एकत्र करायचे .
पाण्यासारखं होऊन वहायचे.
समुद्राला भेटायचे.
सूर्य-किरणांना थंड करुन वाफ़ बनायचे.
ढग बनून पुन्हा आकाशात फ़िरायचे.
मला नसते तुला भिजवायाचे.
तुला असते प्रेम-रसात भिजायचे.
विखुरलेल्या प्रेमाला एकत्र करायचे.
पाण्यासारखं प्रवाही बनून प्रियकराकडे वहायचे.
प्रेमाच्या सागरी जाऊन मिळायचे.
प्रियकराला थंड करुन वाफ़ेसारखे हलके बनायचे.
ढगासारखे स्वच्छंद प्रेमाच्या हवेतच तरंगायचे.
मला नसते तुला भिजवायाचे.
तुला असते प्रेम-रसात भिजायचे.
लेबल: कविता , पाऊस , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
पहिला पाऊस
कोसळणारा पाऊस पाहुन
मला नेहमीच एक प्रश्न पडतो
माझं तर ठीक आहे
पण हा कुणासाठी रडतो
दव पडलेल्या गवतावरून
जेव्हा मी हात फ़िरवतो
तुझे अश्रू पुसतोय
आसाच मला भास होतो
गोडीगुलाबी अन थोडासा रुसवा,
खुप सारे प्रेम अन थोडासा राग हवा,
नको अंतर नको दुरावा
पावसाला लाजवील, असा
असावा मैत्रीत ओलावा
मैत्री नको चंद्रा सारखी,
दिवसा साथ न देणारी,
नको सावली सारखी सदा पाठ्लाग करणारी
मैत्री असावी अश्रु सारखी सदा सुख दु:खात साथ देणारी ..............
लेबल: कविता , पाऊस , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
'ती' आणि 'पाउस'
'ती' आणि 'पाउस'..
'ती' आणि 'पाउस'..
पाउस...किती आनंद होतो ना पाउस चालू झालाकी...पण आतशा हाच पाउस, तिची आठवन करुन देतो,
तिचे विचर मनात घोळका करतात, मनात काही प्रश्न उठतात..काही ईच्छा येतात..आणि मग, तिचि आठवण,मनातले प्रश्न आणि मनातली इच्छा यांतून येते हि कविता...'ती' आणि 'पाउस' ....
'ती' आणि 'पाउस'..
मला पहाचय तिला एकदा पावसात भिजताना,
सर-सरनार्या सरींमध्धे ओली-चींब होताना...
पहिल्या वहिल्या पावसात,
ती नाच नाच नाचेल
चेहेर्यावरचं हस्य तिच्या,
आणखि खुलुन उठेल..
पाउस सुध्धा वेडा होईल,
तिला ओली करताना..
मला पहाचय तिला एकदा,
पावसात भिजताना...
भिजता भिजता हळूच,
ती केसं मोकळे सोडेल..
डोळ्यावरची ओली बट,
हळूच मागे सारेल..
उर्वशीही लाजवेल बिचारी,
तिचं मोहक रुप बघताना,
मला पहाचय तिला एकदा,
पावसात भिजताना...
भिजता भिजता कदाचीत,
ती माझी आठवन काढेल..
बरसनार्या त्या पावसालाही,
मग माझाच हेवा वाटेल..
पण,ख्ररच माला आठवेल का ती?
अस काही घडताना..
मला पहाचय तिला एकदा,
पावसात भिजताना...
पावसाळा चालू झाला की,
तिचेच विचार मनात येतात..
नकळतच डोळे माझे,
उगाचच पाणावतात..
पण,माझ्या भावना कळतात का तिला?
मी तिच्या आठवनीत भिजताना..
मला पहाचय तिला एकदा,
पावसात भिजताना...
कधीतरी पावसात ती,
माझ्या सोबत असेल..
मी तिच्या प्रेमात आणि,
ती पावसात भिजेल..
पुर्ण होईल का माझ स्वप्न?
मी या जगात असताना..
मला पहाचय तिला एकदा पावसात भिजताना,
सर-सरनार्या सरींमध्धे ओली-चींब होताना...
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
पाऊस,अन तु..
पाऊस,अन तु...
तो पाऊस,अन ती तु..
दोघांच्यकिती साम्य आहे नाही?
दोघेमला हवेहवेसे,
वारंवाभेटावेसे वाटणारे..
मला "गारवा" देणारे,
अन मन शितल करणारे..
दोघांचाही तो सुगंध ..
मन तॄप्त करणारा,अन श्वासात भरुन राहिलेला..
दोघही मनातल्या मनात माझ्याशी गप्पा मारणारे...
अन निख्खळ आनंद देणारे..
पण......
कधीकधी दोघंही चिंब भिजवणारे..
तो पाण्याने अन तु आसवांनी.......
लेबल: कविता , पाऊस , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
पाउस...तीच्या पावलांवरचा
ती आली तोच पाऊस घेउन
तिचे ते काळेभोर डोळे..ओळखीचे
पण अनोळखी थेंब गाळणारे
थेंब सुद्धा लोचट...तीला चिकटत ओघळणारे
आपलं अस्तीत्व जपत, पावसाला टाळत कोसळणारे
जमीनीवर पडून पुन्हा उसळणारे
नेहमी उत्कट-बित्कट वागणारा मी,
आज असा दगडा सारखा स्तब्ध
ती जर बोलली असती तर हेच बोलली असती..
पण मलाही ते समजत होतं
मी तिच्या पायाच्या अंगठ्याकडे पहात उभा..
जमीनीत रूतलेले तिचे अंगठे..
बहुदा तिच्या वेदनांचा शेवट तिथे होत असावा
पडलेल्या थेंबांशी हितगुज करत ते ही तसेच निश्चल..
त्यानंतर पाऊस कोसळला, चमचमला, हळहळला
आता उद्या नाही असा बरसला
मी तसाच उभा होतो
पावसाचा हल्ला झेलत
ती गेली निघून
तिच्या पाउलखुणा सोडून
त्यानंतर मी कितीतरी वेळ...
तिच्या पाऊलखुणांवरचा पाऊस टीपून घेत होतो..
अधाश्यासारखा...
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
कधी कधी पाऊस ही येतो असा
कधी कधी पाऊस ही येतो असा सुख शिंपडून
थोडा नभात दाटून थोडा पाण्यात सांडून
मन पाखरू ही गाते गाणे मधुर स्वरात
कधी हिरव्या पानात चिंब भिजल्या रानात
कधी कधी वारा ही बेभान भरकटे आनंदात
वेडा होऊन नाचतो जल सरींच्या प्रेमात
प्रीत उनाड वार्याची लाजवते पावसाला
फुले प्रेमाची पालवी एका अबोल क्षणाला
कधी कधी मेघ ही घालतात मायेची पाखरण
पाना-फुलांत होई मग रंग-गंधाची उधळण
धूळ सरली पाण्यात आज ताजे जुने क्षण
मनातल्या कोपर्यात पावसाळी आठवण
कधी कधी ऊन ही पसरते तेज किरणांचे पिऊन
शोभे सृष्टी हिरवी ही साज रंगाचे लेऊन
थेंब पावसाचे कधी ओल्या ओंजली घेऊन
भेट श्रावणाशी होई सप्तरंगात न्हाऊन
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
पावसाच अन माझ नात
पावसाच अन माझ नात
इतक गहिर होत जात..
सरी बरसतात त्याच्या
अन माझ्या कवितेला उधाण येत ..
मी बावरतो
मी सावरतो
मी झेलीत सुटतो सरी-सरींना
त्याचा होऊन जातो इतका
माझ्यात प्रेम उगवत जातं ..
पावसाच अन माझ नात
इतक गहिर होत जात..
वीजा चमकतात नभात
पण प्रकाश हुंकारतो, माझ्या मनातला
कधी पडुन पडुन दमतो तो,
आणी श्वास भरतो माझ्या छातीतला ..
मग रान नव्याने फुलत जात
सुगंधात मुरत जात
भान सोडुन "तीचं" देखील, माझ्यात प्रेम उगवत जातं ..
पावसाच अन माझ नात
इतक गहिर होत जात..
लेबल: कविता , पाऊस , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
पाऊस दाटलेला असताना मनात..
पाऊस दाटलेला असताना मनात..
तु जवळ असावे असे वाटते..
तुझा खांदा कडे कपारी व्हावा अन्..
मी झरा होवुन कोसाळावेसे वाटते..
पाऊस दाटलेला असताना मनात..
तुला घट्ट बिलगावेसे वाटते..
क्शनभर का होईना पण्..
तुझ्याशी एकरुप व्हावेसे वाटते..
पाऊस दाटलेला असताना मनात..
आपन दोघांनी अबोल रहावेसे वाटते..
न बोलता सगळेकाही जाणावे..
असे दोघांनाही वाटते..
पाऊस दाटलेला असताना मनात
लेबल: कविता , पाऊस , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
पहिल्या पावसातलं पहिलं प्रेम
दुकानात गेलेल्या तिला
मध्येच पावसाने गाठलं आणि
तिच्यामागून छत्री घेऊन गेलेल्या
त्याला तिने वेड्यातच काढलं'.
तिच्या बॅगमध्ये
थ्री-फोल्डिंगची छत्री असेल असं
भोळ्या-भाबड्या त्याला कसं कळणार?
पण तरीही न उपयोगी पडता
त्या छत्रीने काय तो इशारा दिलेलाच असतो.
कॉलेज कॅम्पसमध्येही
छत्री देण्याघेण्याच्या प्रसंगांवरूनही प्रेम फुलू शकतं.
पहिल्या पावसातलं पहिलं प्रेम
असंच न सांगता
बरंच काही सांगणारं असतं.
लेबल: कविता , पाऊस , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
इच्छापत्र
माणूस म्हणून मी
कणाकणा ने संपतोय
भावनांचे ओलावे
अन्
शब्दभंडार
आता रिते झालेत
काळ बदललेल्या वाळवंटात
सावल्या मृगजळामागे
धावू लागल्यात
आता त्या कविता प्रसवत
नाहीत,
शब्दाना गार्हाणे घालून
कवितेचा कौल मिळत नाही.
माझ्या अपूर्ण आयुष्यात
पूर्णांक नसेलही परंतु
आता काहीच तडीस जात नाही
हा अंत आहे वा प्रतिभेचा र्हास
हेच असेल तर
इच्छापत्राची वाट मोकळी करणे
गरजेचे आहे.
माझा उरलेला सहवास मी
माझ्या धूक्यात दडलेल्या गावास
अर्पण करतो,
आईची चोळी कधी माझ्यासाठी
ओली झाली असेल ती उरलेली
ओल मी विधेवेच्या मोकळ्या
केशसंभारात माळतो
प्रेयसीने दिलेल्या चुंबनाचा गोडवा
रात्र जागणार्या वारांगणेवरुन
ओवाळुन टाकतो.
प्रेयसीला नाकारलेल्या प्रेमाचा
अंश,
प्रतारणे नंतरही तिने केलेली मोकळी वाट
गर्भपातानंतर तिने गाळलेले आश्रू
ह्यांचे देवार्पण व्हावे
अन् माझी रक्षा पात्रास मिळताच
त्यानी रक्षेस कवेत घ्यावे.
ज्या मित्रांच्या मैत्रीत
आबालालाजी रेहमानान्ची अमूर्तता
होती
ज्यांच्या आलिंगणात
आधाराची ओढ होती
ते सारे सारे मी वार्यावर उधळायला
तयार आहे,
माझ्या शब्दांची "ग्रेस " मी कवितेच्या
दानपेटीत टाकतो,
माझ्या कवितांचे गूढार्थ मी हिरे
म्हणून ताजमहालवर चिटकवायला
तयार आहे
माझ्या कवितांच्या विटान्चे
थडगे झालेच तर मी माझे
शरीरही द्यायला तयार आहे.
फक्त इतकेच लिहा
थडग्यावर :
" मन कशात लागत नाही
आदमास कशाचा घ्यावा
अज्ञात झार्यावर रात्री
मज ऐकू येतो पावा "
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
पावसाच गाणं
.
पावसाच गाणं होत..
मन भारलं गुंग होत..
झिम्मड धारांत,
झुम्मड नाचलं..
चिंब थेंबा-थेंबात,
अंग-अंग भिजलं..
साचल्या थेंबात,
थप्प-थप्प थिरकलं..
भिजल्या पिसात,
घट्ट लपेटलं..
हरवू नाचत,
नखशिखान्त ओलावलं..
मन हरकलं..
मन आनंदलं!
:
:
:
भिजली गळली पिसं,
मन उदासल.. आक्रसलं!
पावसाच गाणं,
विरून गेलं..
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
पाऊस पाऊस
पाऊस पाऊस
पावसाचं नेहमी असच असतं
तुला भेटायचं असतं
तेव्हाच त्याला पडायचं असतं...
चालता चालता
वा~याचं असं भेभान होणं
छत्री उडवून माझी
पावसाला मला भिजवण्याची संधी देणं...
काळ्या काळ्या
ढगाचं गडगडुन माझ्यावर हसणं
बघता रागाने ढगांकडे
विजेचं माझ्यावर कडाडुन चमचमणं...
चिम्ब चिम्ब
होऊन तुला भेटायला येणं
हॉटेलमधे बसल्यावर
तुझं मला ते रुमाल देणं...
गरम गरम
कॉफ़ी एकाच कपमधे पिणं
"पाऊस थांबला कि जा"म्हणून
तुझं मला थांबवून घेणं...
गुपचुप गुपचुप
पावसाला "थॅन्क यू" म्हणनं
तुझा सहवास लाभेल म्हणून
पावसाला "पडत राहा" अशी विनावणी करणं...
नावडता नावडता
म्हणत होते मी पावसाला
सा~या गोड आठवणी आठवता
पाऊस झाला आज "लाडका"...
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
कातरेळचा पाऊस.
कातरेळचा पाऊस. . .
थोड्याच वेळात पावसाला सुरुवात होईल
आभाळ भरुन आलंय वाद्ळी मेघांनं . . .
मग टपोरे थेंब उतरतील अलगद खाली
कुठूनतरी वीजेचा कडकडाटही ऎकू येईल
मी बसलोय त्याच खिडकीत. . . पुन्हा एकटाच
का कोणास ठाऊक मला वाटतयं
की तिच्या इथंही बरसत असेन तो
अन. . . एकटीच असेन ती घरात
वाट पाहत. . . . . . . नवरांची. . .
सगळे रस्ते एव्हाना शांत झालेत. . .
अन अंधार देखील पडेल आता
मग तिही सावकाश खिडकीत येईल
का बरं उशीर झाला असेल त्याला?
ती विचारेल दहादा त्या खट्याळ वारांला. . .
केस मागे सारताना मग बांगड्याचा आवाज होईल
कडाडणारां वीजेत त्यांची किणकिण विरघळून जाईल
अन अश्याच कातरवेळी तिला तोही पावसाळा आठवेल
माझ्या मातीचा गंध तिला तिच्या मातीत जाणवेल
सगळं तेच, तोच पाऊस, तीच वेळ. . .तीच झाडं , तोच गंध
एक सुरुवात . . .तोच शेवटं . . . एका थेंबाचा अखेरचा बंध
विसरत आलेली एवढीच आठवण
सरत आलेल्या पावसात बरसुन जाईल
चुकलेली एक गार झुळूक. . .
माझ्याही घरांत मग फिरून जाईल
भानावर येईल ती मगं. . .
जेव्हा एक जोराचा कडकडाट होईल
तितक्यात दारावर ओळखीचा. . .
आणखी एक खडखडाट होईल
तो असेल. . .चिंब भिजलेला. . .काहीसा थकलेला. . .
तरीही डाव्या हातात असेल. . . तिच्यासाठी गजरा आणलेला. . .
पाणवलेल्या नजरेचा एक थेंब, अचानक मग गालावरुन ओघळेल
माळलेल्या गजरांची एक कळी, तितक्यात मग खुद्कन उमलेल. . .
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
पाऊस पडून गेल्यावर, मन पागोळ्यांगत झाले
पाऊस पडून गेल्यावर, मन पागोळ्यांगत झाले
क्षितीजाच्या वाटेवरती पाण्यावर रांगत गेले
थेंबांना सावरलेल्या त्या गवतांच्या काडांचा
पाऊस पडून गेल्यावर, मी भिजलेल्या झाडांचा
पाऊस पडून गेल्यावर, मन थेंबांचे गारांचे
आईस चकवूनी आल्या त्या डबक्यांतील पोरांचे
मोडून मनाची दारे, येवुली पाऊल भरती
पाऊस पडून गेल्यावर, या ओल्या रस्त्यावरती
पाऊस पडून गेल्यावर, मी चंद्रचिंब भिजलेला
विझवून चांदण्या सार्या, विझलेला शांत निजलेला
पाऊस पडून गेल्यावर, मन भिरभीरता पारवा
पाऊस पडून गेल्यावर, मन गारठता गारवा ....
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
अचानक आला पाऊस
अचानक आला पाऊस
काय माहीत अचानक कुठुन आला
जाता जाता सगळं ओल करून गेला
शहाणा येतोय येतोय सांगून लवकर पळाला
आणि घाम पुसता पुसता आमचा रुमाल भिजून गेला
सांगून तर गेलाय तुमची वाट लावून जाणार
बघुया यंदा आमची महानगरपालिका तरी काय करणार
का यंदाही सामान्य नागरिकच भरडला जाणार
आणि परत परिस्थिती हाताळता हाताळता आमच्या नाकीनऊ येणार
सांगून तर गेलाय लवकर येतोय म्हणून
बघुया त्याला किती उशीर आहे अजून
मी म्हणालो यायचयं तर लवकर ये फार उकडतयं
तर बोलतो लवकर ये लवकर ये बोलायला तुमचं काय जातयं
बोलतो घरून पाठवल्याशिवाय आम्ही येऊ शकत नाही
तुमच्या या परिस्थितीला तुमच्याशिवाय दुसरं कोणीच कारणीभूत नाही
मला वाटतं यंदाही तो असचं करणार
पालिकेबरोबर झिम्मा खेळून मग आपल्याबरोबर लपंडाव खेळणार
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
रिपरिप येतो मनि तरंगतो आनंदाचे गाणे
रिपरिप येतो मनि तरंगतो आनंदाचे गाणे
रंग येऊन पानोपानि स्मरवितो तराणे
पाऊस आला , पाऊस आला , पाऊस आला .
बालपणाच्या आठवणी घेऊन तो येतो
पाण्यातल्या होड्या नि गाणि तो गातो
वारा पण अलगद डोलु लागतो
हिरवा निसर्ग सारा ओलागार होतो
पाऊस आला , पाऊस आला , पाऊस आला .
मित्र तो , सखा तो , हळवार येतो
मन प्रसन्न करुन तो आनंद देतो
गरम चहाचा स्वाद तो वेगळाच देतो
खिडकित बघताना तो डाळे टिपुन घेतो
हाताच्या बोटावर तो आपला नाच करतो
पाऊस आला , पाऊस आला , पाऊस आला .
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
माथेरानच्या कविता
माथेरानची कविता १
घन पाऊस पाऊस
चहू दिशांनी पाऊस
माझ्या आत उचंबळे
वेडा पाऊस पाऊस
पावसाचे हे थैमान
त्यात ओले माथेरान
कंच झाडांच्या मुळांशी
चिंब भिजलेले मन
कोसळतो घणाघाती
रुद्र पाऊस प्रपाती
आत खोलवर उगे
कोवळीशी तॄणपाती
...
कोवळीशी तॄणपाती
तॄणपाती तॄणपाती...
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
मन ओलसर ऊन
असा श्रावण श्रावण
मन ओलसर ऊन
सोमवार आणतो गं
माहेराची आठवण
झाडावर टांगले गं
झुले पिवळ्या दोरांचे
मन नाचे थुई थुई
साथी पैंजण थेंबांचे
पिवळाल्या कण्हेरीशी
माझे जिव्हाळी संबंध
माझा श्रावण धाडतो
माय मातीचा सुगंध
असा हिरवा श्रावण
किती सांगू मी कौतुक
हिर्व्या चोळीला लागते
मग 'तिकडची' भुक
असा श्रावण श्रावण
मन ओलसर ऊन
मन ओलसर ऊन
मन ओलसर ऊन
लेबल: कविता , पाऊस , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
शार्लोट लेक ( माथेरान)
दरीदरीतून उमटत परततात
बनतात उचंबळणा-या लहरी
मला माझे सगळे अस्तित्त्वच
विशाल झाल्याचा भास होतो...
भास होतो मला प्रपाताचा
माझ्या हृदयातून उसळू पहाणा-या
भास होतो तेजस्वी विजेचा
माझ्या अंतरात्म्यातून स्फ़ुरणा-या
सगळी पंचमहाभूतं माझ्या
रंध्रारंध्रातून जागृत होतात...
वा-यावरून मला हाका ऐकू येतात
पृथ्वी, आप , तेज , वायू , आकाश...
...
तंद्री भंगतॆ
...
मित्र दारू प्यायला बोलावताहेत.
लेबल: कविता , गणपती बाप्पा , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
पाऊस ओसरून आज.........
पण पाऊस विसरता आला नाही....
कधी मनात तर कधी डोळ्यात......
त्याचा जोर सावरता आला नाही.......!
मनातला आणि डोळ्यातला पाउस..
थाम्बवने मित्रा आजवर कुणाला जमले नसावे...
उपाय फ़क्त इतकाच आहे..
"तू नहीं तो और सही" मंत्राला जपत बसावे...
लेबल: कविता , चारोळी , पाऊस , प्रेम कविता , मराठी कविता , मराठी चारोळी , मराठी चारोळ्या , charoli , marathi charolya , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
junach paus....
ani sakhiche paijan,
pawle bhijat jatana,
wirun jatat hridayache spandan...
pawsat sobat bhijayche
ata fakt swapnach rahile..
mhanun sakhichya athwanit
dole papnyansobt bhiju lagle..
pratek paus ata
nawa asel tula,
pan athwani junyach astil..
pratek kshan jagtana tula,
maze june sparsh athwatil..
pratek weli
Paus ani Rutu badlat jatil
pan,
pan man matr tithech
aaplya pahilya pawsat bhijat astil....
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
पाऊस उसवतो धागे
गोधडी मनाची खुलते
तुकडे सरल्या दिवसांचे
खपली काळाची पडते
आषाढाचे कोसळणे मी ओसरीत बसलेली
तू शोधत आडोशाला नजरेला पाणी भिडते
पाऊस उसवतो धागे
गोधडी मनाची खुलते
मन श्रावण श्रावण झाले झुलणार्या झोपाळ्यांचे
सावरी धुके स्वप्नांचे जमिनीवर पाऊल नव्हते
पाऊस उसवतो धागे
गोधडी मनाची खुलते
तो भाद्रपदाचा चकवा कधी रुसलेला कधी ओला
ओल्याश्या आडोशाला पाऊल वाकडे पडते
पाऊस उसवतो धागे
गोधडी मनाची खुलते
तो आश्विन पाऊस जेव्हा गडगडला हृदयावरती
वीज घरट्यावरती माझ्या मनी तुझ्या काहीसे घडते
पाऊस उसवतो धागे
गोधडी मनाची खुलते
दिन काळोखे वैराण मळमळत्या रात्री ओल्या
विसरावे सारे सारे पण जखम मनी भळभळते
पाऊस उसवतो धागे
गोधडी मनाची खुलते
तुकडे सरल्या दिवसांचे
खपली काळाची पडते
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
ए पावसा
ए श्रावणाच्या पावसा
येशी अचानक झनन झन
भिजवित तनू
उडवित फ़वार
जाशी मनावर उजळुनी
एक सप्तरंगी कवडसा
ऎ पावसा
ए श्रावणाच्या पावसा
गच्चीत मी असता उभी
तू गच्च येवून भिजवशी
ओढून माझि ओढणी
तू रास झिम्मा खेळशी
तनु भिजवशी
मन खुलवशी
शृंगारशी मन मानसा
ए पावसा
ए श्रावणाच्या पावसा
ए श्रावणाच्या पावसा
तू बरसशी का नागडा
मन कोवळे उन टिंबसे
मन केतकी बन चिंबसे
फ़ुलतो सुवासिक केवडा
अन वाढवी तृष्णा बिलोरी
सुखमयी मन आरसा
ए पावसा
ए श्रावणाच्या पावसा
ए श्रावणाच्या पावसा
येशी अचानक झनन झन
भिजवित तनू
ऎ पावसा
ए श्रावणाच्या पावसा
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
माझी आई
तीच ती........
तीच ती........
तिची अनेक नावे
देवाच्या आधी मनात तिच भावे
ती साकारते अनेक रूपे
तीच माझ्यासाठी स्व: स्वरुपे
तीची नाही गणना कुणातही
तीच माझ्या दुःखात सहभागी होई
तीच ती जीच्यासाठी मी अमूल्य ठेवा
किती तरी करु मी तीचा हेवा
तीच ती माझ्यासाठी सर्वकाही
जीच्यावीना माझे जीवन व्यर्थ राही
ती तीलाच म्हणतो मी
ही माझी आई.
लेबल: आई , कविता , मराठी कविता , Aai , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
प्पापा सागा कुनाचे?
प्पापा सागा कुनाचे?
प्पापा माझ्या मंमिचे.
मंमि सागा कुनाची?
मंमि माझ्या पप्पांची.
इवल्या इवल्या घरट्यत
चिमणा चिमणी राहतात,
चिमणा चिमणी अण भोवती
चिमणे पिल्लेही चिवचिवती.
प्पापा सागा कुनाचे?
प्पापा माझ्या मंमिचे.
मंमि सागा कुनाची?
मंमि माझ्या पप्पांची.
आभाळ पेलती पंखवरी,
प्पापाना घरटे प्रिय भारी.
चोचित चोचिन घास द्यवा,
पिल्लचा हळुच पापा द्यवा.
प्पापा सागा कुनाचे?
प्पापा माझ्या मंमिचे.
मंमि सागा कुनाची?
मंमि माझ्या पप्पांची.
पंखाशी पंख हे जुळताना,
चोचित चोचिन हे मिळतांना.
हासते नाचते घर सरे,
हासते छप्पर भिनति दारे.
प्पापा सागा कुनाचे?
प्पापा माझ्या मंमिचे.
मंमि सागा कुनाची?
मंमि माझ्या पप्पांची.
लेबल: आई , कविता , मराठी कविता , वडील , Aai , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
पाणी झरत चालले आज आभाळ फाटले
पाणी झरत चालले आज आभाळ फाटले
पावसाला पावसाने वर ढगात गाठले
पाणी झरत चालले झाड झाडाच्या मीठीत
आता झाडाच्या भवती रान आगीच्या ढगीत
पाणी झरत चालले नदी सागर भरती
वाळू ओलावली सारी दोन्ही किनारयावरती
पाणी झरत चालले उभ्या रानाला तहान
पाणी झरत चालले उभ्या रानाला तहान
आता किलबिलताहे झाडाझाडातून पाखरं
पाणी झरत चालले आज आभाळ फाटले
पावसाला पावसाने वर ढगात गाठले
गारवा, वार्यावर भिरिभर पारवा, नवा नवा
प्रिये नभात ही चांदवा नवा नवा
गवतात गाणे झूलते कधीचे
हिरवे किनारे हिरव्या नदीचे
पाण्यावर सरसर काजवा नवा नवा
प्रिये मनात ही ताजवा नवा नवा
आकाश सारे माळून तारे
आता रुपेरी झालेत वारे
अंगभर थर थर थर नाचवा नवा नवा
प्रिये तुझा जसा गोडवा नवा नवा
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
एक दिवस असा होता की...........
कुणीतरी माझ्या फोनची वाट पहायचं
स्वतःच फोन करुन मनसोक्त बोलायचं
त्या गोड गप्पामध्ये रंगायचं
एक दिवस असा होता की
कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं
गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं
मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं
एक दिवस असा होता की
कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं
वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं
फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं
एक दिवस असा होता की
कुणीतरी माझ्यासाठी झुरायचं
पण माझं यातनामय जीवन त्याला कसं सांगायचं
मग काय, विहिरीतील कासव बघायचं
आज दिवस असा आहे की
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं
वेळ देऊनही फोन नाही करायचं
आज दिवस असा आहे की
मी माझं नातं मनापासुन जपायचं
मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं
पण माझं हे दु:ख कोणाला कळायचं
आज प्रश्न असा आहे की
का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं
का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं
का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं
मित्रा, आपल्याल नाही हे जमायचं
दु:खातही आपण मात्र हसायचं
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं!
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
आता लिहा मराठीत
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .



