ए श्रावणाच्या पावसा
येशी अचानक झनन झन
भिजवित तनू
उडवित फ़वार
जाशी मनावर उजळुनी
एक सप्तरंगी कवडसा
ऎ पावसा
ए श्रावणाच्या पावसा
गच्चीत मी असता उभी
तू गच्च येवून भिजवशी
ओढून माझि ओढणी
तू रास झिम्मा खेळशी
तनु भिजवशी
मन खुलवशी
शृंगारशी मन मानसा
ए पावसा
ए श्रावणाच्या पावसा
ए श्रावणाच्या पावसा
तू बरसशी का नागडा
मन कोवळे उन टिंबसे
मन केतकी बन चिंबसे
फ़ुलतो सुवासिक केवडा
अन वाढवी तृष्णा बिलोरी
सुखमयी मन आरसा
ए पावसा
ए श्रावणाच्या पावसा
ए श्रावणाच्या पावसा
येशी अचानक झनन झन
भिजवित तनू
ऎ पावसा
ए श्रावणाच्या पावसा




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा