|
--
sumit love to friends
|
माझ्या मनात तुझे येणे-जाणे...
हे आता नेहमीच झाले आहे
जेव्हापासुन पाहिले तुला
हे मन तुझ्यातच गुंतले आहे
माझ्या मनात तुझे येणे-जाणे...
फक्त स्वप्नापुरतेच राहीले आहे
कारन तु मझ्या मनाला
कधीही न समजु पाहे
माझ्या मनात तुझे येणे-जाणे...
हे कधीच थांबणार नाही
तु कितीही ढुर गेलास तरी
आठवण आल्यविना राहणार् नाही
माझ्या मनात तुझे येणे-जाणे...
सुखढ् स्पश॑ करुन जातो
तुला एकदा तरी भेटण्याची
हे मन सतत ईच्छा करु पाहतो
माझ्या मनात तुझे येणे-जाणे...
डोळ्यांत आपोआप अश्रु आणतात
कितीही थांबवण्याचा प्रयत्न केला
तरी नदीसारखे वाहु लागतात
माझ्या मनात तुझे येणे-जाणे...
हे अंतिम श्वासापय्रत राहिल
तु जरी मला भेटला नाहिस
तरी हे वेड मन तुझीच वाट पाहिल
अग्गोबाई-ढग्गोबाई" या अल्बममधल्या "दूर देशी गेला बाबा" या स्वतःच्याच गाण्याला उत्तर म्हणून वडीलांच्या भूमिकेतून "दमलेल्या बापाची ही कहाणी तुला" हे गाणं संदीपनी नुकतंच लिहीलेलं आहे. "आयुष्यावर बोलू काही" च्या ५०० व्या भागात संदीप-सलीलनी हे गाणं पहिल्यांदा सादर केलं:
(सलीलचा आवाज) पद्य:
कोमेजून निजलेली एक परी राणी
उतरले तोंड, डोळा सुकलेले पाणी
रोजचेच आहे सारे काही आज नाही
माफी कशी मागू पोरी मला तोंड नाही
झोपेतच घेतो तुला आज मी कुशीत
निजेतच तरी पण येशील खुशीत
सांगायाचे आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना.....
आटपाट नगरात गर्दी होती भारी
घामाघूम राजा तरी लोकलची वारी
रोज सकाळीच राजा निघताना बोले
गोष्ट सांगायाचे काल राहूनिया गेले
जमलेच नाही काल येणे मला जरी
आज परि येणार मी वेळेतच घरी
स्वप्नातल्या गावामध्ये मारू बघ खेळी
खर्याखुर्या परीसाठी गोष्टीतली परी
मांडीन मी थकलेल्या हातांचा झुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....
(संदीपचा आवाज) गद्य:
ऑफिसात उशीरा मी असतो बसून
भंडावले डोके गेले कामात बुडून
तास-तास जातो खाल मानेने निघून
एक-एक दिवा जातो हळूच विझून
अशा वेळी काय सांगू काय-काय वाटे
आठवासोबत पाणी डोळ्यांतून दाटे
वाटते की उठूनिया तुझ्या पास यावे
तुझ्यासाठी मी पुन्हा लहानगे व्हावे
उगाचच रूसावे नि भांडावे तुझ्याशी
चिमुकले खेळ काही मांडावे तुझ्याशी
(सलीलचा आवाज) पद्य:
उधळत खिदळत बोलशील काही
बघताना भान मला उरणार नाही
हसूनिया उगाचच ओरडेल काही
दुरूनच आपल्याला बघणारी आई
तरीसुद्धा दोघेजण दंगा मांडू असा
क्षणा-क्षणावर ठेवू खोडकर ठसा
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची ही कहाणी तुला....
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना...
(संदीपचा आवाज) गद्य:
दमल्या पायाने जेव्हा येईल जांभई
मऊ-मऊ दूध भात भरवेल आई
गोष्ट ऐकायला मग येशील ना अशी
सावरीच्या उशीहून मऊ माझी कुशी
(सलीलचा आवाज) पद्य:
कुशी माझी सांगताहे ऐक बाळा काही
सदोदित जरी का मी तुझ्या पास नाही
जेवू खाऊ नाहू माखू घालतो ना तुला
आईपरी वेणी फणी करतो ना तुला
तुझ्यासाठी आईपरी बाबासुद्धा खुळा
तोही कधी गुपचूप रडतो रे बाळा
सांगायाची आहे माझ्या सानुल्या फुला
दमलेल्या बापाची या कहाणी तुला....
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....
(संदीपचा आवाज) गद्य:
बोळक्यामध्ये लुकलुकलेला तुझा पहिला दात
आणि पहिल्यांदाच घेतलास जेव्हा तोंडी मऊ भात
आई म्हणण्याआधीसुद्धा म्हणली होतीस बाबा
रांगत रांगत घेतलास जेव्हा घराचा तू ताबा
लुटू-लुटू उभं रहात टाकलंस पाऊल पहिलं
दूरचं पहात राहिलो फक्त,जवळ पहायचंच राहिलं
(सलीलचा आवाज) पद्य:
असा गेलो आहे बाळा पुरा अडकून
हल्ली तुला झोपेतच पहातो दुरून
असा कसा बाबा देव लेकराला देतो
लवकर जातो आणि उशीरानं येतो
बालपण गेले तुझे-तुझे निसटून
उरे काय तुझ्या-माझ्या ओंजळीमधून
जरी येते ओठी तुझ्या माझ्यासाठी हसे
नजरेत तुझ्या काही अनोळखी दिसे
तुझ्या जगातून बाबा हरवेल का गं
मोठेपणी बाबा तुला आठवेल का गं
सासुराला जाता-जाता उंबरठ्यामध्ये
बाबासाठी येईल का पाणी डोळ्यामध्ये
ना ना ना ना ना.. ना ना ना ना ना....
--- संदीप खरे
मी एक यात्री आहे जीवनाच्या रस्त्यावरचा
माजी वाट जंगलातून आहे तरीही ती मी
चालणार आहे चालणार आहे
वाट माजी वाकदितिकड़ी
कत्याकुत्यानी भरलेली तरीही माज्या वाट्याला आलेली मी ती
न थांबता न थकता
चालणार आहे चालणार आहे
इथे संकटाना तोटा नाहि त्यांचाच वापर करून मी
संकटांच संकट होणार आहे आनी त्यावर मात करून
चालणार आहे चालणार आहे
वाट माजी फुलांची होणार आहे
सुगंध आनी मोहकता याने बहरून जाणार आहे
वाईट सम्पुन्ही एक दिवस चांगले येणार आहे
ही वाट्सुधा मी पाहणार आहे पाहणार आहे
भावनांच्या पार तेथे एक माझे नाव होते
हृदयाच्या गावात मन हे वस्तुपरी
त्यावरी क्षणाक्षनाचे घेतलेले घाव होते
भावनांच्या पार तेथे एक माझे नाव होते
माझे मीपण ना उरले जरी वंचितांचे प्रहार होते
भावनांच्या पार तेथे एक माझे नाव होते
सोसलेल्या घावातुनी मन घनापरी जाहले
आता त्यावरी कितीही जोर पडला
त्याचे वेगळाले भाव होते
भावनांच्या पार तेथे एक माझे नाव होते
आता तिथे वसली घरे जरी अनन्त यात्नातुनी
त्या घरावर फुलापरी अश्रूंची माळली तोरणे
त्या तोरणावर वसलेले आपलेपणाचे भाव होते
भावनांच्या पार तेथे एक माझे नाव होते
भावनांच्या कल्लोळातून निघाली अनंत भाषणे
सहण्याला मिळालीही बलाचीही लोचने
भावनांच्या पार तेथे एक माझे नाव होते
भावनांच्या नात्यातला गुंता फार वाढला
गुंत्यात ना गुंतता मी स्वतःला काढले
भावनांच्या पार तेथे एक माझे नाव होते
जीवनाच्या शिदोरीवर भावनांचे राज्य होते
जगणे त्याविन फार यातनामय होते
भावनांच्या पार तेथे एक माझे नाव होते
माजे जीवनगाने संपताच संपत नाही
मी कितीही पुरून उरलो सरताना सरतच नाही
गाडीची दोनच चाके चढ़ उतार बघतच नाही
रस्ता हा कालोखाचा संपताच संपत नाही
रोज नवी उभी समस्या ती रोज कशी सोडावी
रोजचे नित रडगाणे संपताच संपत नाही
आता असे वाटते सर्वच प्रश्नही सुटले
पण श्वास सोडताना पुढे नविन उभे असते
आयुशाला जाता सामोरा अड़चनींचे मोठे जंगल
रस्ता तुडाविताना हा संपताच संपत नाही
प्रश्न सोडविताना उत्तरच ठावुक नसते
हे आयुष्याचे नित गाणे संपताच संपत नाही
कितीही ठरवले जरिही थाम्बयाचे नाही
थाम्बा येयितोवर धीर बघ हा खचतो
जावयाचे कुठल्या गावा तो रस्ता सापडत नाही
अड़चनींचे बहाने संपताच संपत नाही
संकटा जाता समोरा सांग मी काय करावे
हे संकट आहे की संपताच संपत नाही
शोधली वाट नवी ही नजरेआड होवूनी
ही वाटच आहे परि संपताच संपत नाही
हिचा जरी शेवट जाला तरी तो शेवट नसे मजला
अंधारातून प्रकाशाला एक दूत रस्ता देवून गेला
आज मला फार शांत वाटतय
खुप गढ़ुल पानी स्वात्चा जाल
काहीतरी मिळाला काहीतरी सापडला
याचा याची जाणीव आहे का ?
मन समाधानान भरून गेल आहे
मला काही फार मोठी संपत्ति मिळाली
असहि नाही त्याहीपेक्षा खुप मोठी गोष्ट मिळाली आहे
सर्वा काही पैशात मोजयाचा नसता
तिमिरापलिकडे प्रकाशाचा जग असत
तेच मला दिसला आहे
आणि माजा जगनच बदलून गेला आहे
आता काही मिळावा काही घ्याव
ही भावनाच संपली आहे
काही देता आला तर फार बर ही
उदात्त भावना मिळाली आहे कलाली आहे
हा प्रकाश सत्याचा असू दे
अन्धाराताही त्याचा
ठसा वसु दे ठसा वसु दे
सांग माणसा तुज काय हवे
बोलाल्याविना ही भावना मुकच ना
बोलणे परि हे नित्य नवे नित्य नवे
संग माणसा तुज काय हवे
मिलाली जरी आशांची फुले
फुलल्याविना ती सुगन्धित ना
बोल माणसा तुज काय हवे
पैशासाठी हे खेल भावनांचे वंचित ना
तुजसाठी परि हे नसे नवे
मग हीच भावना मूक होते ना
मनाचे हे जरी दुख नवे कधी थाम्बनार
कितीही मिळाले जरी तू असतुष्टच ना
मग कशासाठी ही धाव रे सांग ना
तुज काय हवे काय हवे
गरजा आशा वाढतात ना
त्यासाठी ही नवी याचना काय रे तुजे हे जिने
गरजेपुधे असे ठेन्गने
सांग ना तुज काय हवे काय हवे
पक्षी जरी गगनावरी रोज विहरति
त्यांची मागणी एकच ना पोट ना
पुसले जरी देवाने तुला
नव्या दिवसांची आलोचना
ती कधी थाम्बेच ना
बोल रे तुला काय हवे नित्य नवे
माजे मीपण न राहिले मागे किती क्षण राहिले
सोसल्या अनंता यातना जरी दुख बोलू लागले
माजे मीपणन राहिले
पाहीली स्वप्ने कितीजरी राहिली उराशी बिलगुनी
पूर्ण न होता राहिला अपुर्णतेचा शाप हा
जगताना जगी या दिल्याघेताल्याचे वाटेकरी
चालताना रास्ता दिसे कात्यापरी
तो सरताना सरतच नाही परि सर्वही भोगने
मागे किती क्षण राहिले
पाहिले जरी मागे वलुनी बहुत गेले राहुनी
करण्यासारखे जगी या मन बोलू लागले
माजे मीपण न राहिले मागे किती क्षण राहिले
अप्राप्य आहे
तो तीर
म्हणून कदाचित
त्याची अशी
अनावर ओढ....
बेगुमान
हरपून टाकणारे
एकलेच
चिरंतन भटकणारे
मनाचे घोर वेड.....
प्राप्य जे
त्याचे इथे तिथे
पोसून झाले आहे
विणून घेतले आहेत
सारे पीळ, पेड...
देहाच्या या
पुरातन चक्राखातर
निमूट बराच
वेढून घेतला आहे
जगरहाटीचा जोड....
प्रवास
जीर्णशीर्ण होत जाताना
उरला नाही
काही मोह
यत्किंचितही तेढ....
अप्राप्य तू
असेच रहावे
एवढेच मागणे
बाकी सारे
बिनधास्त माझ्यावर सोड...
सुरूवात, शेवट
सारे तेच, तसेच
फक्त मध्य
तुमचा आमचा
सर्वांचा वेगळा;
पडदा वर आहे
तोवर धावपळ
देह रसरसता राखण्यासाठी
मनही हवे जिवंत
म्हणून पसारा सगळा!
कलंदर ईशत्वाला
सहज सोबत घेऊन
थिरकली पावले
शून्यत्व निमाले
भास उरला सगळा.
’एको॓Sहम" तू म्हटलेस
पण नाही म्हटले मी
’बहुस्यामः’ चुकून एकदा
म्हणून जन्म हा असा
सुखाचा, तरीही वेगळा!!
एकदा तरी माझ्या स्वप्नातून बाहेर ये
रोजच झालंय तुझं माझ्या स्वप्नात येण..
माझ्या निजलेल्या डोळ्यात खेळण..
उशी बनून हळूच माझ्या मिठीत जाण..
शहारलेल्या देहाला उब देण..
रात्रीला जागत ठेवण ..
गुंफलेल्या मिठीला घट्ट करणं...
रोजच झालंय तुझं माझ्या स्वप्नात येण...
पण एकदा तरी माझ्या स्वप्नातून बाहेर ये !...
अंतरीतल्या स्वप्नांना सत्य रूप दे !...
वाट पाहतेय तुझी स्वप्नपरी ..,
तिला तिचा राजकुमार दे !!!!
तु आहे म्हणुन तर...
सगळं काही माझं आज आहे
हे जग जरी नसलं तरी
तुच माझ्या प्रेमाचा ताज आहे.....
मोगरा फुलला होता कालही आजही
पण त्याचा गंध कळला तुझ्याचमुळे
रंग बिघडले असते माझ्या जिवनाचे
तु आहे म्हणुन तर...
प्रत्येक रंगाचा वेगळा बाज आहे
हरवतो स्वत:ला क्षणोक्षणी
तुला शोधण्यासाठी...
पण तु नाही सापडत
तेव्हा कळते मला खरचं
तु आहे म्हणुन तर...
मनात लपलेला एक राज आहे....
एक दिवस असा होता की
कुणीतरी तासनतास माझ्याशी गप्पा मारायचं
गप्पा तशा कमीच पण फ्लर्ट जास्त व्हायचं
मनमोकळेपणानं सर्व काही सांगायचं
एक दिवस असा होता की
कुणीतरी मला भेटण्यासाठी बोलवायचं
वेळेअभावी कामामुळे कधीच नाही जमायचं
फोनवर मात्र तीन तीन तास बोलायचं
आज दिवस असा आहे की
कुणीतरी विणाकारण मला टाळायचं
नसलेलं काम सबब म्हणून सांगायचं
वेळ देऊनही फोन नाही करायचं
आज दिवस असा आहे की
मी माझं नातं मनापासुन जपायचं
मिळालेल्या वागणुकितुन मन मात्र दुखायचं
पण माझं हे दु:ख कोणाला कळायचं
आज प्रश्न असा आहे की
का कुणाशी स्वार्थासाठी नातं जोडायचं
का प्रेमाचं नाव घेऊन ताळ तंत्र सोडायचं
का स्वतःचं व दुस-याचं जीवन भकास करायचं
मित्रा, आपल्याल नाही हे जमायचं
दु:खातही आपण मात्र हसायचं
कधी कधी एकांतजागी खुप खुप रडायचं
चेह-यावर चेहरा लावुन जगायचं!
हरवलेला मी
स्वप्नील डोळ्यांची उघडझाप करीत
जेव्हा तू बोलायचीस माझ्याशी
कान माझे चक्क फ़ितुरी करायचे
मात्र डोळे होते प्रामाणिक माझ्याशी
अखंड उत्साही बडबड तुझी
कानावरुन जायची वाहून
पण निरागस आविर्भाव चेहेऱ्यावरचा
न्यायचा माझं मी पण पळवून
"असा काय रे बघतोस हरवल्यासारखा",
तू म्हणायचीस नेहेमी
"अगं, मलाच शोधतोय तुझ्या डोळ्यात
सारखा हरवतो माझा मी"
"तुझं आपलं काहीतरीच"!
तू टिंगल करायचीस माझी
पण ते लाजरं खळीतलं हसू तुझं
खरं खरं बोलायचं माझ्याशी
सूर्याचं अस्ताला घाईघाईनं जाणं
अन् तुझं ते गडबडीनं उठणं
रेंगाळलेली किरणं गोळा करत
माझं उद्याची वाट पहाणं....!
"येते रे", म्हणतानाची तुझी व्याकुळ नजर
ओढाळ पावलं अन् ओली पापण्यांची झालर
पाठमोरी डोळ्यात साठवलेली तू
अन् अजूनही हरवलेला मी
अन् अजूनही हरवलेला मी.......!
प्रेमाच्या भाषा अनेक नाव एक
प्रत्येकाच्या मनात बसत याच गाव एक.....
ह्रुदयातून वाहतो याचा भाव एक
लहानापासून मोठ्यापर्यंत याची धाव एक.....
प्रियसीपासून मैत्रीपर्यंत याच्या भाषा अनेक
हे खर मिळाव जगात याची आशा एक.....
सर्वांच्या ह्रुदयात दिसते ही दिशा एक
खोट्या प्रेमात मिळते याची निराशा एक.....
प्रेमाच्या असतात भावना अनेक
विशवात वाहते याची कामना एक.....
डोळ्यातून ह्रुदयात उतरतो हा जीना एक
काळ कुठला ही असो याचा ज़माना एक.....
देवानी दिलेले हे वरदान एक
खरया मनात याच दान एक.....
तुटलेल्या ह्रुदयात याच रान एक
सर्व लोकात याचा मान एक.....
प्रेमाच्या भाषा अनेक नाव एक
प्रतेकाच्या मनात बसत याच गाव एक.....

