Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

बुधवार, २४ जून, २००९

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाह

Share

काही बोलायाचे आहे, पण बोलणार नाह
देवळाच्या दारामध्ये, भक्ती तोलणार नाही

माझ्या अंतरात गंध कल्प कुसुमांचा दाटे
पण पाकळी तयांची, कधी खुलणार नाही

नक्षत्रांच्या गावातले मला गवसले गुज
परि अक्षरांचा संग त्याला मिळणार नाही
मेघ जांभळा एकला राहे नभाच्या कडेला
त्याचे रहस्य कोणाला कधी कळणार नाही

दूर बंदरात उभे एक गलबत रुपेरी
त्याचा कोष किनार्‍यास कधी दिसणार नाही

शुक्रवार, १९ जून, २००९

खुप आठवतात ते दिवस...

Share

आजही मला ते सर्व आठवतयं
जणू कालचं सारे घडल्यासारखं
तीच आयुष्याची मजा घेत
मित्रांच्या सहवासात बसल्यासारखं

अजुनही मला आठवतंय....
Lecture ला दांडी मारुन
बाजुचा परिसर फिरत बसायचो
फिरुन कंटाळा आला की
परत College कडे वळायचो

Canteen वाल्याला शिव्या घालत
बाहेरच्या café मध्ये जायचो
Café बंद असला की परत
Canteen मधलंच येऊन गिळायचो

Library card चा तसा कधी
उपयोग झालाच नाही
Canteen समोरच असल्याने
Library कडे पावलं कधी वळलीच नाहीत

आमच्या group ला मात्र
मुलींची तशी allergy होती
कदाचीत college कडून ती
आमच्या group ला झाली होती

चालु तासाला मागच्या बाकावर
Submission copy करायचो
ज्याची copy केली आहे त्याच्या
आधीच जाउन submit करायचो

खुप आठवतात ते दिवस...
सोबत रडलेलो क्षण आठवले की
आज अगदी हसायला येते
पण तेव्हा सोबत हसलेलो क्षण आठवले की
डोळ्यात टचकन् पाणि येतं............ .

Ekach

Share

दिवाणा

Share

गंधाळलेल्या वाटेवर
मधुर सुंगधी वाऱ्याने
सांगितलेल्या जागेवर
उभा आहे अजूनही
सादेसाठी अतृप्त कान
सहेतुक शोधितं नजरा
भेटीच्या हुरहुरीने
उभा दृढ योग्यासम
डोईवरचा उभा दिवस
पाया जवळ पार ओणवा
अजूनही आशेला कुरवाळत
उभा जागेवर स्थितप्रज्ञाप्रत
हा ही एक योग
हि हि एक साधना
प्रेम योगच रे हा
भले दिवाणा म्हणा

me Prem Kela

Share

कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल

Share

कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल
कधीतरी अशीच एक संध्याकाळ असेल,
ह्रदयात तूझी प्रीत अन ओठावर गीत असेल...
सगळया आठवणी क्षणात डोळयासमोरून जातील,
नकळत मग गालावर या थेंब ओघळतील...


कधीतरी पून्हा तू स्वप्नात येशील,
एकत्र घालवलेले क्षण आठवतील...
तूझ्याशिवाय आता मला जगावं लागेल,
जगतानाही रोज असं मरावं लागेल...


कधीतरी तू ही माझी आठवण काढशील,
प्रीत आठवून मझी कंठ तूझाही दाटेल..
डोळ्यातील अश्रू मूक पणे गिळून टाकशील,
कारण पूसायला तेंव्हा ते मी जवळ नसेन...



कधीतरी मग या मनालाही समजेल,
तूझ्या परतीची अशा तेंव्हा मावळेल...
त्यावेळेस जीवनाला या अर्थ नसेल,
कारण शरीराला तेंव्हा या मनंच नसेल...


कधीतरी तू मला असं वचन देशील ?
पूढच्या जन्मी तरी माझी होशील ?
मग तू सोडून गेल्याचं दुःख नसेल,
आपण कोणावर तरी प्रेम करू शकलो
यातच मग मला समाधान असेल...

मंगळवार, १६ जून, २००९

आई

Share

देव काय असतो माहित नव्हते मला

जाणीव झाली मला जेव्हा मी पाहिले तुला



वेदना काय असतात माहित नव्हते मला

जाणीव झाली मला जेव्हा तिने माझ्यासाठी सहन केल्या तेव्हा



प्रेम काय असते माहित नव्हते मला

जाणीव झाली मला जेव्हा तिने माझ्यावर जिवापाड प्रेम केले तेव्हा



त्याग काय असतो माहित नव्हते मला

जाणीव झाली मला जेव्हा तिने माझ्यासाठी त्याग केला तेव्हा



वाट काय असते माहित नव्हते मला

जाणीव झाली मला जेव्हा तू मला योग्य वाट दाखवालिस तेव्हा



कोणत्याही जाणीवशिवाय आलो होतो या जगात मी

जीवन काय असते हे तू दाखवून दिले मला

चांदणं माळून स्वप्नांना लेऊन

Share

चांदणं माळून स्वप्नांना लेऊन
शब्द फुलांचा सुगंध घेऊन तू येतेस
आनंदाची पखरण जेव्हा तू करीत जातेस
काय सांगू तेव्हा, तू कित्ती गोड दिसतेस..

अंबराची शाल निळी अंगावर ओढून
निळाईच्या रंगाने तू अशी बरसतेस
श्रावणाच्या उन्हात, इंद्रधनुष्य फुलवतेस
काय सांगू तेव्हा, तू कित्ती गूढ दिसतेस

निराश मनाला, पुन्हा उभारी,
हळुवार साद, शब्दात तुझ्या, अलवार तू घालतेस
बेभान भरारी, माझ्या स्वप्नांना, पंख तुझे तू देतेस
काय सांगू तेव्हा, तू निळाईच असतेस !!!

तू अशी ये !!

Share

प्रिये
तू अशी ये…

श्वासातल, भासातल
तुझ्या माझ्या भानातल
वा-याच गीत हलक
ओठामधे घेऊन ये

जाईतला, जुईतला
गंध माझ्या मनातला
लहरीचा धूंद सुगंध
हसण्यामधे भरून ये

सरीतला, दरीतला
थेंब माझ्या डोळ्यातला
सुखाचा एक आसू
जगण्यामधे पेरून ये

marius rOmila

Share






माझी ती

Share

माझी ती
चांदण्यात राहते
अंबरात विहरते
सागरात तरते
मॊ बोलावतो तिला.
तर मान वेळावून पाहते
कधी हसत येते
कधी रुसत येते
कधी.. रडत येते
कधी चिडत येते
कधी कधी
गालावर घेऊन रर्क्तिमा
चक्क लाजत येते..
वेडावतो, मी खुळावतो
लाजताना पाहताना
हळुच मी खुणावतो
कवितेला जागेपणी
स्वप्न दे… विनवतो !!

कितीही म्हटलं तरी

Share

तुझ्यासाठीच जगणं आणि तुझ्यासाठीच मरणं,
हे तर माझं फक्त एक काव्य आहे....
खर म्हटलं तर, तुझ्या प्रेमासाठीच मला,
मरणानंतरही जगायचं आहे...

तू अलगद हात धरलास
नि दुसरा हातही त्यावर धरलास
दोन हातांच्या एका शिंपल्यात
माझा हात मोत्याने भरलास

मीही तेच पाहतोय...
पावसाच्या थेंबालाही माहित नव्हतं,

तो कुठे वाहतोय...

सहज विचारलं तर म्हणाला,

"मीही तेच पाहतोय..."

काही नाती अमुल्य असतात
त्यांची किंमत करू नये
जपावं हाताच्या फोड्यासारखं
उगाचचं गंमत करू नये

कितीही म्हटलं तरी,
मला तितकसं व्यवहारीपणे वागता येत नाही..,
आभाळावर केलेल्या त्या बेहिशोबी प्रेमाचं
या चातकाला व्याज मागता येत नाही.

भास

Share

आता तरी कळू दे ,
तुझेच भास सारे,
शब्दातूनी वहाते,
नियमातली कथारे.

तो रंग शारदेचा ,
माझा कधी न तीचा.
आकाश गुंतलेले
ते सागरी किनारे.

कोणास काय सांगू
मौनात मन मागू .
तुलाच शोधतांना
सभोवात रांगणारे..

आता तरी कळू दे
आसवाचे थेंब सारे ,
माझ्याच पावलात
मलाच बोचणारे.


पुन्हा एकदा ती परतली..तेव्हा

Share

तिच्याविना आयुष्य जगण्यास असह्य झालं होतं,
तिच्यावाचून मन माझं सुन्न सुन्न झालं होतं..

स्वप्नही रातीला सोडून दुर गेली होती,
झोपेलाही डोळ्यात तिचं निघून जाणं सलत होतं..

चित्त थारयावर नाही म्हणून काही सुचत नव्हतं,
तिच्या आठवणीच्या पदराभोवती माझं काळीज घोटाळत होतं…

सारं काही नरकवेदनेच्या पलीकडचं हे एकाकीपण,
अन देहात फक्त तिच्या श्वासांच जगण शिल्लक होतं..

पण…. अचानक….

पुन्हा एकदा ती भेटली अशी एकांतात तेव्हा,
काळीज माझं भितीने धडधडत होतं…

पुन्हा एकदा आभासाच मृगजळ छळणार मला म्हणून,
मन माझं थरकापाने घाबरत होतं..


तेव्हा अचानक तिच्या त्या तळहातांचा स्पर्श झाला,
तसं अंग माझं रोमारोमातून शहारत होतं…

ती म्हणाली पुन्हा आली परतून मी तुझ्यासाठी,
हे सांगताना तिच्या डोळ्यातूनही थेंबांच येणं जाणं सुरूच होतं..

नाही विचारलं मी तिला कूठे होती ? का गेलीस सोडून ?
कारण तिचं येणं माझ्यासाठी एक नव्या जन्माच नवं विश्वचं होतं…

तेवढ्यात ती म्हणाली , “नाही मी राहू शकले तुझ्याशिवाय”
ते ऐकताना खरचं माझं वाट पाहण सफल ठरत होतं…

मग आली पावसाची सर धावून आमच्या भेटीला,
अन सारं काही विसरून ऎकमेकांच्या मिठीत आयुष्य पुन्हा अंकुरलं होतं…

punha me maza

Share

सावरु शकलोच नसतो

Share

तुझा स्पर्श टाळ्ण्याचा
आज प्रयत्न करत होतो
कदाचीत त्यानंतर मी
स्वतःला सावरुच शकलो
नसतो मिठीत तुला घेण्याचा
प्रयत्नही करत नव्हतो
खरेच एकदम खरे प्रेम
तुझ्यावरती करत होतो

तु माझ्या जिवनाचा किनारा बनलीस
त्या वेळी विरहाचे गित
मी लाट बनुन गात होतो
तेंव्हाही तुझा स्पर्श टाळण्याचा
प्रयत्न मी करत होतो
तुला कवेत घेण्याची
हिम्मतही मी करत नव्हतो

तु बनलीस म्रुगजळ
मी शोधक नजर बनलो होतो
तु बनलीस कस्तुरीचा गंध
मी वाहणारा वारा आज बनलो होतो
तुझा स्पर्श टाळण्याचा
तेंव्हाही प्रयत्न करत होतो
तुला कवेत घेण्याची
हिम्मतही मी करत नव्हतो

नेहमीच तुमचाच

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,

Share

मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

तुमचं दु:ख खरं आहे,
कळतं मला,
शपथ सांगतो, तुमच्याइतकंच
छळतं मला;
पण आज माझ्यासाठी
सगळं सगळं विसरायचं,
आपण आपलं चांदणं होऊन
अंगणभर पसरायचं.

सूर तर आहेतच; आपण फक्त झुलायचं,
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

आयुष्यात काय केवळ
काटेरी डंख आहेत?
डोळे उघडून पहा तरी;
प्रत्येकाला फुलपाखराचे पंख आहेत!

हिरव्या रानात,
पिवळ्या उन्हात
जीव उधळून भुलायचं!
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

प्रत्येकाच्या मनात एक
गोड गोड गुपीत असतं,
दरवळणारं अत्तर जसं
इवल्याश्या कुपीत असतं!

आतून आतून फुलत फुलत
विश्वासाने चालायचं,
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

आपण असतो आपली धून,
गात रहा;
आपण असतो आपला पाऊस,
न्हात रहा.

झुळझुळणार्‍या झर्‍याला
मनापासून ताल द्या;
मुका घ्यायला फूल आलं
त्याला आपले गाल द्या!

इवल्या इवल्या थेंबावर
सगळं आभाळ तोलायचं,
मन मोकळं, अगदी मोकळं करायचं,
पाखरू होऊन पाखराशी बोलायचं.

आठवेन मी तुला..

Share

आठवेन मी तुला..

सोडून तुझ्या काळजाला जाईल, तेव्हा मी आठवेन तुला
काळजाला छातीत शोधशील तेव्हा आठवेन मी तुला..

येईन लपत छपत रोज रातीच्या स्वप्नात तुझ्या,
तेव्हा झोपेत स्मित हसताना आठवेन मी तुला..

माझ्या अल्लड प्रेमाला एकदाच विसरून तु,
दुसर्‍या कोणाला करशील प्रेमात घायाळ , तेव्हा आठवेन मी तुला..

दोस्तांच्या गर्दित गप्पा मारता मारता रुसशील तू,
तेव्हा तुझ्या रुसव्यातूनच आठवेन मी तुला...

माझ्या तस्विरीला डोळ्यातून मिटवण्यासाठी करशील प्रयत्न,
तेव्हा सलत्या पापण्यातून ओघळताना आठवेन मी तुला...

निरव शांततेच्या रातीला , खिडीकीतून पाहशील जेव्हा,
तेव्हा तुझ्यावर ह्सणार्‍या चंद्राला पाहून आठवेन मी तुला..

पुन्हा पुन्हा पावसात ओली चिंब होशील तू,
तेव्हा एकांताच्या सरी अंगावर झेलताना आठवेन मी तुला..

आता प्रत्येक सुखाचा आंनद अनुभवताना,
दुरवर मला शोधून थकशील तू अन आठवेन मी तुला..

निलपरीच्या त्या पोषाखात सज़ून , मोकळ्या केसात
तुझे हात फिरताना आठवेन मी तुला..

तुझ्याच नावाने लिहिल्या सार्‍या गझल,
आता वाचताना होशील भावूक तेव्हा शब्दांतून आठवेन मी तुला

सहवास…सारा सुखाचा हव्यास

Share

सहवास अडकवतो
एकान्त छळतो,
सॆरभॆर आयुष्य
कशासाठि कळेना………

विश्वासातून नाईलाज, कि
नाईलाजाने विश्वास?
आवासलेले प्रश्न..
उत्तर मात्र मिळेना…

गूंतलेल्या भावना, का
भावनांचाच गुंता
सा-या विवस्त्र चिंता
सरणंहि जळेना……

खरतरं……….

सहवासातून आयुष्य
आणि आयुष्यासाठि सहवास…
सारा सुखाचा हव्यास
सुटता कुणा सुटेना………

एकदा काय झालं, एक सरिता रागवली आपल्या boyfriend ला म्हणाली

Share




एकदा काय झालं,
एक सरिता रागवली
आपल्या boyfriend ला म्हणाली

'हे रे काय सागर !
मीच का म्हणून ?

दर वेळी मीच का
मीच का यायचं खाली डोंगरावरून ?
आणायचं रानावनातलं सारं तुझ्यासाठी
दरी बघायची नाही
कडा बघायचा नाही
कशी सुसाट पळत येते मी
विरहव्याकुळ, संगमोत्सुक
कधी एकदा तुला गच्च मिठी मारीन
तुझ्यात हरवून , हरपून जाईन

आणि तू वेडा
तुझं लक्षच नसतं कधी
सारखा त्या चंद्रिकेकडे टक लावून असतोस.
उसळतोस तिच्यासाठी
तुझ्यासाठी पाणी आणते मी
पण तुला भरती येते तिच्यासाठी

मी नाही जा !
बोलणारच नाही आता.
येणारही नाही.
काठावरच्या लोकांना सांगून
मोट्ठं धरण बांधीन
थांबून राहीन तिथेच.
बघच मग.

सरिताच ती
बोलल्याप्रमाणे वागली.
सागर बिचारा तडफ़डला
आकसला, आतल्या आत झुरत गेला.
शेवटी फ़ुट्ला बांध त्याच्याही संयमाचा
उठला ताड
ओरडला दहाड
उफ़ाळला वारा पिऊन
लाटांचं तांड्व घेऊन
सुटला सुसाट
सरितेच्या दिशेने

लोक येडे.
म्हणाले 'सुनामी आली ! सुनामी आली !!'

ह्यालाच तुम्ही प्रेम बोला…..

Share

हसू तिचे सुखी मी
उदास ती बेचैन मी
दु:ख तिला यातना मला
ह्यालाच तुम्ही प्रेम बोला

संग तिचा बेधुन्द मी
स्पर्श तिचा रोमांचीत मी
विरह तिचा मारतो मला
ह्यालाच तुम्ही प्रेम बोला

नजर तिची घायाळ मी
बोल तिचे प्रसन्न मी
अबोला तिचा छळतो मला
ह्यालाच तुम्ही प्रेम बोला

अश्रू तिचे कष्टी मी
राग तिचा अपराधी मी
मनातले तिच्या कळते मला
ह्यालाच तुम्ही प्रेम बोला…..


आपण परत तिथेच भेटायचं

Share

आपण परत तिथेच भेटायचं .....``

शेवटचा निरोप घेऊ नकोस,

फक्त "परत भेटू" म्हण..

कारण सखे..

आपण परत तिथेच भेटायचं ..



रोजंदारी शिकवत रहाते,

जगण्याचे नवे बहाणे..

अनेक शिड्या , अन अनेक घोडे,

वर नेऊ पहाणारे...

जीव तोडून आता एकदा

आभाळाला भिडायचं

कारण सखे..

आपण परत तिथेच भेटायचं..



मी धूळ .. तू ही धूळ

शेवट नशीबी असते माती ..

का उगाचच मोडावी

तुझी नि माझी अक्षय मैत्री...

कधीतरी सोडून सारे ..

पूर्ण नभ व्यापायचं..

आपण परत.... तिथेच भेटायचं...

एक असंही प्रेम होतं…

Share

“अम्या असं कसं झालं रे… नक्की काय म्हणाली ती?”
“तुला सांगितलं, तेच म्हणाली. आणि त्यानंतर काही बोलण्यासारखं राहिलंही नव्हतं…’
“रागावू नकोस; पण मला पुन्हा एकदा सांगतोस काय झालं ते…’
“जवळपास गेला आठवडा आम्ही फारसे भेटत नव्हतो, हे तुला माहितीच आहे. तेव्हाही न भेटण्याचं तसं विशेष काही कारण नव्हतं; पण भेट घडत नव्हती हे खरं… काल तिचा फोन आला. आज नक्की भेटूया म्हणाली. मी नेहमीप्रमाणे तिला खेचू लागलो, तर ती खूप सिरीअस वाटली. आवाजावरून रडल्यासारखी वाटत होती. मी कारण विचारलं तिला… तर काहीच बोलली नाही… भेटल्यावर बोलू म्हणाली.’
“मग?’
“मग काय आम्ही भेटलो आज. काहीतरी गडबड आहे… काहीतरी विचित्र घडलंय किंवा घडणार आहे असं मला सारखं वाटत होतं… आज मनूला भेटताना नेहमीसारखं मस्त नव्हतं वाटत… म्हणजे इतर वेळी आम्ही भेटणार म्हटल्यावर जसं वाटायचं तसं नव्हतं वाटत. तुला सांगता येत नाहीये आत्ता… म्हणजे काय वाटत होतं ते शब्दांत नाही सांगता येत…; पण ते काहीतरी विचित्र फिलिंग होतं…’
“आम्ही आपल्या नेहमीच्या जागी भेटलो. तिचा चेहरा मलूल दिसत होता. फारसं बोलली नाही ती. मी विचारलं तिला, “काय प्रॉब्लेम आहे? काय झालंय नक्की?’ तर ती म्हणाली, “तेच बोलायला आलोय आपण; पण आधी काहीतरी खाऊन घे… नेहमीप्रमाणे उपाशीच असशील…’ मग आम्ही खायला मागवलं; पण ती नीट खात नव्हती. नेहमीप्रमाणे माझ्या डिशमधला घासही घेतला नाही तिनं… अन्न चिवडत बसली होती फक्त… तुला गंमत सांगतो, आज यांचं काहीतरी बिनसलंय हे आमच्या नेहमीच्या वेटरच्याही लक्षात आलं… त्यानं तसं विचारलं सुद्धा… माझं खाणं झाल्यावर ती म्हटली, “चल पुलावर जाऊ…’
काय झालंय हे माझ्या लक्षात येत नव्हतं आणि ती काही बोलायला तयार नव्हती… आम्ही पुलावर जायला निघालो. आज बिल तिनं दिलं… तुला ठाऊक आहे, नेहमी बिल मीच देतो. पण आज तिनं मला अडवलं आणि पैसे काढून दिले.
आम्ही पुलाकडे जायला निघालो. ती गाडीवर मागे बसली होती ना, तेव्हाही नेहमीसारखी नव्हती बसली. माझ्या खांद्यावरच्या तिच्या हाताची थरथर मला जाणवत होती… माझ्यासमोरचं प्रश्‍नचिन्ह वाढतच होतं…
आम्ही पुलावर पोचलो. मी गाडी लावली आणि आम्ही खाली बसलो. ती मान खाली घालून बसली होती. तिला म्हटलं, बोल आता… काय झालंय ते सांगून टाक पटकन. आता माझा जीव नको खाऊस… तिनं वर पाहिलं, तर डोळ्यात पाणी होतं तिच्या… तिनं पर्स उघडली आणि मला एक पासबुक दिलं. “हे तपासून घे,’ म्हणाली. तुला माहीत नाही… मी तिला प्रत्येक महिन्याला पैसे द्यायचो. तिनं एक अकाउंट उघडलं होतं, त्यात ती ते भरायची. त्यात स्वत:चीही भर घालायची. आमच्या संसारासाठीची बचत होती ती!
ते पासबुक हातात घेतलं आणि विचारलं, “काय भानगड आहे ही? मी तुला आजपर्यंत त्याबाबत कधी विचारलंय का? आणि आज एकदम हे काय?’
तिनं माझा हात हातात घेतला… तिचा हात थरथरत होता. मी त्यावर थोपटलं… पाच-दहा मिनिटं आम्ही तसेच स्वस्थ बसून राहिलो. मी तिला थोपटत होतो. तिनं मला विचारलं, “तुझा विश्‍वास आहे माझ्यावर?’
मी म्हणालो, “मग कोणावर ठेवू?’
ती म्हणाली, “आपण लग्न नको करायला… का ते विचारू नकोस. मला नाही सांगता येणार; पण आपण लग्न नको करायला…’
ती काय म्हणते आहे, हे मला कळलंच नाही कितीतरी वेळ… समजलं तेव्हा कशाचंच भान नव्हतं राहिलं. माझा तिच्यावर पूर्ण विश्‍वास होता आणि आहे. ती तसं म्हणते यामागे काहीतरी कारण नक्कीच असणार… पण असं कसं होईल… ती माझ्याशिवाय आणि मी तिच्याशिवाय कसे जगू शकू..? अक्षरश: काही समजत नव्हतं. कितीतरी वेळ आम्ही तसेच सुन्न बसून होतो नदीकडे बघत आणि ती नदी आमच्या दोघांच्या डोळ्यातून वाहात होती. बराच अंधार पडल्यावर आम्ही उठलो. तिला घरी सोडलं… आणि मी इथं तुझ्याकडे आलो…’
“अम्या, असं कसं होईल रे… ती का म्हणाली असं? तू विचारलं नाहीस तिला? मी विचारू का?’
“नको. तू काही बोलू नकोस. मीही कधीच विचारणार नाही. माझा विश्‍वास आहे तिच्यावर काहीतरी नक्की घडलंय…’
“अरे पण आपल्या ग्रुपला काय सांगायचं आता? आणि तू तुझ्या घरी काय सांगशील?’

राहुलच्या कोणत्याही प्रश्‍नाचं उत्तर देण्याच्या मनःस्थितीत अम्या नव्हताच. तो केव्हाच हरवून गेला होता. अम्या हरवला होता, त्यापेक्षा राहुल जास्त हरवला होता. हरवणारच होता तो… तो धक्काच तेवढा मोठा होता… अम्या आणि मनू काही थोडा काळ एकमेकांसोबत नव्हते. लहानपणापासून ओळखत होते ते एकमेकांना. फक्त ओळखत नव्हते, तर एकमेकांशिवाय ते कुठंही जात नव्हते की येत नव्हते. भांडणं आणि मारामाऱ्याही तेवढ्याच जोरदारपणे करायचे. बरं दोघांच्याही शाळा वेगळ्या आणि पुढे कॉलेजही वेगळी; पण एका शिबिरात ते भेटले आणि तेव्हापासून एकमेकांचेच झाले होते. हे जे काही आहे, त्याला प्रेम म्हणतात, हे त्यांना दहावीच्या सुटीत जाणवलं. ते पैसे साठवण्याचं खूळ तेव्हापासूनचं होतं. अर्थात त्यावेळी मनू एका पिगी बॅंकेत पैसे टाकायची. अम्याच्या कॉलेजचा ग्रुप हसायचा कधीकधी त्यांना… चेष्टाही करायचा; पण त्यांना त्यांच्या प्रेमाची, त्यांच्यामधील गाढ नात्याची जाणीवही होती. थोडीथोडकी नाही, 12-14 वर्षं दोघं एकत्र होते. कॉलेज संपल्यावर ती नोकरी करू लागली आणि हा व्यवसायात पडला. तेव्हाही याची अकाउंट्‌स तपासणं, तो जेवला की नाही पाहणं यावर तिचं पक्कं लक्ष असायचं. त्यांची ती शेवटची भेट होती, तेव्हाही तिनं आधी त्याला खायला लावलं होतं… अम्या कधी कसा वागेल, हे तिच्याइतकं कोणीच सांगू शकायचं नाही आणि तिच्याबाबत अम्याला विचारून घ्यावं. अम्या केव्हा रागावतो, त्याला काय काय आवडतं इथपासून ते आत्ता त्याच्या गाडीत किती पेट्रोल आहे, तो बाहेरगावी गेला, तर किती वाजता कुठे असेल, घरी किती वाजता पोचेल इथपर्यंत बारीकसारीक गोष्टी मनूला माहिती असायच्या. तशाच मनूच्या त्याला. दोघं एकमेकांची प्रचंड काळजी घ्यायचे. कॉलेज वेगवेगळी असली, तरी अम्यानं कधी कोणती लेक्‍चर्स बंक मारली, त्याचं कुठलं कुठलं कम्प्लिशन राह्यलं आहे, हे
मनूला बरोबर समजायचं. मग ती त्याच्या मागे लागून ते सारं करून घ्यायची.
या साऱ्या गोष्टी त्या दोघांच्या घरीही माहीत होत्या. म्हणूनच अम्याची तक्रार मनूकडे आणि मनूची अम्याकडे व्हायची. दोघांनी घरी स्पष्ट सांगितलं नसलं, तरी त्यांना कळत नव्हतं असं नाही. आणि त्यांचीही ना नव्हतीच! लहानपणापासून पाहात आले होते ते दोघांना… अगदी “मेड फॉर इच अदर…’

मग आता हे अचानक झालं काय, हे राहुलला समजेच ना… अर्थात जिथं अम्यालाच काही समजलं नव्हतं, तिथं राहुलला काय समजणार होतं? तरी राहुल विचार करतच होता; कारण तिच्या आणि त्याच्या अशा दोघांच्याही ग्रुपला त्यालाच उत्तर द्यायचं होतं. दोघांचा बेस्ट फ्रेंड होता तो. ते इतरांना “झाशा’ देऊन हुंदडायला गेले, तरी त्याला मात्र खरंखरं सांगून जायचे. एकदा तर त्याला मनूच्या वडिलांनी विचारलंही होतं… “अरे त्यांना म्हणाव सांगून टाका ना एकदा आम्हाला स्पष्ट. आम्ही काय नाही म्हणणार आहोत का? असे किती वर्षं फिरणार आहात नुसतेच. आमच्या नातेवाइकांनाही माहितीये सगळं. एकदा अक्षता टाकल्या, की आम्ही मोकळे… तू बोल रे त्यांच्याशी…’
राहुलपुढे हा एकच प्रश्‍न सतत उभा राहात होता, “हे अचानक काय झालं?’

दोन महिन्यातच मनूचं लग्न झालं. अम्या घरचं कार्य असल्यासारखा राबला त्या लग्नात. राहुलला, त्याच्या ग्रुपला, एवढंच काय पण तिच्या घरच्यांनाही बघवत नव्हतं त्याच्याकडे. तो आणि मनू एकमेकांसमोर यायचं टाळत होते. तसे आले असते, तर बांध नक्कीच फुटला असता… लग्न लागलं. पंगती बसल्या. सगळा ग्रुप शेवटच्या पंगतीत बसणार होता. तेव्हा अम्या बाहेर सटकला. पंगत उठली, तरी हा काही दिसला नाही कोणाला. मनूची नजरही त्यालाच शोधत होती. तो उपाशी राहिलेला तिला अजिबात चालायचा नाही… पण अम्या उगवला तो थेट पाठवणीच्या वेळी. अर्थात जेवला का नाहीस, हे विचारण्याची कोणाचीही हिंमत नव्हती, मनूचीदेखील… पाठवणीच्यावेळी मनू त्याच्यासमोर आली. नवऱ्याशी ओळख करून दिली. हा अम्या. माझा सगळ्यात जवळचा मित्र… त्यावेळी दोघांच्याही कंठात हुंदका अडला होता… फक्त दोघांच्याच नाही… त्यांना ओळखणाऱ्या साऱ्यांच्याच….

अम्याला सावरायला काही दिवस लागले. मनूला तेवढा तरी वेळ मिळाला की नाही ठाऊक नाही… मनू हनिमूनहून परत आली. आल्याआल्या तिनं पहिला फोन अम्यालाच लावला. तो सापडला नाही म्हणून राहुलला. अर्थात लग्नानंतर ती राहुलच्या संपर्कात होतीच. तिला अम्याची काळजी वाटत होती… पण अम्या काही तिला भेटायला तयार नव्हता. तिनंही त्याला वेळ दिला. शेवटी तिच्या लग्नानंतर दोन-तीन महिन्यांनंतर ते भेटले… त्याच नेहमीच्या जागी… नंतरही ते भेटत राहिले. अम्यासाठी चांगली मुलगी शोधण्याचा तिनं आता चंगच बांधला होता. त्याला कोणती मुलगी शोभेल, हे तिच्याशिवाय दुसरं कोण सांगू शकणार होतं?

पुढे अम्याही निवळला. त्याचंही लग्न झालं. आज अम्या आणि मनू आपापल्या संसारात रमले आहेत. दोघांनाही पोरंबाळं आहेत. भेटीगाठी आता खूपच कमी झाल्यात. म्हणजे सहा-सात महिन्यांतून एखादेवेळी वगैरे… तेव्हा मोबाईल नव्हते. आता आहेत. पण रोज फोन किंवा एसएमएसही नसतो. त्या दोघांना तशी गरजही नाही. ती दोघंही त्यापलीकडे कधीच गेली आहेत. आजही त्यांना एकमेकांबद्दल उत्तम माहिती असते. आपापल्या जोडीदारांशी ते प्रामाणिक आहेत. कदाचित काहींना शंका येते, त्यांच्या “इतर’ संबंधांबद्दल… अर्थात त्याबाबत इतरांना दोष देण्यातही अर्थ नाही. 12-14 वर्ष एकत्र राहिलेल्यांमध्ये असे संबंध निर्माण झाले नसतील, यावर कोण विश्‍वास ठेवणार? पण विश्‍वास ठेवायला हवा. ते दोघंही एकमेकांच्या मनामध्ये इतके गुंतले होते, की त्यांना या गोष्टी खरोखरच दुय्यम वाटत होत्या. कधीकधी ते दोघं तिच्या किंवा त्याच्या घरी एकटेही असत; पण गाणी, गप्पा किंवा मारामाऱ्या याशिवाय दुसरं काही त्यांच्यात घडलं नाही… कोणी यावर विश्‍वास ठेवो, न ठेवो, राहुल, त्या दोघांचा ग्रुप आणि माझा मात्र पक्का विश्‍वास आहे. आम्ही सारे त्यांचं तर उदाहरण सांगायचो साऱ्यांना… आजही सांगतो… हे असं का झालं, हे अजूनही साऱ्यांनाच कोडं आहे. अम्यानं तिला हा प्रश्‍न आजही विचारलेला नाही आणि ती आपणहून सांगेपर्यंत त्याला समजणारही नाही… अर्थात त्याला समजल्यानंतरही तो आम्हाला सांगेल, असंही नाही…

एवढ्या कथेवरून तुमच्या लक्षात आलंच असेल, की मी या साऱ्याचा साक्षीदार आहे. हे सारं माझ्यासमोर घडलंय… मी ते माझ्या परीनं अनुभवलंय. मागे संदीप खरेच्या कार्यक्रमाला गेलो होतो… तेव्हा एक गाणं ऐकलं

कितीक हळवे, कितीक सुंदर
किती शहाणे, अपुले अंतर…
त्याच जागी त्या येऊन जाशी
माझ्यासाठी, माझ्या नंतर…

या दोघांना किती चपखल लागू होतं नाही…

ही गोष्ट अनेक दिवस मनात होती. सांगावीशी वाटत होती. अम्या आणि मनूच्या सफल न झालेल्या (खरंतर असं कसं म्हणणार? लग्नात परिवर्तन न झालेल्या, असं म्हणता येईल फारतर…) प्रेमाची ही कहाणी आहे. कोणालातरी वाटेल, की ते दोघं आपापल्या जोडिदारांना फसवत असतील. तर तसंही नाही. आपापला संसार ते उत्तम रीतीनं करतात. आपापल्या संसाराला ते 100 टक्के देतात… आपलं प्रेम त्यांनी मनाच्या कुठल्यातरी खोल कप्प्यात अगदी अंधारात ठेवलंय एवढंच…

आज इतक्‍या दिवसांनी मला हे सांगावंसं का वाटलं ठाऊक आहे? ते दोघं पहिल्यांदा भेटले, त्याला नुकतीच 18 वर्षं पूर्ण झाली. आम्ही सारे, म्हणजे आमचा ग्रुप त्या दिवशी भेटतो. अगदी पहिल्यापासूनचा रिवाज आहे हा. नेहमीच्या अड्ड्यावर आम्ही भेटलो, प्रचंड दंगा केला. ती दोघंही हे सारं छान एन्जॉय करत होती. नेहमीप्रमाणे सारं वातावरण होतं. जाताना मात्र ती आमचीही नजर चुकवून चटकन निघून गेली… डोळे पुसत होती, असं प्राजू म्हणाली… इकडं अम्याचेही डोळे पाणावले होते… राहुलनं सांगितल्यामुळे मलाही माहीत होतं, म्हणून त्याला सहज विचारलं, “अम्या, त्या पासबुकाचं काय झालं रे?’ अम्या म्हणाला, “मी अजूनही तिच्याकडे पैसे पाठवतो. तीदेखील तिची भर घालून ते पैसे त्याच अकाउंटमध्ये ठेवते… अरे आमचं झालं नाही म्हणून काय झालं… आम्ही ठरवलंय पैसे साठवत राहायचे आणि एखाद्याचं पैशांमुळे अडत असेल, तर त्याला न बोलता देऊन टाकायचे… तिच्या एका मैत्रिणीला अडचण होती, तेव्हा आम्ही त्या कपलला ते पैसे देऊन टाकले. आमचा नाही झाला संसार… पण दुसऱ्याचा उभा राहू शकला, याचा आनंद आहेच की!!!

मी बऱ्याचदा नातेसंबंधांवर लिहीत असतो. कधी नॉस्टॅल्जिक होतो. प्रत्येक विषयानंतर माझी स्वत:ची काहीतरी कॉमेंट करतो. पण यावेळी नाही जमत तसं करायला. खरंतर आज इतक्‍या वर्षांनंतर हे लिहितानाही मी तो काळ अनुभवतोय आणि शब्द अडखळताहेत… होतंच… सॉरी आहेच… तसंच प्रेम आहे हे…

याला प्रेम म्हणायच असतं…

Share

उगाचच्या रुसव्यांना,
तु मला मनवण्याला,
प्रेम म्हणायचं असतं

एकमेका आठवण्याला,
आणि आठवणी जपण्याला,
प्रेम म्हणायचं असतं.

थोडसं झुरण्याला,
स्वतःच न उरण्याला,
प्रेम म्हणायचं असतं

भविष्याची स्वप्न रंगवत,
आज आनंदात जगण्याला,
प्रेम म्हणायचं असतं

कितीही रागावलं तरी,
एकमेका सावरण्याला,
प्रेम म्हणायचं असतं

शब्दातुन बरसण्याला,
स्पर्शाने धुंद होण्याला,
प्रेम म्हणायचं असतं

तुझं माझं अस न राहता,
’आपलं’ म्हणून जगण्याला,
प्रेम म्हणायचं असतं

प्रेमाला प्रेम म्हणत
फ़क्त प्रेमच करण्याला
प्रेम म्हणायचं असतं

tuzya athvanit

Share

मैत्री

Share

एकही मित्र नाही असा माणूस कुठेच नसेल
थोड्या पुरती का होईना प्रत्येकाने मैत्री केली असेल

शरीरात रक्त नसेल तरी चालेल पण आयुष्यात मैत्री ही हवीच
कितीही जुनी झाली तरी ती नेहमी वाटते नवीच

रक्ताच्या नात्यात नसेल एवढी मैत्रीच्या नात्यात ओठ असते
कशीही असली तरी शेवटी मैत्री गोड असते

मैत्री म्हणजे त्याग आहे मैत्री म्हणजे विश्वास आहे
हवा फक्त नावापुरती तर मैत्री खरा श्वास आहे

मैत्रीच्या या नात्याबद्दल लिहिण्यासारखे खुप आहे
खरे नात्याला नसले तरी मैत्रीला एक रूप आहे

मैत्रीला कधी गंध नसतो मैत्रीचा फक्त छंद असतो
मैत्री सर्वानी करावी त्यात खरा आनंद असतो.....

न कळे माझे आयुश्य मजला

Share

न कळे माझे आयुश्य मजला
सांग कोणता ठाव देवु तुजला

तुला पाहशी या डोहात
करे मी कौतुक तुझ्या रुपाच
नसे कोणताच चेहरा मला
ना लोभस ना मोहक
कुरुपही ना म्हणशी मला

लुटण्याचे रंग मनमुराद
जसा उषेचा किरण
अन रातीचा काळोख
ल्यालो मी जरि इंद्रधनुचे रंग
मी एक तो बेरंग

कोणी हसता मी हसत राही
कोणी रडता मी रडुन जाई
नाहीत माझ्या भावना थोर
नसेन मी भोगले दुख अपार
सुखाचे ही पाहिले ना दार
कोणते हास्य देवु तुला
मी तर एक उदासीन

माझे अस्तित्व नसे मला
विरघळुनी इतरांच्यात
शोधितो ध्यास नवा
देवु कोणता जन्म तुला
मरणाच्याही चक्रात नसे स्थान मला

लहरीतुन लहरतो
तरंगातुन तरंगतो
लाटातुन उसळतो
खळखळाटातुन खदखदतो
म्रुगजळातुन फ़सवितॊ
संथ होवुनी निस्तबध होतो
निसर्गाच्या किमयेने मी चालतो
तरी साथ मी देवु कशी तुला

न कळे माझे आयुश्य मजला
सांग कोणता ठाव देवु तुजला ….

gugli

Share

आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत

Share

आयुष्यात पहिल्यादा कोणीतरी मनापासुन आवडल होत
खरच तिच्यावर मी मनापासुन प़ेम केल होत - १


पहिले आम्हा दोघांमध्ये फक्त मैत्रीच नात होत
नंतर मात्र तिच वागण बोलण मला आवडत गेल होत
आयुष्यात - - प़ेम केल होत - २


एके दिवशी सकाळी तिला माझी बनशील का अस विचारल होत
तिने मात्र उत्तर न देताच निघण पसंत केल होत
आयुष्यात - - प़ेम केल होत - ३


दोन दिवसांनी मात्र तिने उत्तर नाही अस दिल होत
मैत्रीच नात मात्र पुढे चालु ठेवीन अस सांगितल होत
आयुष्यात - - प़ेम केल होत - ४


हळु हळु मात्र तिच्या मैत्रीच गोड विष प्याव लागत होत
विसरता येत नाही म्हणुन मैत्रीवर समाधान मानाव लागत होत
आयुष्यात - - प़ेम केल होत - ५


नंतर मात्र आयुष्य संपवावस वाटत होत
पण तिला दोष लागेल म्हणुन तेही जगाव लागत होत
आयुष्यात - - प़ेम केल होत - ६


इतरांसाठी मात्र माझ प़ेम एकतफी॔ होत
पण मी मात्र तिच्यासाठी प़ेम साठवुन ठेवल होत
आयुष्यात - - प़ेम केल होत - ७

बुधवार, १० जून, २००९

आता मोठी हो!

Share

प्रिय ,

आता मोठी हो!

नवरा काम करत असतांना,
सोफ्यावर पाय ताणून त्याच्या चुका काढणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास.
आई-बाबांनी केलं असेल कौतुक त्याचं लहानपणी,
पण आता- मोठी हो.

उंटावरून शेळ्या हाकण्यात तुमचा गौरव
नवऱ्याची खिल्ली उडवण्यात सगळे स्त्रीत्त्व-
होळीला जरा पुरणपोळ्या करा म्हटलं, तर मात्र शेपुट आत-
असला अगोचरपणा शोभत नाही आता.
त्यापेक्षा मोठी हो.

लग्नाचा पाया म्हणजे सहकार्य:
बँक आणि बिलं सांभाळणार नाही.
मला बाहेरची कामे आवडत नाहीत.
लाँड्रीत कपडे टाकणार नाही. चक्कीत दळण टाकणार नाही.
बाजारहाट मला जमत नाही.
असले बालहट्ट परवडत नसतात गृहस्थाश्रमात.
तेव्हा आता मोठी हो.

घर ही आपली एकमेव जबाबदारी
नवऱ्याने बाहेरची कामे सांभाळावित. नाही तर तो नामर्द.
असले शेरे आता "पॉलिटिकली करेक्ट" राहिलेले नाहीत.
हे कळायला हवंय तुला- मोठी झालीयंस ना?

नवरा लाडात असतांना टी.व्ही. जास्त महत्त्वाचा वाटत असेल,
जेवतांना एकीकडे कागाळ्या करायच्या असतील,
तर काय हरवतंय, काय निसटतंय ह्याचा विचार कर.
वाढत्या शरीर-विस्तारापासून तर
घराची किल्ली आत विसरून बाहेरून लॉक करण्याच्या धांदरटपणापर्यंत
प्रत्येक गोष्टीचं खापर नवऱ्याच्या माथी फोडण्याआधी विचार कर.
पण विचार करून थांबू नकोस- कृती कर.
आता मोठी हो.

जपून ठेवलय मी.

Share

प्रत्येक जूनी गोष्ट

जपून ठेवलीयं मी

माझ्या विरलेल्या क्षणांना

धरून ठेवलयं मी.

माझा शाळेचा गणवेष?

माझ्या कपाटात जपून आहे,

माझं फाटलेलं दप्तर?

माळ्यांवर पडून आहे.

छान लिहिलं होतं बाईंनी,

एकदा निबंधावर माझ्या,

त्या निबंधाची पान अजून पलटतो मी.

निबंध लिहिणारा जूना मी,

त्यालाही जाऊन भेटतो मी.

गावाला नेणारी धुरवाली गाडी

हिरव्या हिरव्या शेतांनी बहरतो मी,

गावांत सारवलेलं घरं आमचं,

शेणांच्या वासानी हुरळतो मी.

ओफिसमध्येही अचानक

कोलेजच्या प्रेमात पडतो मी,

फ्रेंडशीप डे ला रंगवलेला शर्ट

अजूनही घालून मिरावतो मी.

वेळात वेळ काढून जेंव्हा

मित्रांशी चाट करतो मी,

ओफिसातल्या पोश खूर्चीला

कोलेज कट्टा समजतो मी.

माझ्या आठवणींचं जग

तूला एकदा तरी दाखवायचं होतं,

पुन्हा तुझ्याबरोबर जगण्यासाठी

ते जीवापाड जपलं होतं.

तू गेलीस तेंव्हा

मला काहीच समजत नव्हतं

स्मृतींच्या सठवणींचं

काय करू उमगतं नव्ह्तं

पण, आता तूझ्या बरोबरच्याही

क्षणांची केलीयं साठवणं मी

आठवणीत तूझ्या विसरून स्वतःला

उरलोय केवळ एक आठवण मी.

माझी तू त्याची होताना

Share

माझी तू त्याची होताना

सांग ना सखे तूच आता
माझ्या पासून दूर जाताना
काय वाटते तुला आज
माझी तू त्याची होताना

मुक्त्त करुनि या बंधना
जोडुनी नवा अनु-बंध हा
काय वाटते तूला आज
माझी तू त्याची होताना ?

एकाच वाटेचे पक्शी आपण
पण मी या दिशेला अन
तू विरुद्ध दिशेला जाताना
काय वाटते तुला आज
माझी तू त्याची होताना ?

सांग ना सखे तूच आता
माझ्या पासून दूर जाताना
अर्धांग येथेच सोडून
काय वाटते तुला आज
त्याची अर्धांगीनी होताना ?

पती, पत्नी आणि झोप

Share

"पती, पत्नी आणि झोप"

तो या कुशीवर ती त्या कुशीवर
दोघांचीही डोकी आपापल्या उशीवर
पाठीकडे पाठ एका हाताचं अंतर
सध्यातरी अबोला माहीत नाही नंतर
विषय आता आठवत नाही पण सकाळी भांडण झालं होतं
जुन्याच कुठल्या मुद्द्याचा पुन्हा कांडण झालं होतं
कळत नाही अबोल्याचं झोपेशी काय नातं असतं
जांभया येतात खूप पण मन टक्क जागं राहतं
झोप येत नाही म्हणून तो घेतो कूस वळून
तिला वाटतं त्याचा राग गेलाय आता पार पळून
तिही मग कूस वळते तिरक्या डोळ्यांचा कटाक्ष देते
शब्दबंद ओठांवरती हळूच कातील हसू फुटते
पुढाकार कोणी घ्यायचा असं काहीच नसतं ठरलेलं
तहामध्ये दोघांचंही सारं निम्मं निम्मं उरलेले
आता भांडणं ढासळतात श्वासात श्वास मिसळतात
तृप्तीच्या डोहामध्ये दोघेही मग कोसळतात
झोप अडून बसलेली आता डोळ्यामध्ये शिरते
हलक्यानेच पापणीखाली अंधाराचं काजळ भरते

मी मराठी

Share

मी मराठी, रांगड्या महाराष्ट्राचा माझा वारसा

शिवभूमीच्या यज्ञकुंडी अग्नी मी अनिवारसा

"जय भवानी, जय शिवाजी" मंत्र मी उच्चारता

साजणी होते यशश्रीही मराठी माणसां

मी समर्थचरणी सेवक, मी शिवाचा मावळा

गोंधळी अंबाईचा नि वारकरी मी बावळा

चाकरी करतो परी मज दीनही समजू नका

उदार मीही पुत्र, माझा बाप सह्याद्री जसा

आपुले म्हणतो तयां मी, जो का दुबळा बापुडा

"नाठाळाचे माथी काठी" हा कसा विसरू धडा ?

देव माझा कानडा, मुखी "राम राम पावनं "

मराठीबाणा हा अजाणां आकळेना फारसा

अस्मितेचे बीज हे शिवराज गेले पेरूनी

टिळक सावरकर बीजांकूर, तेचि माझे अग्रणी

क्रांतीची मी ज्योत, जपतो संस्कृतीला अंतरी

हुश्शार व्हा, डिवचू नका मम अस्मितेच्या चौरसा

जाणतो एकत्मता मी, जाणतो बलिदानही

प्रसंगी देशावर मराठी जाहला कुर्बानही

जाणतो मी नीती रीती, आणखी शिकवू नका

अनंतरूपी मी, मला कुणी काय दावील आरसा ?

यातना

Share

डोळ्यातली तुझ्या ना मी वेदना समजलो
प्रेमास ना समजलो, नाही मना समजलो

मस्तीत जीवनाच्या, धुंदीत यौवनाच्या
तृप्तीस इंद्रियांच्या संवेदना समजलो

झाले असह्य जेव्हा, मिटलेस फक्त डोळे
मिटण्यासही तुझ्या त्या मी वासना समजलो

माझेच नाव व्यापी तव पुस्तकास अवघ्या
तळटीप वा तुला मी प्रस्तावना समजलो

समजून हेम धरले छातीस हीन कथला
लक्ष्मीस मी गुणांच्या निष्कांचना समजलो

कळले न आतड्यांचे तुटणे तुझ्या कधीही
शब्दांस काळजीच्या निर्भर्त्सना समजलो

धरती क्षमाशिला अन्‌ अपराध पावसाचे
परमेश्वरी कृपेची ही योजना समजलो

सरला वसंत, उरले काटे उरात बाकी
तेव्हा फुलारण्याची मी यातना समजलो...

पाऊस....

Share

पाऊस....
पाऊस.........
पाऊस.........
उधळता वारा मनाला सावरत गायला
कोसळ अजुन म्हनाला त्या पाउसाला
चिंब भिजुदे आज ही धरा आणी मी
मन थांबलय तुझ्यात अखंड भिजायला

ओल्या पानावर थेंब बनुन चमकायचं ंमला
पाकळी पाकळीवर चुंबन घ्यायचय मला
कड्याकपारीतुन वहात नदीत मिसळुन जायच मला
हिरवळित ओलवा बनुन पायघड्या घालायच्या मला
झाडाखाली कोसळत भिजवायच मला

गालावरुन तिच्या ओघळनार मी
ओठांशी तिच्या जवळिक साधणार मी
मी असाच कोसळत राहील
ती चिंब भिजत राहील
तो तिला भिजलेली बघत राहील
मला आवडत भिजवायला
त्यांना आवडतं भिजायला

सोमवार, ८ जून, २००९

"मी मराठी मी मराठी"

Share

"मी मराठी मी मराठी"

म्हटलं तर

का पडली इतरांच्या

कपाळावर आठी?.....

दिसलीच पाहीजे सगळया दुकानांवर

मराठी भाषेतली पाटी.....

बसायलाच हवी होती अशी

या दादा लोकांवर मराठीपणाची काठी...

दूर केलीच पाहीजे ही

त्या लोकांची दमदाटी....

आता फुटली आहे मराठीपणाच्या

सहनशीलतेची पाटी...

ही राज नीती खरंच नाही बरं का

मराठी मतांसाठी ..

हा तर खरा आवाज आहे

मराठी अस्तित्वासाठी...

बोलतंय कुणीतरी आता

मराठी माणसासाठी...

राज तर पुकारतोय लढा

मराठीच्या रक्षणासाठी...

पाहा सगळ्या क्षेत्रात काय झाली आहे

मराठी माणसाची गोची...

रोजच्या रोज माणसे येवून येवून

मुंबई भार सहन करेल तरी किती?

मुंबईच काय, ते तर शिरलेत आता

मुळा मुठा नदीच्याही काठी...

द्या सगळे मिळून लढा मराठी मातेच्या

गुदमरलेल्या जीवासाठी ...

जय महाराष्ट्र!!!!!!!!!!!! !!!!

वेड..

Share

vector beautiful flower florझोप माझी असली तरी,
स्वप्न मात्र तुझे आहे!
रंग माझे असले तरी,
चित्र मात्र तुझे आहे!

हृदय माझे असले तरी
ध्यास मात्र तुझा आहे!
नजर माझी असली तरी,
भास मात्र तुझा आहे!

शब्द माझे असले तरी
वर्णन मात्र तुझे आहे,
वेडी मी असली तरी,
वेड मात्र तुझे आहे..!!!

आई

Share

आई, तू आहेस म्हणूनचं माझ्या
अस्तित्वाचं इथे नांदणं आहे
संस्कारांच्या असंख्य चांदण्यांनी
हृदयाच्या आभाळभर गोंदणं आहे

आई, तुझ्या रागवण्यातही
अनूभवलाय वेगळाच गोडवा
तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात
फिका पडतो दसरा नि पाडवा

आठवतं तापाने फणफणायचो तेव्हां
तू रात्रभर कपाळावर घड्या घालायचीस
सर्वत्र दिवे मिणमिणू लागायचे, तरी
तुझ्या डोळ्यातली ज्योत एकटीच लढायची

एकदा जरासं कुठे खरचटलो
आई, किती तू कळवळली होतीस
एक धपाटा घालून पाठीत
जख्मेवर फुंकर घातली होतीस

जख्मं ती पुर्ण बुजली आता
हरवून गेली त्यावरची खपली
तो धपाटा, ती फुंकर, ती माया
ती हरेक आठवण मनात जपली

आई, किती ते तुझं निस्वा:र्थ प्रेम
हृद्याच्या किती कप्प्यात साठवू मी
कितींदा नव्या हृदयाचा संदेश
देवाकडे क्षणाक्षणाला पाठवू मी

आई, हजार जन्म घेतले तरी
एका जन्माचे ऋण फीटणार नाही
आई, लाख चुका होतील मज कडून
तुझं समजावनं मिटणार नाही

आई, करोडोंन मध्ये जरी हरवलो
तरी तू मला शोधून काढशील
आई, तुला एकदाच हाक दिली
तरी अब्जांनी धावून येशील

नजर...

Share

On the other side of the sea...थांबतील थांबतील काय म्हणतेस
मी तर सर्व जग थांबवले होते
अश्रुंचे सारे समूद्र मी तेव्हा
चार डोळ्यातून बरसवले होते

त्याच वाटेवर आज मात्र
पाऊलखुणाही दिसत नाही
आधार काय नि काठी काय
जिथे आज वादळाला रडायला........
माझ्या नजरेत बघवत नाही ...

मित्रा..[My Friend]

Share

2 Much Drama album coverमित्रा माझेही असेच काही झाले होते
संपवण्याचे सारे मार्ग खुले झाले होते
पण,

एकच हसू असे मिळाले की
स्वःतासाठी जगण्याचे सारे मार्ग बंद केले गेले
माझ्याच जीवनाच्या द्रुष्टिकोनात तेव्हा
विरघळण्याचे सारे मार्ग खुले झाले होते.........

मराठियाची पोरे आम्ही

Share

मराठियाची पोरे आम्ही , नाही भिनार मरनाला !
सांगुनी गेला कुणी शाहिर अवघ्या विश्वाला .
तीच आमुची जात शाहिरी मळवट भाळी भवानिचा
पोत नाचवित आम्ही नाचतो , दिमाख आहे जबानिचा


कधी शत्रूचे घाव ना पाठीवरती |
रणी झेलतो सिंहासा छातीवरती ||
हाकारूनी आव्हानतो जो यमाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

दिला एकदा शब्द न पालटावा |
पुढे टाकलेला पाय मागे न घ्यावा ||
धरे जो स्वयंभू शिवाजी पथाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

आपत्तीतही पाय मागे फिरेना |
महा संगरी धैर्य ज्याचे गळेना ||
मिळवितो रणी म्लेंच्छ सेना धुळीला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

जरी शत्रु कांता प्रसंगी दिसेल |
तिला साडीचोळीनिशी पाठवेल ||
कधी स्वप्नी ना पाप स्पर्शे मनाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

महावादळांच्या विरोधात ठाके |
पुढे संकटांच्या कधीही न वाके ||
पराभूतता स्पर्शू शकते न ज्याला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

धरू खड्गधारा वधू शत्रु पूर्ण |
करू म्लेंच्छ सत्ता बलाने विदीर्ण ||
क्षुधा तहान ऐशी जयाच्या उराला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

मराठियाची पोरे आम्ही

Share


मराठियाची पोरे आम्ही , नाही भिनार मरनाला !
सांगुनी गेला कुणी शाहिर अवघ्या विश्वाला .
तीच आमुची जात शाहिरी मळवट भाळी भवानिचा
पोत नाचवित आम्ही नाचतो , दिमाख आहे जबानिचा


कधी शत्रूचे घाव ना पाठीवरती |
रणी झेलतो सिंहासा छातीवरती ||
हाकारूनी आव्हानतो जो यमाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

दिला एकदा शब्द न पालटावा |
पुढे टाकलेला पाय मागे न घ्यावा ||
धरे जो स्वयंभू शिवाजी पथाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

आपत्तीतही पाय मागे फिरेना |
महा संगरी धैर्य ज्याचे गळेना ||
मिळवितो रणी म्लेंच्छ सेना धुळीला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

जरी शत्रु कांता प्रसंगी दिसेल |
तिला साडीचोळीनिशी पाठवेल ||
कधी स्वप्नी ना पाप स्पर्शे मनाला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

महावादळांच्या विरोधात ठाके |
पुढे संकटांच्या कधीही न वाके ||
पराभूतता स्पर्शू शकते न ज्याला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

धरू खड्गधारा वधू शत्रु पूर्ण |
करू म्लेंच्छ सत्ता बलाने विदीर्ण ||
क्षुधा तहान ऐशी जयाच्या उराला |
मराठा म्हणावे अशा वाघराला ||

माझ्या चारोळ्या...काही भावना..

Share

*winter*अश्रुंमधला खारटपणा हल्ली
जास्तच वाढत चाललाय
.
.
.
.
.
वाटतयं जमीनीचा नापीकपणा आता भोवतोय...

तुझ्या क्षितिजाच्या त्या
हळव्या आणि पुसट कडा
संभ्रमाच्या छायेमधील जणू
सप्तरंगी बिकट छटा

त्या झुरण्यात पण एक मजा असते
हसता हसता पाठून रडण्यात वेगळी मजा असते
प्रेम मिळो अगर न मिळो
त्यासाठी जीव तोडून धावण्यात वेगळी मजा असते

मीही आता आवरून घेतलंय
नाईलाजाने सावरून घेतलंय
रात्रीच्या त्या अगणित थेंबाना
मीही आता चांदण्यांशी थेट वावरू दिलयं

माझी तर आता कातरवेळ आहे
सांज तर गेली पण अंधाराची वेळ आहे
तू मात्र मनात आहेस..
जसा आभाळात तोही निरंतर आहे...

डोळेही हल्ली मला आता
तुसरयासारखे वागवतात
शब्दातून जरी तू डोकावलीस तरी
आनंदाने उशीवर रात्रभर रांगोळी काढत राहतात......

श्रावणसरीही मित्रा आता
परक्यासारख्या वागतात
उनपावसाच्या मतलबी खेळात
आपल्याच डोळ्यातून धावतात

तुझ्या आणि माझ्यामध्ये आता
फक्त इतकेच अंतर उरले
पाऊस येऊन सरून गेलाय
आणि अश्रु मात्र माझेच कोरडे राहीले

प्रेम जेव्हा उमलत होतं
तेव्हाच सारं बरसत होतं
आसुसलेल्या प्रत्येक क्षणाला
तेच तेव्हा फसवत होतं....

तसेच काहीसे कातरवेळचे असते
लालगोळ्याच्या निरोपाचे..
..त्याला अमुक आमंत्रण असते
दिवा पेटून कसा जळवून जातो
पहाटेच्या किरणांना याचेच मुळी वावगे असते

आधार...

Share

Moon against the Belt of Venusशब्दांचीच साद कानात होती, कधीकाळी
चंद्राचीच वाट डोळ्यात होती, कधीकाळी
जगबुडी तर कधीच झाली होती
पण शब्दांनीच माझी गळचेपी केली, कधीकाळी

आधार नक्की काय असतो
तेव्हा मला कळले
ह्रदयाचे ठोके जेव्हा कधी
शब्दांसाठी बंद पडले....

त्याचे प्रेमाचे एस.एम.एस [His Love SMS]

Share

Mobile phone Zombies
तू येणार असताना मध्येच
पावसाचं येणं कळत नाही...
पण तुझ्या प्रेमाएवढा त्यात
भिजण्याचा आनंद मिळत नाही...!


तुझ्या प्रेमाने कपाळावरचं कुंकुदेखील हसतं!
खरच प्रिये, या बंधनात कीती सामर्थ्य असतं!
आपलं कोणीतरी असण्यापेक्षा,
आपण कोणाचे तरी व्हावं...
त्याच्यासाठी जगत असताना,
त्याचच होऊन जावं...!


प्रेमाचा वर्षाव नुकताच होऊ लागलाय,
कधी न जाणवणारा सुगंध आता,
सभोवार दरवळु लागलय!!


पापण्यात लपलेली तुझी नजर,
माझ्याकडे बघुन लाजत आहे,
तुझ्या पायातील पैजणसुद्धा,
माझ्याच नावाने वाजत आहे..!


रातराणी उमलावी तशी तु उमलतेस,
माझ्या मनांत मनापासुन दरवळतेस..
खरं सांगु का ग तुला ?
तु मला मनापासुन खुप खुप आवडतेस..!


माझ्यापासुन दुर गेल्यावर
माझी आठवण काढशील ना?
काही बोलावसं वाटलं तर,
मोबाईलवर एक फोन करशील का?

नाती... [Life and Relations]

Share

Business Model Relationमलाही वाटते नाते असावे
मलाही कुणि आपले असावे
पण मग एकच गोष्ट
माझ्या मनात येते....


आलो असेच आणि जाणारही असेच
मग का कुणाचे रेशमी बंध
मलाही नाती आहेत.... नाही होती
मलाही त्यांची जपणूक होती...

एक शब्दावर मरण्यासाठी
माझीही तेव्हा तयारी होती
मीही फुलवल्या शब्दांच्या बागा
शब्द खाली पडू न देण्याच्या आणाभाका
पण नातीच कधी फासे असतात
आणि नातीच कधी फास होतात
आयुष्य पिळून काढले तर, तेव्हा
नात्यांचेच फक्त भास उरतात..........

आयुष्याची पहाट... [The Rising]

Share

Straight On till Morning album coverअंधारातील प्रत्येक क्षणात मी
एक पहाट जागवली
मातीत विरघळत असतानाही मी
गरुडझेप दाखवली...


सकाळच्या दवथेंबामध्ये
गुलमोहोर मी साठवला
वारयाच्याही कानात मी तेव्हा
आत्मविश्वास जागवला
समोर दिसत नाही म्हणून मी
अश्रुनींही दिवे पेटवले
हात जेव्हा भाजले तेव्हा
त्यांनीच मला सावरले

उष्ट्या रक्ताच्या समारंभातही मी तेव्हा
एक पहाट जागवली
मातीत विरघळत असतानाही मी
गरुडझेप दाखवली

सर्व ऋतु खेळून गेले
तीन पत्तीचा डाव
वादळही सांडून गेले
एक रडीचा डाव
उठतांना पंगतीतून पण
सारी आधी उठून गेली
डोळे उघडून बघण्याआधीच
वीज कडाडून निघून गेली

मुठीत ह्रदय आवळण्यात मी तेव्हा
एक पहाट जागवली
मातीत विरघळत असतानाही मी
गरुडझेप दाखवली

अस्तित्वाच्या संघर्षातही
उणे काहीच नव्हते
अंधारातील प्रत्येक वणव्यात
हात मात्र हातात होते
क्षणाक्षणातील प्रत्येक युगात
साथ मला भरपूर होती
प्रत्येक एका अमवस्येला
चांदण्यांची बरसात होती

दोन मनांच्या भेटीगाठीत मी तेव्हा
एक पहाट जागवली
मातीत विरघळत असतानाही मी
गरुडझेप दाखवली

तरीही असे का वाटते
हरवले असे का वाटते
कातरवेळी आज का
दवथेंबाचे वावगॆ वाटते
का आज नशीबाचे पाउल
मलाच थोडे उजवे वाटते
का आज दिव्यामध्ये
पतंग होऊन मरावेसे वाटते

याच उत्तरांच्या मूळ प्रश्नात मी आज
एक पहाट जागवत आहे
"होते" आणि "आहे" यामध्येच
गरुडझेप आठवत आहे

प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! [Indian Republic Day ]

Share

Tiranga in his full attireभारतीय घटना
जगात आहे महान
तिच्या रक्षणाचे
सदा राहु दे भान...!
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


जयोस्तुते श्रीमहन्मंगले !
शिवास्पदे शुभदे
स्वतंत्रते भगवती !
त्वामहं यशोयुतां वंदे !
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


स्वातंत्र्यवीरांना करुया
शतशः प्रणाम
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच
भारत बनला महान..!
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


वंदे मातरम्
सुजलाम सुफलाम मलयज शीतलाम्
शस्यशामलं मातरम
शुभ्र ज्योत्स्नां पुलकित यामिनी
फुल्लकुसुमित द्रुमदलशोभिनी
सुहासिना सुमधुअर भाषिणी
सुखदां वरदां मातरम्!
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


हिन्द देशातील निवासी
सर्वजण एक आहेत
रंग रुप वेश भाषा
जरी अनेक आहेत...
मी भारतीय आहे
मला माझ्या देशाचा अभिमान आहे!
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


विजयी विश्व तिरंगा प्यारा
झंडा ऊंचा रहे हमारा!
प्रजासत्ताकदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भेट

Share

Acrylic Sunrise/Sunsetआज माझ्या जीवनाला
एक नवा सुर मिळाला
रातराणीच्या फुलांना
आज नवा गंध मिळाला...


तुझ्या आज असण्याने
मन माझे धुंद आहे
याच धुंदिचा आनंद
अंगणात मंद आहे
"शब्दांमध्ये व्यक्त करणे
मला निदान शक्य नाही
भावनांच्या गुंतागुंतीत
तुला शोधणे शक्य नाही"

वसंत होता श्वासही होता
पण तेव्हा तू नव्हता
फरक आता इतकाच आहे
माझ्या मनी तू आहेस

आता प्रत्येक पावसात मला
फक्त एकच गोष्ट हवी
कुशीत मला ओढून घेशील
साथ इतकी तुझी हवी

आता माझ्या प्रत्येक गोष्टीत
एका सुखाचा भास असतो
भासाच्या त्या प्रत्येक क्षणात
तुझ्या असण्याचा नाद असतो

एकच आता मला तुला
सांगावेसे वाटते

तुझ्या हरएक दुःखात तू
मला ओढून घे
काठावरतीच आहे अजून
हळूच मला कुशीत घे

आज अचानक...

Share

Lilium bulbiferum in habitat, Tyrol, Austria अचानक भल्या पहाटे
एक आठवण जागवून गेली
तुझे आणि माझे बंध
आपसूकच दाखवून गेली


सांग ना !
काय तुझे आणि माझे नाते
उमजेल का, कधी मला ते

करून करून विचार जेव्हा
कधी नव्हे ते थकलो
गालांवरचा पाऊस मी
थांबवू नाही शकलो

मॆत्रीचे हे नाते अपुले
का आज एकतर्फी वाटले
पहाटेच्या या ऒल्या क्षणी
का कातरवेळ्चे ध्यास लागले

का तुझ्या डोळ्यात आज
शोधतोय मी पाऊस गाणे
धुक्याच्या या ओंजळीमध्ये
प्रेमरूपी दव थेंब माझे

सापडेल का या क्षणांना
कधी एक गोड किनारा
गालांवरच्या पावसाला
सावरणारा एक जिव्हाळा
सावरणारा एक जिव्हाळा"

काल म्हटलं पावसाला

Share

The Vindhyas in central Indiaकाल म्हटलं पावसाला,
माफ कर बाबा ,
आज भिजायला जमणार नाही .
मैत्रीच्या पावसात भिजून
झालोय ओलाचिंब ...


न्हाऊ घालतोय बघ मला
शुभेच्छांचा प्रत्येक थेंब..!
मित्रांची इतकी गर्दी झालीय
भिजून भिजून बघ मला सर्दी झालीय..!
पाऊस रिमझिम हसला .
ढगांना घेउन क्षितीजावर जाउन बसला .
जाता जाता म्हणाला," काळजी नको . भिजून घे खूप .
भिजणं थांबलं की घे पुन्हा मैत्रीचीच ऊब..!

आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं

Share

980127-01

गंध आवडला फुलाचा म्हणून... ... फूल मागायचं नसतं.
गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....


परक्यांपेक्षा आपलीच माणसं
आपल्याला नेहमी दगा देतात
एकमेकांच्या पाठीवर मग्
नजरे आडून वार होतात


भळभळणा-या जखमेतून
विश्वास घाताचं रक्त वाहतं
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा
आपणच पुसायचं असतं

अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपलं सुःख पाहण्याचा तसा
प्रत्येकाला अधिकार आहे..
पण्; दुस-याला मारुन जगणं
हा कुठला न्याय आहे...

माणूस म्हणुन माणसावर
खरं प्रेम करायचं
आपल्या साठी थोडं,
थोडं दुस-यासाठी जगायचं

जगण्याचं हे ध्येय मनात आपणच बाणवायचं आसतं
अशा वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं....

आपल्याला कोणी आवडणं
हे प्रत्येक वेळी च प्रेम नसतं
आकर्षणाचं स्वप्नं ते
आकर्षणंच असतं...

मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं...
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं


मन् आपलं वेडं असतं
वेडं आपण व्हायचं नसतं..
मन मारुन जगण्यापेक्षा
वेळीच त्याला आवरायचं

अशावेळी....
आणि अशाच वेळी आपल्या मनाला आपणच आवरायचं असतं...

अपुर्ण ..

Share

Still The Same

नुसताच बसलो होतो मी
बराच वेळ हातात कागद-पेन घेऊन...
सुचतच नव्हते काही
मनाच्या आकाशात कधी पाऊस कधी ऊन...
शेवटी कंटाळून बाजूला ठेवून दिले कागद-पेन
आणि सरळ आठवायला घेतले तुला


तुझ हसणं आठवलं
तसे टपटपले दोन-चार शब्द कागदावर
तुझ चिडणं आठवलं
तश्या उमटून गेल्या दोन-चार ओळी
मलाही मग आला उत्साह
आठवत गेलो तुला खूप खूप...
तसे तरंगत आले चुकार शब्द
आणि बसले शहाण्यासारखे
एकेका ओळीत गुपचूप...

मग मी आठवल्या त्या कातरवेळा
ती संकेतस्थळं आणि ती चांदरात...
तसे लाजले शब्द थोडे आणि त्यांनी
लपेटले स्वत:ला वृत्त, लयी आणि यमकांत...
कागद भरुन गेला पार...
छान कविता होत होती तयार...
आता शेवटच राहिला होता फक्त
बाकी सगळं जमलं होतं मस्त
अन मला कुठुनसं आठवलं
आपलं झालेलं भांडण
तुझ्यासारखेच रुसून बसले मग शब्द
परत थोडा मागे गेलो
जुनं-जुनं आठवू लागलो

हाताला लागले काही निसटणारे क्षण
लिहिलंही मी कागदावर काहीबाही
पण ते माझं मलाच पटलं नाही...
जसं आपलं भांडण
कधी कध्धीच मिटलं नाही...
माझं मीच मग समजावलं मला
कधी कधी असं होतं
राहते एखादी कविता 'अपूर्ण'च
जसं राहून गेलंय आपलं नातं
जसं... राहून गेलंय आपलं नातं!

मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यात

Share

गुंतत चालले मी तुझ्या प्रेमाच्या जाळ्यातlove_friendship
पण सिचुयेशन आहे तळ्यतमळ्यात

खूप आहे माझा तुझ्यावर प्रेम
पण कसा वेगळाच आहे ह्या फीलिंग्स चा गेम

प्रेमाची भाषा मला कधीच नाही कळली
पण मलाच माहीत नाही मी तुझ्या प्रेमात कशी पडली

मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श
पण प्रपोज़ करायला तू लावणार आहेस किती वर्ष???

तुला होकार द्यायला मी कधीची आहे रेडी
पण पायात अडकली आहे करियरची बेडी

हे आपला अबोल प्रेम असाच सुंदर असु दे
पण स्वप्नात का होईना एकदा तरी खुलू दे

प्रेमाचा खरा अर्थ…..

Share

2प्रेमाचा खरा अर्थ……
दूरवरच्या माळावर
मला एक वड दिसला होता
माझ्याप्रमाणेच तोही मला एकटा वाटला
मी त्याला विचारलं
टुझ्याही मनात तेच चाललयं का जे माझ्या मनात
तर म्हनाला
मी तर पडलोय प्रेमात
तुझं मला काय माहीत?
मी पुन्हा विचारलं
प्रेम म्हनजे काय असतं
तर म्हनाला
प्रेम हे जगन्याचं भान असतं
पावसानंतर हिरवं झालेलं रान असतं
बर्फ़ाळ थंडीत गारठून गेलेलं पान असतं
वैशाखवणव्यात पानगळ झालेलं झाड असतं
अलगद झोळीत पडलेलं दान असतं
मी त्याला विचारलं तू कुणाच्या प्रेमात पडलायस
तर म्हणाला
मी त्या मेघाच्या प्रेमात पडलोय
जिने मला गेल्या पावसात भिजवलं
मी त्याला म्हणालो
अरे मी तीला ओळखतो, सगळेच ओळ्खतात
ती तर सगळ्यानांच भिजवते
पण पण म्हणून तू तिच्या प्रेमात पडलायसं
अरे मग तर तू मुर्खच
अरे तू स्वताकडे पाहिलयस का?
अर्धा तर जमिनीत रुतलेला
उंच होण्याऐवजी नुसताच जाडीने वाढ़णारा
त्या आकाशीच्या मेघांची अपेक्षा करतोयस
तर तो नुसताच गूढ़् हसला
इत्क्यात अंधारुन आले
आकाशात मेघच मेघ जमा झाले
तो हर्षभरीत नजरेनं वर बघत् होता
पण ती मात्र वाऱ्याशी गप्पा मारत होती
त्याच्याशी खेळत होती
या वडाबद्द्ल तर तीला काहीच माहीत नव्हते
मी खिन्न मनाने
परत निघालो
थोडा दूर गेलो असेल तोच
काडकन आवाज झाला
प्रकाशाचा लोळ उठला
मेघातून निघालेली वीज
धाडकन वडावर कोसळली
मी त्याच्याकडे पाहिले
मरणाच्या दारात असुनही
तो हसत होता
मला म्हनाला
अरे मी तिच्यासोबत घालवलेला
हा क्षण मला पुरेसा आहे
मी समाधानाने प्राण सोडतो आहे
मी मात्र सुन्न झालो होतो
प्रेमाचा खरा अर्थ आता मला कळला होता

रंगवुनि स्वप्न माझे

Share

carrieunderwood_dream480रंगवुनि स्वप्न माझे-

निघुनी का गेलास तू?

जीवनाचा अर्थ मजला

सांगुनि गेलास तू!

जीवनाचे चित्र माझ्या

आज मी रे रेखिले!

रंग त्याचा होऊनी अन्‌

उडूनि का गेलास तू?

मूर्ति तव मी नयनि माझ्या

होती रे रेखाटली-

अश्रुधारा होऊनी अन्‌

निघुनी का गेलास तू?

चित्र अपुरे…स्वप्न अधुरे

सांग रे फुलवू कशी

मीलनाची आस मज का-

लावूनि गेलास तू?’

मैत्री

Share

Friendster or Foe

ध्यानी मनी नसताना.... आयुश्यात एका क्षणी.. मैत्री प्रवेशते....
हिरव्या श्रावणात हातावर रंगलेल्या ... मेंदी सारखी....
आयुश्यभर आठवत रहाते....

मैत्री म्हणजे एकमेकांना समजणं.. आणि समजावणं असतं.....
मैत्री म्हणजे... कधी कधी स्वताःलाच आजमावणं असतं .....

घट्ट लावलेलं मनाचं दार.. मैत्रीत अलगद उघड्तं....
हळव्या मनात जपलेलं 'अलगुज' अवचित ओठांवर येतं......

मैत्री मधुनच जन्म घेतं.. निखळ प्रेमाचं रोपटं.....
प्रेम ! परमेश्वरानं माणसाला दिलेली... सर्वात सुंदर गोश्ट !......

मित्राचा 'सखा' आणि मैत्रीणीची 'सखी'......
मैत्रीतुनच फ़ुलतात नाती.... फ़ुलपाखरासारखी........

इन्द्रधनुश्यी रंग लेवुन.. फ़ुलपाखरु आकाशात झेपावते.....
हिरव्या श्रावणातली मेंदी.. आणखीनच रंगत जाते.....!

रविवार, ७ जून, २००९

‘चंद्र’ डागाळलेला बरा

Share

विषय हा टाळलेला बरा,202px-full_moon_partially_obscured_by_atmosphere
अन्य हाताळलेला बरा ॥

आठवांच्या फुलांतील ‘तो’
मोगरा जाळलेला बरा ॥

हट्ट का उत्तराचा उगा?
प्रश्न रेंगाळलेला बरा ॥

विश्व खोटे जरी भोवती,
शब्द मी पाळलेला बरा ॥

लावु दे पेच त्यांनाच, मी
दोर गुंडाळलेला बरा ॥

हौस ना थांबण्याची मला,
पाय भेगाळलेला बरा ॥

मिरव ‘सौभाग्य’ तू आपुले,
‘चंद्र’ डागाळलेला बरा ॥

शनिवार, ६ जून, २००९

उसासा

Share

बरसला पाउस भिजली धरा
होउन ओली बहरली पृथा

पावसाने नकळत लावला लळा
गळ्यात घातल्या प्रेमाच्या माळा

पेचात खोवला श्रावणाचा तुरा
नदी नदीतुन वाहीली धरा

प्रेमाने पावसाच्या लाजुन तिने
अंग झाकले हिरव्या शालुने

शेवटी एकदा संपला पावसाळा
पावसाने आपला तळ हलवला

जाताना पाहून पावसाला अलगद
उसासा सोडला तिने दुःखद

उसास्याने तिच्या पडला गारठा
घेउन आला शरदातला हिवाळा

वेडी माया

Share

निळं गाठोडं आभाळाचं
घेउन रे डोइवर
फिरते मी रानोरानी
शोधते तुज पानोपानी.


उधाण वाऱ्याला पुसते
कुठे गेला माझा सखा
नितळ तळ्यात धूंडते
चेहरा तुझा जीवलगा

शूभ्र कापसाच्या ढगा
वाट तुझी विचारते
काट्याकुट्याची वाट ही
फूलावानी तुडविते

जसा सुवास फूलात
तसा जीव माझा तुझ्यात
वेड्या प्रेयसीची ही
वेडी माया रे

नको नको रे राजसा
असा छळू मजला तू
वाळीवावानी बरसत
एकदातरी ये ना तू.

आशा

Share

पूर्व क्षितीजावरी पसरली लाली
उगवला सूर्य धरा जागी झाली

कोवळ्या किरणांसवे पक्षीही जागले
खळगी भरण्या पोटाची चहूदिशी विखूरले

हळुहळू मित्र पोहचला मध्यावरी
तापलेली धरा थोडि सुस्तावली

शेवटी एकदाची झाली संध्याकाळ
थकलेला रवी पोहचला नभापार्

उतरत अलगद क्षितीजाच्या खाली
देउन गेला आशा उद्याच्या उषेची

आयुष्य

Share

नुकतीच कुठे आयुश्याची सुरुवात होती
पुस्तकाच्या पहिल्याच पानावर शेवटाची बात होती

सुर्य डोक्यावर आलेला अन् लख्ख उजाडलेले
मनाच्या गाभाऱ्यात मात्र आवसेची रात होती

समजुन फूले ज्यांना मी होते केसात माळले
उमगले मज नंतर काट्याची ती जात होती

आयुश्याची लक्तरे अन जीवनाची झालेली दशा
खडतर या वाटेवरती फ़क़्त दुःखाचीच साथ होती

आयुश्याच्या या दिपामध्ये काठोकाठ तेल भरलेले
मिणमिणनाऱ्या या दिपामधली सम्पलेली वात होती .

प्रेत

Share

दुःख जे दाटले उरी, थडगे त्यावरी बांधियले
आणित हासू ओठांवरी, माझेच प्रेत मी मिरवीले

उघडनारे मनात सारे, दरवाजे बंद केले
चिरडुन टाकीत भावनांना, ताजमहाल मी उभारले

लपवीत लक्तरे मनाची, तलम रेशीम पांघरले
थिजवून टाकीत ह्र्दय हळवे, नेत्रास बांध घातले

दाखवीत आमिष सुखाचे, मनास मी समजावले
भूतकाळास विसरन्याचे, चोरुन आश्वासन घेतले

क्रुरतेने घाबरून माझ्या, मन वेडे हे गारठले
भडभडनाऱ्या चितेवरती मग, त्यास शेकुन आणले.

आठवण

Share

येइल का गं तुला माझी आठवण ?
मी दूर गेल्यानंतर
होइल का गं पापणी ओली?
जुनं सारं आठवल्यानंतर
भासेल का एखादी संध्याकाळ
उदास एकाकी नकोशी?
अन् पाहून त्या वेड्या चन्द्रास
आठवेल का रात्र जागवलेली?
विचारलं मी काहीसं हळवं होत
अन् धरला
तुझा हात अफ़्गदी घटट्
तू टाकलास एक शांत कटाक्ष
आणि वार्यावरती गंध पसरावा
इतक्या हळूवारपणे बोललीस
"वेड्या, आठवण येण्यासाठी विसरावं लागतं."

सदीच्छा

Share

कधीतरी येतात आयुश्यात असे काही क्षण
अन् लोटला जातो मी खोल गर्तेत
अगदी तमाच्या तळाशी
शोधू लागतो स्वःताच स्वःताचे अस्तीत्व
अन् अडखळूनही पडतो काहीवेळा
बराचवेळ शोधल्यानंतरही अंधारामुळे
काहीच हाती लागत नाही
अन् कंटाळून परतावे म्हटले तरी
परतीचा मार्ग दिसत नाही.
अश्यावेळी अचानक चमकातात
तुमच्या सदीच्छांचे काजवेआणि
उजळून टाकीत सारा आसमंत
गवसून देतात माझ्यतले मीपण
अन् दाखवतातही परतीचा मार्ग
पुन्हा नव्या उमेदीने जगण्यासाठी

प्रेम

Share

तू नेहमीच धडपडायचा
तिला आपलेसं करण्यासाठी
तुला मदत करता करता
नकळत मीहि धडपडायची
तुला आपलेसं करण्यासठी

व्हायचं तुमचं लुटुपुटीचं भांडण
अन् मग तुमचं ते रुसणं फूगणं
मीच बनायचे मग मध्यस्थ
अन् द्यायचे तुमचे हात एकमेकांच्या हातात

जायचो आपण डोंगरदऱ्यात फिरायला
भटक भटक भटकायचो
अन् मग तुम्हाला एकांतात सोडून
पापण्यातले अश्रू लपवत
खिळवायची मी नजर पुस्तकाच्या पानावर


तिचं ते माझ्या नावावर घराबाहेर पडणं
तुमचं ते फिरायला जाणं
माझं मग बागेतल्या कोपऱ्यात
शून्यात नजर लावून तुमची वाट पहाणं

कधीतरी वाटायचं
देत आहोत आपणच आपल्या प्रेमाची आहूती
पण दुसऱ्याच क्षणी उमगायचं
प्रेम् असतं फ़क़्त देण्यासाठी
धडपडूच नये ते आपलेसं करण्यासाठी .

माझं प्रेम आहे..........

Share

माझं प्रेम आहे..........

अंगणातल्या झाडावर
झाडांच्या फूलांवर
फूलांच्या गंधावर
माझं प्रेम आहे

काळ्याकुट्ट ढगांवर
पावसाच्या पाण्यावर
पाण्याच्या थेंबावर
माझं प्रेम आहे

मळक्या पायवाटेवर
समुद्राच्या लाटेवर
शेतातल्या मोटेवर
माझं प्रेम आहे

मणसातल्या देवावर
देवातल्या माणसावर
साऱ्या देवमाणसांवर
माझं प्रेम आहे

जगातल्या साऱ्यांवर
साऱ्यांच्या जगावर
माझं प्रेम आहे
कारण.....
माझं माझ्या आयुश्यावर प्रेम आहे.

मी सुखीच राहिलो

Share

मी होतो भिकारी अन् भीकारीच राहीलो
भरभरुन देउन सारे ,भरलेलाच राहीलो

जो तो मजला सांगित दुःखे ,भावनांशी खेळून गेला
मज ऐकण्या कुणी न उरले ,मी सुखीच राहिलो

कधि इथे अन् कधी तीथे,सारे मजला शोधीत होते
सापडुन मग साऱ्यानांही ,हरवलेलाच राहीलो

मी नव्हतो कुणाचा ,कूणीही माझे नव्हते कधी
आप्त स्वकीयांच्या घोळक्यात,मी परकाच राहीलो

झाडावरच्या पक्ष्यांनाही, त्यांनी दगड मारले
ते हात जाहले, अन् मी दगड जाहलो.

बरसावं तर .............

Share

बरसावं तर श्रावणासारखं
अगदी हळूवार
बरसतानाही ढगाआडून
धरावी मायेची उबार

बरसता बरसता अचानक
कधी बसावे लपून
ढगाआडून डोकवावं बनून
सोनसळी उन.

मोग-याजवळ रहावं साचून
छानसं तळं बनून
झूळझुळ करीत जावे कधी
झ-यासंगे वाहून .

बरसावं तर अगदी असंच
जावी स्रूष्टी मोहरून
बरसण्यानेही आपुल्या जावे
सा-यांचे चित्त सुखावून .

कधीतरी जावे मग
नकळत निघून
गेल्यानंतरही ह्रदयात कुणाच्या
असावे हिरवळ बनून .

आठवणींचे पुस्तक

Share

कधी अचानक वा-राची झुळूक येते
मनाचा तळ ढवळून काढते
खोलवर कुठेतेरी दडलेल्या आठवणींना
अलगद वर आणून ठेवते .

आणि मग आठवणींत रमतं मन
पिंजलेल्या कापसाच्या पुंजक्या सारखे
तरंगु लागते हेलकावे खात
भुतकाळाच्या वा-रावर.

प्रत्येक आठवणीपाशी क्षणभर थांबत
कधी नकळत पापणी ओली करत
कधी ओठांवर हास्य फूलवत
आठवणींचे चित्र रंगवते डोळ्यांवर .


मग कधीतरी मन अलगद था-यावर येते
नजरे समोर पुस्तकाचे पान फडफडत असते
अन तरीही हे वेडे मन ..........
रेंगाळत असते आठवणींच्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर .

आई........

Share

एक वठलेला व्रुक्ष उभा
देत आधार वेलाला त्या
नाही शक्ती तरिही कसाबसा
तग त्याने धरलेला.
तोच शक्ती वेलाची त्या
तोच त्याची भक्ती
तोच त्याची प्रेरणा अन्
तोच त्याचे अस्तित्वही.
कसली ही वेडी माया ?
खरेच मजला ठाउक नाही
आहे ठाउक एकच मजला
म्हणतो मी त्यास आई.

भारलेले स्तब्ध सारे..........

Share

भारलेले स्तब्ध सारे
गोठलेले चन्द्र तारे
निश्चल ही धरा आणिक
थांबलेले ऊधाण वारे

साचलेले काही नारे
रेंगाळलेले काही पुकारे
एक अनामिक करकर करती
उघडी सताड सारी दारे.

कधी तरी उठतात पहारे
भानावर येते सारे
एक बदल जाणवतो मात्र
भासतात हे वारे खारे.

'ती'ची खंत

Share

रस्त्याच्या कडेला गिर्हाइकाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तीलाही
होतं कधी काळी माणसाचं मन
जे गाडलं गेलं होतं
कित्येक वासनांधांच्या वासनेच्या ढीगाखाली

रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या कित्येक
तथाकथीत नैतिकांच्या तुच्छ नजरा
पुन्हा पुन्हा जाळत होत्या
तिचं ते गडलं गेलेलं माणसाचं मन


कदाचीत त्यानां माहीतच नसावं
तिनेही कधी पाहिला होता स्वप्नात राजकुमार
अन् मनोमन ठरवुनही टाकलं होतं त्याच्याशी एकनिष्ट रहान्याचं
आपलं सर्वस्व त्याला वाहात


परीस्थीतीने हतबल झालेल्या तिला
खंत नव्हती स्वप्न भंगन्याची
पण खंत होती
या जाणाऱ्या येणाऱ्या कित्येकांना
आई बहीणी आपल्यामुळे सुरक्षीत असल्याची जाणीव नसण्याची

काँलेजची ती जुनी वही.........

Share

काँलेजची ती जुनी वही
कधी धरावी घटट् ह्रदयाशी
घेत मग तो जुनाट सुगंध
खेळत बसावे आठवणींशी.

प्रत्येक पानाशी क्षणभर थांबावं
त्याच्याशी निगडीत सारं आठवावं
अन् आपला तो बावळेपणा.........
नकळत स्वःताशीच हसावं

एखाद्या पानावरचं सरांच व्यंगचित्र
एखाद्या पानावरची शेरो शायरी
एखाद्या पानवरची ग्राफ़िटी
अन् एखाद्या पानाची तिला पाठवलेली चिठठी.

एखाद्या पानवरचा मनापासुन केलेल आभ्यास
एखाद्या पानावरचे क्षण काही उदास
एखाद्या पानाच मारलेला बाण
आणि एखाद्या पानावरची कविता छान

क्षणभर् त्या आठवणीत जगावं
जुनं सारं आठवुन पहावं
टीपत पापण्यातले पाणी मग
वर्तमानात हलकेच परतावे .

अर्थ.

Share

असण्या अन् नसण्यामध्ये
होती कुठेतरी खोलवर
असूनही नसण्याची एक दरी

जिथे होतो मी उभा
तू निघुन गेल्यानंतर
कानात प्राण साठवुन.

पण शेवटपर्यंत आलीच नाही
ती अश्वासक हाक
ज्यामुळे होता अर्थ माझ्या असण्याला.

देन...

Share

झिंगलेल्या रातीकडुन
झिंगलेपणाचं देन घेउन
पहडुन रहावं शांतपणानं

घेउ नये मुळी अंधारचा ठाव
अन् करुही नये प्रकाशची हाव

अनुभवत कैफ़्
असुनही नसण्यातला
विसरुन जावं देहभान
पुसत अस्तित्वाच्या खुणा.

सावट ........

Share

क्षणाक्षणाला शोधत असते
कणाकणाने जळत असते
इथल्या असल्या जगण्यावरती
मरणाचे सावट असते.

हसणार्या दारावरती
तिरडीची सावली घुमते
चमकणार्‍या डोळ्यांमागे
आसवांचे दालन जगते

कुणी भडभडून जळताना
कुणा जगण्याचे कारण मिळते
इथल्या असल्या जगण्यावरती
मरणाचे सावट असते.

आईसारखे......

Share

एका हाताने पुसत डोळे
दुस-या हाताने घालत गुद्दा
शिकवायचं चालायला वाटेवर.

कधीमधी रेंगाळला जर रस्त्यामध्ये
एक दोन देत धपाटे
आणित पुन्हा भानावर

आईसारखे लपवीत पाणी डोळ्यामधले
मायेने फिरवावा हात
'आयुष्याच्या' पाठीवर.

वांझ.........

Share

वांझपणाची घ्रुणा असलेल्य़ा
या समाजमनावर मात्र
नेहमीच उठते
वांझ शब्दांची
वांझ संतापाची
वांझ अश्वासनांची
एक् लाट
अन् विरतेही कुटल्या कुठे
पण कोडगेपणाची रेती
कणभरही सरकत नही

दोन कविता.

Share

आयुष्याच्या उजाड भिंतीवर
लिहलेल्या दोन कविता
जाता जाता सहजच
वाचाव्या कुणीतरी
अन् नकळत उमलाव्या
ओठांच्या पाकळ्या दाद देण्यासाठी
नाहीतर मग
चालता चालता मारुन जावं
एक अश्वासक थाप पाठीवर
जमलंच नाही तेही तर
करित कौतुकमिश्रीत स्मितहास्य
जावं पुढे निघुन
अन् आलेच कधी आयुष्यात
उजाड करणारे काही प्रसंग
तर आठवाव्या माझ्या दोन कविता
आणि गुणगुणत सहजच त्या
लिहाव्या आपणही आपल्या आयुश्याच्या
उजाड भिंतीवर दोन कविता
मागुन येणा-यांसाठी .

द्वंद्व....

Share

घरातुन पडताना बाहेर
मागे मी ओढला जातो
पप्पा पप्पा करत अलगद
येउन मला बिलगतो.

गोड बोबडे बोल ऐकुनी
नकळत मी गहीवरतो
उंब-यावरती दोन क्षण
अभावितपणे घुटमळतो.

कसेबसे समजावित त्याला
ओठांवरती हसू फूलवीतो
ह्र्दयावरती ठेवून दगड
पोटासाठी बाहेर पडतो.


पोट आणि ह्रदयाचे हे
द्वंद्व असे नेहमी घडते
द्वंद्वात मात्र नेहमीच या
का कसे पण पोटच जिंकते.

अर्घ्य??

Share

मदिरेप्रमाणे चढत जाते रात्र
अन् रातकिडयाची किर्रकिर्र
हळुहळू निवू लगतात गावं
विझवली जातात कंदिलं
अशाचवेळी रंगु लागते मैफ़ल
कोठ्यावर दूर कोठेतरी
कुणीतरी गात असते आर्त स्वरात
जाणवते त्या स्वरात एक मादकता
पण का कोण जाणे तितकीच करूणता
घुंगराच्या नादासोबत विरत जाते रात्र
चढु लागतो उषेचा कैफ़ पुर्व क्षितीजावर
हळुहळू येते शेवटाकडे मैफ़ल
अन् नकळत ओघळतात दोन अश्रु गालावर
हि आसवे त्या संपलेल्या मैफ़लिला
श्रद्धांजली म्हणुन की
कधीकाळी पहीलेल्या अमूर्त स्वप्नांना
अर्घ्य म्हणुन?
काहीही असले तरी
रोजच होत राहतात मैफ़ली
अन् रोजच ओघळतात दोन मूक अश्रु.

.....तरीही पेटून उठलो.

Share

भडकलो मी अगदी अचानक
रानातल्या वणव्यावानी
घडेल असे कधी काही
नव्हते माझ्या ध्यानीमनी.

नेहमीचा मी खरा की
आजचे हे रूप् खरे?
धुंडाळले अंतर तरीही
प्रश्न अनुत्तरीत सारे

शांत निर्मळ झऱ्याचा या
मार्ग असा का बदलावा
अमावस्येच्या आकाशात
चंद्र अचानक का उगवावा ?

खरेच मजला समजत नाही
का हे असे घडले काही
उजाड उनाड माळरानावर
कशी फूलली ही वनराई ?

अनपेक्षीत सारे घडून गेले
अचानक मी बदललो
स्वाभिमान उरी कधीच नव्हता
तरीही पेटून उठलो.

हुंदका

Share

कधीकाळी घुसमटलेला हुंदका
आता टाहो फोडतो
कुजबुजतो काहीबाही
ओरडतो काहीवेळ
कधीतरी हळूहळु
होतो आपसुकच शांत
.
.
.
.
कदाचीत त्याला
न्याय मिळन्याची
धूसर आशाही नसावी.

क्षितीजाच्या रेषेवरती ........

Share

क्षितीजाच्या रेषेवरती
मन उगाच फिरते
आर्त उदास विराणी
ओठांवर का येते .

कातर कातर क्रुष्णछाया
निळी सावळी गहराइ
कातळ काळे ओले कोरडे
आतल्या आत झिरपत जाई.

ओघळण-या रात्रीला
पुसण्याचा प्रयत्न करित
झोपेच्या आधीन होतो
अंधाराला मिठी मारत.

आई .

Share

शांत शांत मनावर
दाटता वादळ
हेलकावते मन
उठतो कल्लोळ.

नभी चांदव्याची रात
लावीते हुरहुर
ओघळे आठवांच्या सरी
माजते काहुर .

क्षितीजावर दिसे मग
तिचाच चेहरा
दाखवित दिशा
हासे नकळत जरा .

शुक्राची चांदणी.

Share

मठात लपून बसलेल्या साधुच्या
चेह-यावर पसरलेल्या चांदण्यात
चंद्र शोधताना
शिशिरातील पानगळीत सापडलेलेले
हिरवे पान तपासत राहीले
तेच जगण्याचे जुने संदर्भ .
डोक्यावर आभाळ ओढून घेण्याचा
केविलवाणा प्रयत्न करणारे
उघडेबोडके दुर्लक्षित खेडे
या सा-यांमध्ये
भिजत पडलेल्या दुःखाची
परिसीमा शोधताना
आयुष्याच्या सीमा दूर गेल्या होत्या
अगदी दूर क्षितीजाच्या पार
अन् दिसत राहीली तीच
धूसर रेषा आणि त्यावर
चमकणारी दिमाखदार
शुक्राची चांदणी.

पान

Share

एक पान वाहताना
दगडाला अडलेलं
जगण्यावरती उगाचच
थोडसं रुसलेलं

कधीतरी खूप आधी
झाडाला पाहुन हसलेलं
आठवुन जुनं सारं
नकळत थरथरलेलं .

अलगद असे............

Share

अलगद असे भरून यावे
शब्दानी मग विरून जावे
सांज कापर्या क्षितीजानेही
कातर हलवे गाणे गावे

बंध रेशमी आठवताना
बांध नकळत फुटून जावे
पाउस असा पडून जाता
मेघांनी मग निघून जावे ।

कधी कधी...

Share

कधी कधी ओळख अलगदपणे मैत्रीमध्ये बदलते,
गप्पा रंगतात, वादही होतात, नवे नाते उमलते....
गाण्याची एखादी मैफल जशी उत्तरोत्तर रंगत जाते,
तशीच ही मैत्री आयुष्याला संगीतमय करत राहते....
अशा मैत्रीला नियमांचे अन अटींचे बंध नसतात,
चेहरे दिसले नाही तरी मनं मात्र नक्की दिसतात....
आपली मैत्री अशीच आहे कायम मनात जपण्यासारखी,
चिरकाळ आनंद देणाऱ्या गोड सुरेल गाण्यासारखी!!!!

मैत्री अशीच असावी का ?

Share

मैत्री अशीच असावी का ?
आता आपण चांगले मित्र असू
नंतर कधी आपण खूप चांगले मित्र असू

कालावश झाली तर आपली मैत्री ?
तू माझ्याशी बोलणार नाहीस
अन आपले नाते संपुष्टात येईल

मला एकदाच सांगायचे आहे की
माझ्या आयुष्यात तूझे महत्व आहे
तूझ्यासाठी मी माझे आयुष्य बदलून टाकले
तू मला विसरलीस तरी
मला तुला विसरणे खूप कठीण आहे

कदाचित ह्या ओळी लिहिलेल्या
तू तुझ्या मित्रांना पाठवशील
तू माझ्याशी नाते तोडले असले तरी चालेल
माझ्या जवळपास असून सुद्धा

कधी ही कविता कधी त्यांना पाठव
ज्यांना तुझी आठवण येते
त्यांना पाठव जे तुझ्यावर प्रेम करीत होते
जरा त्यांनासुद्धा कळू दे

जेव्हा त्यांना कळेल
तुला त्यांना विसरणे नाही झाले असेल
तेव्हा तू त्यांचा आनंद अनुभवावास

तुला खूप बरे वाटेल
आपल्यापाठी आपल्या मित्रांची साथ आहे असे वाटेल
कारण तुला ही त्यांची पर्वा आहे

आयुष्यात प्रत्येकाला एका मित्राची गरज असते
कधीतरी तुला ह्याची जाणीव होईल
की तुझ्याकडे असे मित्र आहेत
जे तुझ्यासाठी खूप काही करू शकतात

तूला ही कविता वाचताना बरे वाटेल
कदाचित माझी आठवण येईल
पण हे तू नेहमीच लक्षात ठेव

मित्रच...

Share

मित्रच मित्राची थट्टा करणार
मित्रच मित्राची मस्करी करणार
थट्टा-मस्करीशिवाय मैत्रीत अर्थच नाही उरणार

मित्रच मित्राला सावरणार
मित्रच मित्राला दिलासा देणार
चुकीच्या वाटेने जाताना मित्रच मित्राला अडवणार

सुख-दु:खात भागीदार होणार
यशापयशाचा साक्षीदार होणार
अपयशाने खचुन जाताच मित्रच मित्राला आधार देणार

मित्रच मित्रावर रागावणार
मित्रच मित्राची विनवणी करणार
कितीही राग आला तरी मित्रच मित्राशी बोलायला जाणार

संकटात मित्राची आठवण येणार
आनंदात मित्राची उणिव भासणार
ख-याखु-या जिवलग मैत्रीत क्षणाक्षणाला वाढच होणार

अबोल राहीलो आपण असे
तर मैत्रीत कशी वाढ होणार ?
विचार करुन सांग थोडा
तु माझ्याशी कधी बोलणार ?

मैत्री

Share

नातं मैत्रीचं...

Share

भेसुरता?

Share

मनाच्या नाजुक अंगावर
थयथय नाचून गेलेल्या
काळच्या जखमा आजही
अगदी तशाच ओल्या
उठते आजही एखादी
जीवघेणी कळ
तिच्यावर पडलेल्या एखाद्या
खारट खारट शब्दाने
अधुनमधुन उठनार्या या वेदनेवर
कणभरही समजुतींची हळद पडू नये
हा योगायोग की
अशाच वेदनांनी पछाड़लेल्या
समाज मनाची भेसुरता?

आपली मैत्री...

Share

माझ्या सगळ्या मित्रांना... त्यांच्या मैत्रीला सलाम!!!

आयुष्याच्या वेलावर फुललेलं फुल
जसं एक खेळकर हसणारे मुल
हिवाळ्यातल्या सकाळचे टपोरे दवबिंदु
नाही त्यात किंतु परंतु
संध्याकाळी आकाशी रंगाची उधळण
भिरभिरत्या मनाला मैत्रीचे कुंपण
झरझर पावसाची आहे सर
झुळझुळणारा झ-याचा हा निर्झर
निष्पाप अशा या मैत्रीची चादर
सतत राहु दे माझ्या अंगावर
उबेत या जीवन सफल माझे
रक्ताचे नाही ह्रुदयाचे नाते तुझे माझे
साजरा करायला मैत्रीचा दिवस हवा कशाला
मैत्रीच साजरी करतो आपण प्रत्येक क्षणाला

ज्ञानेश्वर

Share

सुख कुणाचे दुःख कुणाचे
राग कुणाचा लोभ कुणाचा
हे तर सारे आपुले माझे
मी कुणाचा ?मी कुणाचा?

मागतो मी पसायदान जे
माझ्यासाठी कधीच नव्हते
हे तर सारे तुमचे तुम्हा
मी कुणाचा? मी कुणाचा ?

अभंग अजुनही गाते मुक्ता
दार कशास उघडावे मी ?
आसवास हे पाणी म्हणती
मी कुणाचा ?मी कुणाचा?

मी शोधात सुखाच्या आहे?

Share

दुखास फूटते वाचा
मी एकटा असतो जेव्हा
मग दुःख बोलते फक्त
माझी अडते जीव्हा

दुखास कोणते शब्द
दुखास कोणती भाषा
दुःख जाणते फक्त
गालांवरच्या रेषा

तरीही पुन्हा का मी
भाळतो एकांतास ?
मी शोधात सुखाच्या आहे
हा बहाना केवळ ख़ास

डोळे कशासाठी?

Share

डोळे कशासाठी? कशासाठी?
तुला साठवून मिटून घेण्यासाठी ॥धृ.॥

आला भरुन पाऊस, नको एकटा जाऊस
आली सरी कशासाठी, तुला बिलगून भिजून जाण्यासाठी ॥१॥

नाव तुझे मनातले, चांदणेच रानातले
शब्द कशासाठी, तुला आठवून भरुन येण्यासाठी ॥२॥

वेल मोहरुन आली, फुले अंगभर झाली
वारा कशासाठी, गंध वनातून पाखरु होण्यासाठी ॥३॥

असा तुझा भरवसा, चांदण्यांचा कवडसा
ओठ कशासाठी, थोडे थरारुन जुळून जाण्यासाठी ॥४॥

प्रयोग प्रेमाचा...

Share

लवकर दे गं उत्तर...

Share

कॊलेजचे गेट। झाली तेथे भेट।
घुसलीस मनात थेट। देशील का मला डेट ?

मी रोगी तु दवा। तु फुगा मी हवा।
तु चुल मी तवा। सांग तुला मी हवा ?

तु तपकिर मी चिमुट। तु साडी मी सुट।
मी मोजा तु बुट। जमेल मेतकुट ?

तु धाप मी छाती। मी शनी तु साडेसाती।
मी भुत तु भानामती। जुळतील का नाती ?

मी पेट्रोल तु गाडी। मी गवत तु काडी।
मी विचार तु नाडी। जमेल का जोडी ?

मी वरवंटा तु पाटा। तु संगणक मी डाटा।
तु टेल्को मी टाटा। होतील एक वाटा ?

तु वाजंत्री मी ताशा। तु मिठाई मी माशा।
तु बोली मी भाषा। ठेवु का मी आशा ?

मी पाणी तु घागर। मी चहा तु साखर।
जोडा जमेल का सत्वर ? लवकर दे गं उत्तर...

सॉरी, थोडक्यासाठी गाडी चुकली...

Share

कॉलेजला जाताना समोरच तिला बघितली
मी दिसताच चालता चालता जरा थांबली
माझ्याकडे बघुन गोड हसली
ओठांची मोहोळ खुलली..
म्हटलं पोरगी बहुतेक पटली
पण..हत तिच्या मारी
मागे वळुन बघितल तर तिची मैत्रीण दिसली..

त्यादिवशी ती वर्गात आली
येवुन नेमकी माझ्याच शेजारी बसली
माझ्या अंगावर कशी शहारी पसरली
बोलाण्यासाठी जीभ सरसावली..
पण.. हत तिच्या मारी
काही बोलणार इतक्यातच म्हणाली
"प्लीज, पुढे बसशील ती पहा माझी मैत्रिण आली."

एकदा कॉलेजमधे परीक्षा सुरु झाली.
गाडी घेवुन जाताना रस्त्यातच मला भेटली
पाठुनच तिनं एक हाक मारली
उशिर झालेला म्हणुन लिफ्ट मागितली.
"थांब गाडी लावुन येतो!" म्हणुन गेट पाशी सोडली..
पण.. हत तिच्या मारी
गाडी लावे पर्यंत हीच टाटा करुन सटकली

शेवटी मनाची तयारी केली
शेवटचा पेपर संपल्यावर जाताना तिला गाठली
हळुच खिशातली चिठ्ठी सरकवली
गालावरची खळी पाहीली..
वाटल बहुतेक देवी पावली
पण..हत तिच्या मारी
म्हणाली "सॉरी, थोडक्यासाठी गाडी चुकली.."

प्रेमासाठी...

Share

मैफ़ील चांदण्याची...

Share

आज या मैफ़ीलीत
काय मजा आली..
त्या एकटया चंद्राला पाहुन
चांदणी गालात हसुनी म्हणाली...

आली आहे मी इथे
तो साज चंदेरी घालुनी
आता डोळे भरुनी
तु घे मला पाहुनी..

मग घेतली त्या वेड्या चंद्राने
नजर आपली रोखुनी..
पुटपुटला तो ओठातल्या ओठात
"नाही पाहीले असे अप्रतिम सौंदर्य अजुनी !"

घायाळ झाली ती
अन लाजली ते ऎकुनी..
पुसले तीने त्याला आवर्जुन
कुठे होतास तु माझी मैफ़ील सोडुनी...

मग केला आवाज तीने
त्या छुमछुम पैणजनाचा..
इकडे वाढला होता
ठोका चंद्राच्या काळजाचा..

केली तीने सुरु
उधळण त्या सप्तसुरांची..
जाहली प्रेमळ दशा
त्या चंद्रच्या हळव्या मनाची

थिरकत होते पाय तीचे
घुमत होते नाद स्वरांचे
मग मत्रंमुग्ध जाहले होते
कान त्या चंद्राचे..

आता पेटला होते सार आसमंत
झाल्या सज्ज नर्तिका स्वर्गाच्या
न्हाउनी रंगात प्रकाश्याच्या
उजळला होते रंग मैफ़ीलीचा.

सारे विलीन होत होते..
तारेहि दिशाहीन होत होते..
आता जणु त्या मैफ़िलीने
सारयांना भाव वश केले होते..

मग मैफिलिचा रंग
मावळतीकडे अचानक वळाला..
होतच असे सारयांच्या डॊळ्यातुनी
थेंब अश्रुंचा गालावरुनी ओघळला

कारण असे काय घडले होते
त्या भावुक मैफिलित.
चक्क चंद्रच हरवला होते
त्या चांदणीच्या कुशीत

म्हणुनच कदाचीत
आजही जातो चंद्र त्या मैफिलिला
कारण नजरेस येत नाही
तो अमावसेच्या रातीला

एवढे असुनही
पौर्णिमेच्या रातीला तो एकटा असतो
चांदण्याची मैफिल मात्र
कायमचाच तर खेळ असतो.....

प्रेमाच्या वेलीवर...

Share

प्रेमाच्या वेलीवर सर्वच फुले फुलतात असे नाही
जीव जेवढ़ा आपण लावावा तेवढ़े सर्व लावतात असे नाही
प्रेमा सारखे बंधन ज्याला सीमा नसतात हे जाणतो
पण प्रेमासारख्या बंधनाला सर्वच जाणतात असे नाही
कुणीतरी म्ह्टलय प्रेमामध्ये हातावरील रेशांनाही आपल्या वाटा बदलाव्या लागतात्
पण त्या वाटा बद्लेपर्यंत सर्वच थांबतात असे नाही...

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top