|
रविवार, २३ मे, २०१०
आयुष्य हे असंच असतं...???
|
२:१२:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
अघळ पघळ
२:०८:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
Paus...
त्याला पाऊस आवडत नाही,तिला पाऊस आवडतो. ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो. मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही, असलं तुझ गणित खरच मला कळत नाही. पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ, पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ. पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी. पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच, पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात. दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते पावसासकट आवडावी ती म्हणून ती ही झगडते. रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात. त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात |
२:०२:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem , Paus , rain
0
Read more>>
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem , Paus , rain
0
Read more>>
"माझी आई"
१२:३३:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: आई , कविता , मराठी कविता , Aai , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
लेबल: आई , कविता , मराठी कविता , Aai , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
गुरुवार, २० मे, २०१०
प्रेम...
९:१२:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
पिंकी सायकॉलॉजिस्ट झाली!
पिंकी सायकॉलॉजिस्ट झाली!एक दिवस शाळेच्या दारापुढे एक चकचकीत गाडी येऊन उभी राहिली. त्यातून उंची कपडे घातलेले आई-वडील आणि एक मुलगी उतरले व त्यांनी शाळेच्या द्वारात प्रवेश घेतला. लगेच लक्षात आलं की नवीन प्रवेश आहे. तांत्रिक गोष्टींची पूर्तता झाली आणि पिंकीचा शाळेत प्रवेश झाला. पिंकी म्हणजे नुसतं वारं, एका वर्गात एका ठिकाणी बसणार नाही. विद्यार्थ्यांमध्ये मिसळणार नाही. थोडीशी रुळल्यावर तिची बुद्ध्यांक तपासणी केली. बुद्ध्यांक बॉर्डर लाईन मतिमंदत्व दाखवत होत्या. वय ९ वर्षं असल्याने काही गोष्टी स्पष्ट कळत नव्हत्या, त्यामुळे ही मतिमंद नाही तर बदमाश असं मत बहुतांश लोक करायचे आणि तिच्यावर चिडचिड करायचे. पालक हा बुद्ध्यांक मानायला तयारच नव्हते. सगळ्यांच्या, स्त्री असो वा पुरुष, कोणाच्याही जवळ जाणार, अंगाला हात लावणार. पुरुषांच्या खिशात हात घालून पाहिजे ते काढून घेणार, सगळं वर्णन वातावरणाला न शोभणारं, विसंगत. इतक्या मोठ्या प्रमाणात वर्तनसमस्या, की सुरुवात कुठून करावी हेच कळत नव्हतं. हिच्या मनाविरुद्ध केलं तर ही काहीही उपद्रव करणार हे लक्षात घेतलं आणि तिला वैयक्तिक वर्तन, परिवर्तनाचं प्रशिक्षण द्यायचं ठरवलं. विविध वर्तनसमस्यांची तंत्रं आणिअ पालकांशी समुपदेशन यांचा मेळ घालण्याचा आटापिटा सुरू होता, हळूहळू कौटुंबिक समस्या समोर येत होत्या. आईवडिलांमध्ये आईवडिलांमध्ये या पाल्यामुळे मतभेद होते. आई एका पारंपारिक कुटुंबातील आदर्श सून होऊ की या मुलीच्या वागण्याकडे लक्ष देऊ या मन:स्थितीत अडकलेली, तर वडील अतीशय महत्वाकांक्षी. व्यापारात तरबेज आणि प्रचंड यश मिळवत चाललेले. त्यात एकुलत्या एका मुलीवर प्रचंड प्रेम, भरपूर पैसा खर्च करणारे. या सगळ्याचा मेळ बसवायचे काम हातात घेतले. सगळ्यात आधी पिंकी. पिंकीला वर्गात बसायला आवडत नाही हे लक्षात आल्यावर सरळ, "तू हुशार आहेस ना? मग आजपासून तू माझी मदतनीस!" म्हणून हाताशी घेतले. सहज, अलगद, तिच्या कळत-नकळत समुपदेशन करणे आणि काम देणे- जसे 'कपाटातून टेस्ट काढ'. कशी-कोणत्या प्रकारची हे तिच्या हळूहळू लक्षात येऊ लागले. कोणत्या टेस्टला कोणते नाव आहे, टेस्टिंग चालू असताना मुलांना कोणत्या सूचना द्यायच्या, कॅल्क्युलेटर कसे वापरायचे, स्कोअर कसा करायचा हे ती शिकत गेली. रिकामपणामुळे, अति लाडामुळे निर्माण झालेल्या वर्तनसमस्या नाहिशा झाल्या. तिच्या वर्तनातल्या बदलाने आईवडलांमध्ये असणारे मतभेदही कमी झाले आणि मुख्य म्हणजे पिंकीला शाळेत यावेसे वाटू लागले. शिक्षक दिनाच्या दिवशी पिंकीने सायकॉलॉजिस्ट बनून पालकांचे I.Q सुद्धा काढले आणि हळूहळू प्रवाहाचा एक भाग बनली. तिला पैशाचे अत्यंत आकर्षण होते. पण पैशाचा व्यवहार तिला जमत नव्ह्ता. तो तिला शिकवला आणि ती आवडीने शिकली. |
९:१०:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
ओझरती जखम जुनी
ओझरती जखम जुनी ओझरती जखम जुनी ओझरती वेदना हलकासा स्पर्श तुझा पाझर माझ्या मना . ओसरत्या श्रावणात इंद्रधनू पुसटसे धूसर अस्तित्त्व तुझे असले नसलेसे . रसरसता देस राग निषाद सरसरता. ऋषभ मनी रुतलेला अवेळीच सलता . व्रण आहे नाहीसा ओसरती वेदना सुकलेला काहीसा पाझर माझ्या मना . ओझरती जखम जुनी आस जुन्या मलमाची हलकासा स्पर्श जुना फ़ुंकर गत जन्माची |
९:०७:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
जय महाराष्ट्र! Majha Maharashtra
महाराष्ट्र हे भारतातलं असं एकमेव राज्य आह इथल्या संतांचा मार्ग भक्तीचा, योद्ध्यांचा मार्ग शक्तीचा, या महाराष्ट्राच्या भूमीतच राम वनवासात राहिला या इथे पुंडलिकासाठी परब्रह्मा अवतरले इथे ज्ञानोबांनी त्यांचा 'मराठाची बोलु कौतुके' बोलिला इथे बुरसट परंपरावर नाथांच्या भारूडांचे आसूड फुटले इथे रामदासांनी भक्तीला शक्तीची जोड दिली या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले स्वराज्य या भूमीचा भगवा झेंडा अटकेपार फडकत राहिला इथे गवतालाही भाले फुटले आणि छत्र नाही, सिंहासन नाही, राजा नाही, शासन नाही, ते अठ्ठावीस वर्षं आपल्याहून हजारोपट दुश्मनांशी इथल्या लेण्यातल्या दगडांवर कलेचे काव्य उमटले इथले कर्मवीर, धर्मवीर, स्वातंत्र्यवीर सदैव लोकमान्यच झाले महाराष्ट्राने देशाला दिशा दिली, महाराष्ट्राने नव्या पाऊलवाटा घडवल्या, महाराष्ट्र देशाच्या गळ्याला ताईत बनला पण महाराष्ट्राला त्याची खंत नाही. कारण महाराष्ट्र हा भारत नावाच्या राष्ट्रपुरुषाचा, आपल्या कर्तृत्वावर, कौशल्यावर, कलेवर प्रेम आहे. पण या सगळ्यापेक्षा आणि सगळ्याहून अधिक म्हणूनच या महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या जय हिंद, जय महाराष्ट्र! |
९:०४:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
दोन थेंब..........
|
८:४९:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
आई, असं का ग केलंस?
| आई, असं का ग केलंस? ( मनाला स्पर्शून गेलेले आईला लिहिलेले एक पत्र.. ) उरिया भाषेतील लेखक...श्रीकांत पारिजा यांनी एकदा एक हत्या झालेला स्त्री गर्भ पाहिला. त्या क्षणी त्यांचा पोटात ढवळून आलं. काय करावं ते सुचेना. त्यानंतरचे कित्येक दिवस त्यांच्या मनातून ते दृश्य आणि त्या अकाली फेकून दिलेल्या चिमुकलीविषयीचे विचार पुसले जात नव्हते. मग त्यांनी लेखणी उचलली आणि त्या आईलाच एक पत्र लिहिलं......उरिया भाषेत प्रसिद्ध झालेल्या त्या पत्राचा अनुवाद केला आहे कटक येथे राहणाऱ्या "राधा जोगळेकर" यांनी. ( सकाळ च्या सप्तरंग पुरवणीतून आज हे पत्र इथे पोस्ट करतांना फक्त हीच विनंती आहे कि हे पत्र कॉपी करून शक्य तितक्या लोकांपर्यंत email करून पोचवा.... हे वाचून एक जोडप्याचे जरी विचार बदलले तरी "सार्थक" झाले असे मी समजेन.....हे पत्र पोस्ट करायची हि जागा आहे का नाही मला माहित नाही...चुकल्यास क्षमा असावी. आणि पुन्हा एकदा हे पत्र शक्य तितक्या लोकांपर्यंत पोचवा हि विनंती. ) आई, असं का ग केलंस? का ग, तुला माझी थोडीशीही आठवण येत नाही का? तू असं का केलंस? मी तुला पाहण्यासाठी किती आशा लावून बसले होते; पण तू मला मारूनच टाकलस. तुला माहित आहे का आई, मी फक्त तुलाच ओळखत होते. आणखी कोणाचा स्पर्शही नव्हता झाला मला. माझ्या आयुष्यातल्या त्या चार महिन्यात मी जे काही अनुभवलं, ते फक्त तुझ्याचमुळे ग. आई तुला आठवत का? माझा भाऊ राजा जेव्हा रडायचा, तेव्हा तू त्याला समजवायचीस, कि रडू नकोस. आता तुला थोड्याच दिवसात तुझ्याशी खेळायला आणखी एक भाऊ येईल. तेव्हा मी तुझ्या पोटात खळखळून हसायचे आणि म्हणायचे, 'आई भाऊ नाही. राजाभाईची छोटी बहिण येणार आहे. तू राजाभाईला कुशीत घेऊन झोपी जायचीस; पण मला मात्र रात्रभर झोप यायची नाही. भाईबरोबर दंगामस्ती करण्याची, खेळण्याची मला खूप इच्छा व्हायची. मग पोटात असूनही मी त्याला हळूच पायाने ढकलून द्यायचे. तोही झोपेतून जागा झाल्यावर तुझ्या पोटाला हाताने ढकलत असे. मला लागायचं. तरीही खूप आनंद व्हायचा. का माहिती आहे? कारण बहिण-भावातल्या खेळाची मजा वेगळीच असते! कधीतरी भाईला बर नसायचं, तेव्हा तू म्हणायचीस, 'हे माँ, माझ्या मुलांना सुखी ठेव. ते ऐकून माझ्या लहान लहान डोळ्यात पाणी दाटून येई. वाटे, माझी आई किती चांगली आहे. मुलांवर तिची किती माया आहे. तुझ्यामुळे मला समजल, कि आणखी एक मोठी आई, "माँ" आहे, जी माझ्या आईला शक्ती देते. सामर्थ्य देते. माझे हे चार महिने फक्त तुझा विचार करण्यात गेले. मनात सतत एकाच विचार असायचा, तुला बघण्याचा! एकदा तू राजाभाईला म्हणत होतीस. माझ्या बाळा तुझ्यासाठी दहा महिने मी त्रास सोसल्यावर तुझा जन्म झाला. मोठा झालास, की आईचं नाव उज्वल कर, वगैरे वगैरे..... त्या दिवशी मला रडूच आलं. तू राजाभाईचे लाड करत होतीस म्हणून नाही, तर माझ्या आईला बघण्यासाठी मला अजून सहा महिने वाट पहावी लागेल म्हणून..... मग एक दिवशी तू आणि ते पप्पा नावाचे कोणीतरी डॉक्टरांकडे जाण्यासाठी बाहेर पडलात. रस्त्यांमध्ये असताना मला खूप जोरात धक्का बसला. आतल्या आत बराच मार बसला. मग तू पप्पांना गाडी हळू हळू चालवायला सांगितलस. बाळाला त्रास होईल म्हणालीस. तुला माझी किती काळजी वाटते, हे पाहून मला किती बर वाटल होत. दवाखान्यात तू झोपलीस, तेव्हा मी तुझ्या पोटात खेळत होते. तुझ्या पोटावर काहीतरी लावून डॉक्टर जेव्हा तपासात होते, तेव्हा मला खोडसाळपण करण्याची खूप इच्छा झाली होती. मी पोटातल्या पोटात पटापट फिरत राहिले. म्हणून डॉक्टर म्हणाले, "मुल खूप हालचाल करत आहे, त्यामुळे काही समजत नाही." थोड्या वेळाने ते म्हणाले, की मुलगी आहे. त्यानंतर एकदम शांतता पसरली. मग तो पप्पा नावाचा माणूस म्हणाला,........ "सर, अबोर्शन करा..." डॉक्टर म्हणाले "उद्या सकाळी या." मी पोटामध्ये खिदळत होते. दुसर्या दिवशी सकाळी देवाची पूजा करताना आई तू म्हणालीस, हे माँ, मला नीटपणे जाऊन सुखरूप घरी येऊ दे." मला वाटल, की तुझी तब्येत बिघडली असावी, मी पण पाणावलेल्या डोळ्यांनी त्या मोठ्या आईला म्हणाले, की माझ्या आईला लवकर बर कर.... नंतर.....नंतरच तुला माहीतच आहे.... आई, का ग मारलस मला? आई, तुला बघायचं होत ग डोळेभरून. मी तुला पाहिल्यानंतर मला मारून टाकलं असतस तरी चालल असत मला. आई मला पुन्हा एकदा तुझ्या गर्भात जागा दे. मला हे जग बघायचं आहे. मलाही शाळेत जायचं आहे. राजाभाईसारखा " हेप्पी बर्थ डे" करायचा आहे. हसत खिदळत तुझ्यामागे धावायचं आहे. आई, फक्त एकदाच मला कुशीत घेऊन माझे लाड कर ना ग....आणि फक्त एकदाच माझ्या कानाशी म्हण.... 'झोप ग माझ्या लाडक्या बाळा, तुझी आई आहे ना जवळ...मग कशाला घाबरतेस....' ............ ....आई एकदाच...........फक्त एकदाच......... |
८:४२:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
आदर्श
| आदर्श आदर्शांपाठी धावणाऱ्यांनो ! द्या गुलाबाच्या काट्याकडे लक्ष अपमान नम्रतेने झेलून असतो तो सौंदर्याच्या संरक्षणात दक्ष झरे जोरात वाहतात आणि सुकतात शांत समुद्र असतात सखोल मिरवायला काय सगळेच मिरवतात पण खरा आदर्श असतो अबोल धैर्य, शौर्य, सात्वना आणि यश असनं मिळालेलं सगळंच खोटं शेवटी त्याच्या घरी सगळेच सारखे नाही कोणी लहान, नाही मोठं मला पराजयाची भिती नका दाखवू माझं जिवनच आहे एक संघर्ष डोळे उघडून विचार करा तुम्हीच बना तुमचा आदर्श |
८:३३:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
देता का थोडेसे शब्द उसने
८:३२:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
स्वतःला बदलायच आहे? टी. क्यू. एम. वापरा!!! Change Yourself.
| *स्वतःला बदलायच आहे? टी. क्यू. एम. वापरा!!!* स्वतःला कशाला बदलायच? आपण तर 'बेस्ट' असतो!!! बाकीचे गाढव असतात. हे अगदी खरं आहे. पण 'हाय ये जमाना!' हा देश, हा समाज, हे नातेवाइक, शेजारी ; खरं सगळच बदलायला हवं आहे. कोण बदलणार? हे काम मोठया लोकांचे. म्हणुन आपल्यालाच बदलायला हवं. आणि तेही आपणच!! पण कसे बदलणार? टी. क्यू. एम. वापरुन.... टी. क्यू. एम. म्हणजे 'टोटल क्वालीटी मॅनेजमेन्ट'. जपानी विचार करण्याची पद्धत. ह्या पद्धतीमुळे जपानी क्वालीटी सगळया जगात सर्वोत्तम झाली. आपल्याकडेसुदधा बर्याच कंपन्या टी. क्यू. एम. वापरतात टी. क्यू. एम. मध्ये बर्याच गोष्टी समाविष्ट होतात. जसे ५ एसः (सेपरेट, सॉट, शाइन, सिस्टमटाइज, स्टान्डरडाइज.); टी. पी. एम.; विश्लेषण पध्दती इ. टी. क्यू. एम. वापरुन आपण आपल्यात बदल घडवू शकतो. आपण आपल्या मोरेश्वराचे उदाहरण घेउ. मोर्या रोज उशीरा ऑफीसला जायचा. बॉसच्या लक्षात आले, बॉस जाम ओरडला. आपल्या नेहमीच्या वेळेवर निघताना मोर्या कसा बसा तयार होत असे. आता नेहमीच्या वेळेच्या आधी निघायचे म्हणजे मोर्याला संकटच होते. मोर्याने विचार केला. आपल्याला नक्की कशासाठी वेळ लागतो हयाचा आढावा घेतला. जवळ जवळ रोज मोर्याला पाकीट शोधायला वेळ लागायचा. पाकीट कधी कालच्या जीन्समध्ये, बेडरुम मध्ये, हॉलमध्ये, आरशावर, कपाटामध्ये, एकदातर पाकीट ऑफीसात आणी महाशय शोधत होते घरात!! आणि शेवटच्या ५ मिनिटातली ही लढाइ मोर्या नेहमी हरायचा. मोर्याने ठरवले, ह्या पाकीटाचे काहीतरी करायला हवे. रोज वेळेवर जायचे तर ह्या पाकीटासाठी वेळ घालवणे परवडणारे नाही. खुप विचार केल्यावर मोर्याला एक युक्ती सुचली.मोर्याने पाकीटाची जागा निश्चीत करण्याचे ठरवले. पण जागा ठरवली तरी त्या जागेवर पाकीट ठेवायला हवे!! तीच तर खरी मेख होती. गंमत म्हणजे पाकीट वेळेत मिळण्यासाठी जागेवर ठेवायला हवे. मोरयाचे शिक्षक , आइ, बाबा; गोष्टी जाग्यावर ठेव हे सांगता सांगता म्हातारे झाले!! मोर्याला हे नक्की ठाउक होते की आपल्याला वस्तु जाग्यावर ठेवायला जमणार नाही. मोर्याने हया गोष्टीसाठी व्यवस्थापकीय हुशारी 'टी. क्यू. एम. विश्लेषण पध्दती'वापरण्याचा विचार केला. वेगळा विचार, वेगळे उत्तर. पाकीट खिशातुन रोज काढल्यामुळे कुठेतरी ठेवले जाते आणि वेळेवर मिळत नाही. जर आपण पाकीट खिशातुन काढलेच नाही तर कालच्या जिन्समध्येच मिळेल, शोधाशोध वाचेल आणि वेळवर निघता येइल. ही कल्पना चांगली होती. आळशी मोर्याला फारच आवडली. पण संध्याकाळी घरी आल्यावर कुणी पैसे मागितले की पाकीट खिशातुन काढले जाते आणि सवयीनुसार कुठेही ठेवले जाते. सकाळी निघताना काल संध्याकाळी पाकीट कुठे टाकले ते आठवत नाही आणि वेळ वाया जातो. संध्याकाळी जरी पैसे लागले तरी पाकीटातुन न घेता, लॉकरमधुन घ्यायचे म्हणजे पाकीट कायम कालच्या जीन्समध्ये राहिल आणि न शोधता सापडेल. मोर्याने 'टी. क्यू. एम. मधील 'का? का? ही विश्लेषण पध्दती' वापरली. मोर्याने स्वतःला विचारलेले प्रश्न आणि त्याची उत्तरं आपण पाहु मला उशीर का होतो? मी पाकीट शोधत राहतो. मी पाकीट का शोधतो? पाकीट जीन्समध्ये नसते. पाकीट जीन्समध्ये का नसते? काल संध्याकाळी पैसे देण्यासाठी काढलेले असते. ह्याचा अर्थ पाकीट काढले नाही तर जाग्यावर मिळेल. पाकीट खिशातून काढल्यामुळे ते मिळत नाही आणि उशीर होतो. पाकीट खिशातून काढणे हे मूळ कारण आणि त्याचा परिणाम म्हणजे उशीर होणे. काही मंडळी म्हणतील 'पाकीट परत जाग्यावर न ठेवल्यामुळे उशीर होतो'. अगदी बरोबर. पण माणसा माणसात फरक असतो. ज्यांना गोष्टी जाग्यावर ठेवण्याची सवय आहे.त्यांना उशीर होणारच नाही. गोष्टी जाग्यावर ठेवण्याची सवय अतिशय चांगली. पण ज्यांना गोष्टी जाग्यावर ठेवण्याची सवय नाही, त्यांचं काय? सवयही लागत नाही आणि आयुष्यभर नुसत्या शिव्याच खाव्या लागतात. आपण दुसर्याला खुप काही विचारत असतो. स्वतःला कधीच काही विचारत नाही. दुसर्याला विचारल्यामुळे आपल्याला बर्याच गोष्टी कळतात. स्वतःला विचारल्यामुळे आपल्यात बदल घडवता येतात. अशा तर्हेने मुळ कारणांचा विचार करुन, मोर्याने म्हटले तर साध्या, म्हटले तर कठीण अशा समस्येवर तोडगा काढला. आपणही जर स्वतःस "का?" असा सवाल विचारत गेलो तर, आपल्याला भेडसावणार्या समस्यांचे उत्तर शोधु शकतो. समस्या ही वैयक्तिक ,कंपनीची,तांत्रिक असो किंवा नवी अथवा जुनी असो,"का" असा सवाल विचारत गेल्यास आपल्याला उत्तर मिळते. अशा छोटया गोष्टी मोठा फरक घडवुन आणतात. आपल्याला सुद्धा असा बदल घडवायचा असल्यास आपल्या वागण्याचा आढावा घ्या. उत्तर त्यातच मिळेल. ह्या आठवडयापासुन अशाच मोर्याच्या स्वतःच्या व फॅक्टरीमधल्या काही गोष्टी बदलण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला किंवा तुमच्या कार्यालयातल्या, फॅक्टरीमधल्या काही गोष्टी बदलायच्या असतील तर आपण मोर्याची मदत घेउ, स्वतःला आणि आपल्या कंपनीला कार्यक्षम बनवु, तेही कमी वेळात, कमी त्रासात आणि कमी खर्चात!!!! |
८:३१:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
तुमचं काही...माझं काही
८:३०:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
हे “ट्विटर” म्हणजे काय हो? (Twitter)
हे "ट्विटर" म्हणजे काय हो? (Twitter)What is twitter, Maharashtra Majha, Author: Ashish Kulkarni ट्विटर? हे काय आहे? किंवा हे ट्विटर काय आहे मला समजतच नाहि. ट्विटर म्हणजे 'मायक्रो-ब्लॉगींग':
या मुळे इतर लोके आपल्या बद्दल अपडेटेड राहतातच तसेस कमीत कमी शब्दात आपण आपले म्हणने हि मांडु शकतो. जसे कि आपल्या शशी थरुर साहेबांनी आपले मत मांडलेना.. इकॉनॉमी क्लासने प्रवास करणे म्हणजे "cattle class" ने प्रवास करणे. म्हणजे 'सोशल मेसेजींग': ट्विटर म्हणजे बातमीदारः वॄत्तवाहिनी चालू करा. खाली तुम्हाला संक्षीप्त बातम्या एका ओळित फिरताना दिसतील. तश्या संक्षीप्त बातम्या म्हणजे ट्विटर. तुम्ही अत्ता काय करत आहात? या प्रश्नाचे उत्तर फक्त देण्या ऐवजी लोकं इथे आपल्या आजुबाजुच्या घडामोडि सुद्धा नोंदवतात, जसे कि या या जागेच्या इमारतीला आग लागली. इकडे भु़कंप जाणवला इत्यादी इत्यादी. ट्विटर वापरुन एकाच वेळि अनेक जणांना बातमी पोहचवता येते. मग आपल्या भागातल्या घडामोडी पोहचवणार ना आता जगाच्या कानाकोपर्यात? ट्विटर म्हणजे मार्केटिंगः मार्केटिंग जगतात ट्विटर खुपच आवडिचे माध्यम होऊ लागले आहे. आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपला संदेश पोहचण्याचा हा अगदी स्वस्त आणि नवीन पर्याय आहे. आपल्या प्रियजनांशी संपर्कात राहण्यासाठी, हॉलीवुड्-बॉलीवुड जगतातील सितारे असोत कि थेट अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा असोत यांनी वेळोवेळी ट्विटरचा सहारा घेतला आहे. ट्विटर हे वेगवेगळ्या लोकांसांठी वेगवेगळा अर्थ घेऊन वापरता येते. कुणासाठी हे कुटूंबाच्या संपर्कात राहण्याचे माध्यम आहे, व्यावसायीक लोकांसाठी हे व्यवसाय वाढवण्याचे तंत्र आहे तर लेखकांसाठी आपल्या वाचकांशी जोडणारा दुवा आहे. मग आता तरी चालु करताय ना ट्विटर वापरणे? आपल्या सचिन तेंडुलकरला आपला मित्र बनवा , येथे tichki mara http://twitter. com/sachin_ rt aani tyala follow kara. |
८:२९:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
हे आता दररोजचं झाले आहे..
हे आता दररोजचं झाले आहे.. हे आता दररोजचं झाले आहे.. वेळ तिन्हि सांजेचीसांगते माला आणिन मी तिला... सुर्य ही ऊगीच रेंगाळतो जान्याचे ताळून रोज नवीन बहाणे करतो... त्यालाही पाहायचे असते तिलाच म्हणून अस्वस्थ होऊन कधी दक्षीणेला तर कधी ऊत्तरेला येरझरया घालतो... वाराही सैरावैरा लगातो पळू ती यायच्या अगोदरच तीला इथे ठेवू का त्तिथे असे लागते होवू... सांज मला काही नं सांगता निघून जाते सुर्य आपला कुठेतरी तोंडं लपवून बसतो... वारा थोडासा रागावतो बोचरया थंडीने तीचा राग दूसर्यावर काढतो.. चंद्र मात्र असतो माझ्या साथीला रात्र जागवायला ती नक्की येईल या आस्थेला... |
८:२८:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
मंगळवार, १८ मे, २०१०
आमराईतल्या त्या साऱ्या गोष्टी
आमराईतल्या त्या साऱ्या गोष्टी अश्याच आठवतात मला... तुझं ध्यान होतं माझ्याकडे.. अन मी झुलावत होतो तो स्वप्नाचा झुला... तुझे केस वारयाने उडायचे अन् मी त्यांना हाताने अलगद सावरायचे.. मग अचानक् ओठांना एवढे धाडस् कुठुन यायचे कुणास ठाऊक कि ते थेट ओठांवर जाऊनच विसावयाचे.... मग अचानक मेघ दाटून यायचे किती भयंकर तांडव सुरू करायचे हळुच मग श्रावणसरींनी डोकावून पहायचे.. अन असच त्या मेघानां श्रावणसरींनी स्पर्श करून सुखवायचे.. तुझ्या माझ्या मिलनाचं असचं काहीसं घडायचे.. तुझ्या नाराजीच्या मेघांना माझ्या डोळ्यातल्या सरींनी कवेत घेवून कुरवाळायचे... किती अपरीचीत होते ते क्षण हरपून जायचे आपूले मन.. किती अंधारले जरी आसमंत.. तरी तुच होतीस माझ्या आशेचा किरण.. मग कातरवेळ दाटून यायची.. विरहाची वेळ समोर उभी रहायची.. उरात चलबिचल अन अस्वस्थता अन क्षितिजे सुध्दा मावळतीला सॊडून जायची... मग तुच मला सांगायची अरे माझ्या राजा... मी तुझीच आहे रे कायमची.. असा हताश नको होऊस आनंदी होऊन तयारी कर.. आपूल्या उद्याच्या प्रेमभेटीच्या घडीची.. मग ह्रिदय माझे आनंदित व्हायचे.. क्षणभरासाठी शरीर माझे.. तुझ्याच मिठीत आसरा घ्यायचे... तु वळायचीस परतीच्या वाटेला .. अन माझी पाऊले सुध्दा तिकडेच वळायची... तु मला हसत हसत निरोप द्यायचीस.. उद्या परत चोरून चोरून भेटण्याचा खाणाखुणा तुझ्या त्या नजरेने करायचीस... हे असं मिलन आपूले आजही आठवते मला.. तु अन तुझ्या आठवणींनेच |
७:५०:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .



