Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, २० सप्टेंबर, २०१२

माझं पाहिलं प्रेम होतीस तू,

Share

माझं पाहिलं प्रेम होतीस तू,

माझं एक सुंदर स्वप्नं होतीस तू,
माझ्या स्वप्नातील राजकुमारी होतीस तू ,
माझ्या प्रत्येक श्वासातला प्राण होतीस तू,
माझ्या प्रत्येक क्षणातील आठवण होतीस तू,


तुला मिळवण्यासाठी माझी सगळी स्वप्न वाया घालवली
माझं प्रेम माहित असून सुद्धा मला दगा देऊन गेलीस तू,
माझ्या प्रेमाला,स्वप्नांना आणि तुझ्या त्या आठवणींना
तुझ्या पायाखाली तुडउन दुसर्या प्रेमाच्या शोधात निघून गेलीस तू

पण,एक सांगू... तुझ्या आयुष्यातलं माझं,
अनमोल प्रेम मात्र गमाउन बसलीस तू........

बेधुंद मन
०३/०९/२०१२

एक कळी मात्र, उमलायचीच राहून गेली…….

Share

एक कळी मात्र, उमलायचीच राहून ेली …….
वसंतात आज या, सारी बाग न्हाऊन गेली; 
एक कळी मात्र, उमलायचीच राहून ेली.
झंकारली भग्न तार, ह्रदयाची माझ्या; 
वेदना त्या जुन्या, पुन्हा सुलगावूनी गेली.
उजळले दीप, सर्वांच्या दारी; 
रांगोळी माझ्या घरी, का अशी पुसटून गेली?
पुरविली वस्त्रे द्रौपदीस, लज्जारक्षणार्थअच्युताने; 
चंद्रमौळी नशिबात माझ्या, लक्तरे का राहूनगेली?
जाहली त्रुप्त धरती, अळवाच्या रसातीने; 
झोपडी माझीच फक्त, त्या पुरात ाहुन गेली.
एक कळी मात्र, उमलायचीच राहून ेली…….

- कुलकर्ण्यांचा निरज!

आमचा इतिहास नुसता इतिहास ना झाला कधी

Share

ऐसे नव्हे की भारती या बुद्ध नुसता जन्मला
नुसताच नाही बुद्ध येथे आहे शिवाजी जन्मला
विरतेची भारती या ना कमी झाली कधी
आमचा इतिहास नुसता इतिहास ना झाला कधी
तीच आहे हौस आम्हा व्हावया समरी शहीद
बाजी प्रभूही आज आहे आज तो अब्दुल हमीद
बोलला इतुकेच अंती आगे बढो आगे बढो
देउन गेला मंत्र जसा आगे बढो आगे बढो
धर्माहुनी श्रेश्ठ आप्ल्या देशास जो या समजला
मानु आम्ही त्यालाच आहे धर्म काही समजला
जन्मला जो जो इथे तो विर आहे जन्मला
अध्यात्म ही या भारताच्या युद्धात आहे जन्मला
कुठला अरे हा पाक याचे नावही नव्हते कुठे
कळणारही नाही म्हणावे होता कुठे गेला कुठे
हे म्हणे लढणार यांच्या दाढ्या मिश्या नुसत्या बघा
पाहिली नसतिल जर का बुजगावणी यांना बघा
पाहण्याला सैन्य त्यांचे जेव्हा आम्ही गेलो तिथे
नव्हते कोणीच होते फ़क्त पैजामे तिथे
आहे ध्वजा नक्कीच आमुची पिंडीवरी लहरायची
फ़क्त आहे देर त्यांनी समरी पुन्हा उतरायची
हाच आहे ध्यास आता अन्य ना बोलू आम्ही
बोलु आम्ही जयहिंद आणि जयजवान बोलू आम्ही
भाऊसाहेब पाटणकर

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top