Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

बुधवार, ३१ मार्च, २०१०

मैत्री........

Share

मैत्री........


एखाद्यावर ठेवता येणार्‍या
अतूट विश्वासाचं;
मनापासून सांगता येणार्‍या
गूढ गोष्टींचं;
भरभरुन देता येणार्‍या प्रेमाचं;
सुखात-आनंदात खळखळणार्‍या हास्याचं;
आणि दु:खातही सांभाळल्या जाणार्‍या अश्रूंचं;
असं एक नातं असतं,—–
आयुष्यासाठी लागणार्‍या सहवासाचं;
जगातल्या सर्व चांगल्या गोष्टीचं
ते उत्तोमउत्तम असं
एकचं स्थान असतं,——
मनं जिंथे मोकळं होईल,
असं ते एकच “मैत्रीचं गाव” असतं

घाणीत घाण......

Share

घाणीत घाण

.

थुंक..
खुशाल थुंक!
कुठे थुंकशील..
वर बघून?
..थुंक!
खुशाल थुंक!
येईल पचकन,
तुझ्याच तोंडावर!

थुंक..
खुशाल थुंक!
कुठे थुंकशील..
खाली मान घालून?
थुंक..
खुशाल थुंक!
पायावर..
तुझ्या असण्यावर!

थुंक..
रस्ता आपलाच आहे..
खुशाल थुंक..
नाही तरी,
आता तेव्हडच जमत..

थुंक..
खुशाल थुंक..
घाणीत आणखी घाण,
तेव्हडच मनाला,
स्वच्छ झाल्याच समाधान!
बहुतेक असच मिळत..

अनोखे नाते….

Share

अनोखे नाते….


विवाह वेदीवर उभी मी..
अनेक स्वप्नं..
थोडी संभ्रमित..काहीशी सतरंगी..
अनेक घटना..पाहिलेल्या..अनुभवलेल्या…
आठवणा-या..न आठवणा-या…

माझा जन्मच जन्मदाती कडून नाकारलेला..
मला जन्मत: नाकारलेले…..
आज माझ्या असण्याचा तिसरा टप्पा..

हो तिसरा..
एक नाळ सूटताना ..
दुसरा तिने नाळेचे संबंधही तोडताना..अनाथालयाने स्विकारताना..
आणि आजचा तिसरा..
परत नविन नावानिशी..
साताजन्मांचे ॠणानुबंध जोडताना..

नातलगांच्या झोंब-या,स्विकारलेपणाच्या नजरा..
माझ्या यशोदेचं आणि माझं नातच वेगळं आहे..

सखीच नातं……

तिच्या माझ्या नात्याचे हे एक अल्लड नाव..
त्याचा माझा नातेबंध..तिलाच पहिल्यांदा सांगितला..
त्याचे मला स्विकारणे समाजकार्य नाही ना??

मनातला डोंब..अनेक काहूरं..
अनेक गोष्टी share केल्यात आम्ही!!

आज कन्यादानाच्यावेळी
तिचे कृतार्थतेचे अश्रू तिच्या हस-या नजरेत ..!!!

सराईत…

Share

सराईत…


वार केला तेव्हा गीत गात होता
घाव घालणारा सराईत होता

कळालेच नाही कधी फ़ास झाला
माझ्या गळ्यातला जो ताईत होता

जन्मभर फुले मी वेचली ज्यासाठी
तोच काटा मला ओरबाडीत होता

किती धावलो मी हाती काहीच नाही
मृगजळ बनुन तो मला भुलवीत होता

हरेक स्वप्न माझे होते समर्पित त्याला
हरेक स्वप्न माझे तो तुडवीत होता

किती फुलासारखी प्रतिक्षा मी केली
कसा पाचोळा माझा तो उडवीत होता

“आजच्या ठळक बातम्या”…

Share

“आजच्या ठळक बातम्या”…


पेपर उघडला.. तेच तेच..

एकतर्फ़ी प्रेमातून प्रेयसीवर एसिड फ़ेकले
कुणी तर प्रेयसीच्या आईलाच जीवे मारले

होटेल रूमवर प्रेमिकेचा प्रियकरानेच केला घात
षोडस वर्षीय युवकाला मारण्यात मित्रांचाच होता हात

क्षुल्लक छोट्या भांडणातून
शाळ्करी मुलं सुद्धा पाडतात ख़ून
चाकू न्हवे.. नाही सुरा
गोळ्या झाडतात चक्क बंदुकीतून

रोज़ तेच घडत असते .. पेपरात छापुन येत असते
आजतक ..स्टार न्यूज़ पुन्हा पुन्हा दिसत असते

सगळं काही तेच..
नाव-गाव फक्त बदलत असते
वाचून पाहून ते भयाण सत्य
उरात धडकी भरत असते

घरोघरी मग प्रत्येक आईच्या
काळजीला येते भरते
जपुन रहा रे बाळांनो..
दिवस वाईट आलेत -म्हणते..

मीही एक आई.. मी सुद्धा घाबरते..
घाबरते तरी पुढ़च्याच क्षणी माझी मी सावरते..

बळी जाणा-याचे नशीब
नकोच माझ्या पिल्लांच्या वाट्याला
पण बळी घेणारेही नको हात त्यांचे
म्हणुन मलाच हवे ना घडवायला………!!!!!!


अलिकड्च्या काळात.. अदनान-उद्योगपति पुत्र, अंधेरी होटेलरूमवर कौशंबीचा तिच्या प्रियकरानेच केलेला घात.. दिल्ली गुरगावला अगदी परवा घडलेलं शाळ्करी मुलांचं प्रकरण.. वर्शानुवर्शं चालत आलेली एसिडफेकी.. ह्या सर्व घटना पाहिल्या की वाटतं ह्या सा-याला बदलेला काळ जबाबदार आहेच.. पण पालकही तेवढेच जबाबदार आहेत..

जे बळी जातात त्यांच्यावर हळहळत, ‘ते’ आपल्या मुलाच्या वाट्याला न येवो म्हणुन आई वडील जागरूक असतात.. पण बळी घेणारे हात घडताना मात्र उघड्या डोळ्यानि तेच आई वडिल बघत रहातात (किंबहुना तेच घडवत असतात).

त्यांनीच लहानपणापासुन मुलाला एक सिक्युअर्ड लाइफ दिलय . जे जे मागेल.. ते ते आणुन दिलय.. प्रत्येक हट्ट पुरवलाय.. त्यामुळे ‘नाही’ कधी ऐकलच नाही.. ‘नकार’ पचवायची सवयच जर त्याला लागू दिली नाही तर.. हे पुढच्या आयुष्यातले “नकार” कस पचवणार आहे ते मुलं मोठं झाल्यावर???

आहे ना एक प्रश्नच??.. पण उत्तर आपल्याकडेच आहे त्याचं.. खरं ना??

कवितेची विशेषणे !

Share

कवितेची विशेषणे !

एकदा वाचुन
पटकन कळते
सोपी कविता…
दोनदा वाचुन
मनात नाचते
साधी कविता…
वाचुन मनात
उच्छाद मांडते
मस्त कविता…
वाचता वाचता
गुणगुण गाते
झक्क कविता….
वाचुन कळते
नंतर वळते
मुग्ध कविता..
लगेच वाचते
मनात साचते
शब्द कविता….
नकळत कळते
कळुनही पळते
गुढ कविता…..
वाचताना हसते
चंचल दिसते
रम्य कविता…..
शब्दात जगते
शब्दाला जागते
अर्थ कविता…..
विदीर्ण करते
मन कुरतडते
शून्य कविता…

आम्हास वाटले……..आत्ता पाउस पडेल…..!

Share

आम्हास वाटले……..आत्ता पाउस पडेल…..!

रखरखत्या उन्हात काले ढग जमले…….
पावसात भिजण्यासाठी मग मन रमले…..!
अचानक एक वीज चमक्ली……
आम्हास वाटले……..आत्ता पाउस पडेल…..!

अंगाची लाही लाही होत होती…….
मनात भिजण्याची तमन्ना झाली….
कुठून एक सर आली……
आम्हास वाटले……..आत्ता पाउस पडेल…..!

एक थेम्ब मग वरुन पडला तळहातावर…….
ओंजलित घेउन मग त्याच्याकडे पाहू लागलो
ढग सरला……सूर्य तापला
थेम्ब वाफ होउन उडून गेला…….

पुन्हा केंव्हातरी एक ढग येईल……
मनास पावसाची चाहुल देईल…….
अचानक वीज चमकेल……..
आम्हास वाटेल……..आत्ता पाउस पडेल…..!

स्वप्नांची परीक्रमा…..!!!

Share

स्वप्नांची परीक्रमा…..!!!

सांभाळते आता मीच माझं स्वप्नं….
देणार नाही तूला…..चुकूनही उसनं….
जमतील तसे फटकारे मारीन ब्रशचे…..
मागणार नाही तूझ्याकडे आभाळ रंगाचे…..!!
माझी स्वप्नं अलगद पापण्यांवर ठेवेन माझ्या….
मागीतली तरी तु ……देणार नाही तूला….

तशी आधीपसूनच जपते …..फूलपाखरं स्वनांची….
फूलपाखरंच ती रे……एकजात हळवी….!!!
पायवाट होती फूलांची……काळजात छळवी….
स्वप्नांचे वेचे घातले ओच्यात माझ्या…..
दिली गर्भरेशमी नक्काशी….तूच ना रे पदराला….

बघून येते माझी मीच आधीसारखी…
नाहीतरी एकटीच होते….राहीन एकटी…
येवू नकोस… आता तिथेच तु थांब…..अस्साच रहा उभा….
मी करून येते स्वप्नांची परीक्रमा…..
फूलांसारखी स्वप्ने येतात का रे आभाळाला…??

कारण…..
कोणाच्यातरी स्वप्नांनी आज…
केली म्हणे…..आत्महत्या…!!!

कविता अशी-अशी असावी…

Share

कविता अशी-अशी असावी…

कविता एक स्पंदन असते
कधी कधी रणकंदन असते
कविता अशी-अशी असावी
असे काही बंधन नसते

कधी अंतरातले र्हुदगत असते
कधी स्वत:चिच फसगत असते
घनदाट जंगल माजलेले कधी
कधी सुबकशी मशागत असते

चांदणं,आकाश,फुले असते
वेश्यावस्तीतील मुले असते
स्वर्ग काय अन नरक काय
कवितेला सारेच खुले असते

मोजुन मापुन जोडलेली असते
सफाईदारपणे खोडलेली असते
कधी अंगावरच येते जशी..
धरणाची भिंतच फोडलेली असते

ईश्वराला केलेले वंदन असते
देहाने केलेले आक्रंदन असते
कविता अशी-अशी असावी
असे कुठलेच बंधन नसते

आज असा मला वर द्या…

Share

आज असा मला वर द्या…


नाही माझ्याकडं सागरासारखं गहीरेपण
नाही माझं नदीसारखं निर्मळ दर्पण
या भवसागराचा तुमच्यासारखाच एक थेंब मी
आजन्म मला ईथ सुख-दुख:चा सौदागर होऊ द्या
प्रयत्न करुन मला यश-अपयशाच्या या सागरात पोहु द्या

ऊमलतोय लेखणीचा एक अनोखा गंध घेउन मी
नका लादु आत्ताच नियमांचा असा बंध तुम्ही
रोज नव्या रंगाची उधळण या रानात करायचीये मला
पण त्याआधी मला नीट तरी फ़ुलू द्या
शब्दसौंदर्याने नटलेल्या या जगात मलाही थोडं लिहु द्या

खुललेत आज माझ्यासाठी दार य़ा मोकळ्या नभाचे
फ़ुटलेत आजच पर मला नव्या दमाचे
नियमाच्या कात्रीने नका हो त्यांना असे कापु
एखाद्या नकोश्या फ़ांदीसारखा नका हो मला असे छाटू

व्हायचय या नीर तळ्याचा खळखळता आवाज मला
चढवायचाय या मनावर आत्मविश्वासाचा नवा साज मला
फ़क्त तुम्ही थोडा उत्साहाचा, विश्वासाचा स्वर मला द्या
“मिळो शिघ्र दर्शन मज विजयलक्ष्मीचे“
आज असा मला वर द्या…….आज असा मला वर द्या…

पान….

Share

पान….

पान जरी कोरं असलं,
तरी पानालाही भावना असतात.
मन जरी वेडं असलं,
तरी मनालाही भावना असतात.
पानाच्या भावना कोणालाच कळत नाहीत,
मनाच्या भावना मनालाही कळत नाहीत.
मनं हे असचं असतं,
इकडून तिकडे बागडत असतं.
मनाला काही बंधनं असतात,
म्हणुन तर ह्र्दयात स्पंदनं असतात

बदलणार….. आणि नाहिपण

Share

बदलणार….. आणि नाहिपण
येतात आणि जातात
बदलत राहतात ,
ऐका मागोमाग एक
नशीबच बनुन वागतात…….!!

तीनच ॠतु
आयुष्यात पण येतात
तिन पगड्या घेवून
विरून जातात ……!!

बाल पनापासुन तरुण
वयापर्यंत काहीच कळत नाही ,
तरुण पन गेले की
म्हातार्पनात ही काहीच कळत नाही ,

बालपन म्हणजे
पावसाळा असतो ,
हिवाला ,उन्हाला तरुण
म्हातार वयात येत असतो ….!!

ॠतु बदलतात
आणि आयुष्यही बदलणार
बदलत नाही तों
ह्या स्रुष्टिचा घडवणार……!!

जो ॠतु ही घडवतों
आयुष्यही घडवतों ,
धावतो ,पडतो
आपल्या बरोबर धडपडतो….!!

पुन्हा ह्या जीवन
चक्र्कात आणून सोडतो ,
तोच तों, बघतो ,
हसतो आणि रडवतो ….!!

तरीही कळुन आणि
वळुन न कळाल्या सारखं ,
गुंत्यात गुंता पडल्या वाणी
सुट्ल्या सारखं

तरीही काळाच्या ओघात
सर्व काही वाहून जाते
माणूस विसरला
तरीही जीवन चक्र तसेच रहाते

होय..! मी क्रौर्य केलयं..!

Share

होय..! मी क्रौर्य केलयं..!


अनंत शारीरिक, मानसिक यातना भोगतांना,
मी स्वतःला प्रश्न करत राहिले,
मी कुणाला कधी लुबाडले नाही,
कधी कुणाचं वाईट चिंतिलं नाही,
ईश्वरसाक्षी आहे, मी खरं सांगतेयं !

मग ही शिक्षा कशासाठी भोगतेयं?
अचानक माझ्या डोळ्यापुढे आले,
ते मुके जीव..झुरळ, गांडूळ, बेडूक,
ज्यांना मी हाल हाल करत मारले होते.
होय…! मी क्रौर्य केलं होतं !

एकनाथ, ज्ञानेश्वरांच्या या देशात,
माझ्याकडून क्रौर्य करवून घेतले गेले होते,
अभ्यासक्रमात, डिसेक्शनच्या नावाखाली..!

क्लोरोफॊर्म देऊन, ट्रे मध्ये बांधलेले जीव,
धडधड करत उडणारी त्यांची इवली हृदयं..
मी त्यांची त्वचा कापली, रक्तवाहिन्या कापल्या,
त्यांच्या शरीराचा अभ्यास करायला..!

परत त्वचा शिवली नव्हती…
ऒपरेशन थोडेच होते? डिसेक्शन होते..!
त्यांची तडफडणारी शरीरं, कच-यात टाकली.!
त्यांचा शाप भोगतेयं का?

शापित वाटा—–(गझल)

Share

शापित वाटा—–(गझल)


सत्य विखुरले इथे असत्य एकसंध हे
पुष्प फ़क्त देखणे कटकांना गंध हे ।

व्यर्थतेत मोडतो उठाव दुर्जनांपुढे
उठाव मातीमोल अन ’गोळे’ मुर्तिमंत हे ।

अमर्याद वाढली बांडगुळी पाळॆमुळॆ
परोपकार मुक मात्र स्वार्थगान बुलंद हे ।

उंच उंच इमल्यांची चमचमती माणसे
दुर्लक्षित राहुट्या , ’चमचमते’ अंध हे ।

को-या धरतीवरुनी सरती नभे पुढे
को-या डोळ्यात मात्र पर्जन्य ज्वलंत हे ।

दंभाचा चमत्कार ,दुनियेचि लोळणे
पुज्यांना हिणवुनी भस्माळलेले वंदय हे ।

डुंबुनी गंगेतिरी पापखाते झडती नवी
ज्योत भडकल्या मात्र मंद यद्न्यकुंड हे ।

मुढांना आत्मविश्वास बुद्धीवान साशंक हे
संकुचित धनाढ्य मात्र दयाळु इथे रंक हे ।

कशा फ़ुका उडविता धुराळॆ एकिची
सौजन्य दावणी ,अन तंटे बेबंद हे ।

मुळाकडे

Share

मुळाकडे
——–

सोपविला भार
तुझ्यावर आता
तूच एक त्राता
दयानिधी

तुझ्याच छायेत
विसरला शिण
उरले न हिण
देहामाजी

धरणी उशाला
आकाशाचि शाल
प्रणवाचा ताल
कानावरी

तुटुनिया गेले
पाश संसाराचे
विश्व हे घराचे
रुप झाले

हात हे मोकळे
तुला वंदावया
धन्य झाली काया
तुझ्या पायी

आनंदाने जड
विलोप पावले
झाड झेपावले
मुळाकडे

जुनेच!!!

Share

जुनेच!!!
.

एक ,
दोन,
तीन..
किती फ्रेम बदलल्या..

तरी
काचांचा नंबर तोच…

आणि
तेच ते;
काचांनं मागचे डोळे…..

तुला तू ..
आणि मला;
मी म्हणून ओळखणारे!

जुनेच!!!

===================

वांझ………

Share

वांझ………

वांझपणाची घ्रुणा असलेल्य़ा
या समाजमनावर मात्र
नेहमीच उठते
वांझ शब्दांची
वांझ संतापाची
वांझ अश्वासनांची
एक् लाट
अन् विरतेही कुटल्या कुठे
पण कोडगेपणाची रेती
कणभरही सरकत नही.

दरवाजा..

Share

दरवाजा..


दरवाजा..
तीन उभ्या फ़ळकुटांना
खिळ्यांनी ठोकलेली
तीन आडवी फ़ळकुटं..

एका बाजूला कोयंडा आणि
एका बाजूला बिजागर्या
झाला दरवाजा तयार..

स्वत:ला बंद करण्यासाठी..

उभी फ़ळकुटं..
स्वार्थ, प्रतिष्ठा, लोभ
आणि त्यांना बांधणारी
आडवी फ़ळकुटं..
गरजा,गर्व आणि तुलना

या फ़ळकुटांमध्ये शिल्लक राहिलेले
झरोके म्हणजे मैत्री, प्रेम, माणूसकी..
आणि यातूनच माणूस थोडासा डोकावत राहतो…

तू निर्वासित जेथे

Share

तू निर्वासित जेथे

तू निर्वासित जेथे
तो प्रांत माझा नाही
तुझे असे ते क्षितिज
तो अंत माझा नाही…

तू उजळशील दिवे
ती निशा माझी नाही
तू चलशील वाट
ती दिशा माझी नाही…

गातोय पारवा गाणे
सुखासुखी तुझे सख्या
तुला सापडला रे सूर
ते गीत माझे नाही…

ए….तू रागाऊ नकोस रे…

Share

ए….तू रागाऊ नकोस रे…
मी नाही म्हणनार नेहमी
कवितेला तुझ्या प्रत्येक
सुंदर,छान,अप्रतिम,तुफान..

मी होणार आहे तुझी टीकाकार
हो टीकाकारच…..विचार ना का????

वाटत तुझ्या शब्दाणी खूप खूप बोलाव
गूढ-गूढ,खोल खोल आशय घन असाव
रथी-महारथीच्या बरोबरीला तू याव
आणि मग तुला कोणी स्पर्धकच ना उराव.

मी होणार आहे तुझी टीकाकार
हो टीकाकारच……विचार ना का???

वाटत तुझ्या कवीतानी खूप भरारी घ्यावी
वेगवेगळ्या विषयांची त्याला छान झालर असावी
कवितेची प्रत्येक ओळ अर्थपूर्ण असावी
उगाच त्याच त्याच विषयांची नेहमी गर्दी नसावी

मी होणार आहे तुझी टीकाकार
हो टीकाकारच……..विचार ना का?????

वाटता माझी टीका तू खूप मनावर घ्यावी
आणि एक-एक रत्न तुझ्या लेखणीतून बाहेर पडावि
तुझ्या कविता ह्या प्रान्तातल्या शेवटचा शबद ठरावा
तुझ्या नंतर तुझ्या कविता अनमोल होऊन उराव्या

मी होणार आहे तुझी टीकाकार
हो टीकाकारच……विचार ना का???

वाटत व्हाव विराजमान तू प्रसिद्धीच्या शिखरावर
अस्सल प्रतिभा खणखनावी तुझ्या प्रत्येक कवितेतून
पाहीन मी ईथुन तुला यशाच्या खुर्चिवर
अश्रू असतील डोळ्यात माझ्या आनंदाचे भरभरून

मग होऊ ना मी टीकाकार तुझी…
ए……..तू रागाऊ नकोस रे

तुझ्या आठावनिने…

Share

तुझ्या आठावनिने…


आभाळी आले नभ भरुनी
दूर कुठे पेटली पणती मंद
मन झाले खिन्न, उचकी आली,
कोणी काढली आठवण माझी
तुच असावी अशी शंका मनी आली
आणि तीच खरी ठरली शंका
स्क्र्याप तुझा पाहून
आनंद मनी दाटला
अश्रुंची झाली बरसात
मेघा बरसले नभ झाले रिक्त
धरणी झाली तृप्त
मन झाले तृप्त मैत्रीत

विकतच दुःख

Share

विकतच दुःख


त्या दिवशी मला सुट्टीच होती
सकाळ तेव्हाची आरामात जात होती

हळू हळू सगळी आन्हिक उरकली
मग हातात पेपरची चळत घेतली

सवइनी शेवटचे क्रीडा पान उघडले
पराभवाच्या मोठया बातम्यांनी मन उदसले

पहिल्या पानांवर कधी जायचेच नसत
खून दरोडे लुटीशिवाय तिथे काहीच नसत

उदास मानाने मग मी टी व्ही कडे वळलो
आहो पण टी व्ही लाऊन मी भलताच पस्तावलो

कोणत्याच सिरीयलचे एकही पात्र धड नाही
नैतिकतेची चाड कुणालाच उरली नाही

डिस्कवरी आणि नॅट जीओ पण त्यातून सुटले नाही
रक्तपात आणि गुन्हेगारीशिवाय काहीच दाखवत नाहीत

ही साधन आता मनोरंजनाची उरली नाहीत
दुःख दैण्याशिवाय ती काहीच विकत नाहीत

लोकांना आता दुसर काहीच सुचत नाही
विकतच्या या दुःखाशिवाय चैनच पडत नाही

दिल्ली कुणाचीच नाही होउ शकली,.

Share

दिल्ली कुणाचीच नाही होउ शकली,.

दिल्ली कुणाचीच नाही होउ शकली,
ना फ़ॅन्सी ड्रेस करणार्यांची,
ना राजकारणाचा सट्टा
लावणार्या भडव्यांची.

बाजारात ह्या लोकशाहीचा
लिलाव केला.
विश्वास मत नावाने,
जगी गवगवा केला.

कुठे चुकले हो ह्यांचे?

आपणही प्रोत्साहन देत उभेच होतो की.
ह्याच बाजारात,
ह्याच बाजारात,
मुल्यांची अब्रु लुटतांना बघतच होतो की.

का द्यायचा दोष ह्या लाल गाडित फ़िरणार्यांना?
आपण साधं मत द्यायला पण पुढे सर्सावत नाही.
कित्येकांचे तर मतदार यादीत नाव ही नसेल.

आपण शंढ झालोत म्हणुन ह्या भडव्यांची चालली,
म्हणुनच आजही,
दिल्ली कुणाचीच नाही होउ शकली,.

देव आज मूडमधे नाही..

Share

देव आज मूडमधे नाही..


तिन्ही सांजेची वेळ
देवघर दिव्याने उजळवलं..
देवाला हात जोडले..
रोजचच मागणं मागितलं

पण आज कदाचित देव मूड मधेच नसावा..

माझ्याकडे बघून न बघितल्या सारखं केलं
म्हटलं असेल काही.. मीही लक्ष नाही दिलं..

काही केल्या माझ्याकडे देव जेव्हा बघेना
मलाही मग तेव्हा अजिबातच राहवेना..
म्हटलं बाबा.. तुझ्या मूडला आज काय बरं झालं..
सांग ना रे.. माझ्याकडून काय चुकीच घडून गेलं
तरी देव गप्पच.. !! घुश्श्यातच बसलेला..
कधीच नव्हता खरतर माझ्यावर असा रुसलेला

आठवत राहिले मग.. नक्की आज काय चूक झाली
की पूर्वीच्या कुठल्या चूकीची देवाला आठवण झाली

नाही म्हणायला चुकले खरी.. आज चिडचिड केली फार
आदळाआपटही केली थोडी.. आज शब्दांनाही होती धार

आजचे मागणे माझे.. म्हणून नामंजूर झाले
आज थोडी जास्तच कारण मगरूर मी झाले

कधीची देवाच्या दारात
ताटकळत उभी मी हात जोडून..
म्हटलं नको आज काही..
पण एकदा माझ्याकडे बघ तरी वळून..!

कवी देतो शिवी !!

Share

कवी देतो शिवी !!


खिश्यातल्या पेनात नेहमीच
ज्वालाग्राही पदार्थ घेऊन हिंडणारा
एक मनस्वी…
म्हणलं तर तपस्वी…
नाहीतर उनाड स्वच्छंदी कवी..
जेव्हा शिवी देतो..
तेव्हा गर्दीच्या खालावलेल्या नजराही…
वर पाहू लागतात..इतकंच !!

खरंतर निर्भीड, बंडखोर शब्द
कागदावर लिहून
समाजावर गोंदवण्याचा
हा छंद.. रूढार्थाने
नॉन प्रॉफिट मेकिंग !!
पण हाच कवी जेव्हा शिवी देतो,
तेव्हा ह्याचा तारसप्तक
कुठेतरी गर्दीतल्याच षंढ मनांना
चाळवत असतो..इतकंच !!

ह्या समाजावरची व्यंध्यत्वाची पुटं काढतांना
त्याचं शस्त्र…प्रत्येक हल्ल्यानंतर
धारधारच होतंय अधिकाधिक…
ह्याने केलेली वळलेल्या मुठींची भाषांतरं..
एव्हाना तारस्पप्तकाने
‘फ्रेश’ झालेल्या मनांवर आदळतात
तेव्हा
आत्तापर्यंत खिश्यात असलेले
तटस्थ हात..
सिस्टीमचा ढासळता चिरा सावरायला
नकळत उंचावलेले असतात…इतकंच !!

१८५७ चे] स्वातंत्र्यसंग्रामाचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव [स्मरण १८५७ चे]

Share

देशासाठी, धर्मासाठी
मातीवरल्या प्रेमापोटी
सुटली मंगलची गोळी
तेजातुन त्या रक्त चमकले
चारी दिशांनी मंगलच्या
नंतर त्याच गिरविल्या ओळी

बंडखोरीचा वार होताच
गो-यांनी त्रागा केला
गर्जुन उठत्या ठीणगीने
सारा देश जागा केला

चेतसिंह, तात्या
सुलतान टीपु
पेटुन उठले सारे वीर
तलवारींसह विजा चमकल्या
अंगी खवळले तप्त रुधीर

कर्नाटक, प्लासी,
अवध,दख्खन,अन झाशी
डोळे पुसणारी गंगा दिसली
तेजाळली तव आशा नवी
नव्या उषेची कीरणे हसली

देशावरच्या, मातीवरच्या
प्रेमाचे त्यांनी दिले दाखले
आईवरली ती प्रीत पाहुनी
क्षणभर गोरे ईंग्रज वाकले

ही शब्दांजली त्या हुतात्म्यांना
ज्यांनी स्वातंत्र्याचे स्वप्न दिले
मातीच्या जखमांचे ऋण फ़ेडाया
ज्यांनी वाहिली प्राण फ़ुले…

१८५७ चा ऊठावाला १५१ वर्ष पुर्ण होत आहेत. ईंग्रजांच्या अन्यायाविरुध्द बंडाला सुरुवात येथुनच झाली. त्या लढ्यात मरणाला कवटाळुन आपल्या देशासाठी आणि धर्मासाठी लढणा-या महान आत्म्यांना ही मानवंदना. त्यांचं आज स्मरण करुन त्यांना वाहीलेली ही शब्दांजली. जय हिंद !! जय महाराष्ट्र !

देह माझी पंढरी

Share

………….

देव माझा राहतो
माझ्या हृदयी मंदिरी
जाऊ कोठे शोधायला
देह माझी पंढरी..

सावळा रुप मनोहर
उभा देव विटेवरी
गळ्यांत माळ वैजयंती
कर शोभे कटेवरी..

तुळस आवडे बहु
पिताम्बर साजे अंगावरी
कानी कुण्डल डोलतसे
मस्तकी तिळा केशरी..

अन्नकुट-भण्डारा उधळण
नैवेद्यासी आवडे पंजिरी
ढोल-मंजिरा वाजतो
सतत् तुझ्या दरबारी..

उभा सृष्टि-नियंता
व्याकुळ नाही कष्टापरी
शांत-चित्त ध्यानस्थः
राहुनी हरतो व्याधी हरी..

कांदा-भाकर माझी
कशी देउ रे मुरारी
लोण्यांत न्हांहलेला तू
मी आसुआं परि..

दिवसं-रात्र तुझी
श्रीमंत करि चाकरी
दिनदयाळा अर्पण करितो
तुला शब्दांची बासुरी..

तुझं ते रम्य-रुप
राहु दे डोळ्या सामोरी
वैकुंठाची नको आस
तुझे नावचं मुखावरी..

♥ღ♥ स्वप्नांशी बोलणारी तू….♥ღ♥

Share

स्वप्नांशी बोलणारी तू….
खुप छान वाटतं,
तुला स्वप्नाशी बोलताना पहाणं,
अर्धवट झोपेतली तू
आणि तुला झुलवणार तुझं स्वप्न,
निरागसतेच्या एका नाजुके सारखं…..
कळत कस नाही तुला वेडे
स्वप्नांना प्रकाशाचा शाप असतो..
त्यांना
निळ्या आकाशाचा धाक असतो..
हात नको लावूस… ती विरघळुन जातात
कापराचे बोचरे क्षण… हातात येतात..!!!!
वा-याचा आकार आणि पा-याचं रूप
काय काय बघायचं ग….
तुझी नंतरची तडफ़ड नाही बघवत
हुरहुर लागते मनाला..
पण छान दिसतेस तेव्हाही,
वाहुन गेलेल्या वा-याला पकडताना…..
खरच,
खुप छान वाटतं,
तुला स्वप्नाशी बोलताना पहाणं….
ते बघायलाही नशीब लागतं नाही…?

मंगळवार, १६ मार्च, २०१०

Gudipadwyachya Haardik Shubhechaa

Share

                                                        Gudi Padwyachya Haardik Shubhechaa.


 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

GUDI PADWA

Importance - The Beginning of the Hindu Calendar.
Special -
A Mixture Made Of Tender Neem Leaves, Tamarind, Ajwain, Gram-Pulse And Jaggery

Gudhi Padwa heralds the advent of a prosperous new year and is considered as one of the most auspicious days by Hindus. The Hindu year begins on the first day, "shuddha pratipada", of the month of Chaitra (March-April). It is one of the 'Muhurat' amongst the three and a half Muhurats that occur in Hindu calendar year. The day is considered auspicious for building or entering a new house, putting a child to school, or starting a business. With this day begins the new season, the spring.

It is believed that on 'Gudi Padva' :

  • The Universe was created by Brahma.
  • Satyuga (The Age of Truth and Justice) began.ôX>
  • King Vali was killed by Rama.Shri Rama returned to Ayodhya victorious.
  • This is one of the 3 and a half days in the Hindu Lunar calendar, whose every moment is considered auspicious.

मराठी नूतनवर्षाभिनंदन...

Share

 
 

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top