Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

मंगळवार, २८ जुलै, २००९

प्रेम केलं नाही?

Share

प्रेम केलं नाही?
काय म्हणालात तुम्ही
कधीच प्रेम केलं नाही?
अहो कशावर प्रेम कराव?
विचारता कोणी प्रेम कराव?
अस का घाबरता राव?
ते म्हणतात प्रेम कुठेही कराव!
कशासाठी प्रेम कराव?
सांगा प्रेमाशिवाय कस जगाव?
मी तर म्हणतो प्रेम केलं नाही ?
फार काही बिघडल नाही!
केल्या नाही चार कविता!
मारल्या नाहीत गुलुगुलु गप्पा?
घेतला नाही तिचा हातात हात
केला नाही धडधडणाऱ्या हृदयाने कधी घात?
प्रेम केल नाही म्हणून काही सुचलं नाही?
अहो लय नाही म्हणून काही लिहीलं नाही!
प्रेम केल नाही म्हणून काही अडल नाही!
आयुष्यात विशेष काही घडल नाही?
आता म्हणाल, वाचुनही काही समजल नाही!
खरच सांगतो प्रेम केलं नाही म्हणून काही बिघडलं नाही
काय म्हणता माझे लेखन आवडल नाही?
आता मान्य कराल का तुम्ही कधीच प्रेम केल नाही?

प्रत्येक मैत्री प्रेमात बदलत नाही..

Share

पहीला दिवस कॉलेजचा,
खुप खुप मजा केली,
एकटेपणाची सवय माझी
हळू हळू विरून गेली..

माझ्याच बसमधे,
माझ्याच वर्गात,
जणू आम्ही दोघे,
नव्या मैत्रीच्या शोधात..

मैत्रीसाठी माझा प्रस्ताव,
माझ्या विनंतीला तीचा होकार,
तेव्हा जाणवले आता मैत्रीच्या झाडाला,
नवी पालवी फुटणार..

मैत्री आमची खुप सुंदर,
एकाकीच्या सागरात जिव्हाळ्याच बंदर,
ती म्हणायची राहूया आपण,
असंच सोबती निरंतर…

तीचा माझ्यावर खुप जिव,
हे तिच्या स्वभावातून कळायचं,
माझ्या अपयशाला,माझ्या चुकीला,
तिच्या डोळ्यातून टीप गळायचं..

ती मला सावरायची ,
माझ्या उदासीला दुर लावायची,
आंनदाची ती श्रावणसर ,
माझ्यावर वेळोवेळी कोसळायची..

मैत्री आमची वाढत गेली,
तसं एकतर्फी प्रेम माझ्यात जागं झालं,
पण मैत्रीला काही होणार नाही ना?
असं भितीच वारं माझ्या मनात आलं

अस्वथ व्हायला लागलो,
दिवसे न दिवस विचार करू लागलो,
तिला कसंतरी कळावं म्हणून,
उगाच प्रयत्न करू लागलो…

कॉलेजच्या शेवटच्या दिवशी,
मी तिला माझ्या मनातलं सांगितलं,
खरतरं आमच्या या नितळ मैत्रीला,
मी तेव्हाच दुर लोटलं..

रविवार, २६ जुलै, २००९

आई!

Share

आई!

आई! आई या शब्दात सगळविश्व सामावालेल असत
तिच्या मायेच्या कुशीत पिलाने सार कही कमावालेल असत
आईच्या वत्सल्यादायी डोळ्यात
उज्जवल भविष्याच स्वप्न पहायच असत
तिच्याच आशिर्वादाने स्वप्नाना वास्तवात आणायच असत
आईच्या हृदय मंदिरात कायम पुजारी बनुन रहायच असत
तिच्या मूर्तिमंत चेहरयात परमेश्वर दर्शन करायच असत

काहीना नसते आई....
काहीना नसते आई पण .....,
वाईट वाटुन घ्यायच नसत
ही तर दैवाने दिलेली संधी आहे
कारण आईला फक्त अनुभवायच असत .

शनिवार, १८ जुलै, २००९

Blank Call

Share

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
बोलतच नाही मुळी पलीकडे कोणी
ऐकू येत रहातं फक्त डोळ्यातलं पाणी ...(१)

कळताच मलाही मग थोडंसं काही
मीही पुढे मग बोलतंच नाही
फोनच्या तारेतून शांतता वाहते
खूप खूप आतून अजून काही सांगते ...(२)

नदी नि शेतं नि वार्‍याची गिरकी
ढगाची विजेने घेतलेली फिरकी
वाळूवर काढलेली पाण्याची चित्रं
"तुझा" पुढे मी खोडलेला "मित्र" ...(३)

टपला नि खोड्या नि रुसवे नि राग
एकदा तरी सहज म्हणून शहाण्यासारखं वाग
हसायचे ढीगभर नि लोळून लोळून
बोलायचे थोडेच पण घोळून घोळून...(४)

वडाचे झाड आणि बसायला पार
थंडीमधे काढायची उन्हात धार
कॉफी घेउन थोडेसे बोलायचे कडू
हसताना पहायचे येते का रडू ...(५)

बोलायचे गाणे आणि बोलायची चित्रं
नुसतीच सही करुन धाडायची पत्रं
क्षणांना यायची घुंगरांची लय
प्राणांना यायची कवीतेची सय...(६)

माणूस आहेस "गलत" पण लिहितोस "सही"
पावसात भिजलेली कवीतांची वही
पुन्हा नीट नव्याने लिहीत का नाहीस?
काय रे.... काही आठवतय का नाही?
शब्दसुद्धा नाही तरी कळे असे काही
हातामधला हात सुद्धा जितकं बोलत नाही...(७)

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन
आणि कळतच नाही बोलतय कोण
दोन्ही कडे अबोला आणि मध्यात कल्लोळ
छाती मधे घुसमटतात हंबरड्यांची लोळ...(८)

ऐकू येतात कोंडलेले काही श्वास फक्त
कोणासाठीतरी खोल दुखलेलं रक्त
गरम होतात डोळे नि थरथरतो हात
सर्रकन निघते क्षणांची कात...(९)

उलटे नि सुलटे कोसळते काही
मुक्यानेच म्हणतो "नको... आता नाही"
फार नाही... चालतो मिनिटे अवघी तीन
तेवढ्यात जाणवतो जन्माचा शीण
तुटत गेले दोर आणि उसवत गेली वीण
डोळे झाले जुने तरी पाणी नविन...(१०)

हल्ली असा अवेळीच येतो कधी फोन....

....संदिप

आठवतं तुला ?

Share

आठवतं तुला ?

आठवतं तुला त्या भेटीत

रिमझिम सरींनी छेडलं होतं .

भर दुपारी मला जणू

चांदण्याने वेढलं होतं .

आठवतं तुला त्या भेटीत

श्रावण धुंद बहरला होता .

ओल्या ऋतूत ओल्या स्पर्शाने

ओला देह शहारला होता .

आठवतं तुला त्या भेटीत

दोघे व्याकुळ झालो होतो .

तुझा गंध वेचता वेचता

मीही बकुळ झालो होतो .

आठवतं तुला त्या भेटीत

भावनांनी कविता रचली होती .

माझ्या डोळ्यात तू अन

तुझ्या डोळ्यात मी वाचली होती.

आठवतं तुला त्या भेटीत

आणखी काय घडलं होतं ?

मला स्मरत नाही पुढचं

बहुतेक तेव्हाच स्वप्न मोडलं होतं .



- संदिप खरे

हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही

Share

हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही
हसलो म्हणजे दुखीः नव्हतो ऐसे नाही

हसलो म्हणजे फ़क्त स्वतःच्या फ़जितीवर
निर्लज्यागत दिधली होती स्वतःच टाळी
हसलो कारण शक्यच नव्हते दुसरे काही
डोळ्यामधे पाणी नव्हते ऐसे नाही

हसतो कारण तुच कधी होतीस म्हणाली
याहुन तव चेहर्‍याला काही शोभत नाही
हसतो कारण तुला विसरणे जितके अवघड
तितके काही गाल पसरणे अवघड नाही

हसतो कारण दुसर्‍यानांही बरे वाटते
हसतो कारण तुला सुद्धा ते खरे वाटते
हसलो म्हणजे फ़क्त डकवली फ़ुले कागदी
आतुन आलो होतो बहरुन ऐसे नाही

हसतो कारण जरी बत्तीशी कुरुप आहे
खाण्याची अन दाखवण्याची एकच आहे
हसतो कारण सत्याची मज भिती नाही
हसतो कारण हसण्यावाचुन सुटका नाही....

बॉस

Share

बॉस खुप उशिरापर्यंत थांबायचा आणि वैताग आणायचा...
लाल लाल कंटाळल्या डोळ्यांनी काम करत रहायचा...
आम्ही घरी निघालो की चुकचुकायचा...

मी लग्नाळलेला... वाटायचं- 'चांगलं घरी जायचं सोडून
कसलं हे उकरून उकरून काम करत रहाणं !'...

यथावकाश माझं लग्न झालं...
नव्या नवलाईचे पक्षी घरटं सोडेना झाले...
बघता बघता 'अतिपरिचित' झाले....

आणि हळूहळू पंख सैलावत जाताना
घरटयाची हाक आत तेवढीशी तीव्र उरली नाही...

आता बॉसला 'थांब' सांगावं लागत नाही...
केबिनमध्ये तो आणि केबिनबाहेर मी
एकमेकांना सोबत करत बसलेलो असतो...
कंटाळ्यातील भागीदारांच्या समजुतदारपणाने
घरी न जाता काम करत रहाण्याची 'अनिवार्यता'
दोघांनाही आता घट्ट धरून ठेवते...

उकरून उकरून काम करत प्रश्नांशी भांडत बसण्यापेक्षा
उकरून उकरून काम करणे सोपे असते,
हे निर्जन ऑफिसमधल्या सुन्न रात्रींशी
गुपचुप कबुल केलेए आहे मी...

- संदिप खरे

हृदय फेकले तुझ्या दिशेने

Share

हृदय फेकले तुझ्या दिशेने
झेलाया तू गेलीस पटकन्‌
गफलत झाली परि क्षणांची
पडता खाली फुटले खळ्‌कन्‌


हृदय फेकले तूही जेंव्हा
सुटले तेही,पडलेही पण
तुटले नाही-फुटले नाही
नाद निघाला केवळ खण्‌कन्‌


गोष्ट येवढी इथेच थांबे
अशा गोष्टींना नसतो नंतर
खळ्‌कन्‌ आणि खण्‌कन्‌ यांतील
कधी कुठे का मिटले अंतर


मन पोलादी नकोच तुजसम
असो असूदे काच जरीही
फुटून जाते क्षणी परंतु
गंजायाची भीती नाही

--- संदीप खरे.

आता उरले ना दिस

Share

आता उरले ना दिस; रूसण्याचे-भांडण्याचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ धृ ॥

किती काळ रहायचे; मान-अपमानी दंग,
पहा लकाके नभात; कसा शेवटला रंग.
कोण जाणे कोण्या क्षणी; सारे सोडून जायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ १ ॥

जरी भांडलो-तंडलो; तरी तुझीया सोबती,
दिली दुर्दैवाला पाठ; अन्‌ संकटाला छाती.
सारे कठीण; तुझीया सवे मृदूल व्हायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ २ ॥

काही उणे माझ्यातले; काही दुणे तुझ्यातले,
बघ शेवटास सारे; कसे सुखमय झाले.
जन्मी पुढल्याही होऊ; अजूनही ओळखीचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ ३ ॥

कष्ट, ध्यास, त्रागा, प्रेम, जिद्द, तडजोड, भीती,
जे जे झरले ते पाणी; आणि उरले ते मोती.
येत्या उद्याने जपावा; असा शिंपला व्हायचे,
क्षण क्षण हिरे-मोती; शेवटले वेचण्याचे ॥ ४ ॥


--- संदीप खरे.

हे गंधित वारे फिरणारे

Share

हे गंधित वारे फिरणारे
घन झरझर उत्कट झरणारे . . .
हे परिचित सारे पूर्वीचे . . .
तरी आता त्याही पलिकडचे . . .
बघ मनात काही गजबजते . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

कुठल्या देशी नकळत माझे पाऊल पडले रे
सूर रोजचे कसे नव्याने मनास भिडले रे
हे गीत जयाला पंखसुध्दा . . .
अन हवाहवासा डंखसुध्दा . . .
कधि शंकित अन नि:शंकसुध्दा . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

मनात जे जे दडून होते नकळत आकळते
कसे दुज्याच्या स्पर्शाने 'मीपण' झगमगते
ही जाणीव अवघी जरतारी . . .
हर श्वासातुन परिमळणारी . . .
हर गात्रातुन तगमगणारी . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

नाव न उरले, गाव न उरले, अवघे ओसरले
बेभानाचे भान जिण्याला बिलगुन बसलेले
हा स्पर्श विजेच्या तारांचा . . .
हा उत्सव बघ अस्वस्थाचा . . .
हा जीव न उरला मोलाचा . . .
क्षणाक्षणाच्या दिव्यादिव्यातून अत्तर जळते रे
उमजत नाही ओढ कुणाची सुखवित सलते रे . . .
हे गंधित वारे फिरणारे घन झरझर उत्कट झरणारे . . .

-संदिप खरे

दुपार

Share

अशी दुपारली वेळ, नभी भरलेल्या सरी

जीव घेत घेत माझा कोण उभे माझ्या दारी

किती जपून ठेवले गुज ओठावर आले

साऱ्य़ा सयीचे वऱ्हाड मेघा का रे बोलवले ?


दूर वाजते सनई तिला आभाळ पुरेना

मनातली हुरहुर जशी मनात मावेना

माझ्या मनात मांडव असा सहजी पडेना

आर्त मनाचे मनाचे जगभर सांगवेना


आता तरी दे ना दे ना मनातले आवताण

मनातल्या माणसाला येवो माझ्या देहभान

आता येथोनीच थांब नको मनभर होऊ

माझ्या कोशात मी बरा तिथे हाक नको देऊ


हाकेतुन तरी काय ? स्वर पाण्याचा पाण्याचा

तुझे आकाश पाण्याचे . . माझा डोळाही पाण्याचा

इथे पाणी तिथे पाणी . . एवढेच ना करणे

उन्हे पडल्यावरती पुन्हा भाजुन निघणे . . .


आता अंथरून वेळ पुन्हा पाय पसरीन

आणि कोसळता सरी आत आत पाझरीन. . .


- संदिप खरे

आयुष्या वर बोलू काही......

Share

जरा चुकीचे... जरा बरोबर......
जरा चुकीचे, जरा बरोबर , बोलू काही.....
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही......

उगाच वळसे शब्दांचे हे देत रहा तू ..
उगाच वळसेे शब्दांचे हे देत रहा तू ....
भीडले नाहीत डोळे तोवर , बोलू काही......
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही..........

तूफान पाहून तीरा वर , कुजबुज्ल्या होडया ..
तूफान पाहून तीरा वर , कुजबुज्ल्या होडया ....
पाठ फीरू दे त्याची, नंतर बोलू काही........
चला दोस्त हो ;आयुष्या वर बोलू काही..........

हवे-हवे से दुखः तुला जर, हवेच आहे ..
हवे-हवे से दुखः तुला जर, हवेच आहे ....
नको-नको से हळवे कातर, बोलू काही.......
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही..........

"उदया-उदया" ची कीती काळजी , बघ रांगेतुन..
"उदया-उदया "ची कीती काळजी , बघ रांगेतुन....
"परवा" आहे "उदया"च नंतर, बोलू काही........
चला दोस्त हो ; आयुष्या वर बोलू काही..........

श्ब्द असू दे हातां मध्ये, काठी म्हनुनी..
श्ब्द असू दे हातां मध्ये, काठी म्हनुनी....
वाट आंधळी, प्र्वास खडतर ,बोलू काही .......
चला दोस्त हो , आयुष्या वर बोलू काही..........

चला दोस्त हो , आयुष्या वर बोलू काही..........

* संदीप खरे

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर...

Share

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर...
त्याच जागी त्या येऊन जाशी, माझ्यासाठी... माझ्यानंतर...
कितीक् हळवे, कितीक् सुंदर...

अवचीत कधी सामोरे यावे...
अन् श्वासांनी थांबून जावे...
परस्परांना त्रास तरीहि, परस्पराविण ना गत्यंतर...

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर...

मला पाहुनी... दडते-लपते,
आणिक तरीहि... इतूके जपते...
वाटेवरच्या फुलास माझ्या... लावून जाते हळूच फत्तर

भेट जरी ना ह्या जन्मातुन,
ओळख झाली इतकी आतून...
प्रश्न मला जो पडला नाही... त्याचेही तुझ सुचते उत्तर

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर...

मला सापडे तुझे तुझेपण,
तुझ्या बरोबर माझे मीपण...
तुला तोलुनी धरतो मि अन्, तु ही मजला सावर् सावर...

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर...

मेघ कधी हे भरुन येता,
आबोल आतून घुसमट होता...
झरते तिकडे पाणि टप् टप्... अन् इकडेही शाई झर् झर्...

कितीक् हळवे, कितीक् सुंदर, किती शहाणे आपूले अंतर...
त्याच जागी त्या येऊन जाशी... माझ्यासाठी... माझ्यानंतर...
किती शहाणे आपूले अंतर...

- संदिप खरे


जुबा तो डरती है कहने से

Share

जुबा तो डरती है कहने से
पर दिल जालीम कहता है
उसके दिल में मेरी जगह पर
और ही कोई रहता है ॥ धृ ॥

बात तो करता है वोह अब भी
बात कहाँ पर बनती है
आदत से मैं सुनती हूँ
वोह आदत से जो कहता है ॥ १ ॥

दिलमें उसके अनजाने
क्या कुछ चलता रहता है
बात बधाई की होती है
और वोह आखें भरता है ॥ २ ॥

रात को वोह छुपकेसे उठकर
छतपर तारे गिनता है
देख के मेरी इक टुटासा
सपना सोया रहता है ॥ ३ ॥

दिलका क्या है,
भर जाये या उठ जाये,
एक ही बात...
जाने या अनजाने
शिशा टूटता है तो टूटता है ॥ ४ ॥

* संदीप खरे *

उत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये..

Share

उत्कट-बित्कट होऊ नये, भांडू नये, तंडू नये..
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

नको कुठला नवा भार, जुनेच गुंते शिल्लक फार..
सूर गाठ-नीर गाठ, राहून द्याव्यात, ओढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

असे वाटते बसून घ्यावे, उरले श्वास मोजत रहावे..
जन्मा-बिन्मा आलो त्याचे, पांग सुद्धा फेडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

शिंकांसारखे सोपस्कार, मला झालीये गर्दी फार..
असल्या गळक्या जगण्यासाठी, रूमालसुद्धा काढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

कुठे कधी रमला जीव, खरंच फार दमला जीव..
वजन, ज्ञान, ओळख, पित्त काही-काही वाढू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये

कसले प्रहर, कसला काळ, मनात कायम संध्याकाळ..
तिच्या कुशीत मांडली कविता, तेवढी मात्र मोडू नये...
असे वाटते आज-काल, नवे काही मांडू नये ॥ ७ ॥

sandeep khare

दिवानों की बाते है

Share

दिवानों की बाते है
इनको लबपर लाये कौन ?
इतना गेहेरा जाये कौन ?
खुदको यु उलझाये कौन ?

जो तु समझा अपना था
वो लमहों का सपना था
हमने दिल को समझाया
अब हमको समझाये कौन ?

तेरी गली मे हो आये
होश वही खो जाये
दिख जाये अगर तू पलभर
मैखाने मे जाये कौन ?

गली गली मे फ़िरते है
कई ठोकरें खाते है
जब तुनेही ठुकराया हमे
अब हमको अपनाये कौन ?

दिवानो की बाते है
sandeep khare

नास्तिक

Share

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा खर तर गाभा-यातच भर पडत असते
की कोणीतरी आपल्यापुरता सत्याशी का होईना,
पण प्रामाणिकपणे चिकटुन राहिल्याच्या पुण्याईची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा होते निर्माण
देवाने आपला आळस झटकून देवळाबाहेर येण्याची !

एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा को-या नजरेने पाहत राहतो
सभोवतालच्या हालचाली, भाविकाच्या जत्रा...
कोणीतरी स्वत:चे ओझे , स्वत:च्याच पायावर
साभाळत असल्याचे समाधान लाभते देवलाच !

म्हणून तर एक खरा खुरा नास्तिक जेव्हा देवळाबाहेर थाबतो
तेव्हा देवाला एक भक्त कमी मिळत असेल कदचित !
पण मिळते आकठ समाधान एक सहकारी लाभल्याचे

देऊळ बद झाल्यावर एक मस्त आळस देउन
बाहेर ताटकळलेल्या नास्तिकाशी गप्पा मारता मारता
देव म्हणतो, " दर्शन देत जा अधुन मधुन........
तुमचा नसेल विश्वास आमच्यावर,
पण आमचा तर आहे ना ! "

देवळाबाहेर थाबलेला एक खरा खुरा नास्तिक
कटाळलेल्या देवाला मोठ्या मिन्नतवारिने पाठवतो देवळात
तेव्हा कुठे अनंत वर्षे आपण घेऊ शकतो दर्शन
अस्तिकत्वाच्या भरजरी शालीत गुदमरलेल्या देवाचे....

sandeep khare

कसे सरतील सये...

Share

कसे सरतील सये...

कसे सरतील सये, माझ्याविना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना...

पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा
रिते रिते मन तुझे उरे
ओठ वर हसे हसे उरातून वेडेपिसे
खोल खोल कोण आत झुरे
आता जरा अळिमिळी तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावुन हसशील ना,
गुलाबाची फुलं दोन...

कोण तुझ्या सौधातून उभे असे सामसूम
चिडीचुप सुनसान दिवा
आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच
नभातून गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण आठवांचे ओले सण
रोज रोज निजपर भरतील ना,
गुलाबाची फुलं दोन...

इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्या पाशी
जडेसर काचभर तडा
तूचतूच तुझ्यातुझ्या तुझीतुझी तुझेतुझे
सारासारा तुझा तुझा सडा
पडे माझ्या वाटेतून आणि मग काट्यातून
जातानाही पायभर मखमल ना,
गुलाबाची फुलं दोन...

आता नाही बोलायाचे जरा जरा जगायाचे
माळूनिया अबोलीची फुले
देहभर हलू देत विजेवर झुलू देत
तुझ्या माझ्या विरहाचे झुले
जरा घन झुरु दे ना वारा गुदमरु दे ना
तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना,

गुलाबाची फुलं दोन रोज रात्री डोळ्यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना...

sandeep khare

मी मोर्चा नेला नाही

Share

मी मोर्चा नेला नाही

मी मोर्चा नेला नाही, मी संपही केला नाही
मी निषेध सुद्धा साधा, कधी नोंदवलेला नाही

भवताली संगर चाले, तो विस्फ़ारुन बघताना
कुणी पोटातून चिडताना, कुणी रक्ताळून लढताना
मी दगड होउनी थिजलो, रस्त्याच्या बाजूस जेव्हा
तो मारायाला देखिल, मज कुणी उचलले नाही

नेमस्त झाड मी आहे, मूळ फ़ांद्या जिथल्या तेथे
पावसात हिरवा झालो, थंडीत झाडली पाने
पण पोटातून कुठलीही, खजिन्याची ढोली नाही
कुणी शस्त्र लपवले नाही, कधी गरूड बैसला नाही

धुतलेला सातिव सदरा, तुटलेली एकच गुंडी
टकलावर अजून रुळते, अदृश्य लांबशी शेंडी
मी पंतोजींना भ्यालो, मी देवालाही भ्यालो
मी मनात सुद्धा माझ्या, कधी दंगा केला नाही

मज जन्म फ़ळाचा मिळता, मी केळे झालो असतो
मी असतो जर का भाजी, तर भेंडी झालो असतो
मज चिरता चिरता कोणी, रडले वा हसले नाही
मी कांदा झालो नाही, आंबाही झालो नाही

sandeep khare, संदीप खरे

करार

Share

करार
चल आता बोलुन घेऊ ! बोलुन घेऊ थोडे !

सुकण्याआधी माती आणि जाण्याआधी तडे !

संपत आलाय पाऊसकाळ ! विरत चाललेत मेघ !

विजेचीही आता सतत उठ्त नाही रेघ !

मृदगंधाने आवरुन घेतलाय धुंदावण्याचा खेळ!

मोरपंखी पिसर्‍यांनी ही मिटण्याची वेळ !

सावाळ्या हवेत थोडं मिसळ्त चाललंय उन्ह !

खळखळणार्री नदी आता वाहते जपून जपून !



चल आता बोलुन घेऊ ! बोलुन घेऊ थोडे !

लक्षात ठेव अर्थांपेक्षा शब्दच असतात वेडे !

मनामधला कानाकोपरा चाचपून घे नीट !

लपले असतील अजुन कोठे चुकार शब्द धीट !

नजरा, आठवण, शपथा . . . सार्‍यांस उन्ह द्यायला हवे !

जाणयाधी ओले मन वाळायला तर हवे !

हळवी बिळवी होत पाहू नकोस माझ्याकडे

माझ्यापेक्षा लक्ष दे माझ्या बोलण्याकडे

भेटण्याआधीच निश्चित असते जेव्हा वेळ जायची !

समजुतदार मुलांसारखी खेळणी आवरून घ्यायची !

एकदम कर पाठ आणि मन कर कोरे !

भेटलो ते ही बरे झाले ! चाललो ते ही बरे !

मी ही घेतो आवरून सारे ! तू ही सावरून जा !

तळहातीच्या रेषांमधल्या वळणावरून जा !

खुदा-बिदा असलाच तर मग त्यालाच सोबत घे !

' करार पूर्ण झाला ' अशी तेवढी दे !

- मौनाची भाषांतरे, संदिप खरे


डोंगळ्याचं जीणं

Share

"तुझ्याकडे तर दिसत नाही एखादीही डिग्री..."
पारावरच्या डोंगळ्याला मी विचारले -
"...आणि तरीही चांगला गलेलठ्ठ जगतो आहेस..."

तो थबकला
कसनुसं म्हणाला -
"छे ! आमचं कसलं आलंय...डोंगळ्याचं जीणं !"

"नाहीतरी काय एवढा फरक आहे ?"
मी म्हणालो...
आणि डोंगळ्यासारखा तुरूतुरू पुढे निघालो......

------------------------------------संदीप

हरकत नाही...

Share

"अक्षर छान आलंय यात !"
माझी कविता वाचताना
मान तिरकी करत
ती एवढंच म्हणते...

डोळ्यांत तुडुंब भरलेली झोप,
कपाळावर पेंगत बसलेले काही भुरटे केस,
निसटून गेलेली एक चुकार जांभई,
आणि नंतर...
वाचता वाचता मध्येच
आपसूक मिटलेले तुझे डोळे,
कलंडलेली मान,
आणि हातातून अशीच कधीतरी निसटलेली,
जमिनीवर पडलेली
माझी कवितांची वही...

हरकर नाही, हरकत नाही;
कविता म्हणजे तरी आणखी काय असतं !!

-----------------------------------------------संदीप

दोघे...नकळते...

Share

...ती म्हटली - ?ते आलेच ओघाओघाने...?
मी म्हटले - "तू कधी येणार ?-
- ओघाओघाने जाऊ दे
निदान एखादी बारीकशी धार ?"

...ती म्हटली - ?तुला काय ? आता खुश्शाल
झोपशील...?
मी म्हटले - " आमेन ! -
- अजून बरीच रात्र आहे शिलकीत...
मेणासारखा चटके खात
मेणबत्तीभोवतीच जमेन !!"

...ती म्हटली - ?कळतच नाही काय बोलतोस...
मी जातेच कशी !?
मी म्हटले - "ते आलेच ओघाओघाने...
आता रात्रीच्या मिठीत मी
आणि माझ्या मिठीत उशी !!".......

-----------------------------------------------संदीप

समुद्राकाठच्या कविता

Share

(१)
हा समुद्र...
हजार लाटांनी समजावतो आहे या तटाला
तरीही त्याचे ?जमिनपण?
प्रत्येक लाटेला ओसरवताना
रंगीतच होते आहे अधिकाधिक......!

(२)
बदलते,मावळते रंग
गोंदवून घेण्याचा
मनस्वी छंद या वाळूला
खूप जुना !

(३)
त्या मावळत्या तांबड्या टिकलीला
हे कपाळ रोजचेच...
युगानुयुगांचे अभंग पातिव्रत्य !

(४)
दूरवर विरघळते आहे
आणखी एक संध्याकाळ
समुद्राच्या पाण्यात...
...तू कुठे आहेस, प्रिय ?
बघ, हे जीवघेणे विरघळणे ......

(५)
खूप वरचे स्वर लागताहेत आज
अचूक आणि भिजलेले...
त्यात हा समुद्राचा अखंड खर्ज...
असेच गाणे येईल ?

(६)
जायची वेळ ! वारा सुटलाय...
माझी परतती पावलंही
त्रयस्थपणे पुसतो आहे हा समुद्र !
दुसर्याला रडवणारी
कसली ही स्थितप्रद्न्यता......प्रिय ?

(७)
मी नसेन
तेव्हाचा समुद्र पाहायचा आहे......

(८)
मी नसताना
खडकांच्या गळ्यात हात टाकून
उदास ह्सत असेल हा...
...असेल ना, प्रिय ?.......

(९)
येतो...सार्यांनो...येतो...

(१०)
...हुरहुर...
...लाटेगणिक...
...लाटाभर...


---------------------------------------------- संदीप .

किती ? (एक जनरल छापील फॉर्म)

Share

तू आवडतोस/तेस
तू खूप आवडतोस/तेस
तू प्रचंड आवडतोस/तेस
तू सॉलीड आवडतोस/तेस
तू अफाट आवडतोस/तेस
तुझ्यावाचून जगणे नाही इतका/की आवडतोस/तेस
श्वास घेणं शक्य नाही इतका/की आवडतोस/तेस
तू नसशील तर नसेन मी ही इतका/की आवडतोस/तेस

तो/ती खपून आता वर्ष होईल अवघं दीड
पण अजूनही आवडतंच त्याला/तिला
वाडीलालचं चॉकलेट आईस्क्रीम,
ब्राऊन शेडेड शर्ट/साड्या,
सनसेट, भीमसेन, पिकासो, परफ्युम्स...
आणिक हो !
आताशा ऑफिस सुटल्यानंतर
त्याच्या/तिच्या ऑफिस सुटल्यानंतर
त्याच्या/तिच्या ऑफिस कलीगची कंपनीही
एक कप कॉफीसाठी (?)...
?तो?/?ती? असली म्हणजे मन थोडं हलकं होतं...यू नोऽऽ

?तो?/?ती? आवडतो/ते
?तो?/?ती? खूप आवडतो/ते
?तो?/?ती? चिकार आवडतो/ते
...तुझ्यावाचून जगणे नाही...
...श्वास घेणं शक्य नाही...
...तू नसशील तर नसेन मी ही...
.................वगैरे.....


------------------------------------- संदीप .

बंद तटांशी या लाटांशी कधी थाबती पाय

Share

बंद तटांशी या लाटांशी कधी थाबती पाय
पश्चिम वा-यावरती मज हे ऐकू येते काय
जीव भाबडा जगावेगळा बोलू गेला काय
जन्म मातीचा स्वप्न नभाचे तोलू गेला काय
तुझ्या वीजेचे दान माझिया मातीला देना
ये ना ये ये ना ये ना ये ना ये ये ना

जरीही बघतो विसरून तुजला तरीही का ऐसे
नभास म्हणतो जमीन आणिक जमीन जळ भासे
कैफ तुझ्या स्मरणांचा कैसा अजून उतरेना
ये ना ये ये ना ये ना ये ना ये ये ना

खिन्न काजळी जरीही चमके आतून रुधिराशी
लखलख ओळी तुझीयावरच्या येती अधराशी
जन्म हारलो पणास याचे इमान उतरेना
ये ना ये ये ना ये ना ये ना ये ये ना

तुला ऐकू दे तुला स्पर्शू दे तुला पाहू दे ना
हिशोब पापा - पुण्याचे हे ज़रा राहू दे ना
क्षणापायी हा शाप युगांचा मला झेलू दे ना
ये ना ये ये ना ये ना ये ना ये ये ना


संदीप खरे

चिमुकल्या चोचीमध्ये आभाळाचे गाणे

Share

चिमुकल्या चोचीमध्ये आभाळाचे गाणे
मातीतल्या कणसाला मोतीयाचे दाणे
उगवत्या उन्हाला या सोनसळी अंग
पश्चिमेच्या कागदाला केशरीया रंग
देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय... देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय...
धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, तारा...

सूर्यासाठी उषा आणि चंद्रासाठी निशा
घरी परतण्यासाठी पाखरांना दिशा
मध खाते माशी तरी सोंडेमध्ये डंख
चिकटला कोळी त्याच्या पायाखाली डिंक
देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय... देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय...
धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, तारा...

नागोबाच्या फण्यावर दहाचा आकडा
खेकड्याच्या प्रवासाचा नकाशा वाकडा
करवंदाला चिक आणि आळूला या खाज
कुणी नाही बघे तरी लाजाळूला लाज
देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय... देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय...
धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, तारा...

मूठभर जीव अन्‌ हातभर ता‍न
कोकिळेला गुरू नाही तरी गाई गान
काजव्याच्या पोटातून जळे गार दिवा
पावसाच्या अगोदर ओली होते हवा
देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय... देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय...
धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, तारा...

भिजे माती आणि उरे अत्तर हवेत
छोट्या छोट्या बियांतून पिके सारे शेत
नाजूकशा गुलाबाच्या भवतीने काटे
सरळशा खोडावर फुले दहा फाटे
देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय... देतंय कोण, देतंय कोण, देतंय कोण देतंय...
धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, धुम तारारा धुम, तारा...

गीत: संदीप खरे.
संगीत: सलिल कुलकर्णी.
स्वर: श्रेया घोषाल.

धैर्य

Share

जसं की...कांदा
कांद्याच्या आत वाटी...
वाटीच्या आत वाटी...
वाटीत वाटी...वाटीत वाटी...
कांदाणू...
परमकांदाणू...
आणखी आत...आत आsत...
अगदी आssत?...
माहित नाही......


जसं की...कांदा
त्याच्यावर हवा...
त्याच्याभोवती हवा...
हवेभोवती हवा...
तिचे थरांवर थर...
मग...निर्वात...
अंधार...
अंतराळ...
अंतराळं...
बाहेर...
अगदी बाsहेर...
अगदी बाssहेरचं?
माहित नाही......

...ती पडल्या पडल्या डोळाभर बघते मला
आणि मग डोळे मिटून हातांनी ?चाचपत? राहते,
सद्ध्या तिच्या असलेल्या हातांनी?
सद्ध्या माझा असलेला चेहरा......
ही कविता खरं तर भीत भीत...
कापर्या कापर्या हातांनी
तिलाच लिहायची होती एकदा...
तिचं धैर्य होत नाही...माझं होतं...एवढंच !

------------------------------------- संदीप

उशीरा उशीरा

Share

कधी बोललो मी उशीरा उशीरा, कधी दान पडले उशीरा उशीरा
आयुष्य अवघे चुकामुक आहे, मला हे समजले उशीरा उशीरा

मला मागते ती दटावून आता, तिचे चित्र माझ्या खिशाआतले ते
तिने पहिले हे तिचे श्रेय नाही, जरा मी लपवले उशीरा उशीरा !!

जिवा गुंतवू पाहिले मी अवेळी, नको त्या स्थळी अन नको त्या प्रसंगी
तिला सर्व वेळीच लक्षात आले, मला फार कळले उशीरा उशीरा

अता प्राक्तनाचा उजाडेल तारा, किती जागुनी वाट मी पाहताहे
कधी ना कळे नीज लागून गेली, सितारे झळकले उशीरा उशीरा

किती पाहिली स्वप्न मी बेईमानी, अता खेदखंती कराव्या कशाला?
मला सत्य आधीच ठाऊक होते, पुरावे गवसले उशीरा उशीरा !

गड्या, जिंदगी हाय जमलीच नाही, तिला मी-मला ती उमगलीच नाही
जिण्याचा कधी पीळ गेलाच नाही जरी दोर जळले उशीरा उशीरा !!


संदीप खरे,

(नेणीवेची अक्षरे)

जोखीम

Share

काळ्या मोत्यांपरी नेत्र हे ! ओठ माणकांपरी !

सुवर्ण ओतुन घडली काया ! कुंतल रेशीमसरी !

संगमर्मरी पोट नितळसे ! घट मोहाचे वक्षी !

अवघड वळणे घेवुन फिरली तारुण्याची नक्षी !!


वळणावळणावरी चोरटे नेत्र पाजळून जागे

आणि तनुवर मिरवित खजिना तुला फिरावे लागे

असे दागिने जडले बाई मोलाचे तव देही

जन्मभराची जोखीम झाली ! कुणा कल्पना नाही !!


------- मौनाची भाषांतरे, संदिप खरे

म्हातारपण

Share

एकदा आले संध्याकाळी सोसाट्याचे वारे
डोक्यावरचे केस उडवून नेले सारे

येत नाही म्हणत, ऐकू कान सोडून गेले
वाक्यामधले अधले मधले शब्द सोडून गेले

चष्मा खराब, डोळे खराब काही कळत नाही
मागचे सारे दिसते स्पष्ट, पुढचे दिसत नाही

जेवण संपवून दंताजींची पंगत उठली सगळी
जून तोंडी पडली नेमकी देखणी गोरी कवळी

कंप कंपनीचा संप करतात बोटे काही
कापत रहातो पायच नुसता , अंतर कापत नाही

देहसदन सोसायटीचे हल्ली झालेत वांदे
जूने झाले बांदे, तरी आखडून वाकतात खांदे

मन म्हणते, कशाला या अर्थ असतो काही?
मान म्हणते तिन्ही त्रिकाळ नाही नाही नाही

शिवून घेतला सूट नवा , सवलती सकट
सुरकुत्यांचे क्रेप कापड , शिवणावळ फुकट

इतका सारा मेकअप , आता नाटकाला मजा
मुलगे झाले आजोबा अन मुलींच्या आज्ज्या

ओबड धोबड फणसा सारखे पिकत चालले क्षण
आवाज झालाय पावरी सारखा , शेवरी सारखे मन..

एकदा आले संध्याकाळी सोसाट्याचे वारे
डोक्यावरचे केस उडवून नेले सारे

... संदीप खरे ...

हा खडक काही केल्या पाझरत नाही

Share

हा खडक काही केल्या पाझरत नाही
मी याला पहाटे गोंजारले आहे,
संध्याकाळी मावळत्या सूर्याच्या पश्विम रंगांची भूल देऊन पाहिली आहे,
रात्री माळरानावर नाचणार्‍या पौर्णिमेच्या चांदण्यांची शाल पांघरली आहे,
पण हा खडक काही केल्या पाझरत नाही.

उन्हाळ्यात हा तापतो,
थंडीमध्ये हा अगदी स्वभावगार,
पावसाळ्यात हा अगदीच इलाज नाही म्हणून
किंवा अगदीच वाईट दिसेल म्हणून
हिरव्या शेवाळ्याची किंचितशी शोभा वस्त्रे बाहेर बाहेर मिरवत बसतो
पण आत्ता हा खडक काही केल्या पाझरत नाही.

आता आता अजूनही मी या माळरानावर भटकायला येतो,
पण माझ्या सार्‍या गुराखी मित्रांबरोबर न रहाता
मोठ्या आशेने याच्या शेजारी येऊन बसतो
की.. हा खडक कधीतरी पाझरेल तेव्हा आपण तिथे असायला हवं.
मी माझी गाणी आवरून धरली आहेत;
मी आता पावाही वाजवत नाही;
किंवा पावलांनाही आता आतूनंच नाचावसं वाटत नाही;
या सार्‍यांच्यापार मला या खडकाविषयी उत्सुकता वाटू लागली आहे.
खडकाला माझ्याविषयी असे काहीच वाटत नाही
हे ज्या क्षणी लक्षात आले
तेव्हापासून मी असण्यापेक्षा खडक असणेच जास्तं चांगले असे वाटू लागले आहे.

मी खडक असतो तर मलाही असं
माझ्याविषयी उत्सुकता वाटणारा,
मी आतून पाझरायला हवे असे वाटणारा
कोणी "मी" भेटेल ?
माझे प्रश्न, वर निळे आकाश, खाली हिरवे गवत,
त्या गवतावरती मी, माझ्या शेजारी हा खडक.
हा खडक काही केल्या पाझरत नाही.

हे सारे कित्येक दिवस चालू आहे.
आयुष्यभर पुरेल असे एखादे कोडे मिळणे
हेही असू शकते आयुष्याचे सार्थक.
मला माझ्या आयुष्याचे सार्थक मिळाले आहे;
मला माझ्या आयुष्याचे प्रश्न समजले आहेत.
उत्तर नसलेल्या प्रश्नावर नजर रोखून त्राटक करताना...
आता आता जाणवत नाहीसे झाले आहे -
वारा, ऊन, थंडी, पाऊस;
भुलवत नाहीसे झाले आहे -
छंद, इच्छा, अपेक्षा, ओस;
खडक झाल्यासारखे वाटत आहे.

---

संदीप खरे.

प्रेम नाही; हवी असते एक जखम फक्त

Share

प्रेम नाही; हवी असते एक जखम फक्त
ज्याच्यायोगे गरम राहील धमन्यानमधील रक्त
ओल्या आठावनिंचे काही क्षण हवे असतात
चाकोरिला उध्वस्ताचे घन हवे असतात....

तसे काही चेहेर्यावरती अधिक उणे नसते
पण मनात दु:खी हसनार्यांचे हसने वेगले दिसते!
ओठात नाही हवी असते डोळ्यात एक कथा
हवी असते षडाजासारखी सलग, शांत व्यथा.........

गाणे नाही; गाण्यासाठी उर्मी हवी असते
स्वर नाही, हव्या असतात स्वरान्मधाल्या श्रुति
प्रेम नाही, हवी असते मला चवथी मिति!

प्रेम नाही दु:खासाठी तारण हवे असते
स्वत:वरच हसण्यासाठी कारण हवे असते
मनासाठी हवा असतो अस्वथाचा शाप
आत्म्यासाठी हवा असतो निखल पश्चाताप!

संदीप खरे ( नेणिवेची अक्षरे).

सरीवर सर?

Share

सरीवर सर?

दूर दूर नभपार डोंगराच्या माथ्यावर
निळे निळे गार गार पावसाचे घरदार
सरीवर सर..

तडा तडा गार गारा गरा गरा फ़िरे वारा
मेघियाच्या ओंजळीत वीज थिजलेला पारा
दूरवर रानभर नाचणारा निळा मोर
मोरपीस मखमल उतू गेले मनभर
सरीवर सर..

थेंब थेंब मोती ओला थरारत्या तनावर
शहार्‍याचे रान आले एका एका पानावर
ओल्या ओल्या मातीतून भिजवेडी मेघधून
फ़िटताना नवे ऊन झाले पुन्हा नवथर
सरीवर सर..

उधळत गात गात पाय पुन्हा परसात
माती मऊ काळी साय हूर हूर पावलात
असे नभ झरताना घरदार भरताना
आले जल गेले जल झाले जल आरपार
सरीवर सर..

अशा पावसात सये व्हावे तुझे येणेजाणे
उमलते ओले रान रान नव्हे मन तुझे
जशी ओली हूर हूर तरारते रानभर
तसे नाव तरारावे मझे तुझ्या मनभर

sandeep khare

आताशा.. असे हे.. मला काय होते!!!

Share

आताशा.. असे हे.. मला काय होते!!!
कुण्या काळचे , पाणी डोळ्यात येते.....
बरा बोलता बोलता , स्तब्ध होतो...
कशी शांतता , शून्य शब्दांत येते.......
आताशा.. असे हे .. मला काय होते!!!
कुण्या काळ चे , पाणी डोळ्यात येते!!!

कधी दाटु येता , पसारा घनांचा....
कसा सावला रंग , होतो मनाचा...
असे हालते .. आत हलुवार काही...
जसा सप्र्श पाण्यावरी चाँदण्याचा....

असा ऐकू येतो , क्षणाचा इशारा ...
क्षणी व्यरथ होतो ... दीशांचा पसारा...
नभातुन ज्या .. रोज जातो बुडूनी..
नभाशीच त्या... मागु जातो कीनारा....

न अंदाज कुठले.. न अवधान काही....
कुठे जायचे , यायचे भान नाही..
जसा गंध नीघतो, हवेच्या प्रवासा
न कुठले नकाशे.. न अनुमान काही....

कशी ही अवस्था.. कुणाला कलावे..
कुणाला पुसावे.. कुणी उत्तरावे...
कीती खोल जातो, तरी तोल जातो...
असा तोल जाता.. कुणी सावरावे....

आताशा .. असे हे ..मला काय होते ....
कुण्या काळ चे ,पाणी डोळ्यात येते....
बर बोलता बोलता , स्तब्ध होतो.
कशी शांतता शून्य शब्दांत येते...

आताशा असे हे मला काय होते ....
कुण्या काळ चे पाणी डोळ्यात येते.....

sandeep khare

भेटण्यास आलि तु अन

Share

भेटण्यास आलि तु अन
पाउस सुरु झाला होता,
थांबण्यास मज जवळ
किति सुंदर बहाणा होता.
बाहेर पाउस, गारठा हवेत.
आग देहात, कंपने ह्रुदयात.
कमनिय बांधा तुझा,
धिर धरु किति,
हा वेडा एकांत
मनांस आवरु किति.
घडावयाचे विपरीत,
नेमके तेच घडले.
घेतले मिठित तुजला
भान आपले हरपले.
चुंबिता मधाळ ओठांना
गालावर पसरली लालि,
फिरता हात वक्षावर
सारी तनु थरथरली.
भान नसे वसनांचे,
देह नग्न मिठित असे,
सोड ति सारी लाज,
साथ प्रेम चेष्टेस दे सखे.
रमलो देहात आपण
काळांचे […]

मी फसलो म्हणूनी...

Share

मी फसलो म्हणूनी हसू दे वा चिडवू दे कोणी
ती वेळच होती वेडी अन् नितांत लोभसवाणी

ती उन्हे रेशमी होती, चांदणे धगीचे होते
कवितेच्या शेतामधले ते दिवस सुगीचे होते
संकेतस्थळांचे सूर त्या लालस ओठी होते
ती वेळ पूरीया होती, अन् झाड मारवा होते

आरोहा बिलगायाचा तो धीट खुळा अवरोह
भरभरून यायचे तेंव्हा त्या दृष्ट नयनींचे डोह
डोहात तळाशी खोल वर्तमान विरघळलेले
अन् शब्दांच्या गाली पाणी थोडेसे ओघळलेले

ती हार असो वा जीत, मज कुठले अप्रूप नाही
त्या गंधित गोष्टीमधला क्षण कुठला विद्रूप नाही
ती लालकेशरी संध्या निघताना अडखळलेली
ती निघून जातानाही, बघ ओंजळ भरूनी ओली

- संदीप खरे

आम्हास वाटले……..आत्ता पाउस पडेल…..!

Share

आम्हास वाटले……..आत्ता पाउस पडेल…..!
रखरखत्या उन्हात काले ढग जमले…….
पावसात भिजण्यासाठी मग मन रमले…..!
अचानक एक वीज चमक्ली……
आम्हास वाटले……..आत्ता पाउस पडेल…..!
अंगाची लाही लाही होत होती…….
मनात भिजण्याची तमन्ना झाली….
कुठून एक सर आली……
आम्हास वाटले……..आत्ता पाउस पडेल…..!
एक थेम्ब मग वरुन पडला तळहातावर…….
ओंजलित घेउन मग त्याच्याकडे पाहू लागलो
ढग सरला……सूर्य तापला
थेम्ब वाफ होउन उडून गेला…….
पुन्हा केंव्हातरी एक ढग येईल……
मनास पावसाची चाहुल देईल…….
अचानक

--

तुझा माझा पहिला पाउस……

Share

तुझा माझा पहिला पाउस……
गेल्या पावसाळ्यात ओळख झाली
पण एकत्र भिजायची न कधी संधी आली
त्यावेळी नुसते बोलत होतो…..
आत्ता भेटण्याची धुंदी आली
यंदाचा आपला पहिला पाउस
एकत्र भिजायची लागली हौस
दूर डोंगर माथ्यावर जायचं….
मनसोक्त झेलायचा पाउस
उन्हाळा वाढला खूप
पावसाचं वेगळच सुख
चिंब होवून भिजयचं……
लुटायचं निसर्गाचं रूप
ओंजळीत थेंब घ्यायचे
अलगद मोती व्ह्यायचे
शिंपडून तुझ्यावर ते सारे…..
मला मिठीत तुझ्या यायचे
पहिल्या पावसाची पहिली सर
लांब हिंडायचं सोडुनी घर
तुझा माझा

स्वर टिपेचा

Share

स्वर टिपेचा आज वेचा ! रे उद्या, फुटणार काचा !
जायचे जातील ! पाहू सोहळा ; उरतील त्यांचा !

विस्मरुया आज सारे रंग ज्वाळेचा चीतेच्या.
चुंबनाचा रंग प्राशू लाजओल्या रक्तिम्याचा !

देहही नव्हता तपस्वी , जीवही नव्हता कलंदर...
झोपताना फक्त कुरवाळून घ्याव्या विद्ध टाचा...

संगतीला दोन हिरवे हात घेऊन चाललो मी,
थाटण्या संसार ग्रिष्माच्या शिवेवर ; पावसाचा !!!

- मौनाची भाषांतरे, संदिप खरे

व्हायचंय मला पाउस एकदा

Share

व्हायचंय मला पाउस एकदा
रिमझिम रिमझिम बरसायचय्
अलगद पनांवरुन ओघळायचय
आनि मतिशि एकरुप व्हयचय
पडायचंय मला कुणाच्या तरि छत्रिवर्
टोपिवर् घरावर आनि छपरावर
झिरपयचंय् कुणाच्यातरि केसांतून
आणि वहायचंय रस्त्याकडेच्या नल्यातुन
पहून मला होतील काहिजण खुश
बाकिचे देतील शिव्या खुप
तरिही बरस बरस बरसायचंय
काहिन्च्या दुवा काहिंच्या शिव्या ऐकायचय
अचानक् बरसून फ़सवयचंय
रस्त्याकडेला सगळ्यांना थांबवायचय
मग अगदि अलगद संपायचय
पण खरच
व्हायचंय मला पाउस एकदा

वा-यासवे लहरणारी

Share

वा-यासवे लहरणारी
मुक्त लहर मी
अबोल अव्यक्त फुलणारी
मुग्ध अबोली मी
आसमंती दरव्ळणारी
कस्तुरी मी
हसणारी, हुरहुरणारी
भिरभिरणारी, थरथरणारी
सोनसळी किरणांची
प्रतिमा मी
मी मुग्धा मी स्निग्धा
चांदणे उधळीत जाणारी
चंदनशलाका
मागे येशील
तर उडून जाईन
कापरासारखी
ये ये म्हणशील
मुळीच येणार नाही
करशील तू आराधना जेव्हा
तपस्वी होऊन
आणशील मला वेड्या
चांदण्यातून खेचून
सख्या तुझी, तुझीच रे मी
शुभ्र प्रतिभा !!
मैत्रेयी भागवत
मुक्त लहर मी
अबोल अव्यक्त फुलणारी
मुग्ध अबोली मी
आसमंती दरव्ळणारी
कस्तुरी मी
हसणारी, हुरहुरणारी
भिरभिरणारी, थरथरणारी
सोनसळी किरणांची
प्रतिमा मी
मी मुग्धा मी स्निग्धा
चांदणे उधळीत जाणारी
चंदनशलाका
मागे येशील
तर उडून जाईन
कापरासारखी
ये ये म्हणशील
मुळीच येणार नाही
करशील तू आराधना जेव्हा
तपस्वी होऊन
आणशील मला वेड्या
चांदण्यातून खेचून
सख्या तुझी, तुझीच रे मी
शुभ्र प्रतिभा !!
मैत्रेयी भागवत

हरकत नाही...

Share

हरकत नाही...
"अक्षर छान आलंय यात !"
माझी कविता वाचताना
मान तिरकी करत
ती एवढंच म्हणते...

डोळ्यांत तुडुंब भरलेली झोप,
कपाळावर पेंगत बसलेले काही भुरटे केस,
निसटून गेलेली एक चुकार जांभई,
आणि नंतर...
वाचता वाचता मध्येच
आपसूक मिटलेले तुझे डोळे,
कलंडलेली मान,
आणि हातातून अशीच कधीतरी निसटलेली,
जमिनीवर पडलेली
माझी कवितांची वही...

हरकर नाही, हरकत नाही;
कविता म्हणजे तरी आणखी काय असतं !!

- संदीप खरे

खूप बोललो आता एवढंच सांग

Share

खूप बोललो आता एवढंच सांग
डोळ्यांतून लागतो का मनाचा थांग ?
आठव ना पक्ष्यांचे रंगीत थवे...
मी म्हटलं - ’चंचल असतात !’
तू म्हटलंस - "आपल्याला हवेत !!"
मग छाती फुटून धावलो...धावावंच लागतं...
हातातून हात सुटून जातात, दु:ख त्याचं असतं...

कसले गं सूर ? कसले शब्द ? सारंच थोटं...
जगण्याला नसतंच धड, असलंच तर ते थोटं !
हात आहेत, पण ते हलत नाहीत
त्यांना फुलं टोचतात, काटे सलत नाहीत !
हा तुझा अणुकुचीदार ’का?’ ठेवशील का बाजूला ?
भिंत बांधली गेली एवढंच खरं, एकेक वीट उपसा कशाला ?

तीन भिंती झाल्या होत्या बांधून
तेवढ्यात तू आलीस...
आणि अशी आत-बाहेर नाचते आहेस आता चिमणीसारखी
की चौथी भिंत बांधताही येत नाही......

मी ही धावायचो वार्यावर, उभा असायचो माळरानावर
मी ही पळायचो पक्ष्यांपाठी...माझ्याही घराला नव्हत्या भिंती...
असो ! आता स्पष्टीकरणे नकोत जास्त
माझीच माझ्यावर चालू आहे गस्त !

चौथ्या भिंतीचे बांधकाम चालू आहे
अजून बांधून झाली नाही...
आत का बाहेर ते एकदाच ठरव
नंतर आतलं बाहेर नाही आणि बाहेरचं आत नाही......

अगंss भिंत असली तरी आकाश दिसतं;
आणि नीट बघीतलं तर आकाशात देव !
जगायला एवढं...अगदी एवढंच लागतं...

- संदिप खरे

किती झाले.. ?

Share

रात्री बायको बरोबर गाडी वरुन घरी जाताना ती खोडकर आवाजात सांगू लागते आमच्याच घरच्या खाणाखूणा... ' हां.. आता इथून डावीकडे... आता सरळ.. त्या मारुती पासून उजवीकडे वळा.. थोडी पुढे घ्या अजुन... पांढर्‍या गेटपाशी थांबवा... हां... बास बास... इथेच... ' आणि मग उतरत, पर्स काढत विचारते हसत हसत - ' हां... किती झाले ? ' ८४ लक्ष तर झालेच की प्रीये ! हा तरी शेवटचा की नव्या जन्मवर्तुळाचा हा प्रारंभ ... ठाउक नाही ! गतजन्माचे आठवत नसेलही काही आपल्याला, पण तेंव्हाही असतील असेच तुझे जन्मप्रामाणिक हसरे क्षण आणि माझे अंतःस्थ उदासीन प्रश्न काही !! आता पर्स काढलीच आहेस तर ठेव हातावर एखादी साखरहळवी टॉफी... गोड चविने सरु दे अजुन एक रात्र... अंधारातच चढायचा आहे एक एक जिना... हातात हात तेवढा राहू दे फक्त.... - मौनाची भाषांतरे, संदिप खरे

हे भलते अवघड असते….

Share

गाडी सुटली, रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन् ओले
गाडी सुटली, पडले चेहरे, क्षण साधाया हसरे झाले
गाडी सुटली, हातामधुनी हात कापरा तरी सुटेना
अंतरातली ओली माया तुटूदे म्हटले तरी तुटेना
का रे इतका लळा लावुनी नंतर मग ही गाडी सुटते
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते
गाडी गेली फलाटावरी नि:श्वासांचा कचरा झाला
गाडी गेली डोळ्यामधल्या निर्धाराचा पारा फुटला

हे भलते अवघड असते... हे भलते अवघड असते...
कुणी प्रचंड आवडणारे... ते दूर दूर जाताना...
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना...
डोळ्यातील अडवून पाणी... हुंदका रोखुनी कंठी...
तुम्ही केविलवाणे हसता अन् तुम्हास नियती हसते...

तरी असतो पकडायाचा... हातात रुमाल गुलाबी...
वार्‍यावर फडकवताना... पाह्यची चालती गाडी...
ती खिडकीतून बघणारी अन् स्वतः मधे रमलेली...
गजरा माळावा इतुके... ती सहज अलविदा म्हणते...

तुम्ही म्हणता मनास आता, हा तोडायाचा सेतू...
इतक्यात म्हणे ती - माझ्या कधी गावा येशील का तू?
ती सहजच म्हणुनी जाते... मग सहजच हळवी होते...
गजर्‍यातील दोन कळ्या अन् हलकेच ओंजळीत देते...

कळते की गेली वेळ... ना आता सुटणे गाठ...
आपुल्याच मनातील स्वप्ने... घेऊन मिटावी मूठ...
ही मूठ उघडण्यापूर्वी... चल निघुया पाऊल म्हणते...
पण पाऊल निघण्यापूर्वी... गाडीच अचानक निघते...

परतीच्या वाटेवरती गुदमरून जड पायांनी...
ओठावर शीळ दिवाणी... बेफिकीर पण थरथरती...
पण क्षण क्षण वाढत असते... अंतर हे तुमच्यामधले...
मित्रांशी हसतानाही... हे दु:ख चरचरत असते...

हे भलते अवघड असते….


- संदिप खरे

रिक्त

Share

उगिच बोलायचे, उगिच हासायचे
उगिच कैसेतरी दिवस काढायचे

मधुन जमवायचे तेच ते चेहरे
मधुन वाऱ्यावरी घरच उधळायचे

चुकुन अपुली कधी हाक ऐकायची
मन पुन्हा बावरे धरुन बांधायचे

रडत राखायची लोचने कोरडी
सतत कोठेतरी भिजत धुमसायचे

उगिच शोधायचे भास विजनातले
अटळ आयुष्य हे टळत टाळायचे

ह्या इथे ही तृषा कधि न भागायची
मीच पेल्यातुनी रिक्त सांडायचे!


- (एल्गार) सुरेश भट

खरखीत उन्हात

Share

खरखीत उन्हात
तू यायचीस झुळूक बनून
गारवा शिपत जायचीस
सप्तरंगाची बरसत व्हायची
गालाची लाली
नभाला गुलाबी करायची
सकळच्या किरणांसवे
पाण्याला सोनसळी झळाळी द्यायचीस
नेहमी वाटायचं
वाळवंटातही तू
हिरवाई बनून यायचीस
थकल्या सावल्यांसाठी
निळाई बनून यायचीस
राहवले नाही ग मला
तू रंगविभोरी
रंग वेचत गेलो
तुझ्या मागे धावलो
वाटले तू हरखून जाशील
तुझेच रंग पाहून
तू वळून पाहिलेस
हसण्यातून चांदणे उधळलेस
मात्र
मला कळून चुकले ग
रंगांचा तुझ्या नयनांना
उपयोग नव्ह्ता..
तू जन्मतःच रंगांधळी होतीस ..!!

कधी तऱ्ही वेड्यागत वागयाला हवे ||

Share

कधी तऱ्ही वेड्यागत वागयाला हवे ||

भांड्या वर भांड कधी भिडायला हवे
उगाचच सखी वारी चिडायाला हवे
मुखातून तिच्यावर पाखारता आग
एकी कडे प्रेम गीत लिहायाला हवे
कधी तऱ्ही वेड्यागत वागयाला हवे ||

विळीपरी कधी एक चंद्रकोर घ्यावी
फिरविशी स्वप्ने धारे धारेने चिरावी
कोर कोर चंद्र चंद्र हारता हारता
मनातून पूर्णबिंब तगायला हवे
कधी तऱ्ही वेड्यागत वागयाला हवे ||

मनातल्या माकडाशी हात मिलवून
आचरावे कधीतरी विचारावाचून
झ्हादापास झ्होम्बुनिया येत हातापाशी फळ
सहज तेही फेकायाला हवे
कधी तऱ्ही वेड्यागत वागयाला हवे ||

कधी रात्री लावूनिया नयनांचे दिवे
पुस्तकाला काहीतरी वाचायाला द्यावे
शोधुनिया प्राणातले दुमडले पान
मग त्याने आपल्याला चाळायला हवे
कधी तऱ्ही वेड्यागत वागयाला हवे ||

स्वत:ला विकून काय घेशील विकत
खरी खरी सुखे राजा मिळती फुकट
हापापून बाजारात मागशील किती
स्वत:तच नवे काही शोधायला हवे
कधी तऱ्ही वेड्यागत वागयाला हवे ||

तेच तेच पाणी आणि तीच तीच हवा
आणि तुला बदलही कशासाठी हवा
जुनेच अजून आहे रीयाजा वाचून
गिळलेले आधी पचायला हवे
कधी तऱ्ही वेड्यागत वागयाला हवे ||

नको बघू पाठीमागे येईल कळून
कितीतरी करायचे गेलेले राहून
नको करू त्रागा असा उद्याच्या दारात
स्वत:ला कधीतरी माफ करायला हवे
कधी तऱ्ही वेड्यागत वागयाला हवे ||

संदीप खरे

राधे रंग तुझा गोरा

Share

राधे रंग तुझा गोरा
सांग कशाने रापला |
मिठीतून सावळ्याच्या
रंग सावळा लागला ||

राधे दृष्टीतून का ग
घन सावळा भिजला |
इथे तुझा डोळा पाणी
तिथे मुरारी भिजला ||

डोळा पाणी जिने उन्हा
इंद्रधनुचा सोहळा |
पुसटले साती रंग
एक श्रीरंग उरला ||

म्हणालो नाही...

Share

तू गेलीस तेव्हा 'थांब' म्हणालो नाही
'का जाशी ?' ते ही 'सांग' म्हणालो नाही,
होतीस जरी बाजूस उभी तू माझ्या
'हे अंतर आहे लांब' म्हणालो नाही...

मज स्मरते ना ती वेळ कोणती होती
घन ओले का नजरच ओली होती,
निपटून काढता डोळ्यांमधले पाणी
'जा! फिटले सारे पांग!' म्हणालो नाही...

बोलून इथे थकले मौनाचे रावे
कोणास कळाले म्हणून तुज उमगावे!
असहाय्य लागला आतून वणवा सारा
पणा वणव्याला त्या आग म्हणालो नाही...

बघ अनोळख्यागत चंद्र टेकवून भाळी
ओलांडून गेलीस तू कवितेच्या ओळी,
तुज अन्य नको काही तर सोबत म्हणुनी
जा घेऊन माझा राग - म्हणालो नाही...

हे श्रेय न माझे! तुझेच देणे आहे!
मन माझे अजुनी नितळ शुभ्रसे आहे,
जो एकच उरला ठसा तुझ्या स्पर्शाचा
तो चंद्रावरचा डाग - म्हणालो नाही...


कवी - संदीप खरे

बरं झालं...

Share

या जमिनीत
एकदा स्वतःला गाडून घेईन म्हणतो...
चारदोन पावसाळे बरसून गेले
की रानातलं झाड बनून
परत एकदा बाहेर येईन...
म्हणजे मग माझ्या झाडावरच्या
पानापानांतून, देठादेठावर,
फांदीफांदीलाच मीच असेन...
येणारे जाणारे क्षण्भर थबकून,
सुस्कारत म्हणतील -
"बरं झालं हे झाड आलं
अगदीच काही नसण्यापेक्षा..."

आणि पानापानांतून माझे चेहरे
त्यांना नकळत न्याहाळत खुदकन् हसतील...
माझ्या पानांतून वाट काढणार्‍या सूर्यकिरणांबरोबर
माझं हसू आणि झुळूकश्वास
माझ्या सावलीतल्या लोकांवर पसरून देईन...
त्यांच्या घामाचे ओघळ
माझ्या सावलीत सुकताना हळूच म्हणेन -
"बरं झालं हे झाड आलं
अगदीच काही नसण्यापेक्षा...!"

माझ्या अंगाखांद्यांवर
आत्तापर्यंत हूल देणारी ती स्वप्निल पाखरं
आता त्यांच्याही नकळत माझ्या अंगाखांद्यांवर झोके घेतील...
त्यांची वसंतांची गाणी
उडत माझ्या कानी येतील...
ती म्हणतील -
"बरं झालं हे झाड आलं...
नाहीतर सगळा रखरखाटच होता !
याच जागी आपल्या मागे लागलेला
तो वेडा कवी कुठे गेला ?"
मी पानं सळसळवत कुजबुजीन -
"बरं झालं मी झाड झालो...
वेडा कवी होण्यापेक्षा"

आणखी काही वर्षांनी
मी सापडतच नसल्याचा शोध
कदाचित, कुणाला तरी लागेलही...
एखाद्या बेवारस, कुठल्याही
पण आनंदी चेहर्‍याच्या शवापुढे
ते माझ्या नावाने अश्रु ढाळतील;
माझी वेडी गाणी आठवत
कोणी दोन थेंब अधिक टाकेल,
आणि...

माझ्या चितेच्या लाकडांसाठी
माझ्याचभोवती गोळा होत
घाव टाकता टाकता ते म्हणतील -
"बरं झालं हे झाड इथे आलं
अगदीच लांब जाण्यापेक्षा..."

माझ्यावरती 'कोणी मी'
जळून राख बनताना
धूर सोडत म्हणेन -
"बरं झालं मी झाड झालो
अगदीच कुजून मरण्यापेक्षा..."


कवी - संदीप खरे

नसतेस घरी तू जेंव्हा

Share

नसतेस घरी तू जेंव्हा
जीव तुटका तुटका होतो,
जगण्याचे विरती धागे
संसार फाटका होतो.

नभ फाटून वीज पडावी
कल्लॊळ तसा ऒढवतो,
ही धरा दिशाहीन होते
अन चंद्र पोरका होतो.

येतात उन्हे दाराशी
हिरमुसून जाती मागे,
खिडकीशी थबकून वारा
तव गंधावाचून जातो.

तव मिठीत विरघळणाऱ्या
मज स्मरती लाघव वेळा,
श्वासाविन हृदय अडावे
मी तसाच अगतिक होतो.

तू सांग सखे मज काय
मी सांगू या घरदारा,
समचा जीव उदास
माझ्यासह मिणमिण मिटतो.

ना अजुन झालो मोठा
ना स्वतंत्र अजुनी झालो,
तुजवाचून उमगत जाते
तुजवाचून जन्मच अडतो.


कवी - संदीप खरे

कसे सरतील सये

Share

कसे सरतील सये माझ्याविना दिस तुझे
सरताना आणि सांग सलतील ना
गुलाबाची फ़ुलं दोन रोज राती डोळ्‌यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना...

पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा
रिते रिते मन तुझे उरे
ओठ वर हसे हसे उरातुन वेडेपिसे
खोल खोल कोण आत झुरे
आता जरा अळीमिळी तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावुन हसशील ना
गुलाबाची फ़ुलं दोन ...

कोण तुझ्या सौधातून ऊभे असे सामसूम
चिडीचुप सुनसान दिवा
आता सांज ढळेलच आणि पुन्हा छळेलच
नभातून गोरा चांदवा
चांदण्यांचे कोटी कण आठवांचे ओले सण
रोज रोज निजपर भरतील ना,
गुलाबाची फ़ुलं दोन ...

इथे दूरदेशी माझ्या सुन्या खिडकीच्या पाशी
जडेसर काचभर तडा
तूचतूच तुझीतुझी तुझ्यातुझ्या तुझेतुझे
सारासारा तुझा तुझा सडा
पडे माझ्या वाटेतून आणि मग काट्यातून
जातानाही पायभर मखमल ना
गुलाबाची फ़ुलं दोन ...

आता नाही बोलायाचे जरा जरा जगायाचे
माळूनिया आबोलीची फ़ुले
देहभर हलू देत विजेवर झुलू देत
तुझ्या माझ्या विरहाचे झुले
जरा घन झुरू दे ना वारा गुदमरू दे ना
तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना

गुलाबाची फ़ुलं दोन रोज रात्री डोळ्यांवर
मुसुमुसु पाणी सांग भरतील ना, भरतील ना...


कवी - संदीप खरे

मनातलीचे श्लोक

Share

प्रिये ये निघोनी घनांच्या कडेने
मला एकटेसे आता वाटताहे,
कुणालाच जे सांगता येत नाही
असे काहीसे मन्मनी दाटताहे.

असे वाटते की तुझ्या पास यावे
तुझ्या सौम्य नेत्रातले नीर व्हावे,
परंतू मला वेळ बांधुन नेते
कधी मुक्तता हे कुणाला ना ठावे.

नको वाटते वाट ह्या पावलांना
नको हालचाली... तनाच्या... मनाच्या,
नकोसे शुभारंभ ध्येया - भियाचे
नकोशाच गप्पा आता सांगतेच्या...

असे वाटते की कधी कोणी नव्हतो
न आहे, न वाहे उरातुन श्वास,
उरा - अंतरातुन यांत्रिकतेने
फिरे फक्त वारा... किंवा तो ही भास!

न ठावे किती वेळ चालेल खेळ
न ठावे किती चावी या माकडाची,
जशी ओढती माळ तैशीच मोजू
भली लांब जपमाळ फुटक्या क्षणांची.

सये पाय दगडी नि दगडीच माथा
अशा देवळातून जाऊन येतो,
न देई कुणा घेतल्यावीण त्याला
नमस्कार नेमस्त देउन येतो.

दिसे जे कवीला न दिसते रवीला
सांगून गेले कुणीसे शहाणे,
मला तू न दिसशी परंतू तयांच्या
नशिबी कसे सांग तुजला पहाणे.

असे वाटणे ही अशी सांज त्यात
दुरावा स्वत:शी तुझ्याशी दुरावा,
किती फाटतो जीव सग्ळ्यात ह्यात
मिठीतुन देईन सगळा पुरावा.


कवी - संदीप खरे

हसलो म्हणजे...

Share

हसलो म्हणजे सुखात आहे ऐसे नाही
हसलो म्हणजे दु:खी नव्हतो ऐसे नाही

हसलो म्हणजे फक्त स्वत:च्या फजितीवर
निर्लज्यागत दिधली होती स्वत:च टाळी;
हसलो कारण शक्यच नव्हते दुसरे काही
डोळ्यामधे पाणी नव्हते ऐसे नाही.

हसतो कारण तुच कधि होतीस म्हणाली
याहुन तव चेहरयाला काही शोभत नाही;
हसतो कारण तुला विसरणे जितके अवघड
तितके काही गाल प्रसरणे अवघड नाही.

हसतो कारण दुसऱ्यानाही बरे वाटते
हसतो कारण तुला सुद्धा ते 'खरे' वाटते;
हसलो म्हणजे फक्त दाखवली फुले कागदी
आतुन आलो होतो बहरुन ऐसे नाही.

हसतो कारण जरी बत्तिशी कुरुप आहे
खाण्याची अन् दाखवण्याची एकच आहे;
हसतो कारण सत्याची मज भिती नाही
हसतो कारण हसण्यावाचुन सुटका नाही.


कवी - संदीप खरे

तुझ्यामाझ्यासवे कधी गायचा पाऊसही,

Share

तुझ्यामाझ्यासवे कधी गायचा पाऊसही,
तुला बोलावता पोचायचा पाऊसही

पडे ना पापणी पाहून ओलेती तुला,
कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही

तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला,
कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही

मला पाहून ओला विरघळे रूसवा तुझा,
कशा युक्त्या मला शिकवायचा पाऊसही

कशी भर पावसातही आग माझी व्हायची,
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही

आता शब्दांवरी या फक्त उरलेल्या खुणा,
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊसही


कवी - संदीप खरे.

नामंजूर

Share

सम्हल सम्हल के नाँव चलाना नामंजूर
मुझे हवा की राह देखना नामंजूर
तय करता मैं दिशा भी बहते पानी की
मौज हिलाए जैसे, हिलना नामंजूर

नहीं चाहिये मौसम की सौगात मुझे
नहीं चाहिये शुभ शकुनों का साथ मुझे
मन करता हो वही महुरत है मेरा
मौका देख के खेल खेलना नामंजूर

अपने हाथों अपनी मौत मै मरता हूँ
मोह के लिये देह भी गिरवी रखता हूँ
खूबसूरती देख जिंदगी है कुरबान
अबरू का बेतुका बहाना नामंजूर

झगडा वगडा और मनाना है हरदम
तेरा मेरा हिसाब रखना है हरदम
जमा खर्च यहीं लेता हूँ देता हूँ
आसमान से चुगली करना नामंजूर

मनकी करने को शाप ना माना मैने
उपभोग को कभी पाप ना माना मैने
काले बादल जिससे गुजरे ना हो
आसमान वो कभी देखा ना मैने

गणीत नीती का मुझसे तो रक्खो दूर
रगों में बहता खून असली जीवन का नूर
खून बहाकर जीते रहना मुझे पता
अपने खून का गरूर करना नामंजूर

-----------------------------------

मूल कविता: नामंजूर
कवी: संदीप खरे
अल्बम: नामंजूर
हिन्दी भावानुवाद: तुषार जोशी, नागपूर

मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यात

Share

मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यात (२)
मन नाजुकशी मोतिमाळ (२)
तुझ्या नाजुकश्या गळ्यात
मन तळ्यात ...

पुरी चाहुलींचे मृ गजळ (३)
वाजे पाचोळा मृ गी कश्यात ||१||
मन तळ्यात ...

इथे वार्‍या ला सांगतो गाणी, माझे राणी
इथे वार्‍या ला सांगतो गाणी
आणि झुळूक तुझ्या मनात ||२||
मन तळ्यात ...

भिडू लागे रात्र अंगाला गे, हो ... हो!
भिडू लागे रात्र अंगाला गे
तुझ्या नखाची कोर नभात ||३||
मन तळ्यात ...

माझ्या नयनी नक्षत्र तारा (३)
अन चांद तुझ्या डोळ्यात ||४||
मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यात

शब्द: संदीप खरे
"दिवस असे की"

माझ बोलण, माझ चालण, माझ हसण, माझ वागण

Share

माझ बोलण, माझ चालण, माझ हसण, माझ वागण (३)
उन सावलीच्या परी, कधी नकोस हवस (२)
तुम्ही म्हणाल तस, हो हो तुम्ही म्हणाल तस, ह ह तुम्ही म्हणाल तस, हो हो तुम्ही म्हणाल तस

(कधी वाटते म्हणावे, गीत केवळ आजचे
आणि डोळ्यांच्या तळ्यात, दीप सोडावे कालचे) (२)
कुणी वाहती तळ्यात, कुणी हळव्या डोळ्यात (२)
तुम्ही कासावीस, हो हो तुम्ही कासावीस, ह ह तुम्ही म्हणाल तस, हो तुम्ही म्हणाल तस

(दिसभर आसावलो, एका कवड्याश्यासाठी
सांज ढळता ढळता, ऊन पोचल दाराशी) (२)
आता सावलीच्या ओठी, येड्या ऊनाची बासरी (२)
गाण येडपिस, हो हो गाण येडपिस, हो हो तुम्ही म्हणाल तस, हो हो तुम्ही म्हणाल तस

(पैलतीर गाठताना, आले ध्यानी गेला धीर
पार पोचताच झाला, पैलतीर ऐलतीर) (२)
(जीव कोणत्या काठचा, कुण्या नाहीश्या गावचा) (२)
आता म्हणाल तस, हो हो आता म्हणाल तस, हो हो तुम्ही म्हणाल तस, हा हा तुम्ही म्हणाल तस

माझ बोलण ...

शब्द: संदीप खरे
"दिवस असे की"

कसे सरतील सये, माझ्याविना दिस तुझे सरताना आणि सांग सलतील ना?

Share

कसे सरतील सये, माझ्याविना दिस तुझे सरताना आणि सांग सलतील ना?
गुलाबाची फुलं दोनं, रोज रात्री डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना?

पावसाच्या धारा धारा, मोजताना दिस सारा, रितेरिते मन तुझे उरे,
ओठभर हसे हसे, उरातून वेडेपिसे, खोल खोल कोण आंत झुरे.
आता जरा अळीमिळी, तुझी माझी व्यथा निळी, सोसताना सुखावून हसशील ना?
गुलाबाची फुलं दोनं, रोज रात्री डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना?

कोण तुझ्या सौधातून, उभे असे सामसूम, चिडीचूप सुनसान दिवा,
आता सांज ढळेलच, आणि पुन्हा छळेलच, नभातून गोरा चांदवा.
चांदण्यांचे कोटी कण, आठवांचे ओले सण, रोज रोज नीजभर भरतील ना?
गुलाबाची फुलं दोनं, रोज रात्री डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना?

इथे दूर देशी, माझ्या सुन्या खिडकीच्यापाशी, झडे सर कांचभर तडा,
तूच तूच तूझ्या तूझ्या, तूझी तूझी तूझे तूझे, सारा सारा तुझा तुझा सदा.
पडे माझ्या वाटेतून, आणि मग काट्यातून, जातांनाही पायभर मखमल ना?
गुलाबाची फुलं दोनं, रोज रात्री डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना?

आता नाही बोलायाचे, जरा जरा जगायाचे माळूनिया अबोलीची फुले,
देहभर हलू देत विजेवर डुलू देत, तुझ्या माझ्या विरहाचे झुले.
जरा घन झुरू दे ना, वारा गुदमरू दे ना, तेंव्हा मग धरा सारी भिजवेल ना?
गुलाबाची फुलं दोनं, रोज रात्री डोळ्यावर मुसू मुसू पाणी सांग भरतील ना?

शब्द : संदीप खरे

ही सांज का रेंगाळली

Share

ही सांज का रेंगाळली
मन कातर
नभ कातर
क्षितिज लाली हरवली
ही सांज का रेंगाळली
मन अंबर
मन पाखर
नजरेतूनी झेपावली
ही सांज का रेंगाळली
तरु अलगद
वेल बिलगत
तमरंगी खुळावली
ही सांज का रेंगाळली
वन किरकिर
क्षण थरथर
हृदयातूनी ओथंबली
ही सांज का रेंगाळली
सय गंधित
स्वर अंकित
तव आठवे वेडावली
ही सांज का रेंगाळली

शुक्रवार, १७ जुलै, २००९

कसली बरं वाट पाहतो आहे मी

Share

मोगर्‍याच्या वेलीवरचंपहिलंच फूल; जीवाला वेड लाऊन गेलं
संध्येच्या सुंदर प्रकाशाला गोड सुगंध देऊन गेलं.
बहराच्या आनंदी दिवसांचं मोहक चित्र दाऊन गेलं.
सुगंधाची उधळण करीत फूल एकदा सुकून गेलं.

कसली बरं वाट पाहतो आहे मी
स्वतःलाच फसवून जगतो आहे मी
काय करायचय नी काय टाळायचंय
सगळंच तर कळतंय
कुठेतरी आत मात्र काहीतरी जळतंय
विझवायचं सोडून तेल ओततोय मी
कसली बरं वाट पाहतो आहे मी...

पहाटेचा मंद वारा तुझा स्पर्श भासतो,

Share

पहाटेचा मंद वारा तुझा स्पर्श भासतो,

शहारून वेडा तेव्हा स्वत:शीच हासतो,

अवखळ झ-यागत नादातच वाहतो,

क्षणोक्षणी जागेपणी तुझे स्वप्न पाहतो..


कुणालाही उमजेना तो असा का वागतो,

चांदण्यांशी बोलताना रात सारी जागतो,

तुझे हसू झरताना चिंब चिंब नाहतो,

क्षणोक्षणी जागेपणी तुझे स्वप्न पाहतो..

Bagh Gatarila mazhi aathavan yete ka ?????

Share

दाढी काढून पाहिला आन् दाढी वाढून पाहिला

Share

दाढी काढून पाहिला आन् दाढी वाढून पाहिला
चेहरा कंटाळवाणा पण अबाधित राहिला

मी सिनेमाला जरी सुरुवातीला कंटाळा लो
फक्त पैसे वसूल व्हावे म्हणून शेवट पाहिला

चार मिळता चार लिहिली ना कमी ना जास्त ही
प्रेमपात्रा ना ही कागद रद्धीचा मी शोधला

नामस्मरणाला सुद्धा दिधली ठराविक वेळ मी
मी किलो आन् ग्रॅम वरती मोक्ष मोजून घेतला

लाल हिरवे दीप येथे पाप पुण्याचे उभे
सोयीचा जो वाटला मी तोच सिग्नल पाळला

मी धुके ही पाहिले आन् धबधबे ही पाहिले
पण तरी मी शेवटी माझाच फोटो काढला

मी पिझा ही चापतो आन् भाकरी ही हाणतो
घास जो पडला मुखी मी तो रवन्थत ठेवला

भोगताना योग स्मरला योगताना भोग रे
राम ही ना झेपला मज कृष्ण ही ना झेपला

मी मला दिसलो असा की ना जसा दिसलो कुणा
कुरूपतेचा आळ कायम आरशावर ठेवला

मेघ नसता वीज नसता, मोर नाचु लागले,

Share

मेघ नसता वीज नसता, मोर नाचु लागले,
ज़ाहले इतुकेच होते कि तुला मी पाहिले

गोरट्या गालावरी का चोरटा हा रक्तिमा,
तू मला चोरून बघताना तुला मी पाहिले

एवढे नाजूक आहे वय तुझे माझ्या फ़ुला,
रंग देखील पाकळ्यांवर भार वाटू लागले

लाख नक्षत्रे उराशी नभ तरीही हळहळे,
हे तुझे नक्षत्र वैभव का धरे वर राहिले ?

पाहता तुज रंग उडुनी होई गजरा पांढरा
शल्य हे त्याच्या उरातील बघ सुगंधू लागले
भर पहाटे मी फ़ुलांनी दृष्ट काढून टाकली,
पाहती स्वप्नी तुला जे भय तयांचे वाटले

मेघ नसता वीज नसता, मोर नाचु लागले,

ज़ाहले इतुकेच होते कि तुला मी पाहिले

अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा

Share

अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥धृ॥

आमच्या देखिल मनी आले चांदण्याचे पुर
आम्हालाही दिसल्या शम्मा अन शम्मेचे नूर
अजुन तरी परवाना हा शम्मेपासुन दुर
मैत्रिणीच्या लग्ना गेलो घालुन काळा झब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥१॥

कुणी नजरेचा ताणुन बाण केलेली जखमी
कुणी ओठांची नाजुन अस्त्रे वापरली हुकमी
अन शब्दांचे जाम भरुन पाजियेले कोणी
मयखान्यातही स्मरले आम्हा मंदिर मस्जिद काबा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥२॥

कधी गोडीने गाउ गेलो जोडीने गाणी
रमलो हे जरी विसरुन सारे आम्ही खुळ्यावानी
सर्वस्वाचे घेउनी दाने आले जरी कुणी
अजुन तरी सुटला नाही हातावरचा ताबा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥३॥

कोण जाणे कोण मजला रोखुन हे धरते
वाटा देती हाका तरिही पाउल अडखळते
कुठल्या शपथेसाठी माझी ओंजळ थरथरते
मोहाहुन ही मोहक माझी हुरहुरण्याची शोभा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ॥४॥

अजुन तरी रुळ सोडुन सुटला नाही डब्बा
अजुन तरी नाही आमच्या चारित्र्यावर धब्बा ...7

भारत मातेसाठी फ़क्त

Share

भारत मातेसाठी फ़क्त
मला अनुभवायचयं रणांगणावरील युद्ध

मला चेतवायचयं माझ्या शरीरातील रक्त

मला जागवायचीयं माझ्यातील लढण्याची जिद्ध

समोरच्याला मारुन व्हायचयं मरायसाठी सिद्ध

रक्तधारा बरसवुन करायचयं भारतमातेला शुद्ध

साल्या दहशतवाद्यांना ठेचुन करायचयं हतबुद्ध

मला काढायचयं माझ्या देशबांधवांना मारल्याचं ऊट्ट

तुटून पडायचयं शत्रुवर होऊन क्रुद्ध

त्यासाठीचं व्हायचयं भारतीय पायदळातीलं एक सत्य

आणि म्हणुनच माझं जगणं-मरणं भारत मातेसाठी फ़क्त.............
..... भारत मातेसाठी फ़क्त

जय हिंद.

आठवणी

Share

जुन्या वहीची पानं चाळताना
मोरपीस हातात पडतं
मोरपीस गालावर फ़िरताना
आठवणींशी नातं जडतं

या आठवणींत बुडुन जाताना
आजचं नाही उरत भान
क्षण ते परत ना येतील आता
तीच होती सुखाची खाण

आठवणी असतात अनेकांच्या
तुमच्या, माझ्या, सर्वांच्या
प्रत्येकाची असते एकतरी आठवण
दु:खाची अथवा सुखाची साठवण

माझ्याही आहेत अशाच आठवणी
पालटुन गेलेल्या भुतकाळाच्या
जीवन झाल्या त्याच आठवणी
सुवर्णरुपी गतकाळाच्या
ह्रुदयात या रुजुनि गेल्या
काही त्यातल्या बुजुनही गेल्या
मनात काहींनी घर केले
पण...
क्षण आता ते उडुन गेले

आठवणी आठवाव्या लागत नसतात
आपोआप त्या आठवत असतात
पालटुन गेलेल्या सुंदर जीवनाचे
सुंदर क्षण भेटीस पाठवत असतात

काय करावे कळत नव्हते

Share

काय करावे कळत नव्हते
मागुनही मिळत नव्हते
सरपटणार्या त्या आयुष्याला
हक्काचे असे बिळच नव्हते

काय करावे कळत नव्हते
कुणी आपुले म्हणतच नव्हते
शिवलेल्या त्या कावळ्याला
जिवंतपणि जगणेच नव्हते

काय करावे कळत नव्हते
समोर असून दिसत नव्हते
ती हाक ओठांवर पेलण्याला
शब्द माझे धजत नव्हते

काय करावे कळत नव्हते
रक्त व्यथेतून रुकत नव्हते
ह्रुदयावर फिरलेल्या त्या मोरपीसांचे
अरे घाव काय थोडे होते

मी लिहितो तेव्हा माझी,

Share

मी लिहितो तेव्हा माझी,
लेखणी बासरी होते
मी जिथे सारखा बसतो
ती अशी ओसरी होते

मी लिहितो तेव्हा सगळ्या
सृष्टीचा कागद होतो
शब्दांच्या वर्षावाला
जो टिपतो, ओला होतो

मी लिहितो तेव्हा लिहिणे,
स्वप्नाहून सुंदर होते
कवितेच्या दवबिंदूंनी
पानांची थरथर होते

मी लिहितो तेव्हा तेव्हा,
मी लिहितो ऐसे काही,
जणू धमन्यांमधे माझ्या
वाहते जांभळी शाई..

मी लिहितो तेव्हा मजला,
जाणवते अपुले अंतर
कवितेच्या थोडे आधी,
कवितेच्या थोडे नंतर....!

मागणी

Share


आणला इंद्रधनुचा गोफ तुझ्यासाठी,
पण टपोऱ्या आषाढी थेंबांचा सर
घातलाय पावसाने
आधीच तुझ्या गळ्यात
ओल्या मातीच्या ठिपक्यांचे
घातलेस मेंदीसारखे पैंजण
तुझे तूच पायात
डोळ्यांत बघून विचारेन म्हटलं,
ढग वाजवून सांगेन म्हटलं,
वाऱ्याने गुदगुल्या करून ऐकवेन म्हटलं,
तर स्वत:भवतीच गिरक्या घेत
डोळे चिंब मिटून
तू पावसाच्या मिठीत
आणि माझे शब्द, सूर सगळे
चुरगळलेत त्याच्या झिम्मडसरीत
या भिजल्या-थिजल्या कवितेने
मागणी* घालायची वाट बघत

माझं काय चुकलं?

Share

आठवतं अजुनही ....
आपलं ते...
कॉलेजच्या कँटीनमध्ये भेटणं.
तुझं पुन्हा पुन्हा,
मान वळवून बघणं...
आणि उधारीवर घेतलेल्या...
सिगारेटच्या धुरात,
माझं डोळ्यातलं पाणी दडवणं.
तु विचारलं होतस
का रे? काय चुकलं?
का झालीत अशी ...
आपल्या नात्याची शकलं?
मला तरी कुठे ठाऊक होतं
कुठल्या तरी बेसावध क्षणी...
मनाशी असलेलं..
माझंच नातं तुटलं होतं !
कदाचित तुला ...
गाडीतुन उतरताना पाहुन..
मला माझं ....
पंक्चर झालेली सायकल धरुन..
मैलोनमैल चालणं आठवलं होतं.
पोटापाण्याचा धंदा काय?
तुझ्या बापाचा प्रश्न ऐकुन
सुकलेल्या डोळ्यांसमोर
गळणारं माझं छप्पर दिसलं होतं.
आणि दिसल्या होत्या
सुरकुत्या...
माझ्या मायच्या डोळ्याखालच्या..
माझ्या नोकरीकडे डोळे लावुन बसलेल्या!
तुझ्या मुखचंद्रापेक्षा...
भावंडांच्या ताटातल्या...
भाकरीला मी महत्वाचं मानलं...
तुच सांग...माझं काय चुकलं?

पाहायचं आहे हळूच तुला

Share

पाहायचं आहे हळूच तुला
माझी वाट पाहताना
डोळ्यांची माझ्या वाटेवर
अधीर नजर रेंगाळताना

पहायचं आहे हळूच तुला
माझ्या आठवणीत रमताना
आठवण काढत काढत
तु गालात लाजताना

पहायचं आहे हळूच तुला
माझ्यासाठी अश्रू ढाळताना
काळजातले अश्रू ढाळत
वाहणारे प्रेम पाहताना

पहायचं आहे हळूच तुला
मी स्वप्नात येताना
स्वप्न पाहत पाहत
गोड भाव फुलताना.

मंगळवार, १४ जुलै, २००९

गाई पाण्यावर

Share

गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या
का गं गंगा यमुनाही ह्या मिळाल्या
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला

तुला लंकेच्या पार्वतीसमान
पाहुनीया होवोनी साभिमान
काय त्यातील बोलली एक कोण
"अहा, आली ही पहां भिकारीण"

पंकसंपर्के का कमळ भिकारी?
धुलीसंसर्गे रत्न का भिकारी?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी?
कशी तुही मग मज मुळी भिकारी?

नारीमायेचे रुप हे प्रसिद्ध
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू
विलासाची होशील मोगरी तू

तुला घेईन पोलके मखमलीचे
कूडी मोत्याची फूल सुवर्णाचे
हौस बाई पुरवीन तुझी सारी
परी यांवरी हा प्रलय महाभारी

प्राण ज्यांचे वर गुंतले सदाचे
कोड किंचीत पुरवीता नये त्यांचे
तदा बापाचे ह्र्दय कसे होते?
न ये वदता अनुभवी जाणती ते

देव देतो सद्गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना?
लांब त्याच्या गावास जाऊनीया
गूढ घेतो हे त्यांस पुसूनीया

"गावी जातो" ऐकता त्याच गाली
पार बदलूनी ती बालसृष्टी गेली
गळा घालूनी करपाश रेशमाचा
वदे, "येते मी, पोर अज्ञ वाचा"

- कवी बी

अनामवीरा

Share

अनामवीरा, जिथे जाहला तुझा जीवनान्त
स्तंभ तिथे ना कुणी बांधला, पेटली ना वात

धगधगता समराच्या ज्वाला या देशासाठी
जळावयास्तव संसारातून उठोनिया जाशी

मूकपणाने तमी लोपती संध्येच्या रेषा
मरणामध्ये विलीन होसी, ना भय ना आशा

जनभक्तीचे तुझ्यावरी नच उधाणले भाव
रियासतीवर नसे नोंदले कुणी तुझे नाव

जरी न गातील भाट डफावर तुझे यशोगान
सफल जाहले तुझेच हे रे तुझे बलिदान

काळोखातूनी विजयाचा हे पहाटचा तारा
प्रणाम माझा पहिला तुजला मृत्यूंजय वीरा

- कुसुमाग्रज

हिंदबांधवा

Share

रे हिंदबांधवा, थांब या स्थळी अश्रु दोन ढाळी,
ती पराक्रमाची ज्योत मावळे इथे झांशिवाली ll ध्रु ll

तांबेकुलवीरश्री ती,
नेवाळकरांची कीर्ति,
हिंदभूध्वजा जणु जळती,
मर्दानी राणी लक्ष्मीबाई मूर्त महाकाली ll १ ll

घोडयावर खंद्या स्वार,
हातात नंगि तलवार,
खणखणा करित ती वार,
गोर्यांची कोंडी फोडित, पाडीत वीर इथें आली ll २ ll

कडकडा कडाडे बिजली,
शत्रुंची लष्करे थिजलीं,
मग कीर्तिरूप ती उरली,
ती हिंदभूमीच्या, पराक्रमाची इतिश्रीच झाली ll ३ ll

मिळतील इथें शाहीर,
लववितील माना वीर,
तरु, झरे ढाळीतील नीर,
ह्या दगडां फुटतील जिभा कथाया कथा सकळ काळी! ll ४ ll

- भा. रा. तांबे

उठा उठा चिऊताई

Share



उठा उठा चिऊताई
सारीकडे उजाडलें
डोळे तरी मिटलेले
अजुनही, अजुनही

सोनेरी हे दूत आले
घरटयाच्या दारापाशी
डोळयांवर झोप कशी
अजुनही, अजुनही ?

लगबग पांखरे हीं
गात गात गोड गाणे
टिपतात बघा दाणे
चोहींकडे, चोहींकडे,

झोपलेल्या अशा तुम्ही
आणायाचें मग कोणी
बाळासाठी चारापाणी
चिमुकल्या, चिमुकल्या ?

बाळाचें मी घेतां नांव
जागी झाली चिऊताई
उडोनीया दूर जाई
भूर भूर, भूर भूर,

- कुसुमाग्रज


खबरदार जर टाच मारुनी

Share

सावळ्या :

खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !
कुण्या गावचे पाटील आपण कुठे चालला असे
शीव ही ओलांडून तीरसे ?
लगाम खेचा या घोडीचा रावं टांग टाकुनी
असे या तुम्ही खड्या अंगणी !
पोर म्हणूनी हसण्यावारी वेळ नका नेऊ ही
मला का ओळखले हो तुम्ही ?
हा मर्द मराठ्याचा मी बच्चा असे
हे हाड ही माझे लेचेपेचे नसे
या नसानसातून हिंमत बाजी वसे
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !

स्वार :

मळ्यात जाऊन मोटेचे ते पाणी भरावे तुवा
कशाला ताठा तुज हा हवा ?
मुठीत ज्याच्या मूठ असे ही खड्गाची तो बरे
वीर तू समजलास काय रे ?
थोर मारिती अशा बढाया पराक्रमाच्या जरी
कुठे तव भाला बरची तरी ?
हे खड्गाचे बघ पाते किती चमकते
अणकुचीदार अति भाल्याचे टोक ते
या पुढे तुझी वद हिंमत का राहते ?
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !

सावळ्या :

आपण मोठे दाढीवाले अहा शूर वीर की --
किती ते आम्हाला ठाऊकी !
तडफ आमुच्या शिवबाची तुम्हा माहिती न का?
दाविती फुशारकी का फुका ?
तुम्हा सारखे असतील किती लोळविले नरमणी --
आमुच्या शिवबाने भर रणी
मी असे इमानी चेला त्यांचे कडे
हुकुमाविण त्यांच्या समजा याचे पुढे
देई न जाऊ मी शूर वीर फाकडे
पुन्हा सांगतो
खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !

लाल भडक ते वदन जाहले बाळाचे मग कसे
स्वार परि मनी हळू का हसे ?
त्या बाळाचे नयनी चमके पाणी त्वेषामुळे
स्वार परि सौम्य दृष्टीने खुले
चंद्र दिसे जणू एक, दुसरा तपतो रवि का तर
ऐका शिवबाचे हे स्वर --
आहेस इमानी माझा चेला खरा
चल इमान घे हा माझा शेला तुला
पण बोल सावळ्या बोल पुन्हा एकदा
"खबरदार जर टाच मारुनी जाल पुढे चिंधड्या
उडवीन राई राई एवढ्या !"


वा. भा पाठक

या झोपडीत माझ्या

Share

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली

ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥१॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे

प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥२॥

पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनी होती चोऱ्या

दारास नाही दोऱ्या, या झोपडीत माझ्या॥३॥

जाता तया महाला, ?मज्जाव? शब्द आला

भितीनं यावयाला, या झोपडीत माझ्या॥४॥

महाली माऊ बिछाने, कंदील शामदाने

आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या॥५॥

येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा

कोणावरी न बोजा, या झोपडीत माझ्या॥६॥

पाहून सौख्यं माझे, देवेंद्र तोही लाजे

शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या॥७॥

- संत तुकडोजी महाराज.

कणा -कुसुमाग्रज

Share

ओळखलंत का सर मला, पावसात आला कोणी
कपडे होते कर्दमलेले, केसांवरती पाणी

क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला वरती पाहून
गंगामाई पाहुणी आली गेली घरट्यात राहून

माहेरवाशीण पोरीसारखी चार भिंतींत नाचली
मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली

भिंत खचली, चूल विझली होते नव्हते गेले
प्रसाद म्हणुन पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले

कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे
चिखलगाळ काढतो आहे, पडकी भिंत बांधतो आहे

खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला
पैसे नकोत सर जरा एकटेपणा वाटला

मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा!

- कुसुमाग्रज

केवढे हे क्रौर्य!

Share


क्षणोक्षणी पडे, उठे, परि बळे, उडे बापडी,
चुके पथहि, येउनी स्तिमित दृष्टिला झापडी.
किती घळघळा गळे रुधिर कोमलांगातुनी,
तशीच निजकोटरा परत पातली पक्षिणी.

म्हणे निजशिशूंप्रती, अधिक बोलवेना मला,
तुम्हांस अजि अंतीचा कवळ एक मी आणला,
करा मधुर हा! चला, भरविते तुम्हा एकदा,
करी जतन यापुढे प्रभु पिता अनाथां सदा!

अहा! मधुर गाउनी रमविले सकाळी जना,
कृतघ्न मज मारतील नच ही मनी कल्पना,
तुम्हांस्तव मुखी सुखे धरुन घांस झाडावरी
क्षणैक बसले तो शिरे बाण माझ्या उरीं

निघुन नरजातिला रमविण्यांत गेले वय,
म्हणून वधिले मला! किती दया! कसा हा नय!
उदार बहु शूर हा नर खरोखरी जाहला
वधुनी मज पाखरा निरपराध की दुर्बला!

म्हणाल, भुलली जगा, विसरली प्रियां लेकरां
म्हणून अतिसंकटे उडत पातले मी घरा,
नसे लवहि उष्णता, नच कुशीत माझ्या शिरा,
स्मरा मजबरोबरी परि दयाघना खरा.

असो, रुधिर वाहुनी नच भिजो सुशय्या तरी
म्हणून तरुच्या तळी निजलि ती द्विजा भूवरी.
जिवंत बहु बोलकें किति सुरम्य ते उत्पल,
नरे धरुन नाशिले, खचित थोर बुध्दिबल.

मातीत ते पसरिले अतिरम्य पंख,
केले वरी उदर पांडुर निष्कलंक,
चंचू तशीच उघडी पद लांबवीले,
निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!

- ना.वा.टिळक


घाटातील वाट

Share

घाटातील वाट,
काय तिचा थाट,
मुरकते गिरकते,
लवते पाठोपाठ ।।

निळी निळी परडी,
कोणी केली पालथी,
पान फुलं सांडली,
वर आणि खालती ।।

खाली खोल दरी,
वर उंच कडा,
भला मोठा नाग,
जणू वर काढून फणा ।।

भिऊ नका कोणी,
पाखरांची गाणी,
सोबतीला गात गात,
खळाळतं पाणी ।।

- सरिता पदकी

इंजिनदादा - बालगीत

Share

इंजिनदादा - बालगीत

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
डबे मी जोडतो, तुम्हांला नेतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
पाणी मी पितो, वाफ मी सोडतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
कोळसा मी खातो, धुर मी सोडतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
हिरवे निशाण बघतो, चालायला लागतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
शिट्टी मी फुंकतो, गर्दी हटवतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
लाल निशाण बघतो, उभा मी राहतो,
गावाला जातो नव्या नव्या

इंजिनदादा, इंजिनदादा,
काय करता?
झुकझुक मी करतो, तुम्हाला घेतो,
गावाला जातो नव्या नव्या

घाल घाल पिंगा वाऱ्या

Share

घाल घाल पिंगा वाऱ्या, माझ्या परसात
माहेरी जा, सुवासाची कर बरसात !

"सुखी आहे पोर"- सांग आईच्या कानात
"आई, भाऊसाठी परी मन खंतावतं !

विसरली का ग, भादव्यात वर्स झालं,
माहेरीच्या सुखाला ग, मन आचवलं.

फिरुन-फिरुन सय येई, जीव वेडावतो
चंद्रकळेचा ग, शेव, ओलाचिंब होतो.

काळ्या कपिलेची नंदा खोडकर फार,
हुंगहुंगुनिया करी कशी ग, बेजार !

परसात पारिजातकाचा सडा पडे,
कधी फुलं वेचायला नेशील तू गडे ?

कपिलेच्या दुधावर मऊ दाट साय
माया माझ्यावर दाट जशी तुझी, माय ... !"

आले भरून डोळे पुन्हा गळा नि दाटला
माउलीच्या भेटीसाठी जीव व्याकूळला !

- कृ. ब. निकुंब

उगवले नारायण

Share

उगवले नारायण, उगवले गगनांत
प्रभा सोनीयाची फांके उन्हें आली अंगणात ll १ll
उन्हें आली अंगणात, उन्हें आली ओटीवर
सोनपावलांनी देवा, उजळले माझे घर ll २ll
उजळले माझे घर, झळाळले ग, कळस
डुलुं लागे आनंदाने वृंदावनींची तुळस ll ३ll
वृंदावनींची तुळस, दिसे हिरवी अंजिरी
वारियाच्या झुळुकिने हंसे मंजिरी मंजिरी ll ४ll
हंसे मंजिरी मंजिरी, प्राजक्ताच्या पावलाशीं
सडा फुलांचा घालतो, मोती-पोवळ्याच्या राशी ll ५ll
मोती-पोवळ्याच्या राशी, वैभवाला नाही अंत
सुख वेचितें संसारी, माउली मी भाग्यवंत ll ६ll

- बहिणाबाई चौधरी

अरे, संसार संसार

Share

अरे, संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर
आधी हाताला चटके तंव्हा मिळते भाकर !

अरे, संसार संसार, खोटा कधी म्हनू नहीं
राउळाच्या कयसाले, लोटा कधी म्हनू नहीं

अरे, संसार संसार, नही रडनं, कुढनं
येड्या, गयांतला हार, म्हनू नको रे लोढनं !

अरे, संसार संसार, खीरा येलावरचा तोड
एक तोंडामधी कडू, बाकी अवघा लागे गोड

अरे, संसार संसार, म्हनू नको रे भीलावा
त्याले गोड भीमफूल, मधी गोडंब्याचा ठेवा

देखा संसार संसार, शेंग वरतून काटे
अरे, वरतून काटे, मधी चिक्ने सागरगोटे

ऐका, संसार संसार, दोन्ही जीवांचा इचार
देतो सुखाले नकार, अन्‌ दुःखाले होकार

देखा, संसार संसार, दोन जीवांचा सुधार
कदी नगद उधार, सुखदुःखाचा बेपार !

अरे, संसार संसार, असा मोठा जादूगार
माझ्या जीवाचा मंतर, त्याच्यावरती मदार

असा, संसार संसार, आधी देवाचा ईसार
माझ्या देवाचा जोजार, मग जीवाचा आधार !

- बहिणाबाई चौधरी

देवा, तुझे किती, सुंदर आकाश

Share

देवा, तुझे किती, सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो .

सुंदर चांदण्या, चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर पडे त्याचे

सुंदर ही झाडे, सुंदर पांखरे
किती गोड बरे गाणे गाती.

सुंदर वेलींची सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले देवा तुझी.

इतुके सुंदर जग तुझे जर
किती तू सुंदर असशील!!

- ग. ह. पाटील

घरटा

Share

चिव चिव चिव रे
तिकडे तू कोण रे ?

कपिलामावशी कपिलामावशी
घरटा मोडून तू का जाशी ?

नाही गं बाई मुळीच नाही
मऊ गवत देईन तुशी

कोंबडीताई कोंबडीताई
माझा घरटा पाहिलास बाई ?

नाही गं बाई मुळीच नाही
तुझा माझा संबंध काही

कावळेदादा कावळेदादा
माझा घरटा नेलास बाबा ?

नाही गं बाई चिमणुताई
तुझा घरटा कोण नेई ?

आता बाई पाहू कुठे ?
जाऊ कुठे ? राहू कुठे ?

गरीब बिचाऱ्या चिमणीला
सगळे टपले छळण्याला

चिमणीला मग पोपट बोले
का गं तुझे डोळे ओले?

काय सांगू बाबा तुला
घरटा माझा कोणी नेला

चिऊताई चिऊताई
माझ्या घरट्यात येतेस बाई ?

पिंजरा किती छान माझा
सगळा शीण जाईल तुझा

जळो तुझा पिंजरा मेला
त्याचे नाव नको मला

राहीन मी घरट्याविना
चिमणी उडून गेली राना

- बालकवी

मधुघट

Share

मधु मागशि माझ्या सख्या परी,
मधुघटचि रिकामे पड़ती घरी

आजवरी कमळाच्या द्रोणी
मधु पजीला तुला भरोनि,
सेवा हि पुर्वीची स्मरोनी,
करी रोष न सखया, दया करी

नैवेद्याची एकच वाटी
अतां दुधाचि माझ्या गाठी,
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगी अंगणी कशि तरी

तरुण-तरुणीची सलज्ज कुजबुज
वृक्ष-झर्यांचे गुढ मधुर गुज,
संसाराचे मर्म हवे तुज,
मधु पिळण्या परी रे बळ न करी

ढळला रे ढळला दिन सखया
संध्याछाया भिवविती हृदया,
अतां मधुचे नांव कासया?
लागले नेत्र रे पैलतीरी

- भा. रा. तांबे

लेझिम चाले जोरात

Share

लेझिम चाले जोरात


दिवस सुगीचे सुरु जाहले, ओला चारा बैल माजले,
शेतकरी मन प्रसन्न जाहले..., छनझुन खळझण झिनखळ छिनझुन,
लेझिम चाले जोरात !

चौघांनी वर पाय ऊचलले, सिंहासनिं त्या ऊभे राहिले,
शाहिर दोघे ते डफ वाले..., ट्पढुम, ढुमढुम, डफ तो बोले..
लेझिम चाले जोरात !

दिवटी फुरफुर करू लागली, पटक्यांची वर टोंके डूलली,
रांग खेळण्या सज्ज जाहली, छनखळ झुणझिन, ढुमढुम पटढुम् ,
लेझिम चाले जोरात !

भरभर डफ तो बोले घुमुनीं, लेझिम चाले मंड्ल धरुनी,
बाजुस-मागें, पुढे वाकुनी..., झणछीन खळखळ, झिनखळ झिनखळ,
लेझिम चाले जोरात !

डफ तो बोले-लेझिम चाले, वेळेचे त्या भान न ऊरले,
नाद भराने धुंध नाचले..., छनझुन खळझण झिनखळ छिनझुन,
लेझिम गुंगे नादात् !

सिंहासन ते डुलु लागले, शाहिर वरती नाचू लागले,
गरगर फिरले लेझिमवाले..., छनछन खळखळ, झणझण छनछन,
लेझिम गुंगे नादात् !

दिनभर शेती श्रमूनी खपले, रात्री साठी लेझीम चाले,
गवई न लगे, सतारवाले..., छनखळ झुणझिन,रात्र संपली नादात्
लेझिम चाले जोरात् !

पहाट झाली - तारा थकल्या, डफवाला तो चंद्र ऊतरला,
परी न थकला लेझिम मेळां..., छनखळ झुणझिन, लेझिम खाली...
चला जाऊया शेतात् ! चला जाऊया शेतात् !!

- श्री श्रीधर बाळकृष्ण रानडे

रंगरंगुल्या, सानसानुल्या,

Share

रंगरंगुल्या, सानसानुल्या,
गवतफुला रे गवतफुला;
असा कसा रे सांग लागला,
सांग तुझा रे तुझा लळा.

मित्रासंगे माळावरती,
पतंग उडवित फिरताना;
तुला पाहिले गवतावरती,
झुलता झुलता हसताना.

विसरुनी गेलो पतंग नभिचा;
विसरून गेलो मित्राला;
पाहुन तुजला हरवुन गेलो,
अशा तुझ्या रे रंगकळा.

हिरवी नाजुक रेशिम पाती,
दोन बाजुला सळसळती;
नीळ निळुली एक पाकळी,
पराग पिवळे झगमगती.

मलाही वाटे लहान होऊन,
तुझ्याहुनही लहान रे;
तुझ्या संगती सडा रहावे,
विसरून शाळा, घर सारे.

- इंदिरा संत

ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचे निधन

Share

ज्याच्या पडद्यावरच्या अस्तित्त्वानेच अनेकांच्या मुठी आवळल्या जायच्या, बायका बोटं मोडत शिव्या द्यायच्या… असा जिवंत खलनायक मराठी पडद्यावर उभा करणारे ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचे मध्यरात्री दोनच्या सुमारास निधन झाले.
ते ७९ वर्षांचे होते. अन्ननलिकेच्या कर्करोगाने गेले काही दिवस अंथरुणाला खिळून असलेल्या निळू फुले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना येथील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दोन महिन्यांपूर्वीच कर्करोगाचे निदान झाल्यापासून ते फारसे घराबाहेर पडत नव्हते.
गेल्या रविवारी सकाळी त्रास वाढल्याने त्यांना जहांगीरमध्ये दाखल करण्यात आले होते. मंगळवारी संध्याकाळी त्यांना अतिदक्षता विभागातून हलवण्यात आले असले , तरी त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अन्न गिळणे शक्य होत नसल्याने त्यांना सपोर्ट सिस्टीमवर ठेवण्यात आले होते.
‘ सामना’, ‘सिंहासन’, ‘जैत रे जैत’ यासारखे मराठी चित्रपट असोत, ‘कुली’, ‘सारांश’, ‘मशाल’, ‘नरम गरम’सारखे हिंदी चित्रपट असोत वा सूर्यास्त, सखाराम बाईंडरसारखी नाटके असो, निळू फुले यांनी आपल्या अभिनयाचा ठसा प्रत्येक ठिकाणी उमटवला. त्यामुळे हिंदी व मराठी चित्रपटसृष्टीतील निळू फुले यांना आदराचे स्थान होते.
राष्ट्र सेवा दलाच्या मुशीत तयार झालेल्या, समाजवादी विचारांवर श्रद्धा असलेल्या या निळूभाऊंच्या अभिनयाचा प्रवास सेवा दल कलापथकापासून सुरू झाला. पण तो तेवढ्यापुरता मर्यादित राहिला नाही. त्यांच्या अभिनयाची ताकद पाहूनच त्यांना ‘सखाराम बाईंडर’सारखे नाटक मिळाले आणि त्यातील भूमिकेला त्यांनी न्याय दिला.
मराठी नाटकांबरोबरच मराठी चित्रपटांवरही त्यांनी आपला ठसा उमटवला. ‘सिंहासन’ चित्रपटातील पत्रकार दिगू टिपणीस असो की ‘सामना’मधील हिंदूराव पाटील असो, त्यांचा अभिनय सर्वांनाच भावला. अमिताभ बच्चनसारख्या अभिनेत्याच्या ‘कुली’ चित्रपटामध्येही निळूभाऊंनी आपल्या अभिनयाचे वेगळेपण दाखवून दिले. त्यामुळे हा चित्रपट अमिताभबरोबरच निळू फुले यांच्यासाठीही लक्षात राहिला.
अगदी ‘जैत रे जैत’मधील भूमिका तुलनेने कमी असूनही ती आठवणीत राहणारी आहे. ‘नामदेव शिंपी’नंतर त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे चित्रपटात काम करायचे नाही, असे ठरवले होते. पण निर्माते आणि दिग्दर्शकांच्या आग्रहास्तव काही आश्वासने ते पूर्ण करीत आहेत. हे सारे करताना हा अभिनेता सामाजिक भान आणि बांधिलकी मात्र कधीच विसरला नाही. त्यामुळे सामाजिक कृतज्ञता निधीमध्येही त्यांचा वाटा होता. अनेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका करणारे निळू फुले प्रत्यक्षात अत्यंत विनम्र आणि सौम्य स्वभावाचे राहिले.
पांढरा पायजमा आणि वर झब्बा, खांद्यावर कापडी झोळी हाच त्यांचा कायमचा वेश. त्यात कधीच बदल झालयाचे आठवत नाही. खलनायकाच्या भूमिकेत असताना शिवराळ भाषा वापरणारे, तसेच वावरणारे निळू फुले यांच्याशी गप्पा मारताना हा माणूस अतिशय अभ्यासू आहे, हे जाणवते. शिक्षण फार झाले नसले तरी वाचन मात्र दांडगे होते. त्याचा प्रत्यय या गप्पामधून ते कायम जाणवत असे.

--
तू इथून दूर गेल्यानंतर,
अनेक वाटा माज्या आहेत,
पण पावला पावलावर
आठवणी मात्र तुज्याच आहेत....

गुरुवार, ९ जुलै, २००९

टप टप टाकित टापा

Share

टप टप टाकित टापा

टप टप टप टप टाकित टापा चाले माझा घोडा
पाठीवरती जीन मखमली पायि रुपेरी तोडा !

उंच उभारी दोन्ही कान
ऐटित वळवी मान-कमान
मधेच केव्हा दुडकत दुडकत चाले थोडा थोडा !

घोडा माझा फार हुशार
पाठीवर मी होता स्वार
नुसता त्याला पुरे इषारा, कशास चाबुक ओढा !

सात अरण्ये, समुद्र सात
ओलांडिल हा एक दमात
आला आला माझा घोडा, सोडा रस्ता सोडा !

- शांता शेळके

फुलपांखरूं

Share

फुलपांखरूं !
छान किती दिसतें । फुलपाखरूं

या वेलीवर । फुलांबरोबर
गोड किती हसतें । फुलपांखरूं

पंख चिमुकलें । निळेजांभळे
हालवुनी झुलतें । फुलपांखरूं

डोळे बरिक । करिती लुकलुक
गोल मणी जणुं ते । फुलपांखरूं

मी धरुं जाता । येई न हाता
दूरच तें उडते । फुलपांखरूं

- ग.ह.पाटील

मन

Share

मन -----

मन वढाय वढाय
उभ्या पिकातल ढोर
किती हाकलं हाकलं
फिरी येते पिकावर

मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात
आता व्हत भुइवर
गेल गेल आभायात

मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन
उंडारल उंडारल
जस वारा वाहादन

मन जह्यरी जह्यरी
याच न्यार रे तन्तर
आरे इचू साप बरा
त्याले उतारे मन्तर

मन एव्हड एव्हड
जस खसखसच दान
मन केवढ केवढ
आभायतबि मावेन

देवा आस कस मन
आस कस रे घडल
कुठे जागेपनी तुले
अस सपन पडल

- बहीणाबाई चौधरी

Yala Mahatwa aahe

Share


बालभारती - आठवणीतील कविता

Share

श्रवाण मासि हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे,
क्षंणात येते सर सर शिरवे क्षंणात फिरुनि ऊन पडे

वरति बघता इंद्र धनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सुर्यास्त वाटतो,सांज अहाहा तो उघडे
तरु शिखरावर उंच घरावर पिवळे पिवळे उन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा

बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते

फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गा‌ई तयांचा श्रावण महिमा एकसुरे

सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला

सुंदर परडी घे‌ऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती

देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

- बालकवी

Nivdak P L

Share


दुखविल्यानंतर... गज़ल

Share

अनावश्यक असे हा जन्म मित्रांनो
जगा माझ्यापरी थोडे पवित्रांनो

मला बोलावणी येती बिघडण्याची
तुम्ही लखलाभ तुम्हाला चरित्रांनो

मजा बरबाद होण्याची नका भोगू
बसा भिंतीवरी निर्जीव चित्रांनो

कुठे अमरत्व तुम्हाला तरी आहे?
कशाच्या काळज्या करता विचित्रांनो?

सुचे कविता मनाला दुखविल्यानंतर...
जपा सातत्य हे उर्जाजनित्रांनो

का छळू लागला ... भास हा रोजचा

Share

भास तो कालचा .. भास हा आजचा
का छळू लागला ... भास हा रोजचा ??

का तुझा पाहिला साजिरा चेहरा ?
राहिलो ना अता कामचा .. काजचा !!

चोरुनी पाहते, लाजते, हासते ..
मी दिवाणा तिच्या ह्याच अंदाजचा !!

काय देऊ तिला मी कुठे शाजहा ?
मी कसा द्यायचा तोहफा ताजचा ??

चुंबिला ना तिचा ओठ अद्याप मी
आड येतो तिचा घुंघटा लाजचा !!

काळजाची तिला भावना सांगतो ..
शब्द लाभो 'अभी' भरजरी बाजचा !!

जादुगर असेन ती ...!!

Share

वाटते कधीकधी जादुगर असेन ती ...
गर्द ह्या नभातली सांजसर असेन ती !!!


मी कयास काढला ..... मी मनास बोललो
डौलदार देखणी अंगभर असेन ती !!!


ती दिसेन चांदवा सांद्र मौसमातला
एकमेव येथला संगमर असेन ती !!!


ती म्रूदू विणा जणू ती मधाळ मारवा
रेशमी गळ्यातला आर्तस्वर असेन ती !!!


पाह ना तिच्यामधे केवढी अदा, नशा
हाय षोडषवर्षिया फारतर असेन ती !!!



ती प्रसन्न राहते एवढी कशी अभी?
काळजातले जुने देवघर असेन ती !!!

तुझ्याशिवाय मला राहवत नाही !

Share

तू समजुन का घेत नाही..........
कसं गं तुला काही समजत नाही !
साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तुझ्याशिवाय मला राहवत नाही !

इतक्या सहजासहजी .call tavo का विचारतेस,
भावना का माझ्या तुला जाणवत नाही !
साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तुझ्याशिवाय मला करमत नाही !

तुज़शी बोलो नहीं की जगही खायला उठतं,
कशातच लक्ष माझं लागत नाही !
एवढही तुला कसं कळत नाही,
तुझ्याशिवाय माझ्या जगण्यालाच अर्थ नाही !

कधी कधी असं वाटतं,
तू फक्त दाखवतेस की तुला समजत नाही !
माझ्या भावना तू चांगल्या जाणतेस,
पण मुद्दामच तू मला भेटत नाही !!

न भेटण्याने आता काही होणार नाही,
मी तुझ्याशिवाय क्षणभरही जगु शकणार नाही !
आपले मिलन ही तर दैवाचीच इच्छा,
त्याला तू किंवा मी टाळु शकणार नाही !!



तुझं नि माझं जन्मोजन्मीचं नातं आहे,
हा काही आज उद्याचा खेळ नाही !
तुझ्याशिवाय मी आणी माझ्याशिवाय तू,
असं स्वप्नातही शक्य होणार नाही !!


किती साधी,सरळ आणी सोपी गोष्ट आहे,
तू हे समजुन का घेत नाही !!

सोमवार, ६ जुलै, २००९

मराठ मोळी आई

Share


मराठ मोळी आई
आपली मराठ मोळी आई म्हणजे एक मजेदार, प्रेमळ, अस रसायन आहे
*आई तुम्हाला दोन वेळां सल्ला देते. एक तुम्हाला हवा असतो त्या वेळी,व तुम्हाला नको असतो त्या वेळी सुध्धा·
*आई हि अशी एकच व्यक्ति आहे, जिला तुमच्या बद्दल, तुम्हाला तुमच्या बद्दल माहित आहे त्या पेक्षा ज्यास्त माहित असत.
*एखाद्या वेळी एखादी गोष्ट जर तुम्हाला नसेल,व आइला तुम्हि ती तिला विचारली अन जरी तिला ति माहीति नसली तरी ति, गोष्ट माहीति असल्यासारखी ठोकुन देते.
*आई जीतकी चांगली तितके मुंले वाया जाण्याच्या संभावना जादा
*अरे पावसांची चिन्हें आहेत रेनकोट घेउन जा अस ती म्हणते, तुम्हि नेहमी पणे,दुर्लक्ष करता, अन मधे कुठेंतरी नेमका तुम्हाला पाउस गाठ्तो.
* तुम्ही एखादी गोष्ट विसरला, तर ति तुमच्या साऱ्या चुकांची तुम्हाला आठ्वण करून देइल ज्यामुळें तुम्ही ति चुक परत करणार नाहीत.
*तुमच्या साऱ्या गोष्टीवर टीका करण्याचा तिला ह्क्क आहे,जरी त्यातली एखादी गोष्ट तुम्ही केली नसली तरी सुध्धा.
*आई च्या जेवणाला नावे ठेवण्याची चुक करु नका[मेल्या बाहेरच शिळ पाक घाण तेलातल मीटक्या मारत खाशील.]
* आई शी कधीच खोट बोलु नका अन जरी प्रयत्न केला तरी निश्चीत पकडलें जाताल·
*जस जस तुमच वय वाढत जात तस तस एखाद्या लहान मुलासारख तुम्हि तिच्याशी वागायला लागता·
*पैशांची कडकी असते, तिला पैसें मागा ति पैसे देइल अन,तुम्ही पैसे कसे उधळता या वर लेक्चरपण देइल·
*तुम्ही कीतिहि चुका करा, ति हजार वेळा तुम्हाला त्याची आठवण करुन देइल, पण मनांत कधीच ठेवणार नाही·
*तुम्ही एखादी गोष्ट केल्यानंतर[आधी नाही], ती आणखी कशी चांगली करता आली असती हे फक्त तिच सांगु शकते.
*तुमची आई कीतिही गरीब कींवा अशीक्षीत असो ति तुमच्या पेक्षा नेहमीच मोठी आसते.
*एखादी गोष्ट तुम्ही केली तर ति आणखी कशी चांगली करता येइल ते ती तुम्हाला सांगेल ,पण जर तीनें केली अन जर तुम्ही सांगायला गेला तर ती म्हणेंल, मग तुच का नाही करत.
*तुम्ही कितिही चांगला विनोद केला तरी तिला तो विनोद नेहमीच वाह्यात वाटतो.
*आइ काम संपवुन जरा बसली कि मुलाला भुक लागते.
*तुम्हि मोठ होउन नांव काढाव इतकच तिला वाटत असत.

KADHI KADHI.....

Share



बा तू हवा व्हता

Share

बा तू हवा व्हता

बा तू हवा व्हता
अपंग, दारुडा,
आजारी, वेडा,
काजग, रिकामातेकादा
कसा बी असला
तरी बी बा तू हवा व्हता

तुझ्या जान्यान
आपल वैभव बी गेल
जस माझ्या मायच
कुकू तू नेल
ती झाली विधवा
आम्ही झालो पोरके
सहनुभुतिच्या नजरांचा आता
घटका-घटका दावा व्हता
बा तू हवा व्हता

काम लै करू लागली
फोटोपाशी रडू लागली
कुणी म्हणे पोराना सोड
या घराशी नात तोड़
लागिन करू दुसर
उभा आयुष्य पसर
गीधाडाच्या नजरा तिच्यावर
पर तिच्या आसवात
आता लावा व्हता
बा तू हवा व्हता

भीती हाय दार हाय
फकस्त छप्पर न्हाई
तिच्या संसाराची गाडी
एकाच चाकावर जाई
कधी ती हानतुरनात रडे
नव्या जिन्दगिशी सकाळी पुन्हा लढे
बिन बापाची लेकर
हा शाबूत तिच्या जीवा व्हता
बा तू हवा व्हता

आज ठीक-ठाक हाय
माझा बाप माझी मायच हाय
मी देखल तिला झुरताना
क्षणों क्षणी मरताना
पाखरांच्या छाप्परासाठी
वेदनेशी लढताना
नियतीशी ती जिंकली
तरीबी तीच हारली
आज ती जाताना बी
तू गेल्या दिसाचा
तिच्या डोळ्यात परतावा व्हता
बा तू हवा व्हता
बा तू हवा व्हता

to aani ti-part -1 ,2

Share

to aani ti-part -1

तो आणि ती. कधी न भेटलेले. कधी न बोललेले. ती नुकतीच collegemadhun बाहेर पडलेली.तो मात्र स्वताचा बिज़नस असलेला.त्याच्याकडे इंटरव्यू साठी ती आलेली. थोडीशी घाबरलेली bavarleli. पहिलाच इंटरव्यू ! काय विचारतील? आपल्याला उत्तर नाही आले तर? या विचारानी gondhaLleli.तो तिला बोलावतो. " बसा मैडम" तो
" गुड मोर्निंग सर" ती
" गुड मोर्निंग. नाव काय तुमचे"
" XYZ" ती
नंतर मग शिक्षण, आवडी-निवडी ह्यामधुन कळत आपल्या आवडी जुळतहेत
ती जोइन होते. काम सुरु होत.एकमेकांशी गप्पा मारन्यापलिकडे गाड़ी गेलेली नसते.एक असाच दिवस उजाडतो. तिला लवकर जायच असत.तो आलेला नसतो. ती फ़ोन करते." सर मी जरा लवकर जाऊ"
" का"
" काम आहे "
" ठीक आहे". तो थोडा थांबतो." माला उद्या भेटशील?
"उद्या ओफ्फिसला येणार आहे मी"
" ओफ्फिसमधे नाही. बाहेर भेटशील?"
हा प्रश्न तिला अनपेक्षित. ती घाबरलेली
" कशाला सर"
भेटल्यावर सांगतो"
तिच्या मानत विचारांचे वादळ सुटलेले. काय काम असेल? कशाला बोलावले असेल?ओफ्फिसबहेर का भेटायचे?

to aani ti-part 2

हो नाही करत ती त्याला भेटते. तिथून सुरु होतो एक प्रवास
कुठे संपेल माहीत नसलेला.ती त्याच्यात गुंतत जाते. त्याला मात्र बायको, मुले आहेत.तो थोडासा reserved. ती मात्र स्वताला संपूर्ण विसरलेली. कुणीतरी आपल्यावर प्रेम करते ह्या भावनेने मोहोरलेली. आकर्शनाच रूपान्तर प्रेमात कधी होत तीच तिलाच कळत नाही. तिला त्याच्याशिवाय क्षणही नाही करमत आता.मग सुरु होतात भान्डण, चिडचिड." तू माला पूर्ण वेळ देत नाहीस" " तुला माहिती होत ना मज लग्न Jhaalay" अशा वाक्यांची देवाण घेवाण
काळ सरकत राहतो. तीच लग्नाच वय झालेल.तिने नोकरी सोडलेली त्याच्याकड़ची.पण भेटन मात्र चालूच.एक दिवस अचानक तीच लग्न ठरत. तो अत वेडापिसा.
" तू माला वचन दिल होतास तू माझीच राहशील म्हणुन"
" तू येतोस का बायको, मुलाना सोडून माझ्याकडे"
तो निरुत्तर.
तीच लग्न होत. वेळ लागतो तिला सावरायला. एक दिवस अचानक तिचा नवरा जरा गंभीर मनस्थितीत घरी येतो. " तुझ लगना आधी कुणावर प्रेम होत का?" " नाही. का काय झाल? " ती प्रचंड घाबरलेली. बराच वेळ तो काही बोलत नाही. मग सांगतो की त्याला एक फ़ोन आला होता या संदर्भात. तुझ affair होत म्हनून. ती पूर्ण भितीच्या छायेत. " कुणी फ़ोन केला" तोच नसेल न"
नंतर तिला कळत तो तोच होता ज्याने फ़ोन केला. तिच्या संसारात वादळ उठालेल. एकदा गमावलेला विश्वास परत नाही मिलाविता येत.ती तशीच ओढत रहते गाडा संसाराचा. शुशक.

मित्रानो, यात चुक कोणाची? तिची? त्याची? की दोघांची?
जर त्याच खर प्रेम हॉट तिच्यावर तर त्याने का वदल उठावल तिच्या संसारात?
मित्रानो, हा मज़ा एक प्रयत्न आहे. चागल्या-वाईट प्रतिक्रया जरुर कलावाव्यात.

तीर्थरूपांस

Share

तीर्थरूपांस

निरोपाच्या मंद घंटा
कधीच्या रुणझुणताहेत कानात
पाकुळलेला आनंदी निरोप…..
त्याच वेळी उमजलं होतं आतून,
आयुष्यावर पसरलेली उबदार मायेची पाखर
हळूहळू विरत जाणार आहे म्हणून…….
त्यानंतर आपण सगळे झगडलो
तुमच्या आजाराशी.
लढता लढता थकलातच तुम्ही;
तरीही जिंकलात.
पण आलीच अखेर ती वेळ
सुटकेसाठी अधीर तुमचा अशक्त श्वास…….
गार कोमट पडत चाललेले तुमचे हात पाय…..
विझत थकत चाललेली तुमची गात्र….
कुठल्यातरी अनमिक भितीचा
कापूस पिंजणारं तुमच विकल मन….
घशाबाहेर न उमटणारे तुमचे अर्धेकच्चे शब्द……
ते आम्हाला समजले नाहीत की
तुमच्या जीवणीवर पसरणारे बारीक मिष्किल हासू…..
तल्लख मेंदूच्या कितीतरी खूणगाठी….
सगळं सगळं संपणार आता हळूहळू.
विरत गेलेल्या आयुष्याच्या वस्त्राला
नाहीच कोणी ठिगळ लावू शकणार.
हे सगळं होऊनही उरेलच की
कितीतरी अजूनही——-
तुमच्या लेकरांच्यात उतरलेल्या तुमच्या अनंत लकबी…….
आजकाल दुर्मिळ होणार्‍या मूल्यांवरच्या निष्ठा…….
आवडते संगीत;मनापासून ठरवून केलेले वाचन……….
स्वत:वर किमान पैसा खर्च करण्याचा हव्यास…….
अन्यायाविरूद्ध वळणार्‍या मुठी……
पहाडासारखे व्यक्तिमत्व पुढे ठाकल्यावर
आपसूक नम्र होणारा माथा…..
चांगल्याचे कौतूक आणि चूकांना क्षमा……..
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वावलंबनाचा ध्यास….
आणि अजूनही कितीतरी ;
चवीपरी इत्यादी……
तुम्हीतर जिवंतच राहणार अहात
आम्ही आहोत, तोपर्यंत
म्हणून तर निरोपाच्या मंद रूणझुणार्‍या घंटा
बदसूर वाटत नाहीत,
या विचारांनी काळीज लक्कन हललं
तरीही.

तीर्थरूपांस

Share

तीर्थरूपांस

निरोपाच्या मंद घंटा
कधीच्या रुणझुणताहेत कानात
पाकुळलेला आनंदी निरोप…..
त्याच वेळी उमजलं होतं आतून,
आयुष्यावर पसरलेली उबदार मायेची पाखर
हळूहळू विरत जाणार आहे म्हणून…….
त्यानंतर आपण सगळे झगडलो
तुमच्या आजाराशी.
लढता लढता थकलातच तुम्ही;
तरीही जिंकलात.
पण आलीच अखेर ती वेळ
सुटकेसाठी अधीर तुमचा अशक्त श्वास…….
गार कोमट पडत चाललेले तुमचे हात पाय…..
विझत थकत चाललेली तुमची गात्र….
कुठल्यातरी अनमिक भितीचा
कापूस पिंजणारं तुमच विकल मन….
घशाबाहेर न उमटणारे तुमचे अर्धेकच्चे शब्द……
ते आम्हाला समजले नाहीत की
तुमच्या जीवणीवर पसरणारे बारीक मिष्किल हासू…..
तल्लख मेंदूच्या कितीतरी खूणगाठी….
सगळं सगळं संपणार आता हळूहळू.
विरत गेलेल्या आयुष्याच्या वस्त्राला
नाहीच कोणी ठिगळ लावू शकणार.
हे सगळं होऊनही उरेलच की
कितीतरी अजूनही——-
तुमच्या लेकरांच्यात उतरलेल्या तुमच्या अनंत लकबी…….
आजकाल दुर्मिळ होणार्‍या मूल्यांवरच्या निष्ठा…….
आवडते संगीत;मनापासून ठरवून केलेले वाचन……….
स्वत:वर किमान पैसा खर्च करण्याचा हव्यास…….
अन्यायाविरूद्ध वळणार्‍या मुठी……
पहाडासारखे व्यक्तिमत्व पुढे ठाकल्यावर
आपसूक नम्र होणारा माथा…..
चांगल्याचे कौतूक आणि चूकांना क्षमा……..
आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे स्वावलंबनाचा ध्यास….
आणि अजूनही कितीतरी ;
चवीपरी इत्यादी……
तुम्हीतर जिवंतच राहणार अहात
आम्ही आहोत, तोपर्यंत
म्हणून तर निरोपाच्या मंद रूणझुणार्‍या घंटा
बदसूर वाटत नाहीत,
या विचारांनी काळीज लक्कन हललं
तरीही.

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top