Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शनिवार, ७ मे, २०११

आयुष्य

Share

"या छोट्याश्या आयुष्यात ठरवलच तर खुप काही करता येत....

नाही जमलच जर काही,

तर तुमच्या सर्वांसारख तेच तेच करुण रोज तिरडी बदलून नव्यान मरता येत.




ठरवलच तर माझ्यासारख हे आयुष्य रोज नव्या रंगांनी भरता येत....

नाहीतर तुमच्यासारख,


कुणाची तरी आठवन काढून इवलुश्या दोन डोळयांमधे तुडूम्ब भरता येत.




ठरवलच माझ्यासारख मनापासून मनातल्या आठवणीमधे झुरता येत....

तुमच्या सर्वांपासून दूर जाण्यासाठी,

मला अस शब्दांच्या खड्ड्यात खोल खोल स्वतःला सहज पुरता येत.




जिंकलेल्या डावाचा आनंद मला पावसाच्या थेम्बासारखा एकट्यानेच झेलता येतो...

एरवी तुम्ही नाही जमणार म्हणून,

सोडलेला डाव मला जिंकन्यासाठीच पुन्हा पुन्हा खेळता येतो.




हे असच माझाही आयुष्य पाण्याच्या थेम्बासारख खळखळत वाहत रहात....


माझ्या शब्दांमधे तुम्हीही रमलात म्हणून,

गालात हसून तुमच्या सर्वांकड़े पाहत रहात...."

असं प्रेम करावं........................

Share

थोड सांगाव थोड लपवावं,
असं प्रेम करावं.
थोड रुसावं थोड हसावं,
असं प्रेम करावं.
गपचूप गपचूप फोनवर बोलाव,
कोणाची नझर पडताच पटकन "अग" चा "अरे" कारावं.
असं प्रेम करावं.

ती वेळेवर आली तरी,
आपण जाणून बुजून उशीरच जाव.
तिचा खोटा रुसवा घालवण्यासाठी मग,
तिच्या कानाजवळ जाऊन SORRY म्हनाव.
असं प्रेम करावं.

वरवर तिच्या छोट्या छोट्या गोष्टीवर,
खूप हसून घ्याव.
"तू मला खूप आवडतेस"
हे मात्र तिला प्रत्येक वेळी सांगाव.
असं प्रेम करावं.

प्रेम हि एक सुंदर भावना,
हे सदैव जपाव,
पण त्या बरोबर येणाऱ्या वेदनांना पण,
हसतमुखाने सामोरे जाव.
असं प्रेम करावं.

विरह येतील संकट ओढवतील,
प्रेमाच्या अनेक परीक्षा होतील.
पण आपण मात्र खंभीर रहाव,
प्रत्येक परीक्षा पास व्हाव.
असं प्रेम करावं.

कितीही गेलोत दूर तरीही,
एकमेकांच्या कुशीत असाव.
तिला माझ्या डोळ्यात मला तिच्या डोळ्यात,
एकमेकावरच प्रेम दिसावं.
असं प्रेम करावं.
असं प्रेम कारावं........................

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top