| बोलायचे होते मनातील बरेच काही पण , वेळच गेली निघून बोलायचे होते मनातील बरेच काही पण , वेळच गेली निघून ............. ......... .. प्रेम सांगुन होत नाही.ते नकळत होत. जरी नजरेतून समजत असले तरी ते शब्दातून सांगावच लागत. बोलायचे होते मनातील बरेच काही पण , वेळच गेली निघून ............ ......... .. जेव्हा तू माझ्यापासून दूर जाणार हे मनाला जनवल तेव्हा हे हसणार मन दू:खात बुडून गेल . पहिलेल स्वप्न हे स्वप्नच राहून गेल. बोलायचे होते मनातील बरेच काही पण , वेळच गेली निघून ............ .......... .. दिली होतीस लग्नाची पत्रिका हसत तू पण मला माहित होते तू मनातून होतीस रडत कदाचित दोघानाही सांगायचे होते काही बोलायचे होते मनातील बरेच काही पण , वेळच गेली निघून ............ ......... .. जे जमले नाही मला या जन्मी कदाचित मिलविन मी तुला पुढच्या जन्मी आवडत होतीस खुप मला .पुढच्या जन्मी भेटलीस मला तर सांगेन तुला खुप खुप आवडतेस मला , बोलायचे होते मनातील बरेच काही पण , वेळच गेली निघून ............ ......... .. |
गुरुवार, २९ ऑक्टोबर, २००९
बोलायचे होते मनातील बरेच काही पण , वेळच गेली निघून
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
0
Read more>>
नावात काय आहे?
| नावात काय आहे असे म्हणतो ना आपण नावात काय आहे? मग नावात काहीही नाही तर जातीत काय आहे? भाषेत काय आहे आणि पंथात काय आहे? कोण म्हणाले ही २१वी सदी आहे म्हणून? प्रत्येकाला स्वतःच्या मतानुसार वागायचा हक्क आहे? असे आहे का? बघा तुम्ही स्वतःलाच विचारुन नेत्याने पक्ष बदलला की लगेच कार्यकर्ते पक्ष बदलतात त्यानंतर मग आम्हालाही मागे मागे जावे लागते इच्छा नसते त्या पक्षाचे मग व्हावे लागते हीच का २१ वी सदी? नेत्यांनाच स्वतःचे अस्तित्त्व नाही तर ते आमचे भविष्य काय घडवणार? मतांसाठी खेळ सारा हा मतदार राजा आता तरी जागा हो योग्य ते सरकार निवड आणि मराठ्यांचे भविष्य घडव जय महाराष्ट्र म्हणायला गर्व वाटू दे मराठी माणूस म्हणून जगायला गर्व वाटू दे जय महाराष्ट्र ............. ......... .... |
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
0
Read more>>
" सांगू माझं तुझ्यावर प्रेम आहे " .....
| तू फ़क्त माझ्या सोबत होतिस ह्या आठ्वानिनेच किती सुखावतो मी, ते तुझं माझं वाळू वर एकत्र पायाची छठा उमटवत दूरपर्यंत चालणं, थोडंसं दुरच असायचो आपण....., आणि आणि अचानक बोलता बोलता नकळत जवळ यायचो.. अलगद मग एकमेकांच्या हातांचा दोघांनाही हवा हवासा असणारा सुखद स्पर्श व्हायचा, त्यातूनच मग कधीतरी चोरटी नजर एक व्हायची.. मग तू लाजुन गालात हसायचीस मी नजरेन खूण करून विचारायचो " काय झालं ...? " आणि तू सुद्धा नजरेनचं सांगायचीस "काही नाही.... " आणि मग आपण एकत्र हसायचो .. दोघांनाही कळायचं एकमेकांच्या नजरेतलं.. पण पहिलं बोलणार कोण हा प्रश्न पडलेला असायचा.. बराच वेळ मग आपण बुडत्या सुर्याकडे बघत बसायचो कित्येक वेळा मनातुनच एक मेकांना हळूवार होकार द्यायचो.. मग मनात विचार यायचा तुझा हात हातात घेवू का ....? पण नंतर मनातच म्हणायचो बघुया ही स्वताहून देते का....? असच एकदा नकळत जवळ आलो आणि आपल्यातलं अंतर कधी संपलं समजलाच नाही. त्या दिवशी सूर्य जवळ जवळ बुडतच आला होता.. आकाश अगदी स्वच्छ तांबुस गुलाबी रंगनी भरलं होतं, थोडीशी मंद कुंद हवा सुटली होती.. तीच हवा तुझ्या ओढणिला सारखी माझ्या चेहर्या भोवती गुंडाळीत होती आणि मी सारखा तुझी ओढणी माझ्या हातांनी बाजूला करत होतो, एकदा मग तू न राहुनच ती ओढणी माझ्या चेहर्या वरुण बाजूला करायला तुझा हात माझ्या चेहर्या वरुण ओढलास.. आणि त्या वेळेसचा तुझ्या मखमली हातांचा स्पर्श झाला आणि न राहून मी तुझा हाथ माझ्या हातात घेतला... दोघांच्या ही नजरेत तेंव्हा अगदी समुद्र भरून रोमांच भरला होता मी थोडासा तुझ्या अजुन जवळ आलो अणि तुझा चेहरा हातात घेतला आणि तुला विचारलं होतं " कळतं का ग तुला माझ्या मनातलं ...? " तू म्हणाली होतिस " कळतय ना ", " मग हे असं कित्ती दिवस चालायचं ..? सांग ना.. " मी म्हणालो .. तू म्हणालीस " मी नाही जा ", " अगं असं काय करतेस सांग ना..?" तू तुझा चेहरा माझ्या हातातून काढून घेण्याचा प्रयत्न करीत नजर झुकवत बोललीस... " सांगू माझं तुझ्यावर प्रेम आहे " ..... |
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
0
Read more>>
मैत्रीचा बोन्साय झालाय
| मैत्रीचा बोन्साय झालाय बोन्सायअरे आजच्या जगात मैत्रीचा बोन्साय झालाय. शाळेत बागडलेली मैत्री कॉलेज मधे उपवर झाली, "आयुष्यभर सोबत हवी" म्हणताना या (धावत्या) आयुष्यात तिचाच विसर पडलाय… जिवलग म्हणवणारे सारे इतके कसे दुरावले ? त्यांच्याच आठवणींचे अश्रु बनुन फक्त नजरेत उतरणं चाललंय. म्हणुन वाटतं मैत्रीचा बोन्साय झालाय. वेळे अगोदर हजर असणा-यांना कसा आज 'वेळ' कमी पडलाय, शब्दा पलीकडच्या बोलण्याला कसा आज शब्दांचाच अभाव आलाय. जणु भावनांची मुळे खुंटली, पण आठवणींचा ओलाव्याने तग धरलाय. म्हणुनच एवढ्या मोठया वट वॄक्षासारख्या मैत्रीचा बोन्साय झालाय. |
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
0
Read more>>
तु मला आवडतेस.
| ही कविता असेल असे मलाही वाटत नाही, आणी याला कोणी कविता म्हणावी अशी माझी इच्छाही नाही. हे नुसतेच जुळलेले शब्द आहेत, भावना दर्शवण्यासाठी एकत्र जमलेले. तुम्हास शब्दांपलीकडचे वाचता आले तर तुमची जीत, पण आवडली नाही तर माझी हार. तु मला आवडतेस. नाही ! मी प्रेम करत नाही तुझ्यावर ! पण होय… तु मला आवडतेस. याचा अर्थ असा नाही की मी तुझ्यावर प्रेम करतो. मला कोणाचं बोलणं आवडतं, कोणाचं चालणं. कोणाचे डोळे आवडतात, तर कोणाचं हसणं. याचा अर्थ असा नाही कि मी त्या सा-यांवर प्रेम करतो. कारण, 'आवड' नी 'प्रेम' यात फरक आहे. आवड 'मर्यादीत'. म्हणुनच त्याला विशेषणांची 'गरज' आहे. उगाच का म्हणतो आपण, थोडं आवडतं… जास्त आवडतं. कधी म्हणताना ऎकलंय ? "माझं थोडंसच प्रेम होतं !" पण प्रेम ? प्रेम म्हणजे…? आयुष्यभर एखाद्याची सोबत करावीशी वाटणं, आयुष्याच्या टोकापर्यंत त्याच्या सोबत चालणं ! मग वाट कशीही असो, काट्याकुट्यांची वा मखमलीची, त्यात अंतर नाही. आणी तुझ्या सोबत आयुष्य वाटुन घ्यावं असंतर मला कधीच वाटलं नाही. म्हणुनच म्हणलोना, मी तुझ्यावर प्रेम करत नही. पण, तु मला आवडतेस. तु मला आवडतेस, तुझ्या दिसण्यामुळं ! नव्हे... तर तुझ्या असण्यामुळं. होय, तुझ्या असण्यामुळं. नुसतं असण्यामुळं म्हणण्यापेक्षा…. 'सोबत असण्यामुळं.' हे जास्त बरोबर आहे. बस्स ! अशीच सोबत रहा. कारण… तु मला आवडतेस. |
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
0
Read more>>
सोमवार, २६ ऑक्टोबर, २००९
प्रेमाचा गुलकन्द- प्र. के. अत्रे.
| बागेतुनी व बाजारातुनी कुठुनी तरी 'त्याने' गुलाबपुष्पे आणून द्यावीत 'तिज'ला नियमाने कशास सान्गू प्रेम तयाचे तिजवरती होते? तुम्हीच उकला बिन्ग यातले काय असावे ते! गुलाब कसले प्रेम पत्रीका लाल गुलबी त्या लाल अक्षरे जणू लिहलेल्या पाठोपाठ नुसत्या प्रेमदेवता प्रसन्न हो! या नैवद्याने प्रेमाचे हे मार्ग गुलबी जाणती नवतरणे कधी न त्याचा ती अवमानी फ़ुलता नजरणा परी न सोडला तिने आपुला कधीही मुग्धपणा या मौनातच त्यास वाटले अर्थ असावे खोल तोही कशाला प्रगट करी मग मनातले बोल अखेर थकला ढळली त्याची प्रेमतपश्चर्या रन्ग दिसे ना खुलावयाचा तिची शान्त चर्या धडा मनाचा करुन शेवटी म्हणे तिला 'देवी' दुजी आणखी विशेषणे तो गोन्डस तिज तो लावी "बान्धीत आलो पुजा तुज मी आजवरी रोज तरी न उमगशी अजुन कसे तू भक्ताचे काज गेन्द गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले सान्ग सुन्दरी फ़ुकट का सगळे गेले?" तोच ओरडून त्यास म्हणे ती "आळ ब्रु था हा की एक पाकळी ही न दवडली तुम्ही दिल्यापैकी" हे बोलूनी त्याच पावली आत जाय रमणी क्षणात घेउन ये बाहेरी कसलीशी बरणी म्हणे "पहा मी यात टाकले तुमचे ते गेन्द आणि बनवला तुमच्या साठी इतुका गुलकन्द का डोळे असे फ़िरवता का आली भोन्ड बोट यातले जरा चाखुनी गोड करा तोन्ड" क्षणैक दिसले तारान्गण त्या परी शान्त झाला तसाच बरणी आणि घेवुनी खान्द्यावरी आला "प्रेमापायी भरला" बोले "भुर्दन्ड न थोडा प्रेमलाभ नच, गुलकन्द तरी कशास हा दवडा?" याच औषधावरी पुढे तो कसातरी जगला 'दय थाम्बुनी कधीच ना तरी असता तो' खपला! तोन्ड आम्बले असेल ज्यान्चे प्रेम निराशेने प्रेमाचा गुलकन्द तयानी चाखूनी हा बघणे - प्र. के. अत्रे. |
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
0
Read more>>
रविवार, २५ ऑक्टोबर, २००९
आज अस वाटलं की कोणी
| आज अस वाटलं की कोणी जिवनात माझ्या डोकाउन गेलं आज अस वाटलं की कोणी मनात माझ्या पाहून गेलं माझे डोळे बदं होते त्यावेळी आणि श्वास जणू यांबला होता मग असं वाटलं की कोणी ह्दयाचे टोके कोणी मोजून गेलं आज अस वाटलं की कोणी जणू केस माझे कुरवाळून गेलं आज अस वाटलं की कोणी जणू पदराने मला झाकून गेलं मला आटवतयं उश्याकडे कागंद होती आणि हातात पेन होता आज अस वाटलं की मानेखाली मग उशी कोणी सरकवुन गेलं आज अस वाटलं की कोणी जणू दु:ख माझं जाणून गेलं आज अस वाटलं की कोणी जणू डोळे माझे पुसून गेलं हो ती नक्कीच माझी माय होती माझी आई आणी कोणी नाही मग पदराने डोळो पुसले कोणी आणि देवापुटे हात कोणी जोडून गेलं. |
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
0
Read more>>
आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही
| कीतीही सुदर मुलगी दीसली तरी, तीची स्तुती करुन तीला हरबरयाच्या झाडावर चढ्वायला आम्हाला कधी जमलेच नाही म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही कोणाच्या मागे शीट्ट्यामारत फीरण आमच्या तत्वात कधी बसलेच नाही म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही कोणी जर आवड्लीच तर स्वतः हुन गप्पांना सुरवात करायला आम्हाला कधी जमलेच नाही म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही दुसरयाचे वीचार ऎकत असतांना आपले वीचार मांडण्याचि संधी आम्हाला कधी साधताच आली नाही म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही कधी हीमत करुन कोणाला जर वीचारलेच तर मी तुला त्या द्रुषटीनीकधी बघीतलेच नाही या व्यतीरीक्त दुसरे काही आम्हाला ऎकायलाच मीळाले नाही म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही प्रेमात नाहीचा अर्थ हो असतो हे गणीत आम्हाल कधी समजलेच नाही म्हणुन आम्हाला प्रेम करायला अजुन जमलेच नाही फुलपाखरा प्रमाणे आम्ही ही बरयाच सुदर फुलां मधे वाव्ररत होतो पण जाउन बसन्यासारखे फुल अजुन आम्हाला दीसलेच नाही..... |
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
0
Read more>>
अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हवे
| अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हवे विझलेल्या दिव्यांना उजळायला हवे नाही आठवले शब्द तरी गीत गायला हवे नसेल जरी खुष तरी हसायला हवे नको समजूस तुझ्याशीवाय सुखी आहे मी जगासाठी पण खुष दिसायला हवे अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हवे पुन्हा घेऊन शपत खोटी तू भेटीस आली नाहीसच मजबुरी असेल तुझीही काही खोटेच मनाला समजवायला हवे तरफडत असशील तू ही भेटीसाठी स्वत:लाच बजवायला हवे अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हवे तुटलेल्या स्वप्नांना कुरव ळायला हवे नाही जमत तुझ्याशीवाय तरी जगायला हवे नसेल जरी सुखी तरी हसायला हवे नाही भेटलीस सत्यात तु स्वप्नात तरी तु यायलाच हवे वाग कशीही तु तरी पण आपलीच तुला मानायला हवे अश्रूंनाही डोळ्यात सजवायला हवे |
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
0
Read more>>
अशी आहेस तू...
| अशी आहेस तू... सप्तसुरांची उधळण करीत... सुरांगणा घेवूनी आली.. चातकासारखी वाट पाहत होतो आम्ही.. अन तु तर एक श्रावणसरी सारखी चिंब बरसली... हसणं तुझं आहे कीती अवखळ.. गालावर पडते ती त्याचीच सुंदर खळ.. तुझं वागण आहे किती सरळ.. जशी मत्स्यकन्या पाण्यामधे हळुवार तरळ... नयन तुझे किती आहे प्रेमळ.. एकटक पाहता मग पडते तुझी भुरळ.. अशी आहेस तु जशी तळ्य़ात.. लाटांवर डोलते राजहंसिनी निर्मळ... तुझ्या मधुर वाणीचे करावे तितके कौतुक कमीच हळुवार पुटपुटलीस जरी.. त्याला लाभलीये मधाची गोडी भारी... मनं तुझं आहे खुप उदार देतेस आपल्या परीने तु इतरांना आधार... तुझ्या या चांगुलपणाचा.. होतो सगळीकडे जय जयकार.. गर्वाला तुझ्या दुनियेत .. काडीमात्र स्थान नाही... प्रेमाचं रान मात्र कुठेही रिकामं नाही... अशी आहेस तु.. सुखाचे करतेस दान भरभरुन अन दु:खाचे डोंगर मात्र सहन करतेस स्वत:हून... |
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
0
Read more>>
श्रावणाची पहीली सर आज पुन्हा दारी आली.......
श्रावणाची पहीली सर आज पुन्हा दारी आली....... |
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
0
Read more>>
एक व्यर्थ गीत
एक व्यर्थ गीतव्यर्थ तू गुंतून जावे अन अशा या सांजवेळी व्यर्थ मी व्याकूळ व्हावे व्यर्थ माझे सूर हे अन व्यर्थ सारया भावना या गीत कंठातील माझ्या वाहुनी जाइल वाया व्यर्थ या शब्दांस माझ्या ओढ नाही चांदण्यांची व्यर्थ या माझ्या स्वरांना साथ ओल्या पापण्यांची व्यर्थ वारे वाहणारे व्यर्थ हे आहेत तारे तू जिथे नाहीस तेथे व्यर्थ सारे व्यर्थ सारे व्यर्थ या गीतांत वेड्या वेचला मी जन्म सारा व्यर्थ आता सांत्वनाला कोरडा आला किनारा व्यर्थ हा आक्रोश माझा तू पुन्हा यावे म्हणुनी जीवनाच्या पायथ्याशी व्यर्थ गावे स्पंदनांनी व्यर्थ या मातीत आता प्रीत माझी पाझरावी जीव हा माझा जळावा अन तुला गीते स्मरावी? व्यर्थ माझ्या इंद्रियांनी शेवटी संन्यास घ्यावा व्यर्थ सारया जीवनाला अन निराळा अर्थ द्यावा. |
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
0
Read more>>
मला गुंतण्याचे ते भोग कळाले
मला गुंतण्याचे ते भोग कळाले |
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
0
Read more>>
मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय.
| मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय. धावत जाऊन माझ्या रोजच्या बाकावर बसायचय रोज सकाळी खड्या आवाजात राष्ट्रगीत म्हाणायचाय नव्या वहिचा वास घेत पहिल्या पानावर छान अक्षरात आपल नाव लिहायचाय मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय. मधली सुट्टी होताच वाटरब्याग सोडुन नलाखाली हात धरून पानी प्यायचाय, कसाबसा डबा सम्पवत तिखट मीठ लावलेल्या चिन्चा, बोर, पेरु, काकडी सगळ खायचय सायकलच्या चाकाचा स्ट्म्प करुन क्रिकेट खेलायचय, मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय. उद्या पाऊस पडुन शालेला सुट्टी मिलेल का? हा विचार करत रात्री झोपी जायचय, अनपेक्षित मिळणारा सुट्टीच्या आनन्दासाठी, मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय. घन्टा व्हायची वाट का असेना मित्राशी गप्पा मारत वर्गात बसायचाय, घन्टा होताच मित्राशी सयकलची रेस लावून घरी पोहचायचय, मला पुन्हा एकदा तरी शाळेत जायचय. कितीहि जड असुदे... जबाबदारीच्या ओझ्यापेक्षा दप्तराच ओझ पाठिवर वागवायचय, कितीहि उकडत असू दे.. वातानुकूलित ऒफ़िसपेक्षा पन्खे नसलेल्य वर्गात खिड्क्या उघडून बसायचय, कितीहि तुटका असु दे.. ऒफ़िसमधल्या एकट्या खुर्चिपेक्षा दोघान्च्या बाकावर ३ मित्र बस |
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
0
Read more>>
तुझ्या आठवणीला, तुझ्या आठवणीला.... .........
| काय म्हणावं तुझ्या आठवणीला...... चुकवुन पाहवी नजर मी जेव्हा स्वप्नांची रोज रात्रीच्या प्रहराला नेमकं तेव्हाच जाग्या होती तुझ्या आठवणी मनावर माझ्या खड्या पह-याला आता तुच सांग, काय म्हणावं तुझ्या आठवणीला...... झाडुन काढावं म्हणतो मी जेव्हा मनातल्या तुझ्या अस्ताव्यस्त प्रेमाच्या ओसरीला पण, नेमका तेव्हाच उडतो तुझ्या आठवणीचा बेशिस्त तो सुमार पाला-पाचोळा आता तुच सांग, काय म्हणावं तुझ्या आठवणीला...... जगुन पहावं म्हणतो मी जेव्हा दुख:-वेदना अनुभवत प्रत्येक श्वासाला पण नेमकं तेव्हा तुझ्या आठवणीचा श्वास त्याआधीच कोंडतो काळजात माझ्या, स्वत:ला आता तुच सांग, काय म्हणावं तुझ्या आठवणीला...... रडुन काढावी रात्र म्हणतो मी जेव्हा आठवुन तुझ्या शेवटच्या निरोपाला अनं, नेमका तेव्हाच उगवतो सुर्य तुझ्या आठवणीचा सारुन बाजुला त्या भयाण तिमिराला खरंच गं , काय म्हणांव सांग मी तुझ्या आठवणीला, तुझ्या आठवणीला.... ........ |
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
0
Read more>>
नावात काय आहे?
| नावात काय आहे असे म्हणतो ना आपण नावात काय आहे? मग नावात काहीही नाही तर जातीत काय आहे? भाषेत काय आहे आणि पंथात काय आहे? कोण म्हणाले ही २१वी सदी आहे म्हणून? प्रत्येकाला स्वतःच्या मतानुसार वागायचा हक्क आहे? असे आहे का? बघा तुम्ही स्वतःलाच विचारुन नेत्याने पक्ष बदलला की लगेच कार्यकर्ते पक्ष बदलतात त्यानंतर मग आम्हालाही मागे मागे जावे लागते इच्छा नसते त्या पक्षाचे मग व्हावे लागते हीच का २१ वी सदी? नेत्यांनाच स्वतःचे अस्तित्त्व नाही तर ते आमचे भविष्य काय घडवणार? मतांसाठी खेळ सारा हा मतदार राजा आता तरी जागा हो योग्य ते सरकार निवड आणि मराठ्यांचे भविष्य घडव जय महाराष्ट्र म्हणायला गर्व वाटू दे मराठी माणूस म्हणून जगायला गर्व वाटू दे |
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
0
Read more>>
शनिवार, २४ ऑक्टोबर, २००९
माझ्यविना
माझ्यविना तुझ्या चेहर्यावरच्या रेषा बद्लव तु पण त्या हळुच बोलतात बरच काही सांगुन जातात , थिजलेल्या डोळ्यात अजुन ठिणगी बाकी आहे...... पापणीत लपलेला तो ओलावा उरात दडपलेला तो चित्कार कुणी ऐको ना ऐको , मला ऐकायला येतय म्हणुनचच मला नाही वाटत तू "जगतोय,"माझ्याविना .......... |
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
0
Read more>>
चारोळी,
खुप काही सांगायच होत तुला
पण शब्दांनी साथ सोडून दिली
कधी वेळेच कारण पुढे आल
तर कधी तुझ्या अबोल्याने वेळ मारून नेली.................
लेबल: कविता , चारोळी , मराठी कविता , मराठी चारोळी , मराठी चारोळ्या , charoli , marathi charolya , Marathi Kavita , Marathi poem
0
Read more>>
--एकटेपण--
| --एकटेपण-- प्रिये आज कस् एकट एकट वाटतय तुझी आठवण येताच मनात अंधार दाटतय तुझ्या विरहाने हे जीवन आता मला काटतय दरदिवशी एकटेपणाने हृदय माझ फाटतय आता हा एकटेपणा मला चावतोय म्हणुन तर तुझ्या शोधात मी आता धावतोय तुझा प्रेमरूपी सुगंध मला भावतोय म्हणुन मी आपल्या प्रेमाचे गुपित सर्वाना दावतोय तुझ्याविना आहे मी एकटा पडलो तुझ्या विरहात खुप खुप रडलो तुझ्यासाठी मी दुनियेशी झगड़लो आयुष्यात माझ्या बर्याचवेळा धडपडलो आता हा एकटेपणा मला हलू हलू गीळतोय रात्रि स्वप्नात येवून मला छळतोय दिवस रात्र मला पिळतोय म्हणुन या एकटेपणापासून मी दूर पळतोय एकटेपणा माझा तुला कधी कळणार कळल्यावर तुझे मन मात्र झुरणार तुझ्या डोळ्यात अश्रु ढळणार आणि तू स्वतःपासून लाम्ब पळणार |
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
0
Read more>>
माझ्यातला 'मी'..!!
माझ्यातला 'मी'..!!असेनही जरी मी , रस्त्याच्या कडेस निर्जीव थिजलेला...काळाकुटट, ओबडधोबड, दगड एकाकी निजलेला ! पण, लाभला जर एखादा चुकार पावसाळी स्पर्श, तर दिसेल तुम्हाला... माझ्याही खाली, एक हिरवा ओला अंकुर अलगद रुजलेला! मी कोरडा, भगभगीत,उन्हाच्या रापाने भाजलेला... चिडका, तापट, भेसूर, माझ्याच व्यापाने झिजलेला ! पण कधी आलीच एखादी, हळवी गार झुळूक, तर दिसेल तुम्हाला.... एके काळी, विरहवेळी, पाऊसही माझ्या अश्रूत भिजलेला ! मी पापपुण्याच्या अध्यात्माला सदैव बुजलेला... नास्तिकतेच्या रोगाने, नको इतका सुजलेला ! पण निनादली जर घंटा दूर कुठे राऊळी, तर दिसेल तुम्हाला... मनाच्या गाभाऱ्यात, मी ही देव गुपचूप पुजलेला ! मी रांगडा, निर्लज्ज म्हणून सांप्रत गाजलेला... बेबंध वळू, सराईत कोडगेपणाने माजलेला! पण फिरलेच कधी मोरपीस गालावरून, तर दिसेल तुम्हाला... तिच्या एकाच कटाक्षाने, मी कधी लाल होऊन लाजलेला ! आज जरी मी कित्येक बदलांनी सजलेला... जगाने हजार मापे लावून हवा तसा मोजलेला! पण मागे वळून पहिलेच कधी, तर दिसेल तुम्हाला... जिवंत म्हणून पेटताना...माझ्यातला 'मी' कधीच विझलेला...!! |
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
0
Read more>>
पण ती लाचार.....तीन पुरूष होते ना!
प्रिय मित्र मैत्रिनिनो एक सामाजिक विचारातून या कवितेचा अर्थ घ्या (बीभत्स रसाची आणखी एक रचना ! आणि तीसुद्धा शब्दांचा वापर करताना असभ्यतेची वा अश्लीलतेची पायरी न गाठता .......!! आख्खा प्रसंग.... वेदना... लाचारी... अत्याचार... सगळं सूचकपणे जिवंत उभं !! आणि यातून सतत जाणवणारी सामाजिक भेदभावामुळे उत्पन्न अगतिकता....!)पण ती लाचार.....तीन पुरूष होते ना!ती ओरडत होती.... पण ती लाचार.....तीन पुरूष होते ना! तिची धडपड सुटायची.. पण ती लाचार.....तीन पुरूष होते ना! जोरदार गालावर थापड, एकाने केस पकडून, भिंतीवर तिचे डोके आदळले, रक्त कपाळावरून गालावर, पण ती लाचार.....तीन पुरूष होते ना! पदर शरीरापासून वेगळा.. शरीर नग्न! तुटुन पडले भडवे तिच्यावर... पण ती लाचार.....तीन पुरूष होते ना! शांत झाली भड्व्यान्चि आग... तिच्या डोळ्यात पाणी.. छे छे रक्तच... पण ती लाचार.....तीन पुरूष होते ना! हे सर्व झाल्यावर... आता तिचा सामना.. या षन्ढ जगाच्या प्रश्नानशी.. वास्नाळलेल्या नजरेशी.... साला इथे ही तिचा बलात्कारच.... पण ती लाचार...... |
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , माझं प्रेम , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
स्वातंत्र्य तर मिळाले ... पण ...??
स्वातंत्र्य तर मिळाले ... पण ...??स्वातंत्र्य तर मिळाले इंग्रज तर पळाले, पण... दहशतवाद जन्मला.... तो येथेच आहे. भ्रष्टाचार जन्मला... तो येथेच आहे. स्वातंत्र्य तर मिळाले, स्वराज्य तर मिळाले, पण... महागाई वाढली.. ती जात नाही बेरोजगारी वाढली.. ती जात नाही स्वातंत्र्य तर मिळाले, लोकशाही तर मिळाली, पण... लोकसंख्या वाढली... ती वाढतेच आहे बेईमानी वाढली.. ती वाढतेच आहे. स्वातंत्र्य तर मिळाले इंग्रज तर पळाले, पण... इंग्रजी येथेच आहे... ती जाणार नाही गरीबी येथेच आहे... ती जाणार नाही |
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , माझं प्रेम , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
विरहाची ऐसी नशा...
|
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , माझं प्रेम , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
आयुष्याच्या हॉस्पिटलमध्ये
| आयुष्याच्या हॉस्पिटलमध्ये जन्म घेउन दाखल होता येते विकारासारखी भूक ही वाढते म्हणून अन्नाचे ओषध पियावे लागते ॥ १॥ आयुष्याच्या हॉस्पिटलमध्ये सुखातून दु:खाची जाणिव कमी होते पण त्यासाठी दारू नाही सलायन लागते ॥ २॥ आयुष्याच्या हॉस्पिटलमध्ये शरीर थोडे विसावले की मग डॉक्टर नाहीतर नाही यमाने तरी डिस्चार्ज करावेसे वाटते ॥ ३॥ आयुष्याच्या हॉस्पिटलमध्ये अजून काहीतरी बाकी म्हणून देहदान करावे लागते खिशात कारण पॅसे नाही म्हणून परतफेड ही करावे लागते ॥ ४ ॥ |
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , माझं प्रेम , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
कोणी गेलं म्हणुन.....
"If all my friends were to jump off a bridge, I would not follow, I would be at the bottom to catch them when they fall".
|
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , माझं प्रेम , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
एक ना एक दिवसतरी "माझी" करीन मी तुला
"If all my friends were to jump off a bridge, I would not follow, I would be at the bottom to catch them when they fall".
|
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , माझं प्रेम , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
0
Read more>>
आता लिहा मराठीत
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .



