Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शनिवार, २४ ऑक्टोबर, २००९

विरहाची ऐसी नशा...

Share

 

विरहाची ऐसी नशा...

रेंगाळते ओठावरी,
सांज तुझ्या मीठीतली ,
जाणवते एकाएकी,
उब तुझ्या स्पर्शातली.

छळती का तुला सखे,
भास जे मला उरी,
कळती का बोल मुके,
जे हृदयाच्या अधरी.

गोड गोड हुंदका,
पानावती ज़रा डोळे,
गाउनिया गीत तुझे,
झाले ऋतुंचे सोहळे.

तुझ्या आठवांचा चन्द्र,
मनी बरसत राही,
विरहाची ऐसी नशा,
धुंद मिलनात नाही

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top