Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शनिवार, २७ फेब्रुवारी, २०१०

बैल

Share

आम्ही उभे आहोत…
अखंड तुमच्यासाठी…
मेहनतीची नाही लाज…
कर्तव्याचे भरले ओझे….
तुम्हीच अमुच्या पाठी..
रे माणसा….
कधी जुम्पतोस गाडीला कुण्या..
कधी हाकतोस मोट…होतात पाठीच्या कण्या…
तर कधी तुझ्या डोक्यात,
शर्यतीच्या झिणझिण्या …
तरी नाही खंत आयुष्याची….
तुझ्या साठी झटून मिटतात…
जळणाऱ्या डोळ्यांच्या वाती….
पण पीळ पडतो जीवाला खरा…
जेव्हा होतोस कधी कृत्घन…
उभ्या आयुष्याची माती होते…
उभे राहते केवळ असे शिल्प भग्न..

कल्पना

Share

धकाधकीच्या जीवनात..आपल हसू विसरलेल्या..माणसांसाठी..
एका छोट्या मुलाची कल्पना…
मला नेहमी वाटत..
दारात येणारी प्रत्येक गाडी,
माझ्या घरासमोर थांबावी..
त्यातून उतरलेल्या माणसांनी..
घरातली प्रत्येक खोली गजबजून जावी..
का?..कारण…
माझ्या घरातली मानस
त्यांच्या स्वागतासाठी,
स्वतःला विसरून,
आयुष्यभर हसतील..
स्वतःमध्ये हरवलेल्या…
स्वार्थी मी पणाला विसरतील..,
खोट खोट का होईना,
पण त्यांच्याशी समरस होतील..
आणि मग एकही दिवस..
माझ्या घरात अश्रुना जागा असणार नाही..
कारण..माझ घर त्या खोट्या का होईना,
पण हसण्यान भरून जाईल..

कित्ती गोड आहे म्हणून सांगू ती...

Share

कित्ती गोड आहे म्हणून सांगू ती...
एरवी अगदी खळखळून हसते
पण मी हात पकडला की गोड लाजते

जीन्स टी शर्ट regularly घालते
पण पंजाबी ड्रेस वर टिकलीही न चुकता लावते

साडीतले फोटोस आवर्जुन दाखवते
पण मोबाइल मधे फोटो काढतो म्हणालो तर 'नाही' म्हणते

पिज्जा बर्गर सर्रास खाते
चहा मात्र बशीत ओतुनच पिते

लोकांसमोर खुप बोलते
मला i luv u म्हणताना मात्र फक्त same 2 u च म्हणते

ग्रुपमधे असताना खुप बिनधास्त असते
पण माझा विषय निघाला की पटकन बावरते

बोलून दाखवत नसली तरी नजरेने खुप काही सांगते
एवढ नक्की सांगतो माझ्यावर खुप खुप प्रेम करते

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१०

आत्महत्या............

Share

please forward to all H.S.C & S.S.C students ...







रविवार, १४ फेब्रुवारी, २०१०

आज “वैलेंटाइन डे” आहे

Share





आज "वैलेंटाइन डे" आहे
पण मला काही सुचतंच नाहीये,
मेसवाल्या काकुंनी गोड-धोड़ स्वयंपाक केलाय
पण मला काही रुचतंच नाहीये...

"वैलेंटाइन" नाही कुणी जवळ
मग "डे" कसला साजरा करायचा,
उगाच तिची भेट नाही झाली
तर दिवस आपला ख़राब व्हायचा...

कुणी नसलेल्या तिची
आठवण मात्र येते,
काळे-कुट्ट दाटतात ढग
मन प्रेमवर्षावाची वाट पहाटे...

संध्याकाळी सहज आपलं
बागेत जावून बसावं,
"कसं हे प्रेम करतात..?"
म्हणुन गालातल्या गालात एकटेच हसावं...

दिवसभर मोबाइलची शांतता
कुणाचाही मेसेज नाही, कॉल नाही,
रात्र झाली, मी कशाला वाट पहु
आता मी मस्तपैकी झोपी जाई...


   Join Me @ MHO


http://i304.photobucket.com/albums/nn196/pappy_says/yahoo_02php.png http://i304.photobucket.com/albums/nn196/pappy_says/hotmailphp.png

The image http://i304.photobucket.com/albums/nn196/pappy_says/gmailphp.png

http://i304.photobucket.com/albums/nn196/pappy_says/aol2php.png

"If all my friends were to jump off a bridge, I would not follow, I would be at the bottom to catch them when they fall".

सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१०

माझ्या आठवणीतील ८ चारोळ्या - जरूर वाचा नक्की आवडतील

Share

१) तू माझ्याशी कधी बोलणार आहेस?
कारण मला तुझ्या वाचून करमतच नाही

तुझ्याच आठवणी मला सारख्या येत असतात
आता तर रात्री सुद्धा नीट झोप लागत नाही ???

२) वेड्या माणसांवर सुद्धा
कोणाला सहज विश्वास बसेल

मग मला तू तर ओळखतच नाही
म्हणूनच माझी आठवण तुला कधीच येत नसेल :'(

३) त्या समुद्राला विचार तुझ्यात पाणी किती आहे?
त्या आभाळाला विचार तू किती उंच आहे

तू मला अशी अर्ध्यावर का सोडून गेलीस?
आता फक्त तुझ्या आठवनीन वरच मी जिवंत आहे :'(

४) सर्व फुले जरी एकसारखी दिसत असली तरी
प्रत्येक फुले हि वेगळीच फुलत असतात

तू माझी कधीच आठवण काढत नाही
मग तुझ्या आठवणी तरी मला रोज का सतवत असतात :'(

५) आठवण तुझी सारखी येत असते
जणू विचारांना थाराच बसत नाही

माझे मन अफाट समुद्रात भरकटलेल्या होडी सारख झालंय
आता तुझ्याशिवाय मला कुठलाच किनारा दिसत नाही ::)


६) तुझी आठवण हि वाऱ्याच्या झुळुका प्रमाणे भासते
तुला दाखवू नाही शकलो तरी,

सारखी मनाला स्पर्श करत
तुझी जाणीव करून देत असते :)

७) मध गोळा करण्यासाठी कशी मधमाशी
फुलांशिवाय कोणाला धरत नाही

तशीच तुझी आठवण अशी गुरफटून गेली आहे
आता विचार केला तरी तुला सोडून जाऊ शकत नाही :(


८) तू वेडी आहेस हे मला माहित होत
पण तुझी आठवण सुद्धा किती वेडी आहे

आता कुठल्याही पोरीन कडे बघितले
तर फक्त मला तुझ आणि तुझ्ह्च चित्र दिसत आहे :)

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top