१) तू माझ्याशी कधी बोलणार आहेस?
कारण मला तुझ्या वाचून करमतच नाही
तुझ्याच आठवणी मला सारख्या येत असतात
आता तर रात्री सुद्धा नीट झोप लागत नाही
२) वेड्या माणसांवर सुद्धा
कोणाला सहज विश्वास बसेल
मग मला तू तर ओळखतच नाही
म्हणूनच माझी आठवण तुला कधीच येत नसेल
३) त्या समुद्राला विचार तुझ्यात पाणी किती आहे?
त्या आभाळाला विचार तू किती उंच आहे
तू मला अशी अर्ध्यावर का सोडून गेलीस?
आता फक्त तुझ्या आठवनीन वरच मी जिवंत आहे
४) सर्व फुले जरी एकसारखी दिसत असली तरी
प्रत्येक फुले हि वेगळीच फुलत असतात
तू माझी कधीच आठवण काढत नाही
मग तुझ्या आठवणी तरी मला रोज का सतवत असतात
५) आठवण तुझी सारखी येत असते
जणू विचारांना थाराच बसत नाही
माझे मन अफाट समुद्रात भरकटलेल्या होडी सारख झालंय
आता तुझ्याशिवाय मला कुठलाच किनारा दिसत नाही
६) तुझी आठवण हि वाऱ्याच्या झुळुका प्रमाणे भासते
तुला दाखवू नाही शकलो तरी,
सारखी मनाला स्पर्श करत
तुझी जाणीव करून देत असते
७) मध गोळा करण्यासाठी कशी मधमाशी
फुलांशिवाय कोणाला धरत नाही
तशीच तुझी आठवण अशी गुरफटून गेली आहे
आता विचार केला तरी तुला सोडून जाऊ शकत नाही
८) तू वेडी आहेस हे मला माहित होत
पण तुझी आठवण सुद्धा किती वेडी आहे
आता कुठल्याही पोरीन कडे बघितले
तर फक्त मला तुझ आणि तुझ्ह्च चित्र दिसत आहे
सोमवार, ८ फेब्रुवारी, २०१०
माझ्या आठवणीतील ८ चारोळ्या - जरूर वाचा नक्की आवडतील
१२:३५:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , चारोळी , मराठी कविता , मराठी चारोळ्या , charoli , marathi charolya , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , चारोळी , मराठी कविता , मराठी चारोळ्या , charoli , marathi charolya , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा