Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

रविवार, २४ ऑक्टोबर, २०१०

काल मरून मी स्वर्गात गेलो...

Share

काल मरून मी स्वर्गात गेलो
इंद्र नाराज होता, रंभा तर फारच चिडलेली
एकंदरीत चित्र चिंताग्रस्त
माझ्या कर्मकांडाची फ़ाईल स्वर्गात हि रखडलेली

इंद्र म्हणाला प्रेम करायचा प्रेम करायचा
म्हणून तू तिच्यावर किती रे प्रेम करायचा
तुला प्रेम वाटता वाटता
माझ्या प्रेमाचा स्टोक मलाच कमी पडायचा

ती तुझ्याकडे ढुंकून हि पाहत नसली तरी
तू तिच्यासाठी रात्रं-दिवस झुरायचास
तिने पायाने लवंडली तरी
प्रेमाची घागर तू परत काठोकाठ भरायचास

तिने तुझ्याकडे पाहिलं नसलं तरी
हि रंभा तुझ्या प्रेमाच दररोज लाईव टेलिकास्ट पहायची
दयेलाही दया येईल असे तुझे प्रेम पाहून
हि रंभा ढसा ढसा रडायची

सौंदर्य नको अमरत्व नको
मी तुझ्या सारखा प्रेम करेल असा वरदान मागायची
शिका जरा त्याच्याकडून
असा वरून मलाच गाल फुगवून सांगायची

येवढ माझा नाव घेतला असतास तर
मी हि तुला पावलो असतो
तुझ्या प्रत्येक संकटात मदतीला
स्वताहून धावलो असतो

येऊ दे तिला वर एकदा
सरळ तिला नरकातच पाठवतो
बघतोच मग तिला
तू कसा नाही आठवतो

तसा म्हणताच बोललो
म्हणालो ती नरकात जाणार असेल
तर मलाही तिथेच पाठवशील
नरक हि मला तिथे स्वर्गाहून सुंदर भासेल

का म्हणून तिने
माझ्याकडे यायचं
तहानलेल्याने पाण्याकडे
का पाण्याने तहानालेल्याकडे जायचं ?

मी साधारण मनुष्य, ती रुपाची राणी
मी साचलेलं पाण्याचं डबकं, ती झुळझुळ पाणी
मी खोबरेल तेल, ती अत्तरदाणी
मी हिमेश चा ऊऊऊऊ, ती लताची गाणी
मी खुरटे केस, ती लांब सडक वेणी
मी आरे च दुध, ती शुध्द लोणी

असा बोलताच इंद्राने चक्क हात जोडले
सकाळच्या पहिल्या गाडीने परत पृथ्वीतलावर धाडले
म्हणाला माझ्या संसाराला आग लावायचा तुझं काही तरी कपट आहे
सांगून सुधारणार नाही असा तू कुत्र्याचा शेपूट आहे

तू साधारण असलास तरी
तरी तुझं प्रेम असाधारण आहे
तिन्ही जगावर मात करेल
असा तुझ्याकडे कारण आहे ..

क्षितीजं

Share

उमललेल्या कळ्या आता
मिटायला लागल्या आहेत
भावनांचे बांध आता
तुटायला लागले आहेत

भरून आलय आभाळ
काळजातल्या भिती संगे
हृदयाची वाढलीय धड्धड
श्वासांच्या घरघरी संगे

दूर क्षितीजा पर्यंत नजरा
कुणाचा तरी ठाव घेताहेत
माझे श्वास उच्छ्वासही
आता तुझेच नाव घेताहेत

वाटतं पळत सुटावं
त्या क्षितीजापलिकडे तू उभी असशील
ती वेड्या मनाची आशा आहे
क्षितीजं का कधी संपतील ?

मन आणि हृदय लागलेत
मेंदूशी भांडायला
आणि मी पळत सुटलोय
ती क्षितीजं ओलांडायला. . .

माझीच मी...

Share

सर्वस्व माझे तुलाच वाहिले
सोडून गेलास तू
आता एकटीच राहिले
.
.
ना कोणाची मी
ना कोण माझे आहे
आठवणीत राहणारी
फक्त माझीच मी आहे

स्वप्न नेहमी तुझेच पाहिले
तुटली स्वप्न सारी
आता वास्तव्यच राहिले
.
.
ना स्वप्नांची मी
ना स्वप्न माझे आहे
आजच्यात जगणारी
फक्त माझीच मी आहे

प्रेमात तुझ्या काव्य रचले
सुटली साथ तुझी
आता शब्दच राहिले
.
.
आहे शब्दांची मी
अन शब्द माझे आहे
शब्दांमध्ये रमणारी
फक्त माझीच मी आहे

तिने कित्ती सुंदर दिसावं..

Share

तिने कित्ती सुंदर दिसावं..
जसं गुलाबाचं फूल उमलावं..
कोणाच्याही नजरेत भरावं..
तासन तास पाहत रहावं..

तिने कित्ती गोड बोलावं..
ऐकणाऱ्याने विरघळून जावं..
हरवूनच जावं ..
सोबत तिच्या..

तिने कित्ती साधं रहावं ..
त्यातही रूप तिचं खुलावं..
कोणीही फिदा व्हाव ..
अदांवर तिच्या..

तिचं उदास होणं..
कसं हृदयाला भिडावं..
कोणालाही वाईट वाटावं..
अश्रूंनी तिच्या..

तिचं हसणं ..
कोणालाही सुखवावं..
कोणीही घसरून पडावं..
गालावरल्या खळीत तिच्या..

तिच्या नजरेने मलाच शोधावं..
अचानक नजरेने नजरेला भिडावं ..
मग तिने लगेच दुसरीकडे पहावं..
लाजेने चूर चूर व्हावं..

ती समोर असताना ...
मी सारं काही विसरावं..
तिने इश्य करत लाजावं..
मी 'हाय हाय' करत घायाळ व्हावं ..

तिने फक्त माझंच रहावं..
मीही फक्त तिच्यासाठीच जगावं..
साथ देऊ जन्मोजन्मी ..
विरहाचं दुख कधीही न यावं..
कधीही न अनुभवावं..

वेलीवरची एक कळी...

Share

वेलीवरच्या एका फुलाला
आपल अस्तित्व उमगलं
कधी वेलीवर , कधी देवाच्या मूर्तीवर
तर कधी निर्माल्य म्हणून
स्वत:च आयुष्य उजळवलं

वेलीवर असताना सोंदर्य
मंदिरातल्या मूर्तीवर पावित्र्य
तर कधी निर्माल्य असूनही मंद सुगंध .

एका दिवसाच्या आयुष्यातही
इतकं काही कमावलं
स्वत:च्या अस्तित्वानी
कधी वेलीला कधी मंदिराला
तर कधी निर्माल्यातील
सुकलेल्या फुलांनाही मोहवलं

वेलीवरची एक कळी जेव्हा
उमलली असेल
आपल्या एका दिवसाच्या
पण सुंदर आयुष्याची
त्या फुलाला कल्पनाही नसेल.

आता आपलं आयुष्य बघून
ते फुल पण हसत असेल
प्रत्येक क्षण दुसर्यांना दिला
यातच आयुष्याच सार्थक झालं
असा मानून डोळे मिटेल..

आज तु जाऊ नकोस...

Share


आज तु जाऊ नकोस
विरहात मला सोडु नकोस
स्वप्न आपल्या प्रेमाची
अश्रूच्या डोहात वाहू नकोस

आज तु जाऊ नकोस.....!!!

आस मनाची सोडू नकोस
प्रेमाचा मोह मोडू नकोस
प्रेमाच्या प्रीत कळीला
फुलण्याआधी तोडू नकोस

आज तु जाऊ नकोस.....!!!

शांत असा राहू नकोस
हात माझा सोडू नकोस
एकत्रच चालायचे आहे
वाटा वेगळ्या करू नकोस

आज तु जाऊ नकोस.....!!!

रविवार, १७ ऑक्टोबर, २०१०

दूर दूर त्या वळनावरती...

Share


दूर दूर त्या वळनावरती,
भेट आपुली घडली होती..
बघता बघता दोघांचीही,
ह्रदय जणू धडधडली होती..

ह्रदय अशी धडधडली जेव्हा,
डोळ्यांचे जाहले इशारे..
तुझी पापनी अलगद उठता,
तीर मनाला भिडले सारे..

तीर मनाला भिडतान्नाही,
गंध तयाचा दरवळला..
हलके हलके श्वासही माझा,
गंधासोबत विरघळला..

विरघळताना श्वास म्हणाला,
सांग माझी तू होशील का?
चिंब भिजुनी पावसात या,
मिठीत मजला घेशील का?

मिठीत मजला घेशील जेव्हा,
धरणीला या सूर मिळे..
भेट आपुली पाहून राणी,
मंद मंद पाउस जळे..

मंद मंद पाउस जळे हा,
झुरू लागली ही धरती..
प्रीतिचा गुलमोहर फुलला,
दूर दूर...त्या वळनावरती....

मंगळवार, १२ ऑक्टोबर, २०१०

पाउस .... माझा सखा

Share

मंद पण गार वारा सुटलेला,
दिवस होता पण अंधारून आलेला

झाडांच्या पानांची कुजबुज सुरू झाली,
सगल्यानाच त्याची चाहूल लागली

सगळेच त्याची वाट पाहत होते,
मी ही त्याचीच वाट पाहत होते

कित्येक महिने झाले होते त्याला पाहून,
गेला होता मी येईन लवकर असे सांगून

मग यायला ईतका वेळ का लागला,
पाहता पाहता रस्ता मोकळा झाला

त्याचे टपोरे थेंब माझ्या अंगावर पडले,
बेदुन्द होऊन मी त्याच्यासवे न्हाहले

गेले विसरून त्याच्यसंगे ती जखम मनातली,
आली माझ्या चेहर्‍यावर नवीन झळाली

मनात आशेची एक पालवी फुटली
चेहर्‍यावर खळखळनारे हसू आले,

त्यानेच माझ्या आयुष्यात सुखद क्षण दिले
मलाही त्याने त्याच्यासारखेच बनविले

असा हा सगल्याना गोडी लावणारा
पाउस माझा सखा आला घेउनि रिमझिम धारा......
.
.
.
-उज्वला राउत

देणे-घेणे

Share

आरोळी ओळीतून ठोकतो
प्रतिसाद मला द्या
शब्दानी शस्त्रे वाटतो,
आवाज मला द्या!
जिंदगी ही माझी-तुमची,
आहेच अशी खडतर
सांत्वनांचे सुर देतो
नवे गाणे मला द्या !!
खाचखळग्यांची पायवाट,
सार्याँच्याच पायाखाली येते,
नव्या वाटा मी देतो ,
स्वप्नांचे गाव मला द्या !!!
-अनिश शाम सुतार
बेळगांव

वाट पाहते

Share

वाट पाहते तुझी अशी मी ..........

तृप्त सुखाच्या निवांत कुरणी

सरीत पहिल्या

साज लेवुनी धूळ फुलांचा,

होवून पाऊलवाट सुगंधा

वाट पाहते तुझी अशी मी ..........

अत्रुप्तीच्या खुल आभाळी

अंधारामधी,

नक्षत्रांची उटी लावुनी

स्वर्गंगा की तेजोगंधा

वाट पाहते तुझी अशी मी............

वातेपरी भावोत्कट होवून

वाटच होवून

वाट पाहते तुझी अशी मी ...........

अस कस रे हे नातं.....तुझ आणी माझ

Share

ना पाहिलं ना भेटलं
फ़क्त शब्दांत अनुभवलं
कधी साथ देत तर कधी
कोवळ्या वादात गुंतलेलं

मी ऎकलेय भाव तुझे
तुझे शब्द माझ्याशी बोलतात
हसत, खेळत, बागडत
कागदावर असेच उतरतात

तु गातोस शब्द माझे
ते ओठांत तुझ्या फ़ुलतात
सहज, सुंदर, सुमधुर
मनात येवुन गुणगुणतात

तु कधी असा तर कधी कसा
रंग बदलणारा बहुरुपिया जसा
मनाच्या खोलीत खोल शिरत
गोल फ़िरणारा भोवरा जसा

तुझे बदलणारे रंग
माझ्यात रंग भरतात
भोवर्‍यात गोल फ़िरत
माझे श्वास गुंतवतात

तुझे असणारे आभास
माझ्यात जिव ओततात
एकटेपणात अलगद येवुन
सोबतीची चाहुल देतात

माझ्या मनात मी
तुला असच कोरलय
प्रत्यक्ष न भेटता
माझ्यातुनच तुला चोरलय

अस कस रे हे नातं.....तुझ आणी माझ

पत्र लिही पण......

Share

पत्र लिही पण नको पाठवू शाई मधूनी काजळ गहिरे
लिपीरेशान्च्या जाळीमधूनी नको पाठवू हसू लाजरे.

चढण लाडकी भूवई मधली नको पाठवू वेलान्टीतून
नको पाठवू तीळ गालीचा पूर्णविरामाच्या बिन्दूतून

शब्दामधूनी नको पाठवू अक्ष्ररामधले अधीरे स्पन्दन
नको पाठवू कागदातूनी स्पर्शामधला कम्प विलक्शण

नको पाठवू वीज सूवासिक उलगडणारी घडीघडीतून
नको पाठवू असे कितीदा सान्गीतले मी , तू हट्टी पण !

पाठवीशी ते सगळे सगळे पहील्या ओळीमधेच मीळ्ते
पत्र त्या नन्तरचे मग वाचायाचे राहून जाते

पुस्तकांतली खूण कराया

Share

पुस्तकांतली खूण कराया
दिले एकदा पीस पांढरे;
पिसाहुनि सुकुमार कांहिसे
देतां घेतां त्यांत थरारे.

मेजावरचे वजन छानसे
म्हणुन दिला नाजूक शिंपला;
देतां घेतां उमटे कांही
मिना तयाचा त्यावर जडला.

असेच कांही द्यावे घ्यावे
दिला एकदा ताजा मरवा;
देतां घेतां त्यातं मिसळला
गंध मनांतिल त्याहुन हिरवा.

रक्तामध्ये ओढ मातीची..........

Share

रक्तामध्ये ओढ मातीची
मनास मातीचे ताजेपण
मातीतून मी आले वरती
मातीचे मम अधुरे जीवन

कोसळताना वर्षा अविरत
स्नानसमाधी मध्ये डुबावे
दवांत भिजल्या प्राजक्तापरि
ओल्या शरदामधी निथळावे

हेमंताचा ओढुन शेला
हळूच ओले अंग टिपावे
वसंतातले फुलाफुलांचे
छापिल उंची पातळ ल्यावे

ग्रीष्माची नाजूक टोपली
उदवावा कचभार तिच्यावर
गर्द वीजेचा मत्त केवडा
तिरकस माळावा वेणीवर

आणिक तुझिया लाख स्मृतींचे
खेळवीत पदरात काजवे
उभे राहुनी असे अधांतरी
तुजला ध्यावे, तुजला ध्यावे

बाकी...

Share

होते का ते नुसते
येणे आणिक जाणे
होत्या का त्या नुसत्या गप्पा
क्षेमकुशल अन स्मरणे ;

होते का ते नुसते फिरणे -
करड्या चढणीवरुणी
हिरवी उतरण घेणे
होते का ते नुसते बघणे
क्षितीजावरची चित्र लिपी अन
पायाखालील गवतावरची
तुसें रेशमी

निवांतवेळी
आभाळाच्या पाटीवरती
हिशोब मांडू बघता
उरते बाकी
चंद्र घेतला जरी हातचा
तरीही उरते बाकी.

दूरदेशी गेला बाबा…

Share

दूरदेशी गेला बाबा… गेली कामावर आई

नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही !! ध्रु !!

कसा चिमणासा जीव , कसाबसा रमवला

चार भिंतित धावुन दिसभर दमवला

‘ आता पुरे ! झोप सोन्या..’ कुणी म्हणतच नाही

कशासाठी कोण जाणे देती शाळेमध्ये सुट्टी ?

कोणी बोलायाला नाही…कशी व्हावी कट्टी-बट्टी ?

खेळ ठेवले मांडून … परि खेळगडी नाही !! २ !!

दिसे खिडकीमधुन जग सारे , दिशा दाही

दार उघडुन तरी तिथे धावायचे नाही

फार वाटे जावे परी – मुठीमध्ये बोट नाही !! ३ !!

नीज दाटली डोळ्यात , परि घरी कुणी नाही दूरदेशी गेला बाबा……

- संदिप खरे

हात तुझा हातात अन धूंद ही हवा

Share

हात तुझा हातात अन धूंद ही हवा
रोजचाच चंद्र आज, भासतो नवा

रोजचेच हे वारे, रोजचेच तारे
भासते परी नविन विश्व आज सारे
ही किमया स्पर्शाची, भारीते जीवा

या हळव्या पाण्यावर, मोहरल्या छाया
मोहरले हृदय तसे, मोहरली काया
चांदण्यात थरथरतो, मधुर गारवा

जन्म जन्म दुर्मिळ हा क्षण असला येतो
स्वप्नांच्या वाटेने चांदण्यात नेतो
बिलगताच जाईचा उमलतो थवा

क्षणभर मिटले डोळे, सुख न मला साहे
विरघळून चंद्र आज, रक्तातून वाहे
आज फुले प्राणांतून, केशरी दिवा

स्वप्नांची परीक्रमा…

Share

सांभाळते आता मीच माझं स्वप्नं….
देणार नाही तूला…..चुकूनही उसनं….
जमतील तसे फटकारे मारीन ब्रशचे…..
मागणार नाही तूझ्याकडे आभाळ रंगाचे…..!!
माझी स्वप्नं अलगद पापण्यांवर ठेवेन माझ्या….
मागीतली तरी तु ……देणार नाही तूला….
तशी आधीपसूनच जपते …..फूलपाखरं स्वनांची….
फूलपाखरंच ती रे……एकजात हळवी….!!!
पायवाट होती फूलांची……काळजात छळवी….
स्वप्नांचे वेचे घातले ओच्यात माझ्या…..
दिली गर्भरेशमी नक्काशी….तूच ना रे पदराला….

बघून येते माझी मीच आधीसारखी…
नाहीतरी एकटीच होते….राहीन एकटी…
येवू नकोस… आता तिथेच तु थांब…..अस्साच रहा उभा….
मी करून येते स्वप्नांची परीक्रमा…..
फूलांसारखी स्वप्ने येतात का रे आभाळाला…??

कारण…..
कोणाच्यातरी स्वप्नांनी आज…
केली म्हणे…..आत्महत्या…!!!

रंग

Share

तुझ्या पापण्यांना रंग
देउ मी कुठले…?
जरा स्पर्श होता
तु डोळेच मिटले…?

निथळले रंग सारे
मी घट्ट बांधलेले…
त्याच रंगात होते
मी हट्ट सांधलेले…
सांग ओलावले का ?
रंग सारे तुझेही…
तप्त आभाळ सांग
का डोळ्यात भिजले?

विझलेत दिप सारे
विजांची उन्हेही…
दिले रंग मजला
जरासे तिनेही…
तो रंग चांदण्याचा
जरी त्यात होता
थेब अता मोजकेच
या ओठात उरले….

ओल श्वासातुनी
ऋतु गार वाहे…
तुझ्या नेत्री तरी
का अंधार आहे…?
सांग पाहिलेस का?
मघा तु मलाही…
रंग माझे तुझेही
का गालात हसल

काही चारोळ्या

Share

मरणप्राय यातना भोगण्यापेक्षा
मरणच यावेसे वाटते
मरण जेव्हा येऊ का विचारते
तेव्हा आणखी थोडे
जगावेसे वाटते.....


अर्थ साऱ्या जीवनाचा हाच आहे समजला
समजलो न मी कुणा, कुणी मला न समजला
तोही असो पण गर्व ज्याचा जीवनी मी वाहिला
आजपण त्याही यशाचा अर्थ नाही समजला...

अंतरीच्या यातनांना अमरता द्याय खरी
निर्मिला मी 'ताज' माझ्या शायरीचा त्यावरी
स्पर्शुनी 'त्या' शिल्पास तेथे यमुनाच वाहते
यमुनेसवे नयनांतुनी गंगाही येथे वाहते....

 ऐसे नव्हे कि शायरी या शायरानीच गायली
कमलासवे भ्रमारादिकांनी आधीच होती गायली
पाठ पहिल्या शायरीचे त्यांनी आम्हा दिले
फक्त त्यांच्या गुंजनाला शब्द मी माझे दिले...

आसवे नयनात या निर्मिली नसती कुणी
नावही शायरीचे ऐकले नसते कुणी
ज्यांनी दिला दर्द नयनी आसवेही निर्मिली
मी नव्हे,हि शायरी त्यांनीच आहे निर्मिली...

शेतीचे शिक्षण देता देता
त्यांनी शिक्षणाची शेती केली
मातीचे शिक्षण दूर राहिले
त्यांनी शिक्षणाचीच माती केली..

७) माणसांनी गंगेत न्हाऊन पापे धुवून घेतली
त्याचेच परिणाम आत्ता बघायला मिळतात
लाखो रुपये खर्चून तिचं माणसे
साफ-सफाईच्या मोहिमा आखतात..

निमूट लाटांच्या तडाख्यात
स्व:ताचे अस्तित्व शोधात
आपले स्व:ताचे असे
बरेच काही असते जपण्यासारखे
कवितेच्या वहीत बंदिस्त केलेल्या
आपल्याच गंधासारखे...

प्रत्येक माणसाला आपण जीवनात
काहीतरी नवीन कराव अस वाटत असत
परंतु अशा जीवनाची सुरवात कोणीतरी आधी करून गेलेला असतो
तरी प्रत्येकाला आपण काहीतरी नवीन करतो अस का वाटत असत ?

खेळ हा दोन नशिबांचा,
इथे अगदी निराळाच आहे,
दोघांची हार, नाहितर दोघांचीही जीत,
हाच ह्या खेळाचा एकुलता "नियम" आहे.

नियम चार भिंती
वर खोडकर आकाश
मन पाखरू होऊन उडत
तोडून सगळे "पाश"

तुझ्या आठवणीनी,
माझ्या भोवती पाश आवळला आहे,
होवू देत गं कहीही,
उगीचच नाही मी हा ''त्रास'' निवडला आहे...


त्रास तुझ्या असूनही नसण्याचा
भास तुझ्या नसूनही असण्याचा
काय सांगू "छंद" हा वेडा लागला
क्षणात हसण्याचा क्षणात रडण्याचा

छंद तुझ्या चारोळ्यांचा
वेड लाऊन गेला
पुन्हा पुन्हा भेटण्यासाठी
हा रोजचा नवा "बहाणा"

मनातले प्रेम लपवन्याचे,
तू अनेक बहाने केलेस,
पण चोरून पाहणा-या "नजरेला",
तू उत्तर काय दिलेस.....???

नजरेला नजर काय
बोलून गेली
तुझ आणि माझ "प्रेम"
आहे एकच सांगुन गेली

नजरेनेच दिली होती
तुझ्या प्रेमाची ग्वाही
"ओठ" माझे काय बोलणार
कदाचित त्यानिही याचीच वाट पाहिली

भावनाच एवढ्या मोठा
कि शब्धच कमी पडतात,
म्हणूनच ओठान एवजी,
त्या "डोळ्यांनी" व्यक्त होतात.

दिवाळीला खातो मी पुरण पोळी
होळीला लावतो फटाक्याच्या सरी
काव्य शब्दांकन करताच जगतोय क्षणाक्षणाला
मी चारोळ्याच्या अशाच अनेक ओळी

हवा किती बदललीय
उन्हाळ्यात सर्दी, हिवाळ्यात पाऊस
राजस्थानच्या वाळ्वन्टात
जसा पिकावा उस !

विद्वानांच्या समोर
मी धाकटाच आहे
या गर्दीत सुद्धा
मी एकटाच आहे !

एकटेपणाच काय
तो तर असतोच कायम सोबतीला
महत्वाच काय
तर कुणीच नसत बाजूला, पहायला

डोळ्यांनी पाहता येत
अगदी खोलवर मनात जाता येत
तुझ्या शब्दांनाही डोळे आहेत वाटत
त्यानाही "खोलवर" उतरता येत

बंद पापण्यांचा आडुन
तुझ्या डोळ्यातही लपल होत..
मनाच्या तळाशी खोलवर
तू माझ एक "गुपित" जपल होतस..!

एक गुपीत एकदा एका बातमीला
गुपचूप जाऊन म्हणाला
नको जास्त बघूस या "आरश्यात "
वेळ नाही लागत मला तुझ्यासारखं व्हायला

नको न्याहाळूस
तुझे "प्रतिबिंब" आरश्यात
दिसेल ते तुला
माझ्याही डोळ्यात !!

बिंब की प्रतिबिंब
एक सुलट एक उलट !
काय खर काय खोट ?
जरा "निसट"जरा पुसट !

एक क्षणच फिरवून जातो
आठवणी वरून हळुवार हात
"पहाटेच्या" तुटणा-या स्वप्नातूनच
होते सकाळची नवी सुरुवात

पहाट होताच डोळ्यांवर,
सूर्य प्रकाश आला,
"स्पर्श" होताच त्याचा,
मला तुझा भास झाला.

मनाची चल बिचल वाढवून
गेला तिचा स्पर्श
"आठवणीत" आहे अजूनही
मला तिचा हर्ष

आठवणीच काय
केव्हा ही येतात
तू दाखवलेल्या "सव्प्नाची"
आठवण करून देतात

खूप काही बोलायचय तिच्याशी
पण जीभच रेटत नाही
आग लागून सुद्धा आमचा
फटाकाच पेटत नाही!

आम्ही वाट पहातोय
त्याच्या दहाव्या अवताराची
तर त्याला आहे प्रतीक्षा
अर्जुनाच्या जन्माची!

फ्राय-डे ला ड्राय-डे
हे ज़रा जास्तच झालं
फालके पारितोषिकाला मन्ना-डे
एव्हडं फक्त छान झालं !

दुश्मन का तुम्ही दोघी
सांग मला माहित नाही
तू आणि आठवण तुझी
एक साथ येत नाही!

काही नाती तुटतात
त्यांचा आवाज होत नाही
पण, मन आतून किंचाळ्या
मारल्याशिवाय राहत नाही.

नकोत तुझ्या खोट्या प्रेमभावना
ती निरागस आठवण
माझ्या मोडलेल्या मनाला
तुझ मृगजलासामान सांत्वन.

अडवत असतो मी स्वतःला
तुझ्याकडे येताना
वाट पायात घुटमळत राहते
पाहतो तिला अडगळीतून जाताना.

मोडत असतो मी मनाला माझ्या
जोडताही असतो
जे नियतीने शिकविले मज
तेच त्यास शिकवत असतो.

जगण्याच्या वाटा बदलत गेलो
गुन्हेगार चिखलात रुतत गेलो
दैवाच्या असहाय वेदना
मी सहज झेलत गेलो.

प्रत्येकाचे इथं
ठरलेले भाव आहेत
सापडले ते चोर
बाकीचे साव आहेत

प्रेमात पडलं तरी
इजा होत नाही
ह्रदय दिलं तरी
काम अडत नाही!

किती नाही म्हंटल तरी
अपल ते आपलच असत
नाहीतर तुजासाठी माझे
रक्त सांडलच नसत.

पोठासाठीच चोरी केली,
ही चुक पुन्हा नाही,
पण भाकरिवर हक्क सांगितला,
हा काही गुन्हा नाही.

शहाणं बनण्यापेक्षा मला
वेडं व्हायला आवडेल
तुझ्या सारख्या (दिड ) शहाण्यावर
विश्वास ठेवायला आवडेल .....

"कळवा" चं झालं "कलवा"
इथं झाला कालवा
होइल सारे ठीक
थोडा पॉइंटर हलवा

इजा होते म्हणूनच...
डोळे सारखे पाणावतात
काम अडत कारण...
श्वास गोठून जातात !!!

प्रेमात पडलं तरी
इजा होत नाही
ह्रदय दिलं तरी
काम अडत नाही!

मैत्रीच्या वाटेवर
गावे खूप असतात
थांबून पाहूणचार घ्यावा
अशी थोडीच असतात!

तुझ्या विषयी बोलताना
मी ज़रा विचार करते
माझ्याशिवाय कोणी नसेल
याची मी खात्री करते .....

पाऊस...

Share

पाऊस...
गोष्ट सुरु होइल तेव्हा सुरु झाला पाहिजे...
गोष्ट वाचून होईस्तोवर पडला पाहिजे...

गोष्टीतल्या पात्रामध्ये रमला पाहिजे...
नायीकेमागे धावताना दमला पाहिजे...
दोघानमधल्या रागासारखा
लटका लटका भांडला पाहिजे...
नंतर तिच्या डोळ्यामधून
सर सर सांडला पाहिजे...

सुखदुखाच्या होडीतून दुरवर तरंगताना
मधेच भान यावे आणि पहावे तर पाऊस!
'हा कधी आला ' म्हणावे हसून ..
मागे रेलून... डोळे मिटून...
मग आठवावी आपली एखादी गोष्ट-
-तर तिथेही पाऊस !........

पहिला पाऊस पडतो तेंव्हा...

Share

पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं ....
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं !

आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या
कोसळणार् या धारा
श्वासांमध्ये भरून घ्यायचा
सळाळणारा वारा

कानांमधे साठवुन घ्यायचे
गडगडणारे मेघ
डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची
सौदामिनीची रेघ

पावसाबरोबर पाऊस बनून
नाच नाच नाचायचं
अंगणामधे , मोगर् यापाशी
तळं होऊन साचायचं !

आपलं असलं वागणं बघुन
लोक आपल्याला हसतील
आपला स्क्रू ढिला झाला
असं सुध्दा म्हणतील

ज्यांना हसायचं त्यांना हसू दे
काय म्हणायचं ते म्हणू दे
त्यांच्या दुःखाच्या पावसामधे
त्यांचं त्यांना कण्हू दे

असल्या चिल्लर गोष्टींकडे
आपण दुर्लक्ष करायचं !
पहिला पाऊस एकदाच येतो
हे आपण लक्षात ठेवायचं !

म्हणून ..
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं ...
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं !

2. पाऊस आलाय….भिजून घ्या
पाऊस आलाय….भिजून घ्या
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

रंगवुनि स्वप्न माझे-

Share

रंगवुनि स्वप्न माझे-

निघुनी का गेलास तू?

जीवनाचा अर्थ मजला

सांगुनि गेलास तू!

जीवनाचे चित्र माझ्या

आज मी रे रेखिले!


रंग त्याचा होऊनी अन्‌

उडूनि का गेलास तू?

मूर्ति तव मी नयनि माझ्या

होती रे रेखाटली-

अश्रुधारा होऊनी अन्‌

निघुनी का गेलास तू?

चित्र अपुरे…स्वप्न अधुरे

सांग रे फुलवू कशी

मीलनाची आस मज का-

लावूनि गेलास तू?’

तुझा सहवास

Share

तुझा सहवास-
जसा पहाटेचा वारा
फूले फूल झरझरा

तुझा सहवास-
झिरी झीरे चांदण्यांचा
मधुरसा उन्मादाचा

तुझा सहवास-
तुझ्या ह्रुदयीची तार
काढीतसे गोड सूर

तुझा सहवास-
कोमलता काव्याहून
मादकता गानाहून

तुझा सहवास
धरेवरी नाही मोल
जीव घेई कुठे तोल

तुझा सहवास-
आहे कसा- कशापरी?
कविताही मूक परी

इंदिरा संत

दुखविल्यानंतर.........

Share

अनावश्यक असे हा जन्म मित्रांनो
जगा माझ्यापरी थोडे पवित्रांनो

मला बोलावणी येती बिघडण्याची
तुम्ही लखलाभ तुम्हाला चरित्रांनो

मजा बरबाद होण्याची नका भोगू
बसा भिंतीवरी निर्जीव चित्रांनो

कुठे अमरत्व तुम्हाला तरी आहे?
कशाच्या काळज्या करता विचित्रांनो?

सुचे कविता मनाला दुखविल्यानंतर...
जपा सातत्य हे उर्जाजनित्रांनो

चुकून-चुकून

Share

चुकून चुकून कधींतरी डोळ्यांना डोळे
भेटले असतील, नसतील.
चुकून-चुकून कधींतरी चार शब्द
दिले घेतले असतील, नसतील …

शुकून-चुकूनमधले अचूक उभें करणारे-
असतील-नसतील मधल्या क्षणांचे स्पंदन
स्थिर करणारें
एकामागून एक कवचें निघळून मनासारख्या
नितळ संगमरवराचें घडलेलें तें शिल्प …

त्याचें अस्तित्व हेंच सर्वस्व. जोखीम जपून ठेवायची.
त्याचें दर्शन हीच शिक्षा. मुकेपणानें सोसायची.

-' गर्भरेशीम ' इंदिरा संत

आई

Share

कळ्या माझ्या आनंदाच्या
साठवील्या माझ्याकडे,
फुलवाया तुझ्यापुढे.

आसवे मी साठवली
पापणीच्या काठोकाठ,
तुझ्यापाशी देण्या वाट.

ठरवले मानापाशी,
बोलावयाचे कितितरी,
निजुनिया मांडीवरी.

किती लांब वाटे काळ,
आई कधी भेटशील?
जीव झाल उतवीळ.



- इंदिरा संत

अजूनही तिन्हीसांज

Share

चंदनाचा की चौरंग वर चांदीचे आसन
मायबाई अन्नपूर्णा रांगणारा बालकृष्ण
बाजूलाच सोनहंसी उभी चोचीत घेऊन
कांचनाची दीपकळी तिचे हळवे नर्तन
ओवाळाया आतुरसे पुढे तांब्याचे ताम्हन
हिलारती निरांजन उदवात धूपदान
तजेलशी गुलबास आणि नैवेद्याचा द्रोण

समोरच्या पाटावर लक्ष्मी घराची येणार
रोजचीच तिन्हीसांज मागे उभी राहणार

अजूनही तिन्हीसांज रोज येतच राहते
निरागस विध्वंसाच्या ढिगावरती टेकते
काळा धूर, लाल जाळ रास राखेची पाहते
काळोखाच्या ओढणीने डोळे टिपत राहते




- इंदिरा संत

तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला...

Share

तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला
माझ्यामनी प्रीत तुझी घेते हिंदोळा

गायिलेस डोळयांनी एक निळे गाणे
बट हळवी वार्‍यातील वेचिते तराणे
नकळत तव हात प्रिये हाती मम आला

पवनातूनी शीतलता दाटूनिया आली
दोन मने प्रीतीच्या गंगेतच न्हाली
आसमंत आनंदी धूंद धूंद झाला

ही दुपार भिजलेली, प्रीत चांदण्यात
मिटून पंख खग निवांत शांत तरुलतांत
आज तुझ्या सहवासी जीव धन्य झाला

तू दूर दूर तेथे, हूरहूर मात्र येथे...

Share

तू दूर दूर तेथे, हूरहूर मात्र येथे
विरहात रात्र मोठी प्रेमीजनांस वाटे

शब्दात सांगू कैसे ते दुःख अंतरीचे
ओलावले दवांत ते काठ पापण्यांचे
भरला स्वरात कंप, कंपात भाव दाटे

मी भाबडी मनाची आहेच स्वप्नवेडी
विरुनी तुझ्यात जावे ही एक आस वेडी
राहो अभंग प्रीती, राहो अभंग नाते

भाळावरी असे हे सौभाग्य लाल कुंकू
विक्राळ काळ येता दोघे तयास जिंकू
स्फुरता मनात आशा, ओठांत गीत येते

चांदण्यात फिरताना...

Share

चांदण्यात फिरताना माझा धरलास हात
सखया रे आवर ही सावर ही चांदरात

निजलेल्या गावातून आले मी एकटीच
दूर दिवे कळलावे पडले मागे कधीच
या इथल्या तरुछाया पण सारे जाणतात

सांग कशी तुजविणाच पार करु पुनवपूर
तुज वारा छळवादी अन् हे तारे फितूर
श्वास तुझा मालकंस, स्पर्श तुझा पारिजात

जाऊ चल परत गडे, जागले न घर अजून
पण माझी तुळस तिथे गेली हिरमसून
तुझिया नयनात चंद्र, माझ्या हृदयी प्रभात

परीक्षा येताच वाटते...

Share

परीक्षा येताच वाटते...
आपली नौका वादलापुढे आहे,
कसातरी अभ्यास करून
तिला डूबण्यापासुन वाचवायचे आहे.
परीक्षा येताच वाटते...
अभिमन्यु चक्रात फसतो आहे,
काही वाचुनी पुस्तके
त्यातून बाहेर निघायचे आहे.
परीक्षा येताच वाटते...
आयुष्यात मोठे संकट आलेले आहे.
प्राण पणाला लावून
त्याला दूर सरायचे आहे.
परीक्षा येताच वाटते...
तिसरे महायुद्ध सुरु आहे,
अभ्यासाला बनवुनी तलवार
या युद्धाला जिंकायचे आहे.
परीक्षा येताच वाटते...
नविन प्रकाश्ज्योत दिसणार आहे,
परीक्षेचा लागताच निकाल
पुढच्या वर्गात बसायला मिळणार आहे.

आताच अमृताची बरसून रात गेली...

Share

आताच अमृताची बरसून रात गेली
आताच अंग माझे विझवून रात गेली

मजलाच हाय माझे जपता न भान आले
मजलाच ऐनवेळी उधळून रात गेली

उरले जरा जरासे गगनात मंद तारे
हलकेच कूस माझी बदलून रात गेली

अजूनी सुगंध येई दुलईस मोगर्‍याचा
गजरा कसा फुलांचा विसरुन रात गेली

शब्दांची फुलपाखरे

Share

मनातील शब्दांची फुलपाखरे हळूच कागदावर उतरली …
आणि बघता बघता एक कविता जन्मास आली !

कविता जणू वाटत होती एखाद्या तान्ह्या बाळासारखी !
नुकतीच या अनोळखी जगात पाऊल ठेवलेली,
आपल्या अस्तित्त्वाचा शोध घेणारी …

मग वाटू लागली ती एखाद्या नववधू सारखी ,
थोडीशी बावरलेली, थोडीशी संकोचलेली…
आपण लोकांना आवडू की नाही या विचारात रमलेली !

कधी कविता वाटते जवळच्या मैत्रिणी सारखी,
आपल्या सुखात व दुःखात सहभागी होणारी …
आपल्या भावना समजून घेणारी !

शेवटी प्रत्येक कवितेला असतं एक स्वतःचं व्यक्तिमत्त्व,
ती ही शोधत असते सगळ्यांमध्ये आपलं वेगळं अस्तित्त्व !

- श्वेता

श्वास घेतला सहज…

Share

माझ्या ओंजळीत शब्द…
काही सांडले त्यातले,
त्यांना वेचून घेताना…
रंग भावनांना आले !

आसवात नाहताना…
किती भिजली अक्षरं,
कुठे जाई जुई कळ्या…
कधी कातळ पत्थर !

कवितेच्या जन्मासाठी…
किती कळा या सोसल्या,
किरणात शितलता…
आणि प्रखर सावल्या !

नको येऊ म्हणताना…
सत्य कल्पनेत आलं,
श्वास घेतला सहज…
झाली कवितेची ओळ !

पाऊस बहुरूपी

Share

पाऊस मुंबईचा
जेव्हा लागतो पडायला
इथल्या माणसासारखाच त्याला
वेळ नसतो 'थाम्बायाला'!

पाऊस दिल्लीचा
"भाषण" ऐकून झालाय 'ठग'
आणतो अवसान ' महापुराच'
नि जमतात नुसतेच 'ढग'!

पाऊस काश्मीरचा
'बर्फ' होउन' थिजला
इथल्या दहशातिला
तो बापडाही भ्याला!

बंगलूरच्या पावसाचा
निरालाच 'ट्रेंड'
पाचच दिवस पडीन, म्हणतो
'आय डोंट वर्क ऑन वीकेंड'!!

पाऊस पुण्याचा
भलताच 'चेष्टेखोर'
'ती' ला भेटायला पडाव बाहेर
तर धरतो लगेच जोर !

पाऊस पंढरीचा
पडतो 'अभंग'
जसे विठ्ठलाच्या कीर्तनी
वारकरी दंग!

असा पाऊस 'बहुरूपी'
वाटे सर्वाना आपला
हां जिथे जिथे पडतो
होउन जातो तिथला!

पाऊस आलाय….भिजून घ्या...

Share

पाऊस आलाय….भिजून घ्या
थोडा मातीचा गंध घ्या
थोडा मोराचा छंद घ्या
उरात भरून आनंद घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

बघा समुद्र उसळतोय
वारा ढगांना घुसळतोय
तुम्हीही त्यांच्यात मिसळून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

ऑफ़ीस रोजच गाठत असतं
काम नेहमीच साठत असतं
मनातून भिजावंसं वाटत असतं
मनाची हौस पुरवून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

सर्दी पडसे रोजचेच..
त्याला औषध तेच तेच..
प्यायचेच आहेत नंतर काढे ,
आधी अमृत पिऊन घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

बघा निसर्ग बहरलाय
गारव्याने देहही शहारलाय
मनही थोडं मोहरून घ्या..
आलाय पाऊस…..भिजून घ्या

आठवण

Share

सांज सकाळी प्रत्येक काळी
मला तुझी आठवण येते.
ती आठवण एक साठवण
बनून मनात विरून जाते.
तुझ्या येण्याची आस, स्वप्नांचा भास
वाट तुझी पहावीशी वाटते
मोगर्याचा सुगंध, आठवणीतला गंध
अजुनही मन प्रसन्न होते
शोधुनी दिशा दाही दिसत नाही काही
मग मात्र दुःख होते.
आशा काळी संस्मरणीय वेळी
ही कविताच माझी साथ देते.

आज मी आयुष्य माझे

Share

आज मी आयुष्य माझे चाचपाया लागलो
नेमके ते हरवले, जे मी जपाया लागलो

त्रस्त या जीन्यास झाला स्पर्श ओझरता तिचा
अन नको म्हटले तरीही मी जगाया लागलो

गीत माझ्या लेखणीचे एवढे भिनले तिला
ती लिहाया बैसली अन मी सुचाया लागलो!

ठरवले हे पाहिजे ! ते पाहिजे ! ते हि हवे !
मागण्या ताज्यातवान्या... मी थकाया लागलो!

शोधले माझेच पत्ते आत माझ्या मी किती!
हरवलो तेव्हाच कोठे सापडाय लागलो!

मज न आता थोडकी आशा कुणी कि 'वा!'
म्हणा आज मी माझ्याचसाठी गुण गुणाया लागलो!

काय हे आयुष्य माझे !काय हि थट्टा तरी!
मी तिला सोडून सर्वा आवडाया लागलो!!
संदीप खरे.

आस

Share

वैभवे सारी जरी ही पास होती;
काळजाला फक्त त्याची आस होती!
जीव माझा घेउनी तो दूर गेला;
जिंदगी बाकी इथे वनवास होती!
एकदा रागात त्याला बोललो बस...
कोणती मग दुशामानी माझ्यास होती!
वादळाने घेरलेल्या झोपडीची;
वेदना कळली कुठे वार्यास होती!
जीवनाला रूप आले वाळवंटी;
जीदागानी कोरडा मधुमास होती!
-शेख गणी

शुक्रवार, १ ऑक्टोबर, २०१०

Share

कॉलेज..गम्मत..

Share

कॉलेज..गम्मत..
कॉलेजचा पहिला दिवस
मुसळधार पाउस
खोडसाळ वारा भन्नाट
छत्री उलट पुलट

नविन चपला सपसप
चिखल उडवी रपारप
शुभ्र सलवार माखलेली
मी पावसात भीजलेली

हॉल मधे जाउ कशी
ऍड्रेसला हजेरी लाउ कशी
सिनीयर्स..रॅगींग..बाप रे
कोणीतरी मला वाचवा रे

कोणीतरी एवढ्यात पुटपुटल
मागचं दार आहे खुलं
भेट सुरु अधुन मधुन
कधी चुकुन, कधी जाणुन

डिग्री घेउन तो गेला
तरी येउन भेटु लागला
माझेही शिक्षण पुरे झाले
हॉस्टेल मधे रहाणे बंद झाले

आज बागेत मी नातवंडांसोबत
तोही दिसला नातवंडांसोबत
ओळखले आम्ही एकमेकांना
गम्मत वाटली ते दिवस आठवताना

खरी गम्मत तर पुढेच घडली
त्याची 'ती' आणी माझे 'हे'
हातात त्यांच्या भेळ पुडे
’एकाच कॉलेजचे आम्ही दोघे’
ओळख त्यांनी करुन दिली !!

रजनी अरणकल्ले ०७.०६.०९

एकटेपण..

Share

एकटेपण..
पाण्याच्या एकाच थेंबासारखं..

कधी पहाटेच्या दवाच्या टिपासारखं,रसिक,
धुक्याचा हात धरून अलगद पाकलिवर उतरनारं..

कधी हळवं,
भुईवर उतरताच तिच्या भेगाना जिरवता जिरवता स्वतःच जिरणारं..

कधी नादखुलं,
दिसेल त्या उतराच्यानादाला लागुन, डबक्यात अडकणारं..

कधी व्यवहारी,
मातीवर टेकताच समुद्राचा रस्ता शोधणारं…

कधी भाबड़,
पावसाच्या करंगलिला सोडून, उगाचच कुणाच्या खिडकिशी डोकावनारं..

कधी रागीट,
रागात येवून विजेच्या तारावर जिव जाईपर्यंत लोंबकालणारं..

कधी हसरं,
हजार थेंबासोबत खदखदून हसनारं,
पण, नेहेमीच, एकट..

वेड ते एकटेपण, आणि वेडा तो थेंब..
दोघात नातं एवढच की,
एकटेपणात साथ देतो,तो पापणीखालचा एकटाच थेंब..

साथ असली त्याची, तरी सोबत नसत मन
थेंब जातो सुकून, पण झोंबत राहातं, ते एकटेपण….


दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही

Share



दिस नकळत जाई, सांज रेंगाळून राही

क्षण एक ही ना ज्याला, तुझी आठवण नाही

भेट तुझी ती पहिली, लाख लाख आठवतो
रुप तुझे ते धुक्याचे, कण कण साठवतो
वेड सखी साजणी हे, मज वेडावून जाई

असा भरुन ये ऊर, जसा वळीव भरावा
अशी हूरहूर जसा गंध रानी पसरावा
रान मनातले माझ्या, मग भिजूनीया जाई

आता अबोध मनाची, अनाकलनीय भाषा
कशा गूढ गूढ माझ्या तळहातावर रेषा
असे आभाळ आभाळ दूर पसरुन राही



Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top