Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

रविवार, २० जून, २०१०

आपल्या दोघांना गोष्ट फार जुनी नाही….

Share

आपल्या दोघांना
गोष्ट फार जुनी नाही….
तेव्हा पहात होतो
झाडाखाली चोरुन भेटताना
तळ्याकाठी रमताना
बागेत स्वच्छंद भटकताना
वेळीअवेळी, कधी भर पावसात
लोकांना  नवनवीन कारणं देत,
एकमेकांच्या डोळ्यांत बघत
तेव्हा दिवस नव्हता पुरत,
आपल्या दोघांना !
पण आताशा पहातोय,
घडी हळूहळू विस्कटताना
होतायत विसंवाद, वितंडवाद
आणि कलहाचा घंटानाद.
हल्ली पहावं लागतंय
एकमेकांशी अकारण भांडताना.
लोक आजही कारणं विचारतायत,
आपल्या दोघांना.
पाहिलेलं कुठलं खरं समजावं-
नक्की काय बिनसलंय, कुणी सांगावं-
या नात्याचं आता काय करावं-
हे समजणार आहे का कधीतरी,
आपल्या दोघांना ?

रोज दुपारी ऑफिस मध्ये येई झोप मस्त

Share

*रोज दुपारी ऑफिस मध्ये येई झोप मस्त

सकाळ पासून वाट पाहणारा डब्बा केला मी फस्त
रोज दुपारी ऑफिस मध्ये येई झोप मस्त
ओले होतात डोळे, जांभळ्या देऊन देऊन
घ्यावी एक डुलकी तर साहेब बघतो दुनकून

ऑफिस मधली दुपार, बंद पाडते नैसर्गिक घड्याळ
डोळे उघडून प्रभावी, होतात मानसिक हाल
डुबवून काढला चेहरा, पण झोप उडत नाही
काय करावे दुपारचे काहीच सुचत नाही

मी खुर्ची मध्ये, आणि वेळ पुढे-पुढे सरकत जाते
वेळेची गती, आणि माझी बुद्धिमत्ती संत होत जाते
अखंड काळाचे असतात एक ते तीन चे दोन तास
आणि मग कटिंग मारून संपतो दुपारचा वनवास

प्रित....

Share

प्रित....
 
सांग सखे सांग तू
प्रित माझी होशील का
बंध तोडून जातिचे तू
माझ्यासंगे येशील का
आड आली नाती तुझी तू
नाती सारी सोडशील का
नावापुढे नाव तुझ्या मांझ तू
जोड्शील का
सांग सखे सांग तू
प्रित माझी होशील का
फ़ुलावानी जपून ठेवीन
ह्रुद्य़ाच्या गाभार्‍यात
झाड होऊन सावली देइन
कडकड्त्या उन्हात
आली वादळं तरी
मी वणवा नाही पेटू देणार
उडाली धूळ तरी
अश्रू नाही वाहू देणार
हात हाती घेऊन तू
साथ मला देशील का
भांगामध्ये कुंकू माझ्या
नावाचं तू भरशील का
सांग सखे सांग तू
प्रित माझी होशील का

विरहाचा पाऊस

Share

पावसाची एक सर,
अलगत बरसून गेली
मनातल्या तुझ्या आठवणींना
हळुवार स्पर्शुनी गेली

मन झाले ओलचिंब
गळा हि दाटुनी आला
पावसाचे काळे ढग माझ्या
डोळ्यांत साठवूनी गेला

बेधुंद होऊनी मग
पावसाच्या सरी झेलत राहिली
तुझ्या विरहाच्या पावसात
बेभान होऊन भिजत राहिली

सुटला सोसाट्याचा वारा
अंगाशी येवूनी झोंबला
त्या वा-यातही मला
तुझाच स्पर्श जाणवला

नकळत शरीर स्तब्ध झाले
मन माझे भूतकाळात रमले
डोळ्यांत अश्रुंचे ढग साठले
बरसात राहिल्या तुझ्या आठवणी
मन त्यातच भिजत राहिले

मझि कविता... प्रेम...

Share

प्रेम...
विचार कर मना, विचार कर मना,
एकदा वेळ गेली की येत नाहि पुन्हा
असेल मनांत कोणी तर व्यक्त करा प्रेम
थांबेल ती तुमच्यासाठी याचा नाही नेम
असेल ती सोबतीला तर पाहू नका जना
एकदा संधी गेली की येनार नाय पुन्हा...
 
असेल जर प्रेम तर विचार मिळणार
मिळाले विचार तर मनं जुळ्णार
मनं जुळ्ली तर ती साथ तुम्हा देणार
साथ तिन दिली तर संसार होणार
असेल भाव प्रितीचे तर वाट पाहू नका
खरं प्रेम एक्दाच होत होणार नाही पुन्हा...

विडंबन कविता : आयुष्यावर बोलू काही (संदीप खरे)

Share

जरा चुकीचे... तरी बरोबर......
जरा चुकीचे, तरी बरोबर , बोलू काही.....
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

उगाच वळसे शब्दांचे ह्या देत रहाती ...
उगाच वळसे शब्दांचे ह्या देत रहाती ...
भीडले नाहीत डोळे तोवर, बोलू काही......
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

आम्हास पाहून कट्या वर, कुजबुज्ल्या वेड्या ..
आम्हास पाहून कट्या वर, कुजबुज्ल्या वेड्या ..
पाठ फीरू दे त्याची, नंतर बोलू काही........
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

नको - नको से दुखः तुम्हा जर, नकोच आहे ..
नको - नको से दुखः तुम्हा जर, नकोच आहे ..
हवे-हवे ते हळवे कातर, बोलू काही.......
चला दोस्त हो ; पोरींवर बोलू काही......

"तिची-तिची" च ती कीती काळजी, बघा झुगारून..
"तिची-तिची" च ती कीती काळजी, बघा झुगारून..
आज "हिचे" रे "तिचे"ते नंतर, बोलू काही........
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

राखी असू दे हातां मध्ये, ढाल म्हनुनी..
राखी असू दे हातां मध्ये, ढाल म्हनुनी..
वाट आंधळी, प्रवास खडतर ,बोलू काही .......
चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

चला दोस्त हो ; पोरीं वर बोलू काही......

बाई माझी लिपस्टीक बिघडली

Share

चाल- बाई माझी करंगळी मोडली)

ऐन रातीला पार्टीमध्ये खोडी कशी काढली
बाई माझी लिपस्टीक बिघडली !!धृ!!

वाढदिवशी मी विश करताना
काय चावले कुठे मिकीला
गुपचूप येऊन पाठीमागून
माझी कळ का काढली
बाई माझी लिपस्टीक बिघडली !!१!!

पाठमोकळा ड्रेस घातला
मुका मिकीचा गाली घेतला (लिपलॉक करायचं काही कारण होतं का?)
मी ही चिडले , ठाण्यात पोचले
तक्रार ठोकली ---
बाई माझी लिपस्टीक बिघडली !!२!!

जरी स्वतःचा ड्रेस फेडला
मी ही शेवटी भारती बाला
ओठ द्यायचे का कोणाला
जरी लाज सोडली ---
बाई माझी लिपस्टीक बिघडली !!३!!

सांग सांग भोलानाथ -विडंबन

Share

सांग सांग भोलानाथ... मार्केट चढेल काय?
स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय?
सांग सांग भोलानाथ...

भोलानाथ Reliance रिझल्ट सांगेल काय?
Investors ना बख्खळ divident देईल काय?
भोलानाथ... भोलानाथ...
भोलानाथ Reliance मार्केट चढेल काय?
Investors ना बख्खळ Divident देईल काय?
भोलानाथ... भोलानाथ...

सांग सांग भोलानाथ... मार्केट चढेल काय?
स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय?
सांग सांग भोलानाथ...

भोलानाथ उदया आहे महत्त्वाचे Chapter...
ONGC म्हणेल का रे "उत्तम होते Quarter"?
भोलानाथ... भोलानाथ...
भोलानाथ उदया आहे महत्त्वाचे Chapter...
ONGC म्हणेल का रे "उत्तम होते Quarter"?
भोलानाथ... भोलानाथ...

सांग सांग भोलानाथ... मार्केट चढेल काय?
स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय?
सांग सांग भोलानाथ...

भोलानाथ, भोलानाथ खरं सांग एकदा...
IT आणि BPO चा वाढेल काय रे धंदा?
भोलानाथ... भोलानाथ...
IT आणि BPO चा वाढेल काय रे धंदा?
भोलानाथ... भोलानाथ...

सांग सांग भोलानाथ... मार्केट चढेल काय?
स्टॉक्सच्या दरात वाढ होऊन पैसा मिळेल काय?
सांग सांग भोलानाथ...

सांग सांग भोलानाथ...
सांग सांग भोलानाथ...
सांग सांग भोलानाथ...

मी माझा चे विडंबन

Share

अशी एक रात्र हवी ज्याला पहाट जोडलेली नाही
अशक्यातली गोश्ट नाही पण मीही आशा सोडलेली नाही

अशी एक बायको हवी जीला तोंड हे अंग नाही
अशक्यातली गोश्ट नाही पण देवानेही आशा सोडलेली नाही

तुला मी कधी शपथ घ्यायला लावत नाही
कारण तुझ्या वरचा विश्वास शब्दात मावत नाही

तुला मी कधीही वजन करायला लावत नाही
कारण तुझ्या शरीराचा व्यास इवल्याशा मशीनवर मावत नाही

जडावलेल्या पापण्या मिटायला तयार नव्हत्या
मोजायच्या म्हट्ल्या तर चांदण्याही फ़ार नव्हत्या

जडावलेल्या पापण्या मिटायला तयार नव्हत्या
हीच्या घोरण्याच्या सीमा पार करायला तयार नव्ह्त्या

शुक्रवार, १८ जून, २०१०

हेच तर खरे प्रेम असते

Share







हिशोब प्रेमात लावायचा नाही

Share

व्यर्थ उतारा मनाचा करायचा नाही
अर्थ प्रेमाचा कधीच कळायचा नाही

दिले काय नि घेतले काय ह्याचा
हिशोब प्रेमात लावायचा नाही ..

आठवण माझी कधी येते का तिला
हा प्रश्न हि आता विचारायचा नाही …

आठवणीत झुरणे , एकटेच हसणे
खूळयांना हा छंद कळायचा नाही

प्रत्येक श्वास माझा माळला तिला मी
निश्वास हि परत मला मागायचा नाही

मागतो कुठे काही लक्षात आणून देतो
दिलेला ‘शब्द’ तिला आठवायचा नाही ..!!

पावसाची गंमत…

Share










पावसाची एक गंमतच असते…
तो बाहेर बरसायला लागला,
की आतही सरी सुरू होतात…

नकोसा नसतोच तो कुणाला
उलट खूप वाट पाहायला लावून
उन्हात होरपळून गेल्यावरच येतो तो…

येतो तेव्हा मात्र झिंमड उडते,
सरी कोसळत राहतात,
आत आणि बाहेर…

भिजवून टाकतात आपल्याला चिंब
सारं काही स्वच्छ होतं मग
आतून आणि बाहेरून…

पावसाचं हेही एक चांगलंय…
तो आतल्या पावसाला सांभाळून घेतो
आतला डोळ्यांवाटे बरसतो तेव्हा
हा त्याला पदराआड दडवतो…

मग डोळेही होतात धुके धुके
बाहेरचा आत कधी येतो
आणि आतला बाहेर कधी येतो
समजतच नाही…

कदाचित यालाच अद्वैत म्हणत असावेत…
म्हणूनच म्हणतो…
या पावसाचीही एक गंमतच असते…

आला आला पाऊस आला…

Share








आला आला पाऊस आला…

सर सर सर सर
कोसळुनी सरी
झर झर धावती धरेकडे
पाहुनी तांडव विद्युल्लतेचे
गाली खळीचे फूल पडे

गिर गिर गिर गिर
गिरक्‍या घेऊनी
एक चिंगी ती हासतसे
टर टर टर टर
फाडुनी कागद
एक बंड्या तो नाव करे

आला आला पाऊस आला
हर्षभरित मन गात असे
विरही त्रस्त त्या भूलोकाला
इंद्रधनुचे स्वप्न पडे

तो ही भिजतो, ती ही भिजते
सवेच भिजते प्रेमही ते
चिंब तनूवर चिंब मनावर
वर्षाऋतू गारुड करे

दूत मेघ तो यक्षजनांचा
दुःख मनीचे जाणतसे
श्रांतविण्या मग दुःखाचे कढ
डोळ्यांमधुनी झरू लागे

प्रेमिक गाती विरही गाती
वृद्धही गाती आनंदे
बालही नाचे थोरही नाचे
नाचे अवघे जीवन ते

तप्त झळा सोसून गांजल्या
जनलोकांना श्रांतविण्या
आला आला पाऊस आला
निर्मोहिंना मोहविण्या

उन्हामागे सावली येते
जगरहाटी सांगतसे
सलाम करूनी तृप्त नेत्री ही
अवघी सृष्टी डोलतसे
अवघी सृष्टी डोलतसे

एक ‘वेगळे’ पाऊस गाणे

Share










व्हिस्कीच्या पहिल्या पेगनं सुखावले सारे
डाळ शेव फुटाणे शोधू लागले सारे

उडाली धांदल खणखणले ग्लास उधाणता वारे। व्हिस्कीचे।।
व्हिस्कीही अवली।
ओतितो बाटली ।
बेसावध जन। पीतापीता।।

काही आनंदी।
काही कष्टी।
काही ताशीर। जनांमध्ये।।

मॅनेजर ही खूष।
वेटर नाखूष।
टेबलक्लॉथ ओले। वाळता वाळेना।।

ग्लासही ओला।
कस्टमर ओले।
त्यातही फाटलेले। सोफ्याचे कुशन।।

ग्लासही झुके।
बाटलीही झुके।
समोरचाही झुके। बोलताना।।

खुर्च्याही फुल्ल।
कोचही फुल्ल।
खोळंबती जन। दारुच्या आशेने।।

बाटली फोडताना।
ग्लास भरताना।
अवचित घाला। विज मंडळाचा।।

झाला खोळंबा।
झाली पंचाईत।
तरीही आनंदी। मद्यलोक।।

कुणा आठवे गेलेले बालपण।
कोणी रमे त्या रम्य आठवणीत।
कुणी शोधू पाहे लपलेले सूर्यबिंब।
कोणी लकी प्रेमिक आतूनही चिंब अन बाहेरूनी चिंब।।

एका छोट्या मदिरभक्ताचा।
हा पहिला पेग।
चिंता उधाणून वाहे। याच्या चेहऱ्यावरून।।

जीव्हाही तृप्त।
मनही तृप्त।
आयुष्य तृप्त। भक्ताचे।।

चला चला उठा झणी।
करा पार्टीची तयारी।
दारेही उघडलेली। वाईन शॉपची।।

मदिरेच्या धुंदीत।
गेली संध्याकाळ।
घरोघरी चकणा तळण। कांदाभजीचे।।

उजाडता दिस।
मेंदु सुन्न सुन्न।
घ्या की हो उतारा। उतरावावया।|

पिण्याच्या गडबडीत।
श्री बोले श्रीमतींना।
येत्या रविवारी गाठ तु। माहेरचा मळा।।

आपण खूष।
मित्र खूष।
बायकोही खूष। मिळाले माहेरी जावया।।

अवली दारुड्याला।
भेटे त्याची बाटली।
तो ना सोडे आता। तिचा पदर।।

त्याची तिची भेट।
फक्त एका रात्रीची।
तीही सोसूनी कळ। ९८ रुपड्यांची।।

तुम्ही जन लकी।
रोज ४ पेग मुखी।
पुन्हा उतावीळ तुम्ही। फुकटची प्यावया।।

चला काढा थोडी हाल्फ।
पेग मारता येते बळ।
तुम्ही साकारलेल्या। कॉकटेलने।।

निर्व्यसनी त्या जनांना।
ना कळे मदिराभक्ताची व्यथा।
कैसी ही माया। मदिरेची।।

आपण प्रेमिक।
घेउन मिठीत।
रंग उडवू। मदिरेचे।।

आहो भाऊ राया।
मान्य तुमची माया।
परंतु आता थोडे । भुकेकडे बघा।।

दारुने टिंग।
आतून बाहेरून।
चकणेही सारे। विखुरलेले।।

तुम्ही म्हणालात।
पितान मधेच।
तुमचे पाकिट। लाटले चोराने।।

जाहलो दुःखी।
हातही कापे।
कसे भरु देवा। बिल हे सगळे ।।

आता करा त्वरा।
वेटरही आला।
सुरू झाल्या हाका। मॅनेजरच्या।।

तुम्ही फार थोर।
लावुनिया घोर।
बेरकी नजरा। चश्म्यातुनी।।

मालक पुढ्यात।
वेटर पुढ्यात।
धराहे बिल। पेमेंट टाका।।

मिळून निसटावे।
कहितरी घडावे।
हाउ दे खेळ चालु । विज मंडळाचा।।

पुर्व संचित जोडून।
दोन्ही करही जोडून।
करितो विनंती। आता तरी गुल्ल व्हा।।

आता तरी गुल्ल व्हा।
अंधारात गायब होउ द्या।
नाहीतर नशीबी पिउन। ग्लास प्लेट विसळणे।।

ही रडकथा नसे।
वा नसे बतावणी।
आहे ही आर्तता। तुमच्या मृत्युंजयाची।।

पाऊस पडत असताना…

Share


































पाऊस पडत असताना…
चहुकडे दाटलेला रंग हिरवा
त्यातच हवाहवासा धुंद गारवा
चिंब भिजण्याचा बहाणाही नवा
कातरवेळी हया सख्या तु मला जवळ हवा…

 पाऊस पडत असताना
बेभान होतो वारा
त्यात तुझी साथ हवी
जसा लाटाना हवा असतो किनारा



































पाऊस पडत असताना…
पाउसाकडे दुरून पाहायच नसत
ते बरसणारे थेंब अलगद झेलत
ओल्या निसर्गात हळूवार विरघळत
पाउस होउन चिंब भिजायच असत …


 पाऊस पडत असताना…
तु समोर आलास की नेहमी मी चिंब भिजते
तुला जरी म्हणत असले पाउसाची मजा घेते
खरतर त्या पाउसात माझे अश्रु लपवीत असते

पाउस…

Share



काल दिवसभर बेभान बरसणारा पाउस
आज तसा शांत झाला आहे
पण कालच्या त्या एका आठवणीने
मनाचा एक कोपरा मात्र अजुनही ओला आहे...










 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
पाउस म्हणजे माझ्यासाठी एक अजब रसायन
मला पाहिजे तेव्हा तो पडत नसतो
अन मग कधी अगदि अचानक येउन 
मला भिजवुन तो मस्त हसत असतो...
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

पाऊस गाणे

Share



पावसाच्या पहिल्या धारेनं सुखावले सारे
छत्र्या रेनकोट पिशव्या शोधू लागले सारे
उडाली धांदल उडाले पत्रे उधाणता वारे। पावसाचे।।

पाऊसही अवली।
ओतितो बादली ।
बेसावध जन। सापडिता।।

काही आनंदी।
काही कष्टी।
काही प्रेमिक। जनांमध्ये।।

पोरे ही खूष।
आया नाखूष।
कपडेही ओले। वाळता वाळेना।।

रस्ताही ओला।
सीटही ओले।
त्यातही फाटलेले। सारे चिंब।।

रस्तेही बाके।
खड्डेही बाके।
चिखलही बाका। मनपाचा।।

बसही फुल्ल।
रिक्षाही फुल्ल।
खोळंबती जन। दुकानाकडेने।।

ऑफिस सुटताना।
शाळा सुटताना।
अवचित घाला। पावसाचा।।

झाला खोळंबा।
झाली पंचाईत।
तरीही आनंदी। जनलोक।।

कुणा आठवे गेलेले बालपण।
कोणी रमे त्या रम्य आठवणीत।
कुणी शोधू पाहे लपलेले सूर्यबिंब।
कोणी लकी प्रेमिक आतूनही चिंब अन बाहेरूनी चिंब।।

एका छोट्या लेकराचा।
हा पहिला पाऊस।
तो उधाणून वाहे। याच्या चेहऱ्यावरून।।

आईही तृप्त।
बाबाही तृप्त।
कुटुंबच तृप्त। लेकराचे।।

चला चला उठा झणी।
करा पावसाची तयारी।
दारेही फुगली। बाथरूमची।।

पावसाच्या धुंदीत।
गेली संध्याकाळ।
घरोघरी तळण। कांदाभजीचे।।

उजाडता दिस।
मन प्रसन्न प्रसन्न।
आला की हो पाऊस। श्रांतवावया।।

ऑफिसाच्या गडबडीत।
सौ बोले श्रीयुतांना।
येत्या रविवारी गाठूया। आपण लोणावळा।।

श्री खूष।
सौ खूष।
पाऊसही खूष। करितो फजितवडा।।

अवली पावसाला।
भेटे त्याची सखी।
तो ना सोडे आता। तिचे अंतःपूर।।

तिची माझी भेट।
फक्त एका सिझनची।
तीही सोसूनी कळ। आठ आठ मासांची।।

तुम्ही जन लकी।
रोज पाहता सखी।
पुन्हा उतावीळ तुम्ही। भिजावया।।

जरा काढा थोडी कळ।
वेधशाळा घेते वळ।
तुम्ही घातलेल्या। अपशब्दांचे।।

आतुर त्या जनांना।
ना कळे विरह व्यथा।
कैसी ही माया। परमेश्‍वराची।।

पाऊस प्रेमिक।
रमला क्षणिक।
झोप उडवून। सर्वांची।।

आहो पाऊस राया।
मान्य तुमची माया।
परंतु आताथोडे । बाहेरही डोकवा।।

घामाने चिंब।
आतून बाहेरून।
जनही सारे। पिडलेले।।

तुम्ही रमलात।
रमणीमधेच।
तुमचा सीझन। लाटला सूर्याने।।

जनही दुःखी।
सूर्यही कोपे।
कसे साहू देवा। मन हे हळवे।।

आता करा त्वरा।
मान्सुनही आला।
सुरू झाल्या हाका। पेपरांमधी।।

तुम्ही फार थोर।
लावुनिया जोर।
वर्षवाव्या धारा। ढगांतुनी।।

बालक सुस्नात।
प्रेमिक सुस्नात।
धराही सुस्नात। करवून टाका।।

मिळून निसटावे।
निसटून मिळावे।
हाच खेळ सारा। संचिताचा।।

तेच संचित जोडून।
दोन्ही करही जोडून।
करितो विनंती। आता तरी कोसळा।।

आता तरी कोसळा।
सारे चिंब भिजवा।
नाहीतर पुन्हा गाईन। मोठे पावसाचे गाणे।।

ही धमकी नसे।
वा नसे चेतावणी।
आहे ही आर्तता। तुमच्या सुडोकूची।।

पाउस पडत असताना …

Share

पाऊस पडत असताना
तुझे मझे सुर जुळले नाही
कारण भिजलेल्या पाऊसात
माझे अश्रु तुला कळले नाही…









































पाऊस पडत असताना
मातीचा सुगंध दरवळला
तुझी आठवण येताच
ऐक अश्रु डोळ्यात तरळला

तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही

Share

तुझ्या माझ्यासवे...

तुझ्या माझ्यासवे कधी गायचा पाऊसही
तुला बोलावता पोचायचा पाऊसही,
पडे ना पापणी पाहून ओलेती तुला
कसा होता नि नव्हता व्हायचा पाऊसही,
तुला मी थांब म्हणताना तुला अडवायला
कसा वेळीच तेव्हा यायचा पाऊसही,
मला पाहून ओला विरघळे रुसवा तुझा
कशा युक्त्या मला सुचवायचा पाऊसही,
कशी भर पावसात आग माझी व्हायची
तुला जेव्हा असा बिलगायचा पाऊसही,
आता शब्दांवरी या फक्त उरलेल्या खुणा
कधी स्मरणे अशी ठेवायचा पाऊस ही........
... संदीप खरे ...

पहिला पाऊस पडतो तेंव्हा एकच काम करायचं…

Share

















पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं…
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं!
आपल्या अंगावर झेलून घ्यायच्या
कोसळणार्‍या धारा
श्वासांमध्ये भरून घ्यायचा
सळाळणारा वारा
कानांमधे साठवुन घ्यायचे
गडगडणारे मेघ
डोळ्यांमध्ये भरुन घ्यायची
सौदामिनीची रेघ
पावसाबरोबर पाऊस बनून
नाच नाच नाचायचं
अंगणामधे, मोगर्‍यापाशी
तळं होऊन साचायचं!
आपलं असलं वागणं बघुन
लोक आपल्याला हसतील
आपला स्क्रू ढिला झाला
असं सुध्दा म्हणतील
ज्यांना हसायचं त्यांना हसू दे
काय म्हणायचं ते म्हणू दे
त्यांच्या दुःखाच्या पावसामधे
त्यांचं त्यांना कण्हू दे
असल्या चिल्लर गोष्टींकडे
आपण दुर्लक्ष करायचं!
पहिला पाऊस एकदाच येतो
हे आपण लक्षात ठेवायचं!
म्हणून…
पहिला पाऊस पडतो तेंव्हा
एकच काम करायचं…
हातातली कामं टाकुन देउन
पावसात जाऊन भिजायचं

आम्ही...!

Share

जगाची झोकुनी दुःखे सुखाशी भांडतो आम्ही
स्वतःच्या झाकुनी भेगा मनुष्ये सांधतो आम्ही
फुकाचे काय शब्दांना मिळे दिव्यत्व सत्याचे
घराची राखरांगोळी कपाळी लावतो आम्ही
तुरुंगातील स्वप्नांची अम्ही धुंडाळितो स्वप्ने
वधस्तंभासवे दाही दिशांना हिंडतो आम्ही
कुण्याही चंद्रभागेचा किनारा प्यार आम्हाला
तिथे नाचे विठू झेंडा जिथे हा रोवतो आम्ही
दिले प्रत्येक वस्तीला अम्ही आकाश सोनेरी
जिथे जातो तिथे हाका उषेच्या वाटतो आम्ही
जरी या वर्तमानाला कळे ना आमुची भाषा
विजा घेऊन येणाऱ्या पिढ्यांशी बोलतो आम्ही…

बरे नाही!

Share

हे तुझे अशा वेळी लाजणे बरे नाही
चेहरा गुलाबाने झाकणे बरे नाही
जे तुला दिले होते तेच ओठ दे माझे
मागचे जुने देणे टाळणे बरे नाही
ऐक तू ज़रा माझे…सोड मोह स्वप्नांचा
आजकाल स्वप्नांचे वागणे बरे नाही
जाहली न कोणाची सांग राखरांगोळी ?
आपुलीच रांगोळी काढ़णे बरे नाही
आज मोकळे बोलू ! आज मोकळे होऊ !
जीव एकमेकांचा जाळणे बरे नाही
कालचा तुझा माझा चंद्र वेगळा होता…
हे उन्हात आलेले चांदणे बरे नाही
मैफिलीत या माझ्या पहातेस का खाली ?
हाय, लाजणारयाने जागणे बरे नाही…

तरी देऊ किती आवाज आता....!

Share

तरी देऊ किती आवाज आता....!

मी तरी देऊ किती आवाज आता..!
अंतरांचा येइना अंदाज आता..!
हा रिता प्याला तुझ्या हाती दिला मी.
जहर दे वा अमृता त्या पाज आता..!
यौवनाचे बाण काळ्याभोर नयनी.
तू सुद्धा झालीस तीरंदाज आता..!
प्रेम जे मुदलात होते, माफ केले
राहिले पण आठवांचे व्याज आता..!
पाहता तुज छाटले बाहूच दिसले.
ताज, मी पाहू कुठे मुमताज आता..!

ए कच पीक्चर, तो पण टेक्स फ्री..

Share

ए कच पीक्चर, तो पण टेक्स फ्री..

ए कच पीक्चर, तो पण टेक्स फ्री...
एकच साद, ती पण मनापासुन...
अजुन काय हवे असते आपल्या मित्रांकडून

एकच कटाक्श, तो पण हळूच...
एकच होकार, तो पण लाजून...
एकच स्पर्श, तो पण थरथरून...
अजुन काय हवे असते आपल्या प्रियेकडून

एकच भूताची गोष्ट, ती पण रंगवून....
एकच श्रीखंडाची वडी, ती पण अर्धी तोडून...
एकच जोरदार धपाटा, तो पण शिवी हासडून...
अजुन काय हवे असते आपल्या आजीकडून

एकच मायेची थाप, ती पण कुर्वाळून...
एकच गरम पोळी, ती पण तूप लावून...
एकच आशिर्वाद, तो पण डोळ्यात आसवे आणून..
अजुन काय हवे असते आपल्या आईकडून.

एकच कठोर नकार स्वईराचाराला, तो पण ह्रुदयावर दगड ठेउन...
एकच सडेतोड उपदेश, तो पण घोघर्या आवाजातून...
एकच नजर अभिमानाची, आपली प्रगती पाहून...
अजुन काय हवे असते आपल्या वडिलांकडून

सगळ्यांनी खूप दिले, ते पण न मागून...
स्वर्गच जणु मला मिळाला, तो पण न मरुन...
फाटकी ही झोळी माझी, ती पण वाहिली भरुन..
अजुन काय हवे मला माझ्या आयुष्याकडून

कधी कधी चुकते जगण्याची अटकळ आयुष्या..!

Share

कधी कधी चुकते जगण्याची अटकळ आयुष्या



कधी कधी चुकते जगण्याची अटकळ आयुष्या.
काट्यांतुनही फ़ुलून येते हिरवळ आयुष्या.
उगाच छत्तिसचे नाते तू धरले वार्‍याशी.
तुला कुठे लाभला स्वतःचा दरवळ आयुष्या.
नदी, झरे अन सागर सारे प्राशुनिया झाले.
तहान आता भागवेल का मृगजळ आयुष्या?
प्रवास अपुला तसा चुकीच्या दिशेनेच होता,
किनार्‍यास बघ नेते आहे वादळ आयुष्या.
झुळझुळ वाहिल माझे मीपण निर्झराप्रमाणे
फोड जरासा अस्तित्वाचा कातळ आयुष्या.
तुला काळजी त्या अंधार्‍या जुन्या कोपर्‍यांची.
जपली मी सामानासोबत अडगळ आयुष्या.
मांडलीस तू गणिते आल्या गेल्या श्वासांची.
क्षणही असतो शतकापेक्षा पुष्कळ आयुष्या.
नसे तोडगा गर्दीवरती, एकटेपणा हा.
एकांतीही आठवणींची वर्दळ आयुष्या.
तुझ्यात वसतो शंभो, तुझिया आत अगस्तीही
बघ तर घेउन हलाहलाची ओंजळ आयुष्या.
कसा मिळावा तुला आसरा तिच्या लोचनांचा.
तिच्या आसवाइतका का तू निर्मळ आयुष्या ?

गुरुवार, १७ जून, २०१०

मराठीतच बोला मराठी वाचवा!

Share

मराठीतच बोला मराठी वाचवा!

*सांयकाळी समुद्रकाठी फ़िरताना एक वृद्धानं एका* लहानग्याला किनार्यावर
काहीतरी उचलून समुद्रात
फ़ेकताना पाहिलं. आश्चर्य वाटून तो त्याच्या जवळ
गेला तर तो समुद्राकाठचे तडफ़डणारे तारामासे एक-
एक करुन पुन्हा समुद्राच्या पाण्यात फ़ेकत होता.न
राहावून त्यानं लहानग्याला विचारलं, ;समुद्रकिनारी
इतके हजारो मासे आहेत, तु कुणा कुणाला वाचवू
शकणार आहेस??.. मुठभर मासे वाचवून जगाला
असा काय फ़रक पडणार आहे?त्या मुलाने आणखी
एक मासा समुद्रात फ़ेकत निरागसपणे उत्तर दिलं,
यानं जगाला काय फ़रक पडेल ते माहीत नाही. पण
या माशाला विचारा, त्याला काय फ़रक पडला? ज्याचा
मी नुकताच जीव वाचवला.
मी एकट्याने, मराठी माणसाकडुन खरेदी केल्याने
किती मराठी शेतकर्यांचे जिव वाचणार आहेत?
मी एकट्याने, मॊल्स मधुन खरेदी न केल्याने किती
मराठी व्यापार्यांचे जिव वाचणार आहेत?
मी एकट्याने, मराठी माणसाच्या पेट्रोल पंपावर, पेट्रोल
घेतल्याने किती मराठी जनतेवर सुपरिणाम होणार?
मी एकट्याने, डान्स बार मधे पैसे न ऊडविल्याने,
किती मराठी माणसे श्रीमंत होणार?
मी एकट्याने, मराठी माणसा कडुन फ़्लॆट / जमीन
विकत घेतल्याने किती मराठी
बिल्डर / कॊन्ट्रॆक्टरांची भरभराट होइल?
मी एकट्याने, विज वाचवल्याने किती अंधारलेल्या
घरांमधे प्रकाश पडेल?

मी एकट्याने, पाणी बचत केल्याने किती, तहानलेल्या
जिवांना पाणी मिळेल?
मी एकट्याने, मराठी किराणा दुकानदाराकडुन, किराणा
खरेदी केल्याने, किती मराठी दुकानदार [जिवघेण्या]
स्पर्धेत टिकुन रहातील?
मी एकट्याने, मराठी मालकाच्या हॊटेल मधुन खरेदी
केल्याने, किती मराठी हॊटेल मालकांना याचा फ़ायदा
होणार?
मी एकट्याने, मराठी माणसाचा पेपर वाचल्याने किती
मराठी पेपरमालकांचा धंदा वाढणार आहे?
कृपया, वर लिहिलेली गोष्ट, कथा, परत एकदा वाचावी....

गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेछा

…मन…

Share

…मन…

वेडं मन हे असं का वागतं..
कधी उगाच स्वैर विहारतं…
कधी गुपचुप कोपर्‍यात रुसुन बसतं….
कधी छोट्याश्या गोष्टीनेही खुप आनंदतं…
कधी मोठ्या दुखा:तही स्थितप्रज्ञ राहतं…
कधी आनंदाच्या सरींची बरसात करतं…
कधी व्यथेच्या सागरातही आनंदानं एकटच डुलतं…
कधी हवं ते मिळावं म्हणुन टाहो फ़ोडतं..
कधी मिळवता न आल्यामुळे उगाच झुरतं…
कधी आठवणींसोबत भविष्याचं चित्र रंगवतं
कधी काही कटू आठवणी आठवून उगाच रडतं….
कधी मन माझं उधाणलेली लाट
कधी मन अनोळखी भविष्याकडे नेणारी सुंदर वाट
कधी मन वादळ वारा आपल्याच कैफात वाहणारा
कधी मन माझं… आसवांचा पाउस कोसळणारा
एक कोडं वाटे मन अगदी गहीरं गहीरं
कधी सारं काही ऎकूनही वागे बहीरं बहीरं
असं गं कसं मन माझं मलाच समजेना…
मन कोणाच्या गं सारखं हे गुज उमजेना…

ती........

Share

ती........

तिने कित्ती सुंदर दिसावं..
जसं गुलाबाचं फूल उमलावं..
कोणाच्याही नजरेत भरावं..
तासन तास पाहत रहावं..!!!!

तिने कित्ती गोड बोलावं..
ऐकणाऱ्याने विरघळून जावं..
हरवूनच जावं ..
सोबत तिच्या..!!!!

तिने कित्ती साधं रहावं ..
त्यातही रूप तिचं खुलावं..
कोणीही फिदा व्हाव ..
अदांवर तिच्या..!!!!

तिचं उदास होणं..
कसं हृदयाला भिडावं..
कोणालाही वाईट वाटावं..
अश्रूंनी तिच्या..!!!!

तिचं हसणं ..
कोणालाही सुखवावं..
कोणीही घसरून पडावं..
गालावरल्या खळीत तिच्या..!!!!

तिच्या नजरेने मलाच शोधावं..
अचानक नजरेने नजरेला भिडावं ..
मग तिने लगेच दुसरीकडे पहावं..
लाजेने चूर चूर व्हावं..!!!!

ती समोर असताना ...
मी सारं काही विसरावं..
तिने इश्य करत लाजावं..
मी 'आये हाये' करत घायाळ व्हावं ..!!!!

तिने फक्त माझंच रहावं..
मीही फक्त तिच्यासाठीच जगावं..
साथ देऊ जन्मोजन्मी ..
विरहाचं दुख कधीही न यावं..
कधीही न अनुभवावं..!!!!

तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय.

Share

हंबरून वासरले चाटती जावा गाय,
तवा मले तिच्यामध्ये दिसती माझी माय. 
 
आय बाया सांगत होत्या होतो जावा तान्हा,
दुष्काळात मायेच्या माझे आटला होता पान्हा,
पिठामंदी पाणी टाकून मले पाजत जाय,
तवा मले पिठामंदी दिसती माझी माय. 
 
तान्या काट्या येचायला माय जाती रानी,
पायात नसे वाहन तिच्या फिरे अनवाणी,
काट्याकुट्या लाही तीच मानत नसे पाय,
तवा मले काट्यामंदी दिसती माझी माय. 
 
बाप माझा रोज लावी मायेच्या माग टुमण,
बास झाल शिक्शान आता घेउदे हाती काम,
शिकून सान कुठ मोठा मास्तर होणार हाय,
तवा मले मास्तरमंदी  दिसती माझी माय. 
 
दारू पिऊन मायेले मारी जावा माझा बाप,
थर थर कापे अन लागे तिले धाप,
कसायाच्या दावणीला बांधली जशी गाय,
तवा मले गायीमंदी  दिसती माझी माय. 
 
बोलता बोलता एकदा तिच्या डोळा आल पाणी,
सांग म्हणे राजा तुझी कवा दिसलं राणी,
भरल्या डोळ्यां कवा पाही दुधावरची साय,
तवा मले सायीमंदी  दिसती माझी माय. 
 
म्हणून म्हणतो आनंदाने भरावी तुझी वटी,
पुन्हा एकदा जनम घ्यावा माये तुझे पोटी,
तुझ्या चरणी ठेऊन माया धरावे तुझे पाय,
तवा मले पायामंदी  दिसती माझी माय.

का छळतोस तू अस मला

Share

का छळतोस तू अस मला...

हे काय होतंय जीवाला
काय झालय मनाला....
काय पाहिजे मना तुला
का छळतोस तू अस मला....

सुखामध्ये मन आनंदी होत नाही
पण दु:खातही मन नाराज होत नाही..
कुणाच्या नजरेला नजर देता येत नाही
पण.....
नजर झुकवताना पण पापणी जड जाते....
काय पाहिजे मना तुला
का छळतोस तू अस मला....

गर्दीत जाता येत नाही
एकट आता बसू वाटत नाही
मनमोकळ हसता येत नाही
मुसूमुसू रडता पण येत नाही

गर्दीमध्ये तर घुसमट तर होतेच
पण....
आता एकट एकट राहिला पण भीती वाटते......
काय पाहिजे मना तुला
का छळतोस तू अस मला....

दिवसाचा प्रकाश तर अंगाला टोचतोच
पण.....
आता रात्रीची स्मशान शांतता पण खायला उठते....
काय पाहिजे मना तुला
का छळतोस तू अस मला....

तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन.....

Share

तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन.....
तुझ्या लग्नाला मी नक्की येईन,
माझ्या शुभेच्छा मी तुला देईन;
तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन.....

मी वेड्यासारखं प्रेम केलं तुझ्यावर,
पण तुला माझी भावना कधीच कळली नाही;
आणि आता कळूनही फायदा नाही,
त्यासाठीची योग्य वेळ आता उरली नाही;
एकांतात बसून मी, तुझ्याच आठवांना स्मरीन....
तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन.....

प्रेम व्यक्त करण्याचं धाडस,
माझ्याकडून झालंच नाही;
शब्दांना ओठांबाहेर,
कधी पडताच आलं नाही;
माझ्या दुःखाचे निखारे आता, मी कागदावरच जपीन....
तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन.....

तुझ्यासाठी लिहीलेल्या कवितांना,
आता काहीच अर्थ उरला नाही;
तुझ्याचसाठी रचलेल्या गीतांचा,
सूर कधीही जुळला नाही;
तुझ्या आग्रहाखातर सखे, मी मंगलाष्टके गाईन....
तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन.....

तुझ्या सोबत जगण्याची;
स्वप्नं आता विरून गेली;
हळव्या माझ्या ह्रदयाला,
यातना देऊन गेली;
आयुष्यभर आता मी, माझाच अपराधी राहीन.....
तुझ्या लग्नाला मात्र मी नक्की येईन.....

आभास

Share

"आभास"

 
एक होता चिमना आणि एक होती चिमणी 
चिमणी मोठा रुबाबदार आणि चिमना अगदीच सुमार 
तरीही एकमेकांचे जिवलग यार.
  वेळात वेळ काढून एकमेकांशी बोलायचे, एकमेकांना चिडवायचे आणि खूप खूप हसायचे .
 
चिमण्याच्या मनात एक खुलत होते गुपित,  चिमणी बद्दलचे प्रेम त्याच्या मनाच्या कुपीत     रोज रोज कारे देवाकडे प्रार्थना , ही  तिच्या मनात असू देत अशाच काहीशा भावना 
 
एक दिवस धीर करून त्याने सगळे सांगितले पण त्याला तिने अगदी सहज नाकारले
   
तिला म्हणे असे काहीच वाटत नव्हते, तिच्या डोळ्यात प्रेम आहे हे अगदी झूठ होते
  
कानाही”  ह्याची बरीच कारणे सांगितली  पण चिमण्याच्या मनाला ती अजिबात  नाही पटली
 
चिमना तशीच घरी गेली, तिकडे जाऊन खूप रडला   काय करावे कळेना,रडू त्याचाने आवरेना
 
चिमण्याला एक उपाय सुचला , त्याने  चिमणीशी अबोला धरला  चिमणीला मात्र ह्याचा सुधा काहीच फरक नाही पडला   चिमणी अगदीच खुशीत होती , नवीन स्वप्ने पाहत होती


कदाचित ती थोडा जास्तच प्रक्टीकॅल होती   चिमण्याने  सुद्धा  आता हसत जगायचे ठरवले  पण एकांतातले अश्रू त्याला कधीच नाही आवरले    
   
एकतर्फी असले तरी चीमन्याचे  चिमणीवर अगदी खरे प्रेम होते पण कदाचित खरे प्रेम चिमणीच्या नशिबी नव्हते
 
एक प्रश्न मात्र त्याला आयुष्यभर सतावत राहिला  चिमणीच्या डोळ्यात त्याला दिसलेले  प्रेम हा नुसता "आभास" कसा ठरला?
image001.jpg

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top