Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, ३० सप्टेंबर, २०१०

झोका. . .

Share

आपणच बांधलेल्या झोक्याला
आपणच धक्का देतो
उमेदीने झोका उंच नेतो
पण खाली येताना बावरुन जातो

उंच जाण्याची उमेद असावी
नी खाली येण्याचं भय नसावं
मनी भीती दाटून येता
मनमोक्ळं जोर जोरत हसावं

झोका जेवढ्या वेगाने वर जातो
तेवढ्याच वेगाने खाली येतो
त्याच्या साखळीवर पकड घेत असता
त्या झोक्यांमधून तरून जातो

प्रत्येकाच्या जीवनाच्या
झोक्याला असे चढ उतार असतात
मनाची पकड घट्ट असली की
माणसं दु:खातही हसतात

उंच जाताना सगळेच हसतात
आपण खाली येतानाही हसावं
चढ उतारात जीवनाच्या आनंद असतो
हे झोक्या कडून शिकावं. . .

श्री गणेशाय नम: ।

Share

मंगलमुर्ती मोरया ।
गणपती बाप्पा मोरया ॥
मंगलमुर्ती मोरया ।
गणपती बाप्पा मोरया ॥
शुभ कार्याशी देसी स्पुर्ती
वचनांची होई पुर्ती
काय वर्णवू त्याची कीर्ती
तो देव माझा मंगलमुर्ती ॥१॥

पापांचे करी क्षालन
करी दीनांचे पालन
जेथे रामभक्तीचे होई मिलन
तो देव माझा गजानन ॥२॥

जेथे क्लेश शमले जाती
जो सुखदु:खाचा साथी
जो करी दु:खाची माती
तो देव माझा गणपती ॥३॥

रिद्धी सिद्धी चा मालक
जो सर्वांचा पालक
तोच दूरित तिमीर हारक
तो देव माझा विनायक ॥४॥

ज्याच्या चरणी नांदती संत
जो करी उपकार अनंत
न राहे कसली खंत
तो देव माझा एकदंत ॥५॥

जो घालवी बुद्धीचा म्लेश
अरजकतेचा होई विशेष
जेथे लोपती सारे क्लेश
तो देव माझा श्री गणेश ॥६॥

फ़ुटे भक्तीचा पाझर
जो ज्ञानाचा सागर
ज्याचा त्रिलोक करे आदर
तो देव माझा लंबोदर ॥७॥

षडरिपूची करी राख
धाऊनी येई सुख
जेथे वाढे भक्तीची भूक
तो देव माझा गजमुख ॥८॥

निराशेचे होई उच्चाटन
करी अज्ञानाचे मोचन
विश्व करी ज्याला वंदन
तो देव माझा गौरीनंदन ॥९॥

दूर करीशी न्युनगंड
अधर्मा विरुद्ध करिशी बंड
अत्याचारा देसी दंड
तो देव माझा वक्रतुंड ॥१०॥

सदैव घाली प्रेमाची फ़ुंकर
निरंतर करीशी कृपा आम्हावर
अशिक्षीता देई विद्येचा वर
तो देव माझा विद्येश्वर ॥११॥

चला दर्शनासी जाउया
डोळे भरूनी पाहुया
एक मुखाने सारे गाउया
मंगलमुर्ती मोरया । गणपती बाप्पा मोरया ॥१२॥

फ़क्त एक सुस्कार

Share

ती चिमुकली पावलं पाहून
अंत:करण हेलावलं
ठेचाळलेल्या जखमेवर
फ़ुंकर घालायला कुणीच नाही धावलं

तापलेल्या रस्त्यावर अनवाणी पावलं
मंदगतीने पडत होती
जड पेटीचा भार
आपल्या अंगावर झेलत होती

जखडलं होतं बालपण
त्या पेटीच्या पट्ट्यानं
त्यांचं खेळणं बागडणं
विकत होती कवडीच्या मोलानं

पोटामध्ये भूक होती
डोळ्यांत होता थकवा
दैवाचा खेळ म्हणा
किंवा नशीबाचा चकवा

त्या पोळल्या रक्ताळल्या पावलांचा
कुणीतरी फ़ोटो घेतला
कुणा धनाढ्याने तो
लाखाला विकत घेतला

वातानुकुलीत दालनात
फोटोला मध्यभागी स्थान होतं
पण चिमुकल्या पावलांचं
निखार्‍यांवरून चालणं काही संपत नव्हतं

लाखाला फोटो घेतला
पण पावलं फ़ुकट कुणी घेत नव्ह्तं
पोटातली आतडी पिळली जात होती
साधं पाणी कुणी देत नव्ह्तं

प्रेत्येकजण करी स्तुती
पाहून तो किमती फ़ोटो
म्हणे "पाहणार्‍याचं अंत:करण
हेलावतो हा फ़ोटो"

छायाचित्रकाराचं नाव आवर्जून
प्रत्येकजण निरखून पाही
पण "ही पावलं कुणाची ?"
असं कुणीसुद्धा विचारत नाही

त्याच कलादालना बाहेर
तीच चिमुरडी हात पसरून उभी होती
पण कुणा एक रसिकानं त्यांना
साधी दमडी सुद्धा दिली नव्हती

उन चटके देत होतं
पोटात भुकेची लाट उसळत होती
छातीवर पेटीचा भार घेउन
चिमुरडी खाली कोसळत होती

दुसर्‍या दिवशी वृत्तपत्राच्या
मथळ्यात मजकुर होता आला
कलादालनातल्या त्या फोटोला
पुरस्कार होता मिळाला

वृत्तपत्राच्या कुठेतरी कोपर्‍यात
छापल्या होत्या दोन ओळी
कला दालना बाहेरील फ़ुटपाथवर
कुपोषणाचे दोन बळी

उद्या कुपोषणावरील लेखालाही
गौरवतील अनेक पुरस्कार
आपण हळहळ व्यक्त करू
सोडू फ़क्त एक सुस्कार . . .

क्षितीज. . .

Share

उमललेल्या कळ्या आता
मिटायला लागल्या आहेत
भावनांचे बांध आता
तुटायला लागले आहेत

भरून आलय आभाळ
काळजातल्या भिती संगे
हृदयाची वाढलीय धड्धड
श्वासांच्या घरघरी संगे

दूर क्षितीजा पर्यंत नजरा
कुणाचा तरी ठाव घेताहेत
माझे श्वास उच्छ्वासही
आता तुझेच नाव घेताहेत

वाटतं पळत सुटावं
त्या क्षितीजापलिकडे तू उभी असशील
ती वेड्या मनाची आशा आहे
क्षितीजं का कधी संपतील ?

मन आणि हृदय लागलेत
मेंदूशी भांडायला
आणि मी पळत सुटलोय
ती क्षितीजं ओलांडायला. . .

नातं. . .

Share

काही नातं आहे आपल्या मध्ये
असं मला होतं वाटलं
पण माझ्या शब्दांनी माझ्या
भावनांना कधीच नाही गाठलं

तू निखळ सुंदर हसायचीस
लाडे लाडे बोलायचीस
माझ्या कवीता वाचताना
प्रेत्येक शब्द मधामध्ये घोळायचीस

मला वाटलं आपल्यामध्ये फ़ुलणारं
नातं म्हणजे प्रित आहे
एकमेकांच्या सहवासात घुलणं
हीच प्रेमाची रीत आहे

आपल्यातील नातं निखळ मैत्री आहे
असं तू म्हणालीस
मग बोलणं अर्ध्यात टाकून
माझी नजर टाळत का पळालीस ?

आता साचली आहे धूळ
त्या कवितांच्या पानांवर
सतत भळभळणारी जखम
करुन गेलीस मनावर. . .

वेडसर. . .

Share

का मागे लागली आहेस
त्या निष्पाप फुलपाखराच्या
ते बागडत नाही आहे
ते पळतंय जीवाच्या आकांताने
त्याच्या रंगाचं कौतुक करीत
अलगद चिमटीत पकडलेस त्याचे पंख
आणि झटकून पुसून टाकलीस बोटं
त्याचे रंग बोटांना चिकटताच
मन भरताच मुठीत हलकेच घेऊन
भिरकावलंस त्याला आकाशात
आणि पंखांची असहाय्य फ़ड्फ़ड करत
कोसळलं ते धरतीवर
एक कळकळीचा सुस्कार टाकून निघून गेलीस
माझ्या हृदयाचं घायळ फ़ुलपाखरु करुन. . .

ठेच. . .

Share

जीवनाच्या वाटेकडे
डोळे लाउन चालत नाही
डोळे थिजतिल पण
वाट काही संपत नाही

पावलागणिक खळगे आहेत
आणि ठेच काही चुकत नाही
रक्ताळलेल्या पावलांची
तमा बाळगून चालत नाही

झालेल्या जखमांवर
काळाची खपली धरते
वरील सुक्या खपली खाली
जखम मात्र ओली असते

कालांतराने खपली मात्र जाते
पण व्रण काही जात नाही
एकदा ठेचाळलेल्या दगडावर
कोणी परत ठेच खात नाही. . .

प्रष्ण. . .

Share

त्याच जुन्या क्षणांनी
पुन्हा एकदा गर्दी केलिय
त्या भेडसावणार्‍या प्रष्णांनी
पुन्हा एकदा वर्दी दिलीय
दिल्या घेतल्या सुखदु:खांची
कधी आकडेमोड केली नाही
पण तुझ्या वचनांची नोंद
कोरलेली हृदयाची ही वही
त्या वहीची पानं फाडताना
काळीज तीळ तीळ तुटतंय
सांग सखे एकदा तरी
माझं कुठे काय चुकतंय ?

नुसतं प्रेम उरलंय. . .

Share

तुझं दबक्या पावलांनी येणं
आणि माझे डोळे मिटणं मला नित्याचं झालंय
तुझ्या ड्रेसचा रंग माहीत असूनही
खोटं बोलणं माझ्या सरावाचं झालंय
तुझ्या नखरेल घुश्श्या पुढे
माझं हृदय नेहमीच हरलंय
उगाच का लाखातून हृदयाने
तुलाच एकटीला वरलंय
सारं जग म्हणतय मला
’तुझ्या डोक्यात प्रेमाचं खूळ भरलंय’
नाही कळायचं त्यांना
सारं शहाणपण जाऊन
आता नुसतं प्रेम प्रेम उरलंय. . .

पारिजात. . .

Share

अंगणातील पारिजातावर
छानसे घरटे चिमण्यांचे
त्या घरट्या खाली सांडते
रोज आभाळ चांदण्यांचे

वेचून त्या चांदण्या
फुले माळ केसात लांब तुझ्या
चांदणे पसरेल निशेवर
भिनेल रुधीरात गंध माझ्या

सांज रूप घेउन यावस
मग विझतील रवीकिरणे म्लान
सांजेच्या उंबरठ्यावर निशा
घेत असेल चांदण्यांचे स्नान

असेल हात तुझा हातात
सर्वदूर चांदण्यांचे आभाळ
होइल चांदणेही रुपेरी
पाहून रंग तुझा गव्हाळ

मग क्षण येइल तो
हळूवार सोडवून घेशील हात
मग कित्येक रात्री जागवणारी
हासत निरोप घेइल रात. . .

प्राक्तन. . .

Share

मला सारथी पद स्वीकरायचं होतं
पण लगाम हाती आला नाही
तू रथारुढ हो म्हणाला
आणि स्वत: बेलगाम झाला

यशापयशाचे अश्व जोडले
आणि स्वप्नांचा लगाम दिला
वर्तमानाची धूळ उडवत
भविष्याचा प्रवास सुरु झाला

सगळ्याच वाटा खळग्यांच्या
वेगाने तुडवायच्या
भावनांच्या वेदना
हास्यात उडवायच्या

काळ एकावर एक आसूड ओढतोय
पण हूं नाही की चूं नाही
सुख दु:खाचा संघर्ष म्हणतोय
मी नाही किंवा तू नाही

रथ माझ्या जीवनाचा पण
मी कधीच नाही हाकला
प्राक्तनाचा सारथी माझ्यापुढे
कधीच नाही झुकला. . .

आवेग. . .

Share

रात्र अशी बहरुन यावी
गंध चांदण्याला सुटावा
अन ओठांतील तुझ्या मकरंद
ओठांनी लुटावा

निशब्द व्हावे सारे
श्वासात श्वास घुलावेत
मदहोशी त्या स्पर्शाने
मग रोम रोम फ़ुलावेत

दाटून येता रात्र
हृदयी तुला धरावे
बेभान गारवा होताच
मिठीत तुझ्या शिरावे

ओघळतिल चांदण्या मुठीतून
मोत्यांची माळ तुटता
हा चंद्र मिठीत असावा
रंगीत पहाट फ़ुटता. . .

एक पहाट. . .

Share

रात्रभर खेळ खेळून
एक दवबिंदू थकलं
मग गवताच्या पात्यावर
निमुटपणे झोपलं

कोंबड्याने बांग देताच
मोत्या सारखं हसलं
त्याला रविचं बाळ समजून
सारं रान हसलं

वा‍र्‍याने शीळ घालताच
सारं रान हललं
ते ही येडं घाबरून
धरेच्या कुशीत शिरलं. . .

एकांगी. . .

Share

अजुनही तू तशीच
जेव्हा पहील्यांदा तुला होतं पाहिलं
त्या पहिल्या वहिल्या क्षणात
हृदय तुझ्या चरणी होतं वाहिलं

अजुनही तू तशीच
डोळ्यांच्या कोनातून बघणारी
अजुनही तू तशीच
नजर चुकवत बोलणारी

अजुनही आठवतं तुझं
ओठ दाबून हसणं
अजुनही आठवतं तुझं
श्रुंगाराविना सजणं

तुझं अंगठ्याने जमीन उकरणं
माझ्या मनात खोलवर रुतलंय
त्या क्षणात पेरल्या बिजाचं
आज एक छानसं रोपटं बनलय

त्या सर्व आठवणींचा सुगंध
मनात दरवळत रहातो
त्या चित्रासम आठवणींना
मी तासन तास निहाळत रहातो

डोळे मिटून ऐकताना
एखादं रोमँटीक गाणं
मग दबक्या पावलाने तुझं
बंद पापण्यांमधे येणं

स्वप्न नाहीत ती माझी
त्या तुझ्या आठवणी आहेत
माझ्या एकांत जगण्याला
त्याच खत पाणी आहेत

मी ही जपून ठेवलय
माझं एकांगी चकोरपण
चंद्र पहाताना प्रत्येकवेळी
येते तुझीच आठवण

प्रेमाच्या गंधावर जगणारा मी
मला मकरंदाची आस नाही
तू माझी व्हावीस असा
मज क्षणभरही भास नाही

कधीच लांधल्या सीमा
मी परकेपणाच्या
माझ्याच मी जपल्या प्रतिमा
आपल्या आपुलेपणाच्या

माझी स्वप्नं, माझ्या आठवणी
तुला कधीच कळणार नाहीत
माझी पावलं तुझ्या दिशेने
कधीच वळणार नाहीत. . .

मीरा. . .

Share

आज तिने केस धुतले अन
ओल्या केसांचा आंबाडा घातला
ती वेचायला येणार म्हणून
पारिजातकाने सडा सांडला

धुके उतरले मंद मंद
आसमंती गंध दरवळला
त्या कोमल म्लान स्पर्षाने
पारीजातही थोडा सळसळला

ती फ़ुलं जितकी कोमल
तितकच हृदयही तीचं कोमल
गुलबक्षीला स्पर्ष होताच
उठला फ़ुलपाखरांचा मोहोळ

तुळसही थोडी तिष्ठली
तीज फ़ुलझाडांचा वाटे हेवा
स्पर्ष पहिला प्राजक्तास
मज प्राजक्त का नाही केलेस देवा ?

आरक्त ओठ हळूवार
श्रीकृष्णाला आळवी
आर्त ती साद ऐकूनी
हळवी होई पालवी

चरणी तुझ्या विलीन होण्या
आळवी तुज ही मीरा
अरूणोदय होण्या समयी
कुठे रे गुंतलास श्रीधरा . . .

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०१०

मराठीतूनच बोला सारे मराठी रक्षणासाठी...!!

Share

तुमचे विचार फार सुंदर आहेत.
'मी मराठी' गर्जतो आम्ही, वाऱ्यावरती  स्वार होऊनी
माय मराठीसाठी झटतो आम्ही , हातात कलम घेउनी .
तुमच्या दोन्ही कविता  जोश आणणाऱ्या आहेत.

मराठी असे आमुची मायबोली ।
नसो आज ती राजभाषा नसे ॥नसो आज ऐश्वर्य या माउलीला ।
यशाची पुढे दिव्य आशा असे ॥
इंग्रजीच्या पेपरात होऊन जाते वर्ग सारा पास
पण मराठीचा पोरगा होतो मराठीत नापास...

प्रेम करतो तुझ्याशी म्हटले की पोरगी समजते शेंबडा
अन आय लव यु म्हटल्यावर मनात मारते उड्या...

माय झाली मॉम आणि बाप झाला आता ड्याड
रेव्ह पार्टीत नाचून श्यान पोर झाली मॅड...

भांडण करते बायको घरात बाबुला इंग्रजी शाळेत टाका
मराठी माणसापासून आहे खरा मराठी भाषेला धोका...

मराठी इसरत चालल शाळेतले शिक्षण
मराठी औक्सीजनवर अन चालू आहे इंग्रजीचे रक्षण...

ज्ञानोबा तुकोबाची अभंगवाणी, आठवा मराठीचा गोडवा
मराठी माणसाचे नवीन वर्ष म्हणजे असतो गुडी पाडवा...

सावध व्हा मित्रहो, जपा मायबोली मराठी
मराठीतूनच बोला सारे मराठी रक्षणासाठी...!!

प्रेम केल तर अस कधी तरी होणारच

Share

प्रेम केल तर अस कधी तरी होणारच,
प्रेम केल तर अस कधी तरी होणारच,
तो किवा ती नको इतक्या जवळ जाउन खेटतिलच,
होतय तर होऊ दया की, एकदा तरी होउन जाऊ दे!
दिवस valentine day चा दिवसा संधी साधणारच ना,
लाल लाल गुलाब घेउन propose प्रकरण गाजणारच,
हि नाही तर ती तरी कोणा वर chance तर नक्की मारणार,
होतय तर होऊ दया की, एकदा तरी होउन जाऊ दे!
हसली तर फसली, आता तर नक्की पटली,
इतक्या वर थोडी थांबणार आहे तो किवा ती,
भेटा-भेटी फिरा-फेरी चिपका-चिपकी होउन रहाणार,
होतय तर होऊ दया की, एकदा तरी होउन जाऊ दे!
पावसाचे दिवस म्हणजे आयत्या वर कोयता,
ओलाव्यात त्याच बरच काही फावल,
पावसाची भीती म्हणुन त्याला जाऊं मीठी,
अंधारी रात्रि आता काही खर नाही……
होतय ना मग होऊ दया की,एकदा तरी होउन जाऊ दे!
Traffic Jam म्हणुन टैक्सी हि थांबली,
तो किवा ती थांबनारयातले नव्हते,
त्यांचा तरी काय टाइम पास….मग काय
केला एकमेकांवर जोर …होण्याला कोण थांबवेल ?
होतय तर होऊ दया की, एकदा तरी होउन जाऊ दे!
निसर्गाची साथ प्रेमाची जात समुद्राची लाट,
किनारयावर कधी ना कधी आदलनारच,
ओबड दोबड़ दगडाना गुलगुलित पणा येणारच,
कोणी तरी बसल्याचे ठसे उमटनारच,
होतय ना मग होऊ दया की,एकदा तरी होउन जाऊ दे!
संध्याकाळची वेळ होती,
एकमेकांला भेटायची ओढ़ होती,
बागेत काहीतरी गड़बड़ होती,
झाडांच्या आडोश्याला एक सवाली होती,
होती तर असू दया की,एकदा तरी होउन जाऊ दे!
आमच्या तुमच्या पूर्वजानी आणखी वेगळ ते काय केल?
तुमच्या आणि माझ्या आयुष्यात एकदा तरी होणारच आहे,
होतय तर होऊ दया की, एकदा तरी होउन जाऊ दे!

बिन्धास्त मराठी

Share

आहो आम्हीच ते वीर मराठी
म्हणतात आम्हाला बिन्धास्त मराठी..

गप्पा गोष्टी अन ग़ॉसिप इथे चालती,
मैत्रीच्या या बीजाला स्नेहपालवी अंकुरती..

कधी उडतात इथे खटके अन कधी वादविवाद होती,
सवांदाच्या या कळ्या मनामनातून उमलती..

येतात पाखरे इथे अशी गरूड झेप घेवूनी,
आपल्याच तालात इथे घिरट्या घेती...

कधी इथे जमतो वर्ग बालपणीच्या शाळेचा
मग गुंफला जातो एक एक मोती आठवणीचा..

कधी कधी पाय खेचतात वर जाणार्‍याचे,
अन म्हणातात इथे सर्वानांच सोबत घेवून जायचे...

इथली पोरं लाईन मारायचा चान्स अजिबात सोडत नाही,
जुळतात इथे नाती प्रेमाची तेव्हा ती कधीच मोडत नाही...

भेटतात सारे एकत्र येथे अन धमाल उडवतात
विसरून सारे वैर आपसातले एकीचा मेळा भरवतात..

माझे बाबा...............

Share

माझे बाबा...............

दूरदेशी गेले बाबा
सगळ्यांना सोडून गेले
        न माहित मला कुठे आहे माझे बाबा..........
    भूतकाळाच्या आठवणीत मन माझे गुतले
माझे बाबाचे प्रेम हे फणसासारखे
वरून काट्याप्रमाणे हट्टी
            तर आतून गोड रसाळ गरयाप्रमाणे त्याचे रसाळ प्रेम.......
स्वता ऊनाचे चटके घेत जगले
आणि आम्हाला झाडाची सावली झाले
    जशी दिव्याची ज्योत दुसऱ्याना प्रकाश देते जळत राहते
तसे माझे बाबा आमच्यासाठी जळत राहिले
कधी कोणत्या गोष्टीची कमी पडू दिले नाही
जगत होते तेव्हा ही आणि दूर निघून गेले तेव्हा ही
घराच्या वास्तू आजही त्याची आठवण जगत आहे
कान्याकोपऱ्यात त्याची आठवण तशी आहे
त्याचे स्वप्नं आजही पूर्ण होतात

खरं प्रेम सुरू होतं लग्नानंतर !

Share

"प्रेम म्हणजे ................
खरं प्रेम सुरू होतं लग्नानंतर !

खरया प्रेमाची सुरूवातच तर नेमकी तेव्हां होते जेव्हां दोघं खरया अर्थाने जवळ येतात- मनाने, शरिराने! कायमचे..!!

खरं प्रेम म्हणजे दोघांनी प्रत्येक परिस्थितीला धैर्याने तोंड देणे.

खरं प्रेम म्हणजे दोघांचा एकमेकांवर विश्वास असणे.

खरं प्रेम म्हणजे दोघांची एकमेकांवर निष्ठा असणे.

खरं प्रेम म्हणजे दु:खात एकमेकांच्या सोबत असणे.

खरं प्रेम म्हणजे सुखात एकमेकांना आनंद देणे.

खरं प्रेम म्हणजे तडजोड करण्याची तयारी असणं.

खरं प्रेम म्हणजे एकमेकांच्या गुणांना जपणे.

खरं प्रेम म्हणजे दुखावलेली मने परत जोडणे.

खरं प्रेम म्हणजे भांडण करुन परत जवळ येणे.

खरं प्रेम म्हणजे एकही शब्द न उच्चारता भावना पोहोचणं.

खरं प्रेम म्हणजे डोळ्यात फक्त आनंदाश्रु असणं.

खरं प्रेम म्हणजे एकमेकानां सांभाळणे.

खरं प्रेम म्हणजे चुकत चुकत शहाणे होणे.

खरं प्रेम म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत सोबत असणे.

खरं प्रेम म्हणजे प्रेमबरोबर प्रमाणिक असणे.

खरं प्रेम म्हणजे तू अणि मी, कायम जवळ असणे..!!

गुरुवार, १६ सप्टेंबर, २०१०

हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो... -मंगेश पाडगांवकर

Share

हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो... -मंगेश पाडगांवकर

हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...

आपलं जे असतं;
ते आपलं असतं
आपलं जे नसतं;
ते आपलं नसतं
हसतं डोळे पुसुन आतुन फळासारखं पीकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...


आलेला मोहोर;
कधी जळुन जातो
फुलांचा बहर;
कधी गळुन जातो
पुन्हा प्रवास सुरु केला, जरी चालुन थकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...


कधी आपलं गाव;
आपलं नसतं
कधी आपलं नाव;
आपलं नसतं
अश्या परक्या देशात वाट नाही चुकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...


पींजऱ्यात कोंडुन;
पाखरं आपली होत नाहीत
हात बांधुन;
हात गुंफले जात नाहीत
हे मला कळलं तेंव्हा हरुन सुध्दा जींकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...


झाड मुकं दीसलं तरी;
गात असतं
न दीसणाऱ्या पावसात;
मन न्हात असतं
कळोखावरं चांदण्याची वेल होऊन झुकलो
हे गाणं मी तुझ्याकडुन शीकलो...


नुसताच बसलो होतो मी

Share

नुसताच बसलो होतो मी
बराच वेळ हातात कागद-पेन घेऊन...
सुचतच नव्हते काही
मनाच्या आकाशात कधी पाऊस कधी ऊन...
शेवटी कंटाळून बाजूला ठेवून दिले कागद-पेन
आणि सरळ आठवायला घेतले तुला


तुझ हसणं आठवलं
तसे टपटपले दोन-चार शब्द कागदावर
तुझ चिडणं आठवलं
तश्या उमटून गेल्या दोन-चार ओळी
मलाही मग आला उत्साह
आठवत गेलो तुला खूप खूप...
तसे तरंगत आले चुकार शब्द
आणि बसले शहाण्यासारखे
एकेका ओळीत गुपचूप...

मग मी आठवल्या त्या कातरवेळा
ती संकेतस्थळं आणि ती चांदरात...
तसे लाजले शब्द थोडे आणि त्यांनी
लपेटले स्वत:ला वृत्त, लयी आणि यमकांत...
कागद भरुन गेला पार...
छान कविता होत होती तयार...
आता शेवटच राहिला होता फक्त
बाकी सगळं जमलं होतं मस्त
अन मला कुठुनसं आठवलं
आपलं झालेलं भांडण
तुझ्यासारखेच रुसून बसले मग शब्द
परत थोडा मागे गेलो
जुनं-जुनं आठवू लागलो

हाताला लागले काही निसटणारे क्षण
लिहिलंही मी कागदावर काहीबाही
पण ते माझं मलाच पटलं नाही...
जसं आपलं भांडण
कधी कध्धीच मिटलं नाही...
माझं मीच मग समजावलं मला
कधी कधी असं होतं
राहते एखादी कविता 'अपूर्ण'च
जसं राहून गेलंय आपलं नातं
जसं... राहून गेलंय आपलं नातं!

रातोरात रडवणारी मैत्री

Share

रातोरात रडवणारी मैत्री

आसवाणी भीजवणारी

हृदयात प्रेमाच नव घर करणारी मैत्री
मैत्री आकाराने लहान
पण अर्थाने मात्र महान असते
रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीची नाती बरी असतात
कारण ती रक्ताच्या नात्याइतकीच खरी असतात
मैत्रीत नसते वस्तुंची देवाण-घेवाण
मैत्रीत असते भावनांची जान
मैत्री नसावी सूर्यासारखी तापणारी
मैत्री असावी सावलीप्रमाणे शांत करणारी
कळतनकळत आपल्या सुख-दुखात सामवणार डोळ्यात
अश्रू जागवणार जेव्हा कोणी भेटत तेव्हा जीवनाचे अर्थच बदलतात
मैत्रीत घालवलेला प्रत्येक क्षण असतो अनमोल
मैत्रीत असतो मनमनाचा समतोल
मैत्रीत अशीच आसावी कधी न संपणारी

रातोरात रडवणारी मैत्री

Share

रातोरात रडवणारी मैत्री

आसवाणी भीजवणारी

हृदयात प्रेमाच नव घर करणारी मैत्री
मैत्री आकाराने लहान
पण अर्थाने मात्र महान असते
रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीची नाती बरी असतात
कारण ती रक्ताच्या नात्याइतकीच खरी असतात
मैत्रीत नसते वस्तुंची देवाण-घेवाण
मैत्रीत असते भावनांची जान
मैत्री नसावी सूर्यासारखी तापणारी
मैत्री असावी सावलीप्रमाणे शांत करणारी
कळतनकळत आपल्या सुख-दुखात सामवणार डोळ्यात
अश्रू जागवणार जेव्हा कोणी भेटत तेव्हा जीवनाचे अर्थच बदलतात
मैत्रीत घालवलेला प्रत्येक क्षण असतो अनमोल
मैत्रीत असतो मनमनाचा समतोल
मैत्रीत अशीच आसावी कधी न संपणारी

तुला माहीत आहे का ......

Share

तुला माहीत आहे का ......

स्वप्नांच्या गावात तुझ्यासोबत फिरताना .....
प्रत्येक क्षण मिळावा असे वाटते ...
पण स्वप्न आणि वास्तव यांच्यातले .....
अंतर नेहमी वाढत जाते ......

मी कधीही तुला विचारुन प्रेम केले नाही ....
त्यामुळे तुझ्या होकराचा प्रश्नच येत नाही .....
हे सर्व कसे झाले हे मलाच कळालं नाही ......

आज आशा वाटेवर मी उभा आहे ..
समोर काहीच दिसत नाही ...
पण मागे फिरावे की नाही ..
हे ही समजत नाही .....


पण या वाटेवर चालत राहण्याचा ...
मी प्रयत्न करेन ....
तुझ्या सोबत न रहता , तुझ्या
मानत राहण्याचा प्रयत्न करेन ....


मी फक्त तुझ्यावरच प्रेम केले आहे .....
यात आकर्षणाचा भाग नाही ..
पण कर्ताव्याची जान आहे हे ही खर ...
माझे जीवन तुला कधीच विसरणार नाही ....

चल हे आयुष्य..तू तुझ्या मना प्रमाणे जग ..
पण येणारा जन्म हा फक्त माझ्या साठी राखून ठेव .....
पण पुन्हा असे का वाटत की कोण जाणे ..
दूसरा जन्मच नसेल तर कोण जाणे
--

ती

Share

चेह~यावर रेशमी बटा रुळती
का इतकी सुंदर दिसते ती?

धवल गुलाबी साडि नेसति ति
जणु गुलाबास पाकळ्यात लपेटति ती

बोलायचा प्रयत्न जरी केला मी
तरी सारखि बिझि का असते ती?

कधि ड्रेस,कधि जिनटॉप वापरे ती
पण साडित अति सुंदर दिसते ती

किति गोड कविता लिहिते ती,
त्यात दुखा:चे रंग का भरते ती?

भेटलो नाही कधी तिला मी
तरी ओळखिची का वाटते ती ?

नाहि जरी दोन शब्द बोललो मी
अनामीक ओढ का लावते ती?

खुप गुढ वागणे आहे तिचे जरी...
तरी मैत्रीण का आवडे मला ती?

ज़रा अस्मान झुकले

Share

ज़रा अस्मान झुकले
शुभ्र तारकांचे झेले
क्षितिजाचे रंग रेखा
संथ पाण्यात न्हालेले
रान मुकाट झालेले
पक्षी पंखात मिटले
हळु चाहूल घेताना
पाणी दाण्डात हासले

ज़रा अस्मान झुकले
स्वर मेंदित भिजले ...
ज़रा अस्मान झुकले
स्वर मेंदित भिजले
उस मळयाच्या गर्दीत
डोळे पाऊल चुकले

अशी लाखकलि बोर
अंगभर चंद्रकोर
उस मळयाच्या गर्दीत
थोड़े सांडले केशर !

- ना. धो. महानोर

खंत माझ्या मनातली

Share

खंत माझ्या मनातली, जाणतील जेव्हा तारे,
विसरून दिशा दाही, भांबावतील हे वारे,

खोली माझ्या मनाची, मापतील जेव्हा सागरे,
कळेल त्यांना माझ्या मनाला, न अतृप्त हे किनारे,

साम्राज्य माझ्या मनाचे, पाहील जेव्हा धरे,
दिसेल तिला ही निद्रिस्त, सुख:दुखा:ची रुजणारी अंकुरे,

नवलाई माझ्या मनाची, पांघरतील जेव्हा झाडे,
भेटेल त्यांना हिरवळीत या, एक तरु वठलेले,

अवखळ या माझ्या मनाची, खळ-खळ सुनतील जेव्हा झरे,
स्फुरेल त्यांना ही वाहणारे, माझे माणुसकीचे गाणे

मी अलिप्त या जगाशी तरी, विचारील चांदणे,
घेतल्यास पदरात उल्का परी तू, का न झेललीस नक्षत्रे?

यात्री मी जीवनाची, अन् असेच माझे भटक्यापरी भटकणे,
सुख:दुखा:तुन, व्यथे-कथेतुन, माझे हे बरसणे, तरसणे……………

अजुन तीच मन काही.........वळलं नाही......!

Share

अजुन तीच मन काही.........वळलं नाही......!
अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!
काल तिच्या सोबत चालत होतो...
चालता चालता बोलत होतो...
बोलता बोलता रस्ता कधी संपला कळलं नाही...
अजुन तीच मन काही.........वळलं नाही......!

नविन बुटामुले पाय दुखत होता...
चालता चालता हाडाला खुपत होता...
तिच्या आनंदात पायाच दुःखण कळलं नाही...
अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!


काल खुप खुश होती.......म्हणाली मजा आली
आज का तू थाम्बलास.......माझ्यासाठी....
का थाम्बलो...... तिला काय हे कळलं नाही...?
अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!

होटेलात गेलो.......खुप खल्ल
उशीर झाला तिला......पण वेळ कसा गेला नाही कळलं
का तिने इतका वेळ घालवला.......तिला काय हे कळलं नाही...?
अजुन तिचं मन काही.........वळलं नाही......!

मग असेच चालत राहिलो रस्त्यावर........
घर तिचे जवळ येउच नये असे वाटत राहिले.....
बसस्टॉप येताच मी थाम्ब्लो
तेंव्हा डोळ्यांत तिच्या मी......आनंदाचे क्षण पाहिले

काही क्षण स्तब्ध झालो........आम्ही
एकमेकांना टाटा.......बाय नाही म्हणालो
कोणास ठाउक........का ते कळलं नाही...?
अजुन तिचं मन काही.........वळलं नाही..

दहीहंडी

Share

सायंकालची वेळ होती.
रघुनाथ रस्त्याने घराकडे चालला होता.
चालून चालून फार थकला होता तो.
दोस्त व नातेवाईकांकडे फिरत होता सकाळपासून,
आता रस्त्याने चालताना साफ निराशा त्याच्या चेहृयावर दिसत होती.
कसल्यातरी काळजिने त्याचे मन ग्लबलून येत होते.
पुढच्या चौकात जरा वेळ बसू असा विचार करून तो चौकाकडे वळला.
चौकमध्ये कसलीतरी गडबड चालू होती,
म्हणून पुढे आला.
बरीच मुळे घोळक्या घोळक्याने उभा होती.
समोरच एक मोठा बोर्ड लावलेला होता.
त्यावर त्या भागातील नामांकित व प्रतिष्ठित मंडळींचे फोटो लावलेले होते.
सर्वात वरच्या भागात मोठ्या अक्षरात लिहिलेले होते.
' पाच लाखांची भव्य दहीहंडी सोहळा'.
हे वाचल्यावर रघुनाथ च्या डोळ्यासमोर काजवे चमकले.
त्याने एका मुलाला विचारले की हे काय आहे,
त्यावर त्या मुलाने उत्तर दिले की दहीहंडी उभरायचे काम चालू आहे.
आम्हाला मदत करणार का असे विचारल्यावर रघुनाथ तयार झाला.
एक दोन तासात दही हांडी उभा झाली.
सहज म्हणून रघुनाथ ने वर पहिले तो काय,
अबब दहीहंडी च्या भोवती शंभर, पाचशे व हजार रुपयांच्या नोटांच्या माळा लावलेल्या होत्या.
कमीत कमी शंभर दोनशे तरी नोटा असतील.
त्यातील एक जरी नॉट मिळाली तरी रघुनाथ ची चिंता मिटणार होती.
मागून एकाने विचारले,"दहीहंडी छान बांधली नाही का!, कशी काय वाटली आमची दहीहंडी!"
रघुनाथ ऊद्गारला," हे तर एकदम पैशाचा पाऊस पहिल्यासारख वाटत आहे."
मनातल्या मनात त्याच्या मनात विचार सुरू झाला की यातली एकजरी नोट मिळाली तरी
माझा आजचा प्रश्न सुटेल व घरी असलेली माझी दोन मुले जेवतील तरी.
त्याच्या डोळ्यासमोर घर व त्याघरात दोन दिवसांपासून उपाशी असलेले
त्याचे कुटुंब दिसले, मुलांचे हाल त्याला बघवत नव्हते.
म्हणून सकाळ पासून सर्वानकडे पैसे मागत् फिरत होता पण कुणी मदत केली नाही.
नोटांची झालर व डोळ्यात पाणी नाही राहीले असे मुलांचे डोळे हेच त्याला आल्टून पालटून दिसत होते.
कसल्या तरी आजाराची साथ आली म्हणून त्याच्या मुकादम् ने काम बंद ठेवले होते.
आठ दिवसांपासून तो असाच भटकत होता.

दहीहंडी साठी मुलांनी रिंगन धरायला चालू केले.
तसा रघुनाथ हडकूळा व चपल शरीर यष्टीचा होता.
मागून कुणा कार्यकर्त्याने त्याला ढकलले व दहीहंडी वर चढण्यास मदत करण्यास सांगितले.
कार्यकर्ते बर्‍यापैकी धुंद झालेले होते.
अंगात त्रानही राहिलेले नव्हते पण मुलांचा चेहरा आठवून वरती चढण्याचा विचार करू लागला.
त्याच्या मनात एखादी नोट हाती लागलीच तर घरचा प्रश्न सुटेल.
दुसर्‍या थरावर उभा राहिलेला होता.
त्यावर अजुन तीन थर उभा राहीले.
पायाला काम करताना जखम झाली होती,
पण पैशे नसल्याकारणाने तो दावाखान्यामध्ये सुधा गेलेला नव्हता.
पाय तग धारिना.
एका पायाचा आधार करून कसा बसा तोल सांभाळत वरचा भार अंगावर पेलून होता.
दहीहंडी फुटली जल्लोष झाला.
पैशाच्या माळा खाली आल्या.
गोविंदा नि सगळे पैसे जमा केले.
सत्कार, मानपान झाले.
सगळेच जिकडे तिकडे रवाना झाले.
रघुनाथ सगळे चाचपडून थकला,
शेवटी फाटकी एक नॉट त्याच्या हाताला आली जीचा शून्या उपयोग होता.
लंगडत लंगडत घरी निघाला.
विचार मनात परत आला.
घरी जाऊन काय सांगू त्या लहान जिवा ना.
कृष्णा सारखी दोन बालके,
ना दही ना खायला, काय देऊ त्या दोन जीवांना.
काय देऊ त्या दोन जीवांना.

शनिवार, ११ सप्टेंबर, २०१०

प्रेमात हरलेला मुलगा आणि त्याचे आई वडिल ........खूपच छान ( वेळ काढून वाचा )

Share

प्रेमात हरलेला मुलगा आणि त्याचे आई वडिल......खूपच छान ( वेळ काढून वाचा)



































Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top