Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

रविवार, २५ ऑक्टोबर, २००९

तुझ्या आठवणीला, तुझ्या आठवणीला.... .........

Share

काय म्हणावं तुझ्या आठवणीला......
चुकवुन पाहवी नजर मी जेव्हा
स्वप्नांची रोज रात्रीच्या प्रहराला
नेमकं तेव्हाच जाग्या होती तुझ्या आठवणी
मनावर माझ्या खड्या पह-याला
आता तुच सांग, काय म्हणावं तुझ्या आठवणीला......

झाडुन काढावं म्हणतो मी जेव्हा
मनातल्या तुझ्या असताव्यस्त प्रेमाच्या ओसरीला
पण, नेमका तेव्हाच उडतो तुझ्या
आठवणीचा बेशिस्त तो सुमार पाला-पाचोळा
आता तुच सांग, काय म्हणावं तुझ्या आठवणीला......

जगुन पहावं म्हणतो मी जेव्हा
दुख:-वेदना अनुभवत प्रत्येक श्वासाला
पण नेमकं तेव्हा तुझ्या आठवणीचा श्वास
त्याआधीच कोंडतो काळजात माझ्या, स्वत:ला
आता तुच सांग, काय म्हणावं तुझ्या आठवणीला......

रडुन काढावी रात्र म्हणतो मी जेव्हा
आठवुन तुझ्या शेवटच्या निरोपाला
अनं, नेमका तेव्हाच उगवतो सुर्य तुझ्या आठवणीचा
सारुन बाजुला त्या भयाण तिमिराला
खरंच गं , काय म्हणांव सांग मी
तुझ्या आठवणीला, तुझ्या आठवणीला.... ........

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top