मन -----
मन वढाय वढाय
उभ्या पिकातल ढोर
किती हाकलं हाकलं
फिरी येते पिकावर
मन पाखरू पाखरू
त्याची काय सांगू मात
आता व्हत भुइवर
गेल गेल आभायात
मन लहरी लहरी
त्याले हाती धरे कोन
उंडारल उंडारल
जस वारा वाहादन
मन जह्यरी जह्यरी
याच न्यार रे तन्तर
आरे इचू साप बरा
त्याले उतारे मन्तर
मन एव्हड एव्हड
जस खसखसच दान
मन केवढ केवढ
आभायतबि मावेन
देवा आस कस मन
आस कस रे घडल
कुठे जागेपनी तुले
अस सपन पडल
- बहीणाबाई चौधरी
गुरुवार, ९ जुलै, २००९
मन
३:३९:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: बालभारती - आठवणीतील कविता , मराठी , मराठी कविता , Balbharati , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: बालभारती - आठवणीतील कविता , मराठी , मराठी कविता , Balbharati , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा