रात्री बायको बरोबर गाडी वरुन घरी जाताना ती खोडकर आवाजात सांगू लागते आमच्याच घरच्या खाणाखूणा... ' हां.. आता इथून डावीकडे... आता सरळ.. त्या मारुती पासून उजवीकडे वळा.. थोडी पुढे घ्या अजुन... पांढर्या गेटपाशी थांबवा... हां... बास बास... इथेच... ' आणि मग उतरत, पर्स काढत विचारते हसत हसत - ' हां... किती झाले ? ' ८४ लक्ष तर झालेच की प्रीये ! हा तरी शेवटचा की नव्या जन्मवर्तुळाचा हा प्रारंभ ... ठाउक नाही ! गतजन्माचे आठवत नसेलही काही आपल्याला, पण तेंव्हाही असतील असेच तुझे जन्मप्रामाणिक हसरे क्षण आणि माझे अंतःस्थ उदासीन प्रश्न काही !! आता पर्स काढलीच आहेस तर ठेव हातावर एखादी साखरहळवी टॉफी... गोड चविने सरु दे अजुन एक रात्र... अंधारातच चढायचा आहे एक एक जिना... हातात हात तेवढा राहू दे फक्त.... - मौनाची भाषांतरे, संदिप खरे
शनिवार, १८ जुलै, २००९
किती झाले.. ?
५:४२:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: मराठी कविता , मराठी लेख , संदीप खरे , Marathi Kavita , marathi lekh , Marathi poem , sandeep khare
लेबल: मराठी कविता , मराठी लेख , संदीप खरे , Marathi Kavita , marathi lekh , Marathi poem , sandeep khare
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा