मधु मागशि माझ्या सख्या परी,
मधुघटचि रिकामे पड़ती घरी
आजवरी कमळाच्या द्रोणी
मधु पजीला तुला भरोनि,
सेवा हि पुर्वीची स्मरोनी,
करी रोष न सखया, दया करी
नैवेद्याची एकच वाटी
अतां दुधाचि माझ्या गाठी,
देवपुजेस्तव ही कोरांटी
बाळगी अंगणी कशि तरी
तरुण-तरुणीची सलज्ज कुजबुज
वृक्ष-झर्यांचे गुढ मधुर गुज,
संसाराचे मर्म हवे तुज,
मधु पिळण्या परी रे बळ न करी
ढळला रे ढळला दिन सखया
संध्याछाया भिवविती हृदया,
अतां मधुचे नांव कासया?
लागले नेत्र रे पैलतीरी
- भा. रा. तांबे
मंगळवार, १४ जुलै, २००९
मधुघट
२:४५:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , बालभारती - आठवणीतील कविता , मराठी , मराठी कविता , Balbharati , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , बालभारती - आठवणीतील कविता , मराठी , मराठी कविता , Balbharati , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा