त्याला पाऊस आवडत नाही,तिला पाऊस आवडतो. ढग दाटून आल्यावर तो तिच्या तावडीत सापडतो. मी तुला आवडते पण पाऊस आवडत नाही, असलं तुझ गणित खरच मला कळत नाही. पाऊस म्हणजे चिखल सारा पाऊस म्हणजे मरगळ, पाऊस म्हणजे गार वारा पाउस म्हणजे हिरवळ. पाऊस कपडे खराब करतो पाऊस वैतागवाडी पाऊस म्हणजे गार वारा पाऊस म्हणजे झाडी. पाऊस रेंगाळलेली कामे पाऊस म्हणजे सूटी उगाच, पावसामध्ये गुपचुप निसटुन मन जाऊन बसतं ढगात. दरवर्षी पाऊस येतो दरवर्षी अस होतं पावसावरून भांडण होऊन लोकांमध्ये हसं होतं पाऊस आवडत नसला तरी ती त्याला आवडते पावसासकट आवडावी ती म्हणून ती ही झगडते. रूसून मग ती निघून जाते भिजत राहते पावसात. त्याचं तिचं भांडण असं ओल्याचिंब दिवसात |
रविवार, २३ मे, २०१०
Paus...
२:०२:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem , Paus , rain
लेबल: कविता , पाऊस , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem , Paus , rain
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा