भावनांच्या पार तेथे एक माझे नाव होते
हृदयाच्या गावात मन हे वस्तुपरी
त्यावरी क्षणाक्षनाचे घेतलेले घाव होते
भावनांच्या पार तेथे एक माझे नाव होते
माझे मीपण ना उरले जरी वंचितांचे प्रहार होते
भावनांच्या पार तेथे एक माझे नाव होते
सोसलेल्या घावातुनी मन घनापरी जाहले
आता त्यावरी कितीही जोर पडला
त्याचे वेगळाले भाव होते
भावनांच्या पार तेथे एक माझे नाव होते
आता तिथे वसली घरे जरी अनन्त यात्नातुनी
त्या घरावर फुलापरी अश्रूंची माळली तोरणे
त्या तोरणावर वसलेले आपलेपणाचे भाव होते
भावनांच्या पार तेथे एक माझे नाव होते
भावनांच्या कल्लोळातून निघाली अनंत भाषणे
सहण्याला मिळालीही बलाचीही लोचने
भावनांच्या पार तेथे एक माझे नाव होते
भावनांच्या नात्यातला गुंता फार वाढला
गुंत्यात ना गुंतता मी स्वतःला काढले
भावनांच्या पार तेथे एक माझे नाव होते
जीवनाच्या शिदोरीवर भावनांचे राज्य होते
जगणे त्याविन फार यातनामय होते
भावनांच्या पार तेथे एक माझे नाव होते
मंगळवार, १३ एप्रिल, २०१०
भावना
२:१५:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा