ये जाणार्या क्षणा
थांब मी येतो
तिला अगदी शेवटचेच
डोळे भरुन पाहतो
बघ ती मला
परत भेटणार नाही
माझ्या आठवणीत ती
कधीच नटणार नाही
एकदा तिच्या नजरेत
मनभरुन पाहतो
ये जाणार्या क्षणा
थांब मी येतो
तिचे ते हासणे
परत दिसणार नाही
मी गेल्यावर ती
परत हसणार नाही
तिच्या त्या खळीला
एक नजर पाहतो
ये जाणार्या क्षणा
थांब मी येतो
माझ्या बाहुत ती
परत शिरणार नाही
माझा विरह ती
सहन करणार नाही
जाण्याआधी तिला मी
घट्ट मिठीत घेतो
ये जाणार्या क्षणा
थांब मी येतो
ये जाणार्या क्षणा
थांब मी येतो
तिला अगदी शेवटचेच
डोळे भरुन पाहतो
शुक्रवार, २९ मे, २००९
ये जाणार्या क्षणा
१०:०१:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा