॥ हरि ૐ ॥
नवरात्र
घटी बैसे आदिमाया
नंदादीप नऊ दिस
नवान्नाने तृप्त झाला
झळाळतो अश्विन मास
दाट काजळी अंधार
कृष्णमेघ आले आले
भिजे हस्ताचे नक्षत्र
घट माळ ओले ओले
वृक्ष तरू लता वेली
तृप्त काळोख हिरवा
गारव्याने शहारतो
पानी कंटक बरवा
निवडंगांचे उंच फ़डे
एकाकी सुन्न रान
वेळूतून लहरते
शिळभारी मंद गान!
वेळूच्या बनी बाई
सखा कान्हुला राहतो
आकाशी तेज वीज
तेथे राधेला पाहतो
नवराती रातभर
राधा नाचली नाचली
तिच्या अंगोअंगी भिने
घननीळ्याची मुरली!
शुक्रवार, २९ मे, २००९
नवरात्र
९:१७:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , नवरात्र , मराठी कविता , मराठी सण , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , नवरात्र , मराठी कविता , मराठी सण , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा