मी.....................
एक भूल
कोमेजलेले फूल
विझलेली चूल |
मी...................
एक नशा
हरवलेली दिशा
कातरवेळेची निराशा |
मी........................
एक भास
निसटलेला आभास
अंतहीन प्रवास |
मी........................
एक ध्यास
अपुरा सहवास
सुटलेला निश्वास |
मी.........................
एक गाज
दबलेला आवाज
भरकटलेले जहाज |
मी..................
एक आशा
पराभुतांची निराशा
अनाकलनीय भाषा |
मी....................
एक ध्येय
अंधारवाटी भय
न सुटणारे प्रमेय |
शुक्रवार, २९ मे, २००९
मी. एक भूल
८:३४:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा