आल्या पावसाच्या सरी ;
किती चातक चोचीने
प्यावा वर्षाऋतूतरी
काळ्या ढेकळांच्या गेला
गंध भरून कळ्यांत ;
काळ्या डांबरी रस्त्याचा
झाला निर्मळ निवांत
चाळीचळीतून चिंब
ओली चिरगुटे झाली ;
ओल्या कौलारकौलारी
मेघ हुंगतात लाली
ओल्या पानांतल्या रेषा
वाचतात ओले पक्षी ;
आणि पोपटी रंगाची
रान दाखविते नक्षी
ओशाळला येथे यम ,
वीज ओशाळली थोडी ,
धावणाऱ्या क्षणालाही
आली ओलसर गोडी
मनी तापलेल्या तारा
जरा निवतात संथ ;
येतां आषाढ - श्रावण
निवतात दिशा - पंथ
आला आषाढ - श्रावण
आल्या पावसाच्या सरी ;
किती चातकचोचीने
प्यावा वर्षाऋतूपरी




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा