पाउस दाटलेला माझ्या घरावरी हा
दारास भास आता हळुवार पावलांचा
गवतास थेंब सारे बिलगुनी बैसलेले
नितळुन साचलेले नितळुन साचलेले
तळवा भिजेल आता हळुवार पावलाचा
झाडावरुन पक्षी सारे उडुन गेले
जेंव्हा भिजुन गेले जेंव्हा भिजुन गेले
पंखात लाडक्यांचा हळुवार पावलांचा
पाउलवाट सारी रात्री भिजुन गेली
विसरुन तीच गेली विसरुन तीच गेली
ओला ठसा कुणाचा हळुवार पावालांचा
दारास भास आता हळुवार पावलांचा
गवतास थेंब सारे बिलगुनी बैसलेले
नितळुन साचलेले नितळुन साचलेले
तळवा भिजेल आता हळुवार पावलाचा
झाडावरुन पक्षी सारे उडुन गेले
जेंव्हा भिजुन गेले जेंव्हा भिजुन गेले
पंखात लाडक्यांचा हळुवार पावलांचा
पाउलवाट सारी रात्री भिजुन गेली
विसरुन तीच गेली विसरुन तीच गेली
ओला ठसा कुणाचा हळुवार पावालांचा




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा