Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

पाऊस वेगळा होता

Share



जो काल इथे आला तो

पाऊस वेगळा होता

आभाळ निराळे होते

तो मेघ वेगळा होता

...

वेचली फुले थेंबांची

ओठही फुलांचे होते

डोळ्यात पावसामधला

निथळता जिव्हाळा होता

...

पाऊस असा आला की

अद्याप थांबला नाही

या अशा पावसासाठी

सोसला उन्हाळा होता

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top