Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

पाउस...तीच्या पावलांवरचा

Share


पाउस...तीच्या पावलांवरचा
ती आली तोच पाऊस घेउन
तिचे ते काळेभोर डोळे..ओळखीचे
पण अनोळखी थेंब गाळणारे
थेंब सुद्धा लोचट...तीला चिकटत ओघळणारे
आपलं अस्तीत्व जपत, पावसाला टाळत कोसळणारे
जमीनीवर पडून पुन्हा उसळणारे

नेहमी उत्कट-बित्कट वागणारा मी,
आज असा दगडा सारखा स्तब्ध
ती जर बोलली असती तर हेच बोलली असती..
पण मलाही ते समजत होतं
मी तिच्या पायाच्या अंगठ्याकडे पहात उभा..
जमीनीत रूतलेले तिचे अंगठे..
बहुदा तिच्या वेदनांचा शेवट तिथे होत असावा
पडलेल्या थेंबांशी हितगुज करत ते ही तसेच निश्चल..

त्यानंतर पाऊस कोसळला, चमचमला, हळहळला
आता उद्या नाही असा बरसला
मी तसाच उभा होतो
पावसाचा हल्ला झेलत
ती गेली निघून
तिच्या पाउलखुणा सोडून
त्यानंतर मी कितीतरी वेळ...
तिच्या पाऊलखुणांवरचा पाऊस टीपून घेत होतो..
अधाश्यासारखा...

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top