पाऊस दाटलेला असताना मनात..
तु जवळ असावे असे वाटते..
तुझा खांदा कडे कपारी व्हावा अन्..
मी झरा होवुन कोसाळावेसे वाटते..
पाऊस दाटलेला असताना मनात..
तुला घट्ट बिलगावेसे वाटते..
क्शनभर का होईना पण्..
तुझ्याशी एकरुप व्हावेसे वाटते..
पाऊस दाटलेला असताना मनात..
आपन दोघांनी अबोल रहावेसे वाटते..
न बोलता सगळेकाही जाणावे..
असे दोघांनाही वाटते..
पाऊस दाटलेला असताना मनात




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा