सहवासाची संगत तु
चांदण्यांची गंमत तु,
रवि किरणांचा तुच तजेला
जलधारंची गंमत तु,
कधी अचानक रुसतस तु
मनापासुन हसतस तु,
साद घालते मनास
ऐसे जीवनगाणे तु,
खळखळणारा झरा तु
चंचलतेचा वार तु,
लाट धावते ज्याच्यासाठी
कधी तो शांत किनारा तु,
निखळ मनाचे तुझे वागणे
फ़क्त मैत्रीचे साद घालणे,
राग लोभ जरी आले गेले
उरले केवळ जीव लावणे,
गुण दोषांचा स्वीकार तु
माझ्यावरचा अधिकार तु,
शब्दांमद्ये साकार तु
मैत्री मद्ये साकार तु,
प्रत्येक दिवशी आठवतात
या मैत्रीची खुप कारणं,
सर्वात सुंदर हेच
आपलं एकमेकांच्या मनात राहणं
शुक्रवार, २९ मे, २००९
सहवासाची संगत तु
८:२५:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , मराठी गोस्टी , मैत्री , Friendship , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , मराठी गोस्टी , मैत्री , Friendship , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा