Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

माथेरानच्या कविता

Share

माथेरानची कविता १

घन पाऊस पाऊस
चहू दिशांनी पाऊस
माझ्या आत उचंबळे
वेडा पाऊस पाऊस

पावसाचे हे थैमान
त्यात ओले माथेरान
कंच झाडांच्या मुळांशी
चिंब भिजलेले मन

कोसळतो घणाघाती
रुद्र पाऊस प्रपाती
आत खोलवर उगे
कोवळीशी तॄणपाती

...

कोवळीशी तॄणपाती
तॄणपाती तॄणपाती...

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top