Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

पहिला पाऊस.........

Share

पहिला पाऊस.........

पहिला पाऊस
मातीचा गंध
हर्ष होई मना
चराचरी आनंद

तप्त धरती
थंड पावसाची धार
तृप्त झाली माती
निसर्ग झाला गार

मयूर बेधुंद नाचे
धुंदी कणाकणात
पाखरे गाती गाणी
चैतन्य रानावनात

ढगांचा गडगडाट
विजांचा कडकडाट
भरलाय आसमंत सारा
पहा खट्याळ झालाय,तो वारा

सुखद बळीराजा
पावसाचा ऋणी
बरस रे वरुणराजा
मैत्री आपली जुनी

मन होई पाखरू
म्हणे पावसात फिरू
उकडलेल्या या देहाला
थोडे शितळ करू

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top