Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

पाऊस पाऊस

Share

पाऊस पाऊस
पावसाचं नेहमी असच असतं
तुला भेटायचं असतं
तेव्हाच त्याला पडायचं असतं...

चालता चालता
वा~याचं असं भेभान होणं
छत्री उडवून माझी
पावसाला मला भिजवण्याची संधी देणं...

काळ्या काळ्या
ढगाचं गडगडुन माझ्यावर हसणं
बघता रागाने ढगांकडे
विजेचं माझ्यावर कडाडुन चमचमणं...

चिम्ब चिम्ब
होऊन तुला भेटायला येणं
हॉटेलमधे बसल्यावर
तुझं मला ते रुमाल देणं...

गरम गरम
कॉफ़ी एकाच कपमधे पिणं
"पाऊस थांबला कि जा"म्हणून
तुझं मला थांबवून घेणं...

गुपचुप गुपचुप
पावसाला "थॅन्क यू" म्हणनं
तुझा सहवास लाभेल म्हणून
पावसाला "पडत राहा" अशी विनावणी करणं...

नावडता नावडता
म्हणत होते मी पावसाला
सा~या गोड आठवणी आठवता
पाऊस झाला आज "लाडका"...

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top