Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

तुझं माझं मैत्र...

Share

तुझं माझं मैत्र...
जीवनाच्या कागदावर रेखाटलेले एक चित्र...

भरलेले विविध भावनांचे रंग..
नारंगी बालपणातल्या मस्तीत दंग..

तो हळुवार रंगलेला हिरवा..
जणु सोबतीच्या आठवणीतला गारवा...

लाल लाल तारुण्यातला जोश...
तर प्रेमळ क्षणातला गुलाबी मदहोश....

ह्या छटा अनेक रेखाटलेल्या...
कधी रुसलेल्या कधी हसलेल्या...

गडद दु:खातल्या आधारासारखं...
तर सुखातल्या क्षणापरी हलकं...

सरळ आडव्या रेखांनी हे सांधलेलं...
अन वेग-वेगळ्या घटनांनी बांधलेलं...

तुझं माझं हे मैत्र...
एक नयन-रम्य चित्र....
विस्तारु याला अजून मोठं
राहून नेहमी एकत्र....

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top