Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

पाणी झरत चालले

Share


पाणी झरत चालले आज आभाळ फाटले,
पावसाला पावसाने वर ढगात गाठले.
पाणी झरत चालले झाड झाडाच्या मीठीत,
आता झाडाच्या भवती रान आगीच्या ढगीत.
पाणी झरत चालले नदी सागर भरती,
वाळू ओलावली सारी दोन्ही किना-यावरती.
पाणी झरत चालले उभ्या रानाला तहान,
आता किलबिलताहे झाडाझाडातून पान.

पाणी झरत चालले आज आभाळ फाटले,
पावसाला पावसाने वर ढगात गाठले.

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top