Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

गार वारा हा भरारा

Share


गार वारा हा भरारा, नभं टिपूस टिपूस
रानी वनी, पानोपानी, मन पाऊस पाऊस ॥धृ.॥

माती खाली खोल खोल, ओल मातीच्या मनास
मातीवर थरथरे, ओला सुवास सुवास ॥१॥

पावसाळी पायवाटा, जरा उदास उदास
दाही दिशांत पाखरे, जणू आभास आभास ॥२॥

रान मोकळे मोकळे, बघे भारुन नभास
त्याचा हिरवा हिरवा, आज प्रवास प्रवास ॥३॥


****************************************************************


रिमझिम धून, आभाळ भरुन
हरवले मन, येणार हे कोण ? ॥धृ.॥

मन फुलांचा थवा, गंध हा हवा हवा
वाहतो वारा नवा, जुन्यात हरवून ॥१॥

गूज मनीचे मनाला, आठवूनी त्या क्षणाला
सांगावे का माझे मला, उगाच मनात बावरुन ॥२॥

वार्‍यात गाणे कुणाचे, गाण्यात वारे मनाचे
मनाच्या वार्‍यात आता, सुरात तुला मी कवळून ॥३॥



****************************************************************


झाडाखाली बसलेले, कोणी कोठे रुसलेले
चिंब मनी आज पुन्हा, आठवूनी मेघ जुना कोणी भिजलेले ॥धृ.॥

वार्‍यातूनी, पाण्यातूनी, गाण्यातूनी भिजला
पाऊस हा माझा तुझा, आता ऋतू सजला
गंध असे, मंद जणू, होऊनिया थेंब जणू, आता टपटपले ॥१॥

पाऊस हा असा, झाला वेडापिसा, पानाफुलांत पुन्हा
खूप जुन्या आज पुन्हा, डोळयात थेंबखुणा
होऊनिया धुंद खरे, आज पुन्हा गार झरे येथे झरझरले ॥२॥

काही कळया, काही फूले, काही झूले हलले
काही मनी, काही तनी, काही नवे फुलले
वावरुनी आज कुणी, सावरुनी आज कुणी, येथे थरथरले ॥३॥

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top