Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

कधी पाहिलय मी तुला

Share

कधी पाहिलय मी तुला
फुलपाखरु होऊन आकाशी उडताना
रडणा-या प्रत्येक चेह-यावर हसु वाटत फिरताना

कधी पाहिलय मी तुला
स्वप्न होऊन रंगताना
निराश झालेल्या दु:खी मनात
आशेचा नवा किरण भरताना

कधी पाहिलय मी तुला
आकाशी उडताना
इंद्रधनुष्यी त्या रंगात
अलगतपणे मिसळताना

कधी पाहिलय मी तुला
तिरस्काराने बेभान होताना
तप्त त्या अग्निरसात
सारं सारं वाहुन नेताना

कधी पाहिलय मी तुला
दु:खाच्या सागरात डुबताना
सारे अश्रु आतल्या आत
ह्रदयामध्ये लपविताना

कधी पाहिलय मी तुला
माझ्यामध्ये शिरताना
क्षणोक्षणी बरोबर माझ्या
माझ्यासाठीच जगताना .. .....

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top