गरज म्हणून "नातं" कधी जोडू नकोस,
सोय म्हणून सहज असं तोडू नकोस.....
रक्ताचं नाही म्हणून, कवडीमोल ठरवू नकोस
भावनांचं मोल जाण... मोठेपणात हरवू नकोस.....
आयूष्याच्या प्रत्येक वळणात नवं नातं जुळत असतं
जन्मभर मीळेल इतकं भरून प्रेम मिळत असतं.....
तुझी ओंजळ पुढे कर, कमीपणा मानू नकोस
व्यव्हारातलं देणं घेणं फ़क्त मध्ये आणू नकोस.....
मीळेल तीतकं घेत रहा, जमेल तीतकं देत रहा
दीलं घेतलं सरेल तेव्हा..पुन्हा मागून घेत रहा...
समाधानात तडजोड असते..फ़क्त जरा समजून घे
"नातं" म्हणजे ओझं नाही..मनापासून उमजून घे...
वीश्वासाचे चार शब्दं..दुसरं काही देऊ नकोस
जाणीवपुर्वक "नातं" जप.....मध्येच माघार घेऊ नकोस
शुक्रवार, २९ मे, २००९
गरज म्हणून "नातं" कधी जोडू नकोस,
८:२७:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा