Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शुक्रवार, २९ मे, २००९

पाऊस

Share

पाऊस


मला नसते तुला भिजवायाचे.
तुला असते प्रेम-रसात भिजायचे.

विखुरलेल्या थेंबाना एकत्र करायचे .
पाण्यासारखं होऊन वहायचे.
समुद्राला भेटायचे.
सूर्य-किरणांना थंड करुन वाफ़ बनायचे.
ढग बनून पुन्हा आकाशात फ़िरायचे.

मला नसते तुला भिजवायाचे.
तुला असते प्रेम-रसात भिजायचे.

विखुरलेल्या प्रेमाला एकत्र करायचे.
पाण्यासारखं प्रवाही बनून प्रियकराकडे वहायचे.
प्रेमाच्या सागरी जाऊन मिळायचे.
प्रियकराला थंड करुन वाफ़ेसारखे हलके बनायचे.
ढगासारखे स्वच्छंद प्रेमाच्या हवेतच तरंगायचे.

मला नसते तुला भिजवायाचे.
तुला असते प्रेम-रसात भिजायचे.

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top