प्रेम करण्याचे कारण!एका ई मेल मधुन आलेली गोष्ट, जमला तसा अनुवाद केला. आपल्या सगळ्यांसाठी इथे देत आहे. आमच 'पहीलं प्रेम' चर्चेमुळे हा अनुवाद करावा वाटला पहिल्या प्रेमाशी जरी या कथेचा संबंध नसला तरी 'प्रेमाशी' नक्कीच आहे :) एकदा एक प्रेयसी तिच्या प्रियकराला विचारते, प्रेयसी : तुला मी का आवडते? तुझं माझ्यावर प्रेम का आहे? प्रियकर : मला नाही सांगता येत पण माझं खरच तुझ्यावर खूपखूप प्रेम आहे. प्रेयसी : तुझं जर खरच माझ्यावर येवढं प्रेम आहे तर मग तुला एक साधं कारण नाही सांगता येत? छे, मग तु कसा असा दावा करतोस की तुझं माझ्यावर प्रेम आहे? प्रियकर : खरंच मला नाही सांगता येत की, मी तुझ्यावर येवढं प्रेम का करतो. पण तु म्हणतच असशील तर मी तुला सिध्द करून दाखवेन. प्रेयसी : काय सिध्द करून दाखवणारेस. साधं एक कारण सांगत नाहीस आणि सिध्द काय करणार... छे! :( प्रियकर : ठीक आहे बाबा... उम्म्म ... सांगतो तुला, की मी का तुझ्यावर प्रेम करतो ... - कारण तु खूप खूप सुंदर दिसतेस प्रेयसीची कळी आता एकदम खुलते. काही दिवस आनंदात जातात. आणि असाच एक दुदैवी दिवस उजाडतो. प्रेयसीला अचानक अपघात होतो आणि ती कोमात जाते. प्रियकर तिच्या जवळ येतो. तिच्या बाजुला एक पत्र ठेवतो. त्यामध्ये लिहिलेले असते, प्रिये, तुझा आवाज गोड होता म्हणुन मी तुझ्यावर प्रेम करत होतो. तु माझी फ़ार काळजी घ्यायचीस. म्हणुन मी प्रेम करायचो. तुझ्या लोभस हास्यामुळे, तुझ्या प्रत्येक गोष्टींमुळे मी तुझ्यावर प्रेम करत होतो. जर प्रेम करण्यासाठी काहीतरी कारणच लागत असेल तर मग आता मी तुझ्यावर प्रेम करावे असे तुझ्यात काहीच नाही.
|
सोमवार, ६ सप्टेंबर, २०१०
प्रेम करण्याचे कारण!
६:४६:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा