| आम्ही कोण म्हणूनि काय पुससी? आम्ही असू लाडके- देवाचे दिधले असे जग तये आम्हांस खेळावया; विश्वी या प्रतिभाबले विचरतो चोहीकडे लीलया, दिक्कालांतुनि आरपार अमुची दृष्टी पहाया शके सारेही बडिवार येथिल पहा! आम्हांपुढे ते फिके; पाणिस्पर्शच आमुचा शकतसे वस्तूंप्रती द्यावया - सौंदर्यातिशया, अशी वसतसे जादू करांमाजि या; फोले पाखडिता तुम्ही, निवडितो ते सत्त्व आम्ही निके! शून्यामाजि वसाहती वसविल्या कोणी सुरांच्या बरे? पृथ्वीला सुरलोक साम्य झटती आणावया कोण ते? ते आम्हीच, सुधा कृतींमधुनिया ज्यांच्या सदा पाझरे; ते आम्हीच शरण्य, मंगल तुम्हां ज्यांपासुनी लाभते! आम्हांला वगळा - गतप्रभ झणी होतील तारांगणे; आम्हांला वगळा - विकेल कवडीमोलावरी हे जिणे! - केशवसुत |
शनिवार, ११ सप्टेंबर, २०१०
आम्ही कोण
६:०८:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा