Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शनिवार, ११ सप्टेंबर, २०१०

त्या शब्दासाठी

Share

त्या शब्दासाठी

ठेचकाळत निघालेला तो शब्द शोधतोय
तुझा आसरा, वळचणीच्या पागोळ्यासारखा.
तू कोठे आहेस?
असण्यात तुझं नसणं नि
नसण्यात तुझं असणं.
एवढी कशी
तू अगदी निर्गुण, निराकार.
तू कोठेतरी हरवली आहेस जणू.
तो झाडाखालचा वेडा कवी पण शोधतोय तुला.
लोक म्हणतातच, त्याला खुळा प्रेमी; आता तूही सहभागी झालीस वाटतं त्यात.
तु अशी त्याच्या जवळ येतेस नि
त्याला हूल देऊन निघून जातेस ते.
अगं, त्याच्यासाठी नव्हे तर त्या शब्दासाठी तरी तू त्याला गवसं
अगदी
अनाहूतपणे चालत येऊन पाठीमागून मिठी मारावी तशी

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top