Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

शनिवार, ११ सप्टेंबर, २०१०

प्रेम

Share

प्रेम

उघडून डोळे तुलाच बघण्या, तुझ्याच साठी मी जन्मावे
तुझ्याच स्पर्शासाठी उमलून, तव देहाचे सोने ल्यावे
शब्द मुके हे श्वास बनूनी, तव श्वासांना बिलगूनी जावे
श्वासांमधले प्राण निरागस, हृदयी चुंबून अर्पूनी यावे
जवळी असो वा असो कुठेही, मिठीत या आभासी र्‍हावे
श्वासांचे उबदार चांदणे, अंगावरती लेवूनी न्हावे
मिठीत घेता घेता व्याकुळ, श्वासांचेही मीलन व्हावे
सुटता सुटता लज्जबंध हा, हृदयाने उन्मादी गावे
सदैव लागो प्रेमसमाधी, काळ वेळ ना कुणा स्मरावे
या हृदयातील प्रेम गोजिरे, प्रौढपणीही बाल रहावे
या देहातून जाता सखया, मजला व्योमी तूच दिसावे
राखेमधल्या कणाकणातून, तूच, तूच अन तूच उरावे
अस्तित्वाच्या पल्याड जेंव्हा, नाव तुझे आत्म्याने घ्यावे
नकोच मुक्ती येईन धावत, जन्म जन्म हे तुझ्याच नावे

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top