ना पाहिलं ना भेटलं फ़क्त शब्दांत अनुभवलंकधी साथ देत तर कधी कोवळ्या वादात गुंतलेलं मी ऎकलेय भाव तुझे तुझे शब्द माझ्याशी बोलतात हसत, खेळत, बागडत कागदावर असेच उतरतात तु गातोस शब्द माझे ते ओठांत तुझ्या फ़ुलतात सहज, सुंदर, सुमधुर मनात येवुन गुणगुणतात तु कधी असा तर कधी कसा रंग बदलणारा बहुरुपिया जसा मनाच्या खोलीत खोल शिरत गोल फ़िरणारा भोवरा जसा तुझे बदलणारे रंग माझ्यात रंग भरतात भोवर्यात गोल फ़िरत माझे श्वास गुंतवतात तुझे असणारे आभास माझ्यात जिव ओततात एकटेपणात अलगद येवुन सोबतीची चाहुल देतात माझ्या मनात मी तुला असच कोरलय प्रत्यक्ष न भेटता माझ्यातुनच तुला चोरलय अस कस रे हे नातं.....तुझ आणी माझ |
शनिवार, १४ नोव्हेंबर, २००९
अस कस रे हे नातं.....तुझ आणी माझ
२:१२:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा