अजुनही आठवतय मला ते सर्व काही
ती शेवटची एक काळी कुट्ट संध्याकाळ
सोडून जात होतीस मला तू खुप दूर दूर
जीवनाच्या प्रवासात येणाऱ्या त्या काळ्याभोर अंधारात
शेवटी माझ्या शरीराचाच एक भाग निसटुन दूर जात होता
पण जाता जाता खुप काही नेलेस तू...
माझे मन, ह्रदय, विश्वास, धीर सर्व काही
तुटत होतो मी प्रत्तेक सेकंदाला
सेकंदाच्या प्रत्तेक क्षणाला
येशील जेव्हा चुकून कधी पुन्हा याच गावी
तेव्हा त्या वाटेवरून नक्कीच जा
आठवेल पुन्हा तुला सर्व काही
तिच काळी कुट्ट संध्याकाळ
तेच मला सोडून जतानाचे क्षण
पण मी तसा नाही
असेन मी तिथेच कुठेतरी झाडाखाली
पण त्या वेळेला मी एकटा नसेन
कारण माझ्या हातात लेखणी आणि कागद असेल
तुझी वाट पाहता पाहता एक कवी झालेलो असेन
एक विरह कवी..........
गुरुवार, ४ जून, २००९
एक विरह कवी..........
५:४०:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , मराठी कविता , िवराह , Marathi Kavita , Marathi poem
लेबल: कविता , मराठी कविता , िवराह , Marathi Kavita , Marathi poem
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .




0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा