खुप काही बाकी आहे….
वेळ थोडाच आहे गं माझ्याकडे
पण अजुनही खुप काही
करायच बाकी आहे….
आपल्याच माणसान्नी दिलेल्या
जखमा भरायच अजुन बाकी आहे…
तुझ्या प्रेमाची सवय
झाली होती मला!
म्हणुनच तुला विसरायचा
प्रयत्न अजुन बाकी आहे….
तुझ्या अमुल्य वेळेतला थोडा
अजुन वेळ देशिल का मला?
अजुनही प्रेमाचं तुझ
एक कर्तव्य अजुन बाकी आहे….
मला स्मशानापर्यंत
सोडुनच परतु नकोस
माझ्या काळजात तुझ्याबद्द्ल्च्या
भावना अजुन बाकी आहेत……
जाताना त्या तुझ्यासन्गे घेउन जा…
कारण माझ्या देहाच
जळणं अजुन बाकी आहे……
मला जाळताना रडु नकोस वेडे
नाही तर त्या यमालाही सान्गाव लागेल
जरा थाम्बतोस का माझ
तिला समजवण अजुन बाकी आहे…….
गुरुवार, ४ जून, २००९
खुप काही बाकी आहे….
५:४१:०० PM
|
·÷±‡±Sumit±‡±÷·
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
लेबल: कविता , प्रेम कविता , मराठी कविता , मैत्री , Friendship , Marathi Kavita , marathi love poem , Marathi poem , marathi prem kavita
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
आता लिहा मराठीत
सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा