Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, ४ जून, २००९

मला कुठे काय झालयं?

Share

आज् काल मला बघून बरेच लोक विचारतात,
काय झालयं तुला?

मि म्हण्ते " मला कुठे काय झालयं?"

हा मन खूप अशांत असतं..
नजर ही उदास आहे
पण मला कुठे काय झालयं?

कोणी विचारलं, "डोळे का सुजलेत?"
म्हंट्ल, " झोप नाही झाली"
कशी होईल झोप?
दिवस सरुन जातो कामात...
पण रात्र? ति कशी सरेल?
तुझ्या मिठीत आल्या शिवाय झोप तरी कशी येइल?

खरचं मला कुठे काय झालयं?
तु गेल्या नंतर...
मला काही होण्यासाठी,
माझ्यात... मी राहीलेच कुठे?

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top