Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, ४ जून, २००९

पण आज मला तिला भेटायचेच नव्हते....

Share

का माहीत नाही...!
पण आज मला तिला भेटायचेच नव्हते
तिच्या त्या तेज नजरेला नजर भिडवायची नव्हती
कदाचिद तिच्या प्रश्नांची पुरेशी उत्तरेही माझ्याकड़े नव्हती.........
:
मी तिच्या समोर येउन काहीतरी चुकी करतोय
नाहीतर हृदयाची स्पंदने वाढलीच नसती
ती भीतीही नव्हती आणि आनंदही नव्हता
हे असे नेमके कधी होते हा एकच विचार होता.........
:
आज १ वर्षांनी ती मला भेटणार होती
मला तर हा प्लानच वाटत होता मित्र-मैत्रिणींचा
किंवा कदाचिद तो एक योगायोग होता घडवून आणलेला
पण काहीच उपयोग झाला नाही त्याचा.........
:
शेवटी तो एकच प्रश्न तिने विचारला
का नव्हते भेटायचे मला...?
का माहीत नाही...!
पण आज मला तिला भेटायचेच नव्हते.........

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top