Feeds RSS
लाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी । जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी । एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥

गुरुवार, ४ जून, २००९

फक्त जळवण्यासाठी तुला....

Share

एक सांगू का...
तुझी ती मैत्रिण
खुप आवडते मला....
:
बघ विचारून तिला
मेसेज, कॉल करू नकोस
असे कधी सांगते का मला....
:
बोलून बघ कधी तिच्याशी
खुप लाजत बोलते ती
मलाही आवडले तिच्या संगे बोलताना....
:
फिरायलाही आवडते तिला
पण तू सोबत असताना
होकार कसा येणार ओठांवर तिच्या....
:
ए लडके...रागावलीस...!
खरं सांगू का...!
हे सर्व रामायण
फक्त जळवण्यासाठी तुला....

0 टिप्पणी(ण्या):

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

आता लिहा मराठीत

सुचना
ह्या कविता विविध माध्यमातून घेतल्या आहेत .
जर या मधील कोणाची कविता असेल तर आपले पूर्ण नाव टिप्पणी मध्ये सोडावे .
back to top